निर्णय - Novels
by Vrushali
in
Marathi Novel Episodes
निर्णय - भाग १आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने ...Read Moreकट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली. " अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल.
निर्णय - भाग १आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने ...Read Moreकट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली. " अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल.
निर्णय - भाग २दोन वर्षांपूर्वी कुठल्याश्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये त्यांची ओळख झाली. तिची नुसती बडबड चालू असल्याने सगळेच लगेच तिचे फ्रेंड्स बनले. परंतु कोणाशी न जमणाऱ्या त्याच्याशी मात्र तिची अशी गट्टी जमली की सोबत्यांनाही विश्वास बसेना की ते कालच ...Read Moreदोन दिवस दोघांचीही अखंड बडबड चालू होती की सोबत्यानीही त्यांना एकटच सोडणं पसंत केलं होत. निघायच्या आदल्या रात्री कॅम्प फायर संपवून सगळा ग्रुप आपापल्या तंबूत झोपी गेला होता. हे दोघे मात्र पुन्हा शेकोटी पेटवून तिथेच बस्तान मांडून तारे बघत पडले होते. रात्र जशी चढत होती तसे तारे अजूनच चमकत होते. घराच्या बाल्कनीतुन कधीच नजरेस न पडलेले दृश्य पाहताना ती हरवून गेली
निर्णय - भाग ३खिडकीतून येणारा उन्हाचा कवडसा तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याला स्पर्शून तिला जागवायचा प्रयत्न करत होता. रात्रभर तिचे डोळे झोपेच्या अधीन न झाल्याने एक कंटाळवाणी चुरचुर डोळाभर पसरली होती. तिची ओलसर दबलेली उशी तिच्या रात्रभर जागण्याची कहाणी मूकपणे खुणावत ...Read Moreतिने सुजलेल्या डोळ्यांनी मोबाईलकडे पाहिलं. मागच्या काही वर्षांत पहिल्यांदाच तो रात्रभर शांत होता. तिने घाबरतच फोन ऑन केला. त्याचे बरेचसे मिस्डकॉल आणि मेसेजेस तिची वाट बघत होते. खरेतर ती रागातच होती आणि तिला त्याच्याशी बोलायचही नव्हतं पण त्याचे इतके सारे मिस्डकॉल्स बघून तिचा राग विरघळून गेला. लटक्या रागाने तिने त्याचा नंबर डायल केला.... आह...... द नंबर यू आर ट्राइंग इज
निर्णय - भाग ४पाचेक मिनीटात तिचा फोन वाजला. ती खुशचं झाली आणि का ना होईल, त्याचाच तर फोन होता. आता नक्कीच तारीफ करत बसेल.... बट मी आता त्याचा फोन उचलणार नाही.. लेट का केला त्याने.... आल्यावरच बघू दे..... हेहेहे.….. ...Read Moreआवडायचं त्याला अस बेचैन करायला. स्वतःचा लांबलचक घागरा सावरत ती उगाच इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिली तरी तिची नजर न राहवून फोनकडे जात होती. मनात आणि पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तीच हृदय जोराने धडधड करत होत. सर्वांग एक अनामिक जाणिवेने थरथरत होत. " काय म्हणतायत आमच्या सुनबाई...??" दरवाजातून त्याच्या आईने प्रवेश केला. हिरव्या निळसर कॉम्बिनेशनची ही सिल्कची साडी तिने मुद्दाम
निर्णय - भाग ५ घरी आल्यापासून गप्प गप्प बसलेल्या तिला बघून आईने ताडल की नक्कीच हीच काहितरी बिनसलय. रोज देवाकडे ती सगळं नीट होण्यासाठी प्रार्थना करायची पण तरीही देव काही तीच साकडं ऐकत नव्हता. आज पुन्हा काय नवीन घडलं ...Read Moreआणि का...?? आईच्या मायेपोटी तिने हळूच कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. " त्याच्याशी काही बोलणं झालं का..??" पदराला घाईघाईने हात पुसत आईने विचारलं.ती सोफ्यावर तशीच बसून होती....हतबुद्ध..... सर्व जाणीवा हरवल्यासारखी... तिचे डोळे कुठेतरी भिंतीवर रोखलेले होते... कोणत्यातरी विचारांचं जाळं ती गुंफत होती. आईच बोलणं तर तिच्या गावीही नव्हतं.आपल्या लेकीला अस शून्यात हरवलेलं पाहून आईच्या काळजाचाही ठोका चुकला. अशी ती कधीच नव्हती. भग्न वाड्याच्या
निर्णय - भाग ६जळणाऱ्या काळजाची धग आसू बनून तिच्या डोळ्यातून बरसत राहायची फक्त. त्याच्यासोबतच्या आठवणी तिचा मेंदू पोखरून खायच्या. उण्यापुऱ्या दोन वर्षांच रिलेशन. पण घरच्या लावलेल्या दह्यासारखं अगदी घट्ट होत. कोण कोनात मिसळून गेलं होतं हे सांगण कठीण. तीच ...Read Moreअख्ख आयुष्य साखरेसारखं विरघळून गेलं होतं त्याच्यात. रुसवे, फुगवे, लटकी भांडण, प्रेमाच्या आणाभाका, एकत्र राहण्याची वचन आणि एकमेकांवर सर्वस्व उधळून द्यायची ओढ. त्यांच्या पहिल्याच भेटीत त्याने गारुड घातलं होत तिच्या मनावर. त्यानंतरचा प्रत्येक दिवस ती त्याच्या प्रेमात भरल्याप्रमाणे त्याची सावलीच बनून गेली होती. एखाद स्वप्न बघावं तसं ते प्रेमात पडले. ट्रेकच्या ओळखीनंतर असच एकदा सहजच फेरफटका म्हणून माथेरानचीही चक्कर घडलेली. भल्या
निर्णय - भाग ७" हजार वेळा सांगून झाली माझं... मला कुठेही जायचं नाही " ती वैतागली. ' आधीच माझ्या आयुष्याचे बारा वाजले असताना, ह्या लोकांना फिरायचं सुचतय.' ती मनातच चरफडली. ' तो तसा आणि हे... हद्द झालीय.' वैतागून पाय ...Read Moreती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली." का ग छळते तू तिला..?" मगापासून तीच डोकं खाणाऱ्या तिच्या चुलत बहिणीवर आई जरा चिडलीच. " माहितेय ना तुला..." आईचा स्वर गदगदला. काळजातली धग आवंढा बनून गळ्यात दाटली. " म्हणूनच तर तिला बाहेर न्यायचं म्हणतेय... जरा बर वाटेल ना. नुसती कोशात गुरफटून बसलीय..... मला नाही बघवत अस तिला " आईची अवस्था बघून बहिणीच अवसानच गळल.