ते चार दिवस - Novels
by बाळकृष्ण सखाराम राणे
in
Marathi Fiction Stories
25 डिसेंबर 2020 स्थळ- चौकुळ सावंतवाडी
चंद्रिका,रिमा व उषा बंगल्याच्या गच्चीवर गप्पा गोष्टी करत होत्या.वेळ रात्रीची अकरा वाजताची होती.आकाशातल्या चांदण्या .. गार वारा व रातकिड्यांचा आवाज याशिवाय सारा परिसर शांत होता.
"चंद्रिके ; अग ते गाण म्हण ना जे तू 'लिटल चॅम्पस्' च्या फ़ायनलला गायली होतीस. " उषा म्हणाली.
"अग आत्ता या वेळी?"
"ये , गा ना..."रिमाने विनवणी केली.
" गाते ग..."
चंद्रिकेने गाणे सुरू केले.
' सांज ये गोकुळी..सावळी-सावळी '
तिचा सुरेल आवाज वातावरण सजीव करून गेला.तिघिही गच्चीच्या कठड्यावर टेकून उभ्या होत्या.चंद्रिका गाण्यात समरस झाली होती.अचानक चंद्रिकेला मानेवर थंडगार वस्तूचा स्पर्श जाणवला...तिच गाण थांबलं.काय झाल ते बघण्यासाठी उषा व रिमाने मान वळवली. चंद्रिकेच्या मानेवर रिवाॅल्व्हर टेकलेले त्याना ओझरतं दिसल.
"अश्याच उभ्या रहा...आवाज केलात तर चंद्रिका जीवंत राहणार नाही. " एक दबका थंडगार आवाज कानावर आला. तिघिही मुली भयाने गारठल्या. त्यांचा आवाज घश्यातच गोठला.
" हे बघा मी फक्त चंद्रिकेला घेवून जातोय....मी खाली जाईपर्यंत आवाज केलात तर ती जीवंत राहणार नाही. " त्याच थंडगार घोगर्या आवाजात त्याने धमकी दिली.त्याने चंद्रिकेच्या तोंडावर आपला रूंद पंजा ठेवला. जवळपास बेशुध्द पडलेल्या चंद्रिकेला खांद्यावर उचलून घेवून तो दबक्या पावलांनी जिना उतरला.
खाली गाडी सुरू झाल्याचा आवाज आला तस पुतळ्यसारख्या गप्प उभ्या असलेल्या उषा व रिमा एकाच वेळी किंचाळल्या. दोन दिर्घ किंचाळ्या आसमंतात घुमल्या.
ते चार दिवस भाग1-- 25 डिसेंबर 2020 स्थळ- चौकुळ सावंतवाडी चंद्रिका,रिमा व उषा बंगल्याच्या गच्चीवर गप्पा गोष्टी करत होत्या.वेळ रात्रीची अकरा वाजताची होती.आकाशातल्या चांदण्या .. गार वारा व रातकिड्यांचा आवाज याशिवाय सारा परिसर शांत होता. "चंद्रिके ; अग ते ...Read Moreम्हण ना जे तू 'लिटल चॅम्पस्' च्या फ़ायनलला गायली होतीस. " उषा म्हणाली. "अग आत्ता या वेळी?" "ये , गा ना..."रिमाने विनवणी केली. " गाते ग..." चंद्रिकेने गाणे सुरू केले. ' सांज ये गोकुळी..सावळी-सावळी ' तिचा सुरेल आवाज वातावरण सजीव करून गेला.तिघिही गच्चीच्या कठड्यावर टेकून उभ्या होत्या.चंद्रिका गाण्यात समरस झाली होती.अचानक चंद्रिकेला मानेवर थंडगार वस्तूचा स्पर्श जाणवला...तिच गाण थांबलं.काय झाल
