सावध - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Thriller
दहा हजार बक्षीस ! या महिन्याच्या ३ तारखेला द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक वर आपल्या गाडीचा टायर बदलत असणाऱ्या व्यक्तींनी फोक्स व्हॅगन आणि गडद रंगाच्या सिटी होंडा यांची झालेली धडक पाहिली असेल आणि त्यातील सिटी होंडा चे अचूक वर्णन कनक ओजस याच्या गुप्तहेर कंपनीला पोस्ट बॉक्स नंबर ७७७ ला केले, तर त्या व्यक्तीला दहा हजार चे बक्षीस मिळेल.अपघात पाहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की टायर बदलणाऱ्या व्यक्तीने धडक देणाऱ्या सिटी होंडा चा नंबर टिपून ठेवला आहे,परंतू अँब्यूलन्स येण्यापूर्वी ती व्यक्ती टायर बदलून झाल्यामुळे निघून गेली होती.त्यामुळे आता त्याच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे.
कनक ने पाणिनी च्या समोर पेपर टाकला. पाणिनी ने जाहिरात वाचली.
“ छान, ही जाहिरात काहीतरी माहिती मिळायला उपयोगी पडेल हे नक्की.” पाणिनी म्हणाला
“काय मागवलं आहेस खायला?” कनक समोरची खुर्ची ओढून पाणिनी ने विचारलं
आज खूप दिवसांनी दोन मित्र बाहेर निवांतपणे हॉटेल मधे बसले होते.
“ पाणिनी, सौम्या ला तू नेहेमीच ऑफिसच्या खर्चाने हॉटेलात जेवायला नेतोस. मला मात्र ते भाग्य क्वचित मिळतं. आज सगळ बिल तू द्यायचं आहेस.” कनक म्हणाला.
सावधप्रकरण १ दहा हजार बक्षीस ! या महिन्याच्या ३ तारखेला द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक वर आपल्या गाडीचा टायर बदलत असणाऱ्या व्यक्तींनी फोक्स व्हॅगन आणि गडद रंगाच्या सिटी होंडा यांची झालेली धडक पाहिली असेल आणि त्यातील सिटी होंडा ...Read Moreअचूक वर्णन कनक ओजस याच्या गुप्तहेर कंपनीला पोस्ट बॉक्स नंबर ७७७ ला केले, तर त्या व्यक्तीला दहा हजार चे बक्षीस मिळेल.अपघात पाहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की टायर बदलणाऱ्या व्यक्तीने धडक देणाऱ्या सिटी होंडा चा नंबर टिपून ठेवला आहे,परंतू अँब्यूलन्स येण्यापूर्वी ती व्यक्ती टायर बदलून झाल्यामुळे निघून गेली होती.त्यामुळे आता त्याच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे.कनक ने पाणिनी च्या समोर पेपर टाकला.
प्रकरण २ऑफिस मधून निघाल्यापासून बरोब्बर अर्ध्या तासाने पाणिनी ने मायरा कपाडिया च्या दाराची बेल वाजवली होती. वाजवण्यापूर्वी त्याचा नंबर २०८ असल्याची खात्री केली.दोन तीन वेळा बेल वाजवूनही ना आतून कसला आवाज आला ना कोणी दार उघडायला आलं. पाणिनी ने ...Read Moreआपल्या खिशातून किल्ली काढली आणि बोटात धरून लॅच मधे घालून फिरवली. दार सहजपणे आवाज न करता उघडलं गेलं. आत हॉल मधे अंधार होता.पलीकडची बेडरूम लाईट लावल्यामुळे दिसतं होती. बेड नीट लावलेला नव्हता.त्यावर एक गाऊन अस्ताव्यस्त फेकलेला दिसतं होता आणि बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. पाणिनी ने पुन्हा दार ओढून घेऊन लावले मिनिटभर वाट पाहून पुन्हा बेल वाजवली.“ कोण आहे?”
