ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Detective stories
या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना यांच्याशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.......... प्रकरण एक आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.! ” एका दमात त्याने सांगून टाकले. सुकृत हा एक अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता.पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस चा किरकोळ कार्यभार तो
या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना यांच्याशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.......... प्रकरण एक आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी ...Read Moreआत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.! ” एका दमात त्याने सांगून टाकले. सुकृत हा एक अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता.पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस चा किरकोळ कार्यभार तो
प्रकरण दोन. ओजस,पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस मधे आला.आज जरा निवांत वाटत होता.अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर , पाणिनी पटवर्धन समोर , खास त्याच्या पद्धतीने बसला. आपले दोन्ही पाय गुढग्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेऊन आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर ...Read More“ पाणिनी अचानक तुला कुक्कुटपाल कंपनी मधे कसा काय रस निर्माण झाला ?” “ मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक.” पाणिनी ने गुगली टाकला.त्या दोघात कायमच असे वाक् युद्ध चालायचे. “ ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूचीच कंपनी वाटते मला.मधेच ती जिवंत होते,मधेच गायब होते.” “ म्हणजे? ” पाणिनी ने गोंधळून विचारले “ म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात
प्रकरण तीन “ पद्मनाभ पुंड ला भेटायचंय ” पाणिनी पटवर्धन दारावरच्या रखवालदाराला म्हणाला. “ तुमचं काय नाव? ” “ पटवर्धन ” “ तुम्ही येणार होतात हे त्यांना माहीत होते? ” “ नाही ” “ थांबा मग , विचारतो मी.” ...Read Moreउठून फोन पर्यंत पोचला आणि अगदी हळू आवाजात काहीतरी बोलला फोन मधे तोंड घालून.काय बोलला हे कळायला पाणिनी ला काही मार्ग नव्हता. “ पद्मनाभ घरी नाहीयेत अत्ता.आणि रात्री उशिरा येतील घरी.” “ बायको असेलच ना त्यांची घरी, काही हरकत नाही.भेटतो मी तिला.” सहज बोलल्या सारखा पाणिनी म्हणाला. रखवालदार पुन्हा फोन मधे तोंड घालून बोलला.आणि पाणिनी ला म्हणाला, “ त्यांच्या लक्षात
प्रकरण चार बाहेर आल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला. “ जेवलीस का सौम्या ?” “ नाही,नाही.तुम्ही मला थांबायला सांगितलं होत ना?” “ मी जेवायलाच गेलो होतो.” पाणिनीम्हणाला. “ हे बर आहे तुमचं.मला थांबायला........” “ आणि जेवणा ऐवजी खून ...Read Moreआला.”पाणिनीम्हणाला. “ कोणाचा खून झाला?” “ पद्मनाभ पुंड ”“ अरे देवा ! ” सौम्याउद्गारली.“ असं कसं काय झालं पण? ” “ काय माहिती ? झालं खर ” पाणिनीम्हणाला “ आपलं अशील कोण आहे? ” “ कोणीच नाही. अशिला शिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? ” पाणिनीने विचारले. “ बहुतेक नाही घेऊ शकत.” सौम्याउत्तरली. “ कनकला वर्तमान पत्र वाल्यांकडे
प्रकरण पाच. काया प्रजापति पाणिनी पटवर्धन ला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली. “ इथेच असणार ”ती म्हणाली. “ कोण ? वडील ? ” “ नाही , माझ्या वडलांचा उजवा हात,जतीन भारद्वाज ” “ त्याला खुना बद्दल माहिती आहे? ...Read Moreपाणिनी ने विचारले “ हो.” “ तू अत्ता कुठे चालल्येस हे पण माहिती आहे? ” “ कार मधे टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं या व्यतिरिक्त त्याला काही माहिती नसते.” कायाने उत्तर दिले. तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ येऊ लागली.आतील माणसाने गाडी पार्कींग चालवणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतले. “आलाच जतीन
