निर्धार..... लढूनी जिंकण्याचा - Novels
by prajakta panari
in
Marathi Women Focused
अमृतवृक्ष घाटात शोधाशोध सुरू होती. बरेच दिवस एका मुलीचा शोध चालू होता. त्या मुलीचे आई-वडीलही पुरते खचून गेले होते पण तरीही त्यांना अजूनपण आशा वाटत होती की आपली मुलगी आपल्याला नक्की सापडेल. पण रोजरोजच्या शोधान पोलिस वैतागले होते. कारण जवळजवळ दोन वर्षे झाली ते एकाच मुलीच्या शोधात गुंतले होते . त्यांना वरून पण ऑर्डर येत होती कि बास झाल आता हाती काही धागादोरा पण लागत नाही आहे. याचाच अर्थ ती मुलगी जिवंत नसणार. तिने खरच आत्महत्या केली असेल.
.................
ये आई बाबांना सांग ना मला पुढे शिकायच आहे. खर्च झेपत नाही म्हणून नेहमी मुलींचच का शिक्षण बंद करायच. मला पुढे शिकायच आहे ग. मला तुमच नाव मोठ करायच आहे. नेहमी असच म्हटल जात कि मुल घराण्याच नाव उजळवतात आणि मुली परक्यांच्या घरी जावून त्यांच नाव मोठ करतात. मला समाजातल हे वाक्य खोट करून दाखवायच आहे. तु सांग ना बाबांना तुझ ते नक्की ऐकतील. सांग ना ग आई सांग ना बाबांना सांग ना....
तोवर घंटीचा आवाज ऐकू येतो आणि कावेरीबाई लेकिच्या आठवणींतून बाहेर येतात. शेजारच्या अनुष्का वहिनी आल्या होत्या. तशा त्या सानू हरवल्यापासून दररोजच यायच्या. कारण आपण गेल्यामुळे त्या थोड सानूचा विचार सोडून देतील व त्यांना त्यांच्या कामात आपली मदत पण होईल या इराद्याने.
अमृतवृक्ष घाटात शोधाशोध सुरू होती. बरेच दिवस एका मुलीचा शोध चालू होता. त्या मुलीचे आई-वडीलही पुरते खचून गेले होते पण तरीही त्यांना अजूनपण आशा वाटत होती की आपली मुलगी आपल्याला नक्की सापडेल. पण रोजरोजच्या शोधान पोलिस वैतागले होते. कारण ...Read Moreदोन वर्षे झाली ते एकाच मुलीच्या शोधात गुंतले होते . त्यांना वरून पण ऑर्डर येत होती कि बास झाल आता हाती काही धागादोरा पण लागत नाही आहे. याचाच अर्थ ती मुलगी जिवंत नसणार. तिने खरच आत्महत्या केली असेल. ................. ये आई बाबांना सांग ना मला पुढे शिकायच आहे. खर्च झेपत नाही म्हणून नेहमी मुलींचच का शिक्षण बंद करायच. मला पुढे
सलोनी भरभर चालत होती. आज तिला खूपच उशीर झाला होता. किर्र अंधार पडला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते. का कोणास ठाऊक पण आज तिच मन खूपच अस्थिर झाल होत. काहितरी अघटीत घडणार आहे अस राहून राहून वाटत होत. ...Read Moreअस होत नेहमी मुलींनी काय कोणाच वाईट केलेल असत कि त्यांना त्यांची स्वप्न गुंडाळावी लागतात. दुसरे जे सांगतील ते ऐकावेच लागते. स्वतः हाच्या मनाच थोडही ऐकायला मिळत नाही आणि वर अशी राहा तशी राहा हि सुनावणी. एकिकडून अस विचारांच चक्र चालू होत तर दुसरीकडून काहितरी अघटीत घडणार अशी चाहूल लागत होती. ............ दोस्ती आईला समजवत होती. ये आई बास ग
अग ये रख्मा य जरा इकड ये. अग हे बघ, इत यक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडले, लवकर काय तर आण. हिच्यावर काय बी नाय आपण बिगी बिगी घरला नेवूया.मग हिला तयार कर, हि अजून जिती हाय, हिला लागलीच अस्पतळात ...Read Moreपायजे. व्हय व काय यक यक उलट्या काळजाची लोक असत्यात, एकली बाय दिसली म्हंजी हैदोस घालत्यात, नरकात सडावीत असली मुडदी. ये आ ग बास कर आदी इतन निवूया हिला लय वायट हालात हाय हिची. यळ केला तर काय बी व्हइल. ती दोघ तिला घेऊन दवाखान्यात नेत्यात. आव डाक्टर हे बघा या पोरीची कशी गत झाले, हिला लवकर बघा. हा बर