प्रकरण ३“ मला सगळं ऐकायचंय.” सौम्या म्हणाली.“ एक अत्यंत सुंदर, बोलक्या डोळ्यांची, निष्पाप, मनमोकळी सुंदरी भेटली.” पाणिनी म्हणाला“ सर प्रेमात पडलेले दिसताहेत.” सौम्या कनक ला म्हणाली.“ पाणिनी, केवढी होती ती मुलगी?” कनक ओजस ने विचारलं.“ पंचवीस ते तीस.”“ लग्न ...Read Moreआहे? म्हणजे तुला चान्स आहे की नाही पाणिनी? आणि पोटापाण्याला काय करते ती?” –कनक“ सारांश सांगायचा झाला तर तो एक मोठा सापळा होता.” पाणिनी म्हणाला“ सौंदर्याने भुलवण्याचा सापळा? ”“ नाही.सकृत दर्शनी तुझी जाहिरात तिने बघितली आणि विचार केला असावा की जाहिरात जरी गुप्त हेराच्या नावाने असली तरी त्यामागे वकील असावा.” पाणिनी म्हणाला“ सांग मला, तिच्या फ्लॅट चं दार उघडल्यावर काय
प्रकरण ४ मायरा आणि आदित्य कोळवणकरला आपल्या ऑफिस मधे बसवून पाणिनी पटवर्धन पुन्हा मायरा कपाडिया च्या अपार्टमेंट जवळ आला. आत जाण्यापूर्वी त्याने सौम्याला फोन लावला.“ काय चाललंय तिकडे? अजून किती वेळ काढू शकतेस तू? ” पाणिनी ने विचारलं.“ या ...Read Moreपंधरा मिनिटांची हमी देते तुम्हाला.” सौम्या म्हणाली.“ छान. तेच मला जाणून घ्यायचं होतं.”“ काळजी घ्या सर.”“ नाही सौम्या.आम्लेट करायचं तर अंडं फोडायला लागणारच. बर मी बंद करतोय फोन.”पाणिनीकडे तिच्या फ्लॅट ची किल्ली होतीच तरीही त्याने दक्षता म्हणून बेल वाजवली.दोन तीन वेळा वाजवूनही आतून दार उघडले गेले नाही,तेव्हा त्याने आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडलं.आत गेला दार बंद केलं. आधी आला त्या
प्रकरण ५आपल्या केबिन मधे जाण्यापूर्वी पाणिनी कनक ओजस च्या ऑफिसात आला.त्याचं ऑफिस ही त्याच मजल्यावर होतं.सौम्या,पाणिनी, तारकर, आणि कनक हे वर्गमित्र होते.अगदी खास,घट्ट मित्र.पुढे तारकर पोलिसात भरती झाला, आपल्या हुशारीने मोठया पदावर पोचला.कनक ओजस ने स्वतःची गुप्तहेर संस्था काढली.पाणिनी ...Read Moreप्रथम पासून वकीली करायची असेच ठरवले होते त्याप्रमाणे तो शहरातला एक नावाजलेला वकील झाला. दोघांनी एकाच इमारतीत आणि एकाच मजल्यावर ऑफिस घेतलं.सौम्या ला पाणिनी ने आपल्याच व्यवसायात स्वतः ची सेक्रेटरी म्हणून सामावून घेतलं. पाणिनी आपली तपास काढायची कामे कनक ला द्यायचा. हे चौघेही घनिष्ट मित्र असूनही मैत्री आणि कर्तव्य यात वितुष्ट येऊ देत नसत.“ तुला मोठाच जॅकपॉट लागला पाणिनी.” कनक
