Kaalchakra book and story is written by shabd_premi म श्री in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kaalchakra is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
कालचक्र - खंड 1 - Novels
by shabd_premi म श्री
in
Marathi Fiction Stories
आदित्य नार्वेकर, वय वर्षे पंचवीस. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण सुरू असणारा आणि सोबतच इतर गोष्टींमधे अग्रेसर असणारा एक बिंधास्त माणूस. संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. आपल्या मेहनती, देखण्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने सगळीकडे स्वतःची ओळख निर्माण केली होती. ह्या साऱ्या गोष्टींमुळे कॉलेजमधल्या अनेक मुली त्याच्यावर जीव लाऊन असायच्या. त्यातल्याच एका प्रीती नावाच्या मुलीने आदित्यला प्रपोजही केले. आदित्यला प्रपोजेसची कधी कमतरता नव्हतीच. पण प्रीतीचा स्वभाव पाहता त्याला ती आवडलीही होती. त्यामुळे त्याने तिला होकार दिला. काही काळातच दोघांचीही जोडी पूर्ण कॉलेजमधे सगळ्यांच्या परिचयाची झाली. सगळ्यांना त्यांच्या नात्या बद्दल कळले होते. कॉलेजमध्ये चर्चा रंगू लागल्या. जसं जशी वेळ पुढे निघत गेली, तसं तसे त्यांचे नातेही घट्ट होऊ लागले.
आदित्य नार्वेकर, वय वर्षे पंचवीस. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण सुरू असणारा आणि सोबतच इतर गोष्टींमधे अग्रेसर असणारा एक बिंधास्त माणूस. संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. आपल्या मेहनती, देखण्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने सगळीकडे स्वतःची ओळख निर्माण ...Read Moreहोती. ह्या साऱ्या गोष्टींमुळे कॉलेजमधल्या अनेक मुली त्याच्यावर जीव लाऊन असायच्या. त्यातल्याच एका प्रीती नावाच्या मुलीने आदित्यला प्रपोजही केले. आदित्यला प्रपोजेसची कधी कमतरता नव्हतीच. पण प्रीतीचा स्वभाव पाहता त्याला ती आवडलीही होती. त्यामुळे त्याने तिला होकार दिला. काही काळातच दोघांचीही जोडी पूर्ण कॉलेजमधे सगळ्यांच्या परिचयाची झाली. सगळ्यांना त्यांच्या नात्या बद्दल कळले होते. कॉलेजमध्ये चर्चा रंगू लागल्या. जसं जशी वेळ पुढे
दुसरा दिवस उजाडला. तयारी करून नऊच्या सुमारास आदित्य ऑफिसला निघतो. ऑफिसला पोहचेपर्यंत वेळ झाल्याने नेहमीसारखे आपले काम करत सगळे आपापल्या जागी बसलेले दिसतात. ऑफिसमध्ये प्रीतीला जॉईन होऊन काहीच दिवस झाले होते. सगळ्यांना आदित्य आणि प्रीतीबद्दल जाणीव होतीच. पुढे लग्नच ...Read Moreआहोत. इथवर साऱ्यांना सांगून झालं होतं. सगळं काही सुरळीत सुरू असतं. दुपारी एकच्या दरम्यान लंच ब्रेक होतो. आदित्य आणि त्याचे सहकारी एकत्र जेवायला बसतात. आदित्य आपल्या शर्टच्या दोन्ही बाह्या वर करून जेवायला सुरुवात करतोच की जेवताना अचानक हातावरच्या टॅटू सदृश्य व्रणावर प्रीतीची नजर पडली. तो पाहून प्रीती आदित्यला म्हणते.प्रीती: अरे वा !!! आदित्य, मस्त गोंदलय रे.आपल्या हाताकडे प्रीतीची नजर गेलेली