Nirdhar - 1 books and stories free download online pdf in Marathi

निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 1

अमृतवृक्ष घाटात शोधाशोध सुरू होती. बरेच दिवस एका मुलीचा शोध चालू होता. त्या मुलीचे आई-वडीलही पुरते खचून गेले होते पण तरीही त्यांना अजूनपण आशा वाटत होती की आपली मुलगी आपल्याला नक्की सापडेल. पण रोजरोजच्या शोधान पोलिस वैतागले होते. कारण जवळजवळ दोन वर्षे झाली ते एकाच मुलीच्या शोधात गुंतले होते ‌. त्यांना वरून पण ऑर्डर येत होती कि बास झाल आता हाती काही धागादोरा पण लागत नाही आहे. याचाच अर्थ ती मुलगी जिवंत नसणार. तिने खरच आत्महत्या केली असेल.
.................
ये आई बाबांना सांग ना मला पुढे शिकायच आहे. खर्च झेपत नाही म्हणून नेहमी मुलींचच का शिक्षण बंद करायच. मला पुढे शिकायच आहे ग‌. मला तुमच नाव मोठ करायच आहे. नेहमी असच म्हटल जात कि मुल घराण्याच नाव उजळवतात आणि मुली परक्यांच्या घरी जावून त्यांच नाव मोठ करतात. मला समाजातल हे वाक्य खोट करून दाखवायच आहे. तु सांग ना बाबांना तुझ ते नक्की ऐकतील. सांग ना ग आई सांग ना बाबांना सांग ना....
तोवर घंटीचा आवाज ऐकू येतो आणि कावेरीबाई लेकिच्या आठवणींतून बाहेर येतात. शेजारच्या अनुष्का वहिनी आल्या होत्या. तशा त्या सानू हरवल्यापासून दररोजच यायच्या. कारण आपण गेल्यामुळे त्या थोड सानूचा विचार सोडून देतील व त्यांना त्यांच्या कामात आपली मदत पण होईल या इराद्याने.
............
स्वराला आज ती ने एका चित्रपटात गायलेल्या गाण्याबद्दल उत्कृष्ट गायिका हा अवॉर्ड मिळणार होता. तस तीला आता एकच वर्ष झाल होत. फिल्म इंडस्ट्रीत येवून. तरीसुद्धा ती ने तिच्या आवाजाने जग जिंकून घेतल होत. आज तिने वर्षभर घेतलेल्या मेहनीचे सोने झाल्याचा दिवस होता. त्यामुळे ती खूप खुश होती. .........

सानूचा आज साखरपुडा होता. तिच्या घरच्यांनी शिक्षणाचा खर्च परवडणार नाही म्हणून ती च लग्न करायच ठरवलेल, मुला कडचे पण चांगले होते त्यांनी तुमची मुलगी आमच्या घरची सून बनून येणार हेच खूप आहे आमच्यासाठी. आम्हाला दुसर काही नको अस सांगितलेल आणि म्हणूनच हे स्थळ हातच जावू नये म्हणून तीच्या घरचे धडपडत होते. पण ती मात्र खूप नाखुश होती. कारण तिच्या शिकण्याची इच्छा राख होत होती, ती च्या स्वप्नांचे पंख छाटले जात होते. एक गृहिणी म्हणून चार खोलीत बंद राहाव लागेल या विचारानच तिला भरभरून येत होत. ती पुढे कस जगायच या विचारातच हरवली होती. ...............
सानूचा साखरपुडा पार पडला. आणि लग्नासाठी पुढच्या महिन्यातली तारीख ठरवली गेली............

सलोनी मैत्रिणीकडे गेली होती. आतून खूप दुःखी होती. मैत्रिणीशी बोलल्यावर तरी बरे वाटेल मन मोकळे होईल म्हणून मैत्रिणीला भेटायला गेली होती. तिथे गेल्यावर तिला वेळेचे भानच नाही राहिले. त्या खूप दिवसांनी भेटल्या होत्या. त्यामुळे खूप दिवस मनात भरलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होत्या. काही वेळ बालपणी शाळेत असताना करत असलेल्या खोड्या आठवून आनंदी होत होत्या आणि मनाशीच म्हणत होत्या किती भारी होत ना शालेय जीवन. शाळेतल्या मैदानात मोकळेपणाने फिरता येत होत. कोणी हे करू नको ते करू नको अस सांगायला येत नव्हत. मस्त अभ्यास करायचा, अभ्यास नाही केला तर शिक्षकांच्या छड्डीचे फटके खायचे. ते खात असताना घाबरून हात मागे
मागे घ्यायचे. घरी गेल्यावर आईला त्या करामती सांगायच्या. दुसऱ्या दिवशी परत उशीरा उठून आवरायला घाई घाई करायची. माझ्या वेण्या घाल, माझा डबा भर लवकर , असे म्हणून आईला गडबडीत आवरायला भाग पाडायच. नंतर बाबांचा हात धरून, ते खाऊसाठी देत असलेले पैसे घेऊन शाळेत जायच. ...
शाळेत गेल्यावर रांगेत उभे राहून राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणायची. एक हात पुढे करून प्रतिज्ञा म्हणायची. हे सार किती भारी असायच. एक दिवस सुट्टी काढल्यावर मैत्रिणी दुसऱ्या दिवशी चिडवायच्या तु काल न येवून चूक केलीस बघ काल आम्हाला एक चित्रपट दाखवला. काही तास अॉफ गेले म्हणून आम्ही खूप धमाल केली. खूप खेळलो. मग काय अस चिडवल्यावर वाटायचे की उगचच चुकवली शाळा आता कधीच चूकवायची नाही अस ठरवून. रोज शाळेला जायच. ......
घ्या पोरींनो चहा घ्या. झाल्या कि नाहीत तुमच्या गप्पा अग दिवालावणीची वेळ होत आली. सलोनी म्हणाली हो ग दोस्ती खरच खूप वेळ झाला. कसा दिवस सरत आला कळलच नाही. मला निघायला हव आता नाहीतर खूपच उशीर होईल. बाबा पण ओरडतील. त्यामुळे मी निघते आता चल बाय बाय... आता कधी भेट होईल काय माहित. अग सलोनी थांब ना चहा तर पिवून जा. दोस्तीची आई सलोनीला म्हणू लागले.
नको काकि परत कधीतरी येते. आता खूप उशीर होत आहे. आई घरी वाट बघत असेल. आणखी उशीर नको करायला. मी जाते आता. ...
काय बाई तुम्ही आजकालच्या पोरी नुसत सुसाट सुटता. कस व्हायच तुमच पुढे देव जाणे..
दोस्तीच्या आईच हे बोलण ऐकून सलोनी आणि दोस्ती एकसूरात म्हणाल्या व्हायच तस होतय त्यात काय.
यावर दोस्तीची आई म्हणाली कल्याण आहे तुमच.... बर सांभाळून जा ग सलोनी.. हा काकि बाय बाय.......

दोस्तीच्या आईचे डोळे पाण्याने भरून आले. त्यादिवशी सलोनी जे घरातून गेली ते परत आलीच नाही. तेव्हाच आपण तिला आजची रात्र थांब म्हणालो असतो तर कदाचित सलोनी दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पोहोचली असती घरी. का बर आपण तिला असच जावू दिल. अशी कशी बुद्धी फिरली असेल आपली तेव्हा......

क्रमशः

Share

NEW REALESED