प्रकरण ६ आपल्या गाडीतून सौम्या ला घेऊन धीरेंद्र तोंडवळकर च्या पत्त्यावर जात असतांना, पाणिनी सौम्याला म्हणाला, “ काहीही म्हण ही पोरगी आवडली मला.” “ पैशाच्या मागे लागलेली पोरगी आहे.” –सौम्या “ मला माहिती आहे ते.तिने सिटी होंडा चा नंबर ...Read Moreघेतला, ब्लॅकमेल करायच्या उद्देशाने.पण नंतर तिचा विचार बदलला.का माहीत नाही.पेपरात जाहिरात पाहून तिने सनदशीर मार्गाने बक्षीस रुपात दहा हजार मिळवायचं ठरवलं. काहीही असो मला तिचा मोकळेपणा आवडला.मी कीर्तीकर च्या गाडीची तपासणी केली आहे.गाडीचे पोचे दिसताहेत.उडालेला रंग पुन्हा नव्याने दिलाय, मागचा टायर नवा कोरा टाकलेला दिसतोय.आणि.....” “ आणि... त्याने गाडी चोरीला गेल्याची सांगितलेली गोष्ट खरी सुध्दा असू शकते.” सौम्या म्हणाली. “
प्रकरण ७पाणिनी आणि सौम्या तिथून बाहेर पडले. वाटेत गाडी चालवत असताना पाणिनी सौम्याला म्हणाला, “ठीक आहे सौम्या, मी तुला वाटेत एका ठिकाणी सोडतो. तू तिथून टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये जा आणि कनक ओजसला इथे घडलेल्या सगळ्या घटनांचा तपशील सांग. ...Read Moreतुला थोड्या वेळाने फोन करतो मी आत्ता पुन्हा कीर्तीकर ला भेटायला जातोय”“काळजी घ्या सर. या सगळ्या घटना म्हणजे एक मोठा सापळा वाटतोय मला”“लक्षात आलय माझ्या. कोणीतरी गेम टाकतय आपल्यावर आणि मला ते शोधून काढायच कोण आहे ती व्यक्ती” पाणिनी म्हणालात्यानंतर दोघे एकमेकांशी फारसे बोलले नाहीत पाणिनी शांतपणे गाडी चालवत राहिला. एका विशिष्ट ठिकाणी पाणिनीने गाडी थांबवली. सौम्या गाडीतून खाली उतरली.“ठीक
प्रकरण ८ मायरा कपाडिया ने आपली गाडी एकदम थांबवली आणि दार उघडून घाबरून उडी मारून बाहेर आली. “काय आहे हे?” पाणिनी कडे बघून ती उद्गारली.“एक माणूस आडवा पडलाय एक तर तो झोपलेला असावा किंवा पिऊन पडला असावा किंवा मेलेला ...Read Moreपाणिनी सावधपणे म्हणाला. “चल बघूया ”“पुढे होऊन पाणिनीने गॅरेज चे दार सताड उघडलं. त्याबरोबर गाडीच्या हेडलाईटचा झोत त्या माणसाच्या संपूर्ण शरीरावर पडला पाणिनीने खाली वाकून तपासलं तर त्या माणसाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हरच्या गोळीच्या आकाराचे एक भोक पडलं होतं. “सकृत दर्शनी तो मेला आहे असं दिसतय”मायरा कपाडिया अडखळत एक पाऊल पुढे आली. तिच्या घाबरलेल्या श्वासाचा स्पष्ट आवाज पाणिनीला ऐकू आला.“काय आहे हे?