प्रकरण सहा. “ खायला घालण्याचा विचार आहे का मला ? ” पाणिनी ने विचारले. “ भूक लागली? ” तिने गाडी चालवताना विचारले. “ प्रचंड ” पाणिनी म्हणाला “ आपण वाटेतच कुठेतरी खाऊ रस्त्यात.वडलाना शोधायची घाई आहे.” ती म्हणाली “ ...Read Moreआधीच खूप उशीर झालाय , पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले असेल.” पाणिनी म्हणाला “ मला पण तीच शक्यता वाटत्ये.” “ आपण त्या हॉटेलात पोचायच्या आधी किती वेळ आधी तुझे वडील तिथून निघाले असतील असं तुला वाटतंय?”पाणिनी ने विचारले. “ मला नाही येणार सांगता.” काया म्हणाली. “ मला आश्चर्य वाटतंय ” पाणिनी म्हणाला “ आपण ज्या मोटेल मधे वडलाना शोधलं, तिथून
प्रकरण सात पाणिनीपटवर्धन आपल्या ऑफिस ला आला आणि आपल्या जवळच्या किल्लीने दाराचे लॅच उघडले.आत पाहतो तर सौम्या टेबला वर डोके ठेऊन, हात उशाशी घेऊन चक्क झोपलेली दिसली. “ काय ग अजून घरी नाही गेलीस? ” पाणिनी ने विचारले. “ ...Read Moreकाया बरोबर गेलात तिथे काय झालं त्याची उत्सुकता होती त्यामुळे थांबले इथेच ” सौम्याम्हणाली. “ जेवण तरी झालाय का तुझं?” “ नाही , मी बाहेरून सॅण्डविच मागवले फक्त.” “ तू आता तातडीने घरी जा.इथून पुढे मी तुला कायम माझ्याच बरोबर नेत जाईन म्हणजे तुझ्या खाण्या पिण्याची अळंटळं होणार नाही”पाणिनी म्हणाला नंतर पाणिनी ने तिला सर्व हकीगत कथन केली.नंतर पाणिनी तिला
प्रकरण ८....सौम्याआणि पाणिनी, कोर्नीस होटेल च्या स्वागत कशात उभे होते.वयाने थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला एक माणूस तिथे होता. “ रूम शिल्लक नाही.” तो म्हणाला.“ गर्ग नावाच्या माणसाचे इथे बुकिंग आहे? ” पाणिनीने विचारले.“ आहे.खोली नंबर सहाशे अठरा . काही ...Read Moreआहे? ” त्याने विचारले.“ त्याला फोन करून सांगा मी इथे आलोय म्हणून.”पाणिनी म्हणाला.“ तुम्ही त्याला अपेक्षित आहात का? ”“ तसचं नाही म्हणता येणार.”पाणिनी म्हणाला.“ खूप उशीर झालाय अत्ता पण , एखाद्याला भेटायच्या दृष्टीने.” तो म्हणाला.“ माझ्या हातावर घड्याळ आहे. ” पाणिनी म्हणाला.नाईलाजाने त्याने इंटरकॉम वर ६१८ नंबर ला फोन लावला. “ एक गृहस्थ तुम्हाला भेटायला आलेत.त्यांच्या बरोबर एक बाई आहेत.”
प्रकरण 9 पाणिनी व सौम्या बाहेर पडले. “ मी तुला तुझ्या घरी सोडतोय.आणि तू निमूटपणे झोपणार आहेस.”पाणिनी म्हणाला. “ वेडेपणा करू नका सर. मला तो गर्ग आवडलाय.त्याचं बोलणं ऐकत रहावं अस होत. तुम्ही ती पत्र कधी वाचणार आहात ?” ...Read Moreविचारलं “ उद्या ऑफिस ला आल्यावर, अर्थात ! ” “ छे ! एवढा धीर कुणाला आहे इथे? आपण आपल्या गाडीत बसून गाडीतील दिव्यातच वाचून काढू.” सौम्याम्हणाली. त्या दोघांनी ती सर्व पत्रे वाचून काढली.साहसचे आडनाव बेलवलकर होते., सात आठ पत्र होती.मागच्या दीड-दोन महिन्यातच हा पत्र व्यवहार झाला होता.प्रत्येक पत्रात दोघांतील जवळीक वाढत गेल्याचे लक्षात येत होते. “ चांगला वाटतोय पोरगा.” सौम्याम्हणाली.
प्रकरण १० “सौम्या , प्रणव पालेकर नावाच्या माणसाला शोधायला आपण अत्ता बाहेर पडलोय.”पाणिनी म्हणाला. “ कसा आहे हा माणूस?” सौम्याने विचारणा केली. “ भयंकर हट्टी, बैला सारखे डोके , अशी मूर्ती डोळ्यासमोर येते.मी बघितलेलं नाही त्याला अजून ”पाणिनी म्हणाला. ...Read Moreवेळात ते दोघे पालेकर च्या दारात उभे होते. “ मला पालेकर ला भेटायचं होत. ”पाणिनी म्हणाला. “ तुमच्या समोर उभा आहे त्या देहाला तेच नाव आहे.”पालेकर म्हणाला. रुंद छातीचा ,भडक कपड्यातला माणूस त्याच्या समोर उभा होता. “ कोण तुम्ही? ” “ या देहाला पाणिनी पटवर्धन म्हणतात , लॉयर ! ”पाणिनीने त्याच्याच भाषेत उत्तर दिले. पाणिनी पटवर्धन हे नाव ऐकताच त्याच्या