ते चार दिवस --भाग 2 26 डिसेंबर 2020 स्थळ - चौकुळ सकाळचे नऊ वाजले होते. शरद गावडेच्या बंगल्यासमोरच्या परिसरात सुमारे शंभराच्यावर गावकरी हजर होते. गावात अपहरणकर्त्याच्या निषेधाचे फलक लागले होते. सर्व स्थानिक वर्तमानपत्रात अपहरणाची बातमी आली होती.सर्वजण पोलीसांची वाट ...Read Moreहोते. एवड्यात पोलीसांची गाडी आली. इन्स्पेक्टर इलियास खान गाडीतून उतरले.उंच व तगडा असा हा तरूण इन्स्पेक्टर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जायचा.घारीसारखी तीक्ष्ण नजर..चौकस बुध्दी.. समोरच्याला कोड्यात टाकणारे प्रश्न यामुळे प्रत्येक केसमध्ये तो यशस्वी व्हायचा.बंगल्याच्या बाहेर ऐवडे लोक बघून तो वैतागला.पण गावकर्यांच्या भावना लक्षात घेवून तो गप्पपणे बंगल्याच्या आत गेला.आत हॉलमध्ये रिमा, उषा,समीर,संजना,प्रशांत व घनश्याम ऊभे होते. " आणखी कोन आहे
ते चार दिवस 27 डिसेंबर 2020 स्थळ - चौकुळ - वेळ सकाळी 6.00 चौकुळमध्ये दाट धुकं पडल होत.अगदी दोन फुटांवर दिसत नव्हत. शरदच्या बंगल्याच्या आवारात एकून दोन कार तयार होत्या.एका कारमध्ये शरद व रेवती होती. तर दुसर्या कार मध्ये ...Read Moreव प्रशांत व त्यांच सामान त्यात लॅपटॉप,त्यानी चौकुळचे शूटिंग करण्यासाठी आणलेला ड्रोन,प्रशांतचे स्केचबुक इत्यादी. गावातले काही तरूण आपणही गाडी घेवून येतो अस म्हणत होते.पण इन्स्पेक्टर खानच्या सूचनेवरून शरदने नम्रपणे त्यांना थांबवले.चंद्रिकेला सोडवल्यावर पहिल्यांदा गावातच घेवून येवू अस सांगितलं. कारच्या पिवळ्या लाईटस् चालू करून कार संथपणे पुढे सरकल्या.गावकर्यांचे डोळे पाणावले होते.आंबोली घाट उतरेपर्यत धुकं राहणार होत.कोणत्याही परिस्थितीत काळोख पडण्यापूर्वी अलिबागला पोहचायच
ते चार दिवस 28 डिसेंबर 2020 वेळ-सकाळी 4.30 स्थळ- अलिबाग इन्स्पेक्टर खान सगळ्यांना चंद्रिकेच्या सुटकेचा प्लान समजावून सांगत होता.त्याने यापूर्वी दोन वेळा समीरने ड्रोनद्वारे तयार केलेले फार्महाऊसचे शूटिंग बघितले होते. तसेच प्रशांतने गुगलमॅपवरून तयार केलेले ड्राॅइंग त्याने अभ्यासाले होते.त्याच्या ...Read Moreप्लान तयार होता. बंगला साधारण मध्यावर होता.बंगल्याच्या उजव्या बाजूला राजमानेची औषधाची छोटी फॅक्टरी होती. बंगल्याच्या पुढच्या बाजूला गेट होते व ते सतत बंद असायचे.पुढच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला डॉबरमॅन कुत्रे बसलेले असत. चंद्रिका पहिल्या मजल्यावरच्या किनार्यालगतच्या खोलीत होती.त्यावर गच्ची होती. सभोवताली माड व पोफळींची दाटी होती. सभोवतालच्या दगडी कुंपणावर दोन फुट उंचीचे तारेचे कुंपण होते. त्यातून इलेक्ट्रिक करंट सोडलेला होता. बंगल्याच्या