सावध प्रकरण ९ टॅक्सी करून ते पुन्हा आपल्या ऑफिस पाशी पोहोचले इमारतीच्या तळमजल्यावर बसलेल्या वॉचमनला पाणिनी ने विचारलं. “मला कोणी भेटायला आल होत?” “छे: कोणी सुद्धा नाही.” वॉचमन उत्तर दिलं सौम्या आणि पाणिनीने एकमेकांकडे बघितलं. “सौम्या आपण कनक ओजसच्या ...Read Moreआधी जरा नजर टाकू.” कनक चं ऑफिस पाणिनीच्याच ऑफिसच्या मजल्यावर होतं. आपल्यासमोर फायली आणि फोन घेऊन कनक कामात गढला होता. “काय म्हणतोयस कनक? कसं काय चाललंय?” “छान तू सांगितलेलं काम चालू केलं. तुला हवी असलेल्या रिव्हॉल्व्हरची माहिती मिळाली आहे.” कनक म्हणाला, “बऱ्याच जणांना ती रिव्हॉल्व्हर विकली गेल्ये. म्हणजे एकमेकांकडून हस्तांतरित झाली आहे. सगळ्यात शेवटची विक्री उदक प्रपात कंपनी याला झाली
सावध प्रकरण १० पियुष चा निरोप घेऊन पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा सौम्या काम करत होती “पोलिसांकडून काही कळलं का सौम्या म्हणजे त्यांचा फोन आला होता का ?किंवा ते येऊन गेले का?” “काहीही नाही. त्यांच्याकडून काहीच नाही” पाणिनीच्या ...Read Moreआठ्या पडल्या “हे मला समजत नाहीसे झाले की अजून पर्यंत पोलीस आपल्यापर्यंत कसे पोहोचले नाहीत. खरं म्हणजे तास दोन तासापूर्वीच ते इकडे यायला हवे होते.” “सर, तुम्हालाही त्यांच्याकडून फोन वगैरे काही आला नाही?” “नाही ना मी पियुष ला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो” “पियुष ची तब्येत कशी आहे आता?” “ठीक आहे सुधारतोय तो त्याची तब्येत सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग घडला आहे”
सावध प्रकरण ११पाणिनीने आपली गाडी मुख्य रस्त्याला आणून वाहतुकीमध्ये आणेपर्यंत सौम्या त्याच्याशी काही बोलली नाही.“आता सांगाल का सर काय झालंय?”“ती हरामखोर सैतानाची अवलाद!”“म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे तिने पोलिसांना कळवलं नाही?”“तिनं नाही कळवलं पोलिसांना. मी मगाशी बघितल त्याच अवस्थेत ते ...Read Moreअजूनही गॅरेजच्या फरशीवर पडलेल आहे. मगाचच्या आणि आताच्या स्थितीत फरक एवढाच आहे त्या प्रेताच्या उजव्या हाताजवळ एक रिव्हॉल्हर ठेवण्यात आलय”“म्हणजे सर आत्महत्या भासवण्यासाठी का?”“हो. आत्महत्या भासवण्यासाठी”“सौम्या, मी थोडा वेळ गाडी बाजूला लावून थोडा विचार करणारे” पाणिनी म्हणाला“आपण झालेला हा सगळा प्रसंग विसरून जाऊ शकणार नाही का सर?”“मला त्याही गोष्टीचा विचार करू दे. हे बघ इथे जरा गाडी लावायला जागा आहे,
सावध प्रकरण १२दुसऱ्या दिवशी पाणिनी आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा कनक ओजस त्याची वाट बघत थांबला होता. “पाणिनी, तू मला जयद्रथ परब याची माहिती काढायला सांगितली होतीस.” कनक म्हणाला“हो बरोबर आज सकाळचे वर्तमानपत्र मी बघितलं त्यानं मायरा कपाडिया च्या गॅरेजमध्ये ...Read Moreकेल्याचं दिसतंय.”“पेपरामध्ये तसं आलंय पाणिनी, प्रत्यक्षात बऱ्याच विचित्र घटना घडलेत पोलिसांना मायरा कपाडिया कडून माहिती मिळाली आहे ती एकदम सैरभैर झाली होती रात्री गाडी आत ठेवण्यासाठी त्यांनी गॅरेजचा दरवाजा उघडला आणि तिला आत मध्ये प्रेत पडलेले दिसले तिच्याबरोबर एक कोणतरी मैत्रीण होती. ती तिच्या घरी राहायला आली होती हे दृश्य बघितल्यावर त्यांनी गाडी तिथेच चालू ठेवली आणि घरात जाऊन पहिल्यांदा
