नवा प्रयोग... - Novels
by Sane Guruji
in
Marathi Children Stories
भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. केळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते.
भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी ...Read Moreकेळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते.
किती तरी वर्षांनी सखाराम घरी आला होता. ते लहानसे तालुक्याचे गाव. परंतु रेल्वे होती म्हणून महत्त्व होते. आईला, वडील भावाला आनंद झाला. परंतु सखाराम घरात ताई दिसली नाही. ताई त्याची मागे आलेली बहिण. लहानपणीच तिचे लग्न लावण्यात आले होते. ...Read Moreएकदोन वर्षांतच पती वारला. सासरी हाल होत म्हणून ती घरीच येऊन राहिली होती. सखारामला ताईची आठवण येऊन रडू येई. त्याला ताईच्या शतस्मृती येत. गावातच सासर. एकदा दादा ताईला घेऊन सासरी गेला. विधवा बहिणीला घेऊन सासरी गेला. परंतु दादा परत निघताच तीही त्याच्या पाठोपाठ धावली. त्याने तिच्या थोबाडीत मारली.
“मग येणार ना रोज स्वच्छतासप्ताह पाळायला? आपण रोज सकाळी ६ ते ८ जाऊ. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही. २६ सप्टेंबरला आपण सुरू करू. २ ऑक्टोबरला समाप्त करू. गांधीसप्ताह स्वच्छतासप्ताहाच्या रूपाने आपण साजरा करू. याल ना सारे?” घनाने विद्यार्थ्यांना विचारले. ...Read Moreविद्यार्थ्यां त्याच्या वर्गाला येत. तो त्यांना रविवारी दोन तास शिकवीत असे. कधी संस्कृत तर कधी इंग्रजी, कधी गणित तर कधी मराठी असे विषय तो घेई. घना कोणताही विषय शिकवू शकत असे. विद्यार्थ्यांशी संबंध यावा आणि स्वत:चे ज्ञानही जिवंत राहावे म्हणून तो ते दोन तास देत असे. कधी कधी तो त्यांना इंग्रजी वर्तमानपत्रांतले चांगले लेख वाचून दाखवी. कधी त्यांना राजकारण समजावून देई. त्याचा रविवारचा तास म्हणजे मेजवानी असे.
दिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. खिशातून टकली काढून तो तेथे कातीत बसला आणि रामनाम म्हणत ...Read Moreत्याची क्षणात तन्मयता झाली.
“पुरे सारे ढोंग.” व्यवस्थापक येऊन म्हणाले.
“ढोंग आहे की मनापासून कर्म होत आहे, प्रभूला माहीत. तुम्ही तरी ढोंग करू नका म्हणजे झाले. येथे महात्माजींची तसबीर तुम्ही लावली आहे, तिला साक्ष ठेवून वागता ना?” घनाने विचारले.
“महात्माजी तर मालक म्हणजे ट्रस्टी म्हणतात. तुमचा निराळा प्रचार.”
“परंतु ट्रस्टी म्हणजे आपण काय समजता?”
कामगारांची प्रचंड सभा भरली होती.
पगार झाला होता.
काही दिवस रेटणे आता शक्य होते.
पगार हाती पडल्यावर संप – असे मुद्दामच ठरवण्यात आले होते.
परवापासून संप!
चाळी-चाळींतून प्रचार होत होता.
सुंदरपुरात खळबळ होती.
सभास्थानाकडे माणसांची रीघ सुरू आहे. गाणी म्हटली जात आहेत. “हम नहीं हटनेवाले, हम ...Read Moreलढनेवाले” अशी ती गाणी होती.
रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर सर्वांनी कसे वागावे ते सांगणारे एक पत्रक घनाने तयार करून ...Read Moreहजारो प्रती करून वाटा.” तो म्हणाला.
“सखाराम येत आहेत ना?”
“हो, त्याची बहीणही येत आहे. ती स्त्रियांत जाईल. खूप काम करील.”
“छान होईल! कधी येणार दोघे?”
“उद्या सकाळी येतील. उद्याच्या सभेत त्यांची भाषणे ठेवू. त्यांची ओळख करून देऊ. सखाराम म्हणजे देवमाणूस! कामाचाही त्याला उरक आहे. मी पकडला गेलो तर काळजी करू नका. शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शक. आपली हिम्मत हीच मैत्रीण.” घना गंभीरपणे बोलत होता.
संप सुरू होऊन जवळ जवळ महिना झाला. कामगारांची दुर्दशा होती. खेड्यापाड्यांतून थोडीशी धान्याची मदत झाली. परंतु शेतक-याजवळ जादा धान्य अलीकचे फारसे शिल्लकच नसे. रेशनिंगचे दिवस. दुकानांतून रोखीने आणावे लागे. रेशनिंगमध्ये उधारीने कोण देणार? इतर माल कदाचित कोणी उधारीने दिला ...Read Moreरेशनिंगचे काय? जवळ दिडकी उरली नाही, थोडा फंड अजून शिल्लक होता. त्यातून गरीब लहान मुलांना दूध देण्यात येई. डाळे-मुरमुरे वाटण्यात येत. परंतु वेळ कठीण आली होती. मालक काहीच करायला तयार नव्हाता. सरकारही स्वस्थ! काय करावे हा प्रश्न होता.
मुलांना घेऊन मालती जंगलात गेली होती. मुले झाडावर चढत होती. तेथील त्या प्रचंड वटवृक्षांच्या पारंब्यांना धरून वर जात होती. कोणी फुले गोळा करीत होती. कोणी फुलपाखरांना धरीत होती.
मालती एका शिलाखंडावर बसली होती. तेथून समोरची शेते दिसत होती. बाग दिसत ...Read Moreओसाड जमीन लागवडीखाली आली. तेथे मळे फुलले. परंतु माझे जीवन? मी अशीच का राहणार? घनश्याम का लग्न करू इच्छित नाही? मी त्यांना कसे विचारू? माझ्या मनातील वेदना कोणास सांगू? तिचे डोळे भरून आले. तिला आईची आठवण आली. ती तेथे डोळे मिटून बसली होती. तो तिच्याजवळ हातात फुलांची माळ घेऊन घना उभा होता. तिने डोळे उघडले तो समोर घना! ती उठली. दोघे समोरासमोर उभी होती.