सावध प्रकरण १३पाणिनीची हाताची बोटे वाळायच्या आधीच रिसेप्शन आत आली “पटवर्धन साहेब, बाहेर आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी वैशाख इंगळे आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे”“सौम्या त्यांना आत घेऊन ये.”दोघेही आत आले वैशाख इंगळेने पाणिनीशी हस्तांदोलन केले पाणिनीने दोघांना खुर्चीत ...Read Moreम्हणून सांगितलं“मिस्टर तोंडवळकर तुमची हरकत नसेल तर बोलण्याचं काम मी करतो तुम्ही बोलू नका” वैशाख तोंडवळकर ला म्हणाला“माझी काही हरकत नाही” तोंडवळकर म्हणाला“मिस्टर पटवर्धन मला वाटतं तुम्ही पण बोलायला इच्छुक आहात” “नक्कीच” पाणिनी म्हणाला“तुम्हीच आधी विषय काढला तर बरं होईल मिस्टर पटवर्धन” वैशाख इंगळे म्हणाला“मिस्टर वैशाख इंगळे शेवटी पैसा बोलतो हेच खरं”“मला मान्य आहे मिस्टर पटवर्धन, थेट विषयाला हात घाला”“विषय
सावध प्रकरण १४ दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसच्या इमारतीत शिरला तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. बाहेरच्या पानाच्या टपरीवर कनक ओजसचा एक माणूस पाणिनीला दिसला.पाणिनीच्या मागोमाग तो आत आला आणि लिफ्ट मधे शिरला.लिफ्ट मधे ते दोघेच होते ते पाहून ...Read Moreपाणिनीच्या कोटाच्या खिशात एक कार्ड सरकवले.आणि पाणिनी चा मजला येण्यापूर्वीच तो खाली उतरला.सौम्या च्या अक्षरात कार्डावर निरोप खरडला होता, ‘ ऑफिसात बरेच पाहुणे आलेत.सावध.’पाणिनीने लायटर पेटवून कार्ड जाळून टाकले.ऑफिसचे दार उघडले.आत गर्दीच झाली होती.इन्स्पे.तारकर त्याला सामोरा आला.“ तुझ्याच ऑफिसात तुझे स्वागत आहे पाणिनी.”“ अरे तू कसा काय इथे अचानक?” आश्चर्य दाखवत पाणिनी म्हणाला“ माझ्या बरोबर आलेली मंडळी तुझ्या परिचयाची नाहीत
सावध प्रकरण १५“हो नक्की लगेच करूया पोलिसांना सहकार्य करायला मी तयारच असतो. पण हेही लक्षात ठेव तारकर की माझ्या अशिलाचा माझ्यावर जो विश्वास आहे त्याला मी तडा जाऊन देऊ शकत नाही”तारकर ने त्याच्या हाताखालच्या पोलिसाला खूण केली हाताचे ठसे ...Read Moreएक उपकरण त्यांने आपल्या बॅगेतून बाहेर काढलं “उठून उभा रहा” तारकर म्हणाला“ओह नो. मी बसूनच करतो हा प्रकार.” पाणिनी हसून म्हणाला आणि त्याने आपला हात त्या पोलिसाच्या पुढे केला.हा सगळा प्रकार गडकरी बघत होता तो अचानक उद्गारला, “मला नाही वाटत मी बघितलेला माणूस हा आहे. मी जो माणूस बघितला होता तो खूपच जाड होता आणि..,.”“जरा गप्प बस आणि थोडा वेळ
सावध प्रकरण १६दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पाणिनी आपल्या टेबलवर वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचत होता.‘ वकिलाच्या हाताचे ठसे खुनी हत्यारावर सापडले.खुलासा करण्यास वकिलाचा नकार. स्त्री अशिलाला पोलिसांनी खुनाच्या आरोपात पकडले. वकिलाने किल्ली वापरून अशिलाच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याचे निष्पन्न.’“ सर ...Read Moreतारकरला त्या पत्राची आणि किल्लीची माहिती द्यायला नको होती.” सौम्या म्हणाली.“ तो एकमेव मार्ग होतं माझ्याकडे, मायरा ला सांगण्याचा,की मला तिला काय टिप द्यायची होती ते.” पाणिनी म्हणाला“ मला नाही समजलं.” –सौम्या.“ समज मायरा ने नाही तर वेगळ्याच कोणीतरी ती दोन्ही पत्रे लिहिली असतील आणि किल्ली पाठवली असेल तर? मायरा ने पाठवली असेल किल्ली तर मी तिच्या परवानगीनेच अपार्टमेंटमध्ये शिरलो
प्रकरण १७त्यानंतर पुढचा तासभर पाणिनी कनक ओजसच्या ऑफिसमध्ये सँडविच खात आणि कॉफी पीत बसला होता कनक च्या हातात सुद्धा कॉफीचा मग होता तेवढ्यात फोन वाजला कनक बऱ्याच वेळ फोनवर बोलत होता नंतर पाणिनी ला म्हणाला" तुझा अंदाज बरोबर ठरला ...Read Moreपत्रकारांनी त्या मोठ्या खोक्याचा तुझ्या गॅरेज पर्यंत पाठलाग केला. त्यांना तो खोका शेवटी रिकामाच आढळला. त्यांनी लगेच इन्स्पेक्टर तारकर ची भेट घेतली आणि त्याला ही सर्व हकीगत सांगितली आता तारकर प्रचंड वैतागलाय" कनक म्हणालापुन्हा एकदा कनक चा फोन वाजला कनकने तो कानाला लावला थोडा वेळ तो काहीतरी बोलला नंतर फोन ठेवून पाणिनी इकडे वळलापाणिनी रुद्रांश गडकरी कुठेतरी निघून गेलाय. त्याचा
सावध प्रकरण १८ दुसऱ्या दिवशी तारकर थेट पाणिनीच्या केबिन मधे घुसला आणि थेट विषयाला हात घातला.“ माझा साक्षीदार रुद्रांश गडकरी ने तुला ओळखलं तुला माहिती असेलच. ”“ खरचं की काय?” पाणिनी ने विचारलं.“ काल रात्री त्याने तुला उभं राहिलेलं ...Read Moreचालताना पाहिलं आणि ओळखलं.”“ कुणी सांगितलं तुला हे?”“ होळकर म्हणाला मला.” –तारकर उत्तरला.“ मी काल रात्री कुठे होतो हे त्याला कसं समजलं?”“ जनसत्ता मधे तू पत्रकारांना मुलाखत देताना आणि दारात उभा असतांना चे फोटो आलेत पाणिनी. होळकर ने सांगितलेल्या हकीगतीत एक खटकणारी गोष्ट आहे की तिथे फक्त फोटोग्राफर होते,वार्ताहार नव्हते.आणि ही बातमी फक्त जनसत्ता मध्ये आल्ये. इतर पेपरात का नाही
प्रकरण १९मायरा कपाडिया विरुद्धचा खटला सुरू झाला, न्यायाधीश आगवेकर आपल्या खुर्चीत येऊन बसले त्यांनी हातोडा आपटला."राज्य सरकार विरुद्ध मायरा कपाडिया खटला आपण सुरू करतो आहोत दोन्ही बाजूचे वकील तयार आहेत?"सरकारी वकील हेरंब खांडेकर रुबाबदार आणि एखाद्या पहिलवानासारखे देहयष्टी असलेले ...Read Moreहोते. त्यांचा आवाज सुद्धा आपल्या व्यक्तीमत्वा सारखाच भारदार होता"आम्ही तयार आहोत न्यायमूर्ती महाराज. आम्ही कोर्टाला एक मोकळेपणाने सांगू इच्छितो की जयद्रथ परब याचा मृत्यू एक गूढ आहे पण ही प्राथमिक सुनावणी असल्यामुळे आम्हाला एवढेच सिद्ध करायचे की गुन्हा घडलेला आहे आणि आरोपीला तो गुन्हा करण्याचे सबळ कारण होतं, संधी होती. मला खात्री आहे की जसजशी ही केस पुढे जाईल आणि
सावध प्रकरण २०पाणिनी उठला आणि प्रश्न विचारायला तारकरकडे गेला. “ तुला काय माहीत की मी पॅकिंग कंटेनर मधून इमारतीच्या बाहेर पडलो?”“ मी माझा मुद्दा स्पष्ट करतो. मी स्वतः तुला कंटेनर मधे बसताना किंवा त्यातून बाहेर पडताना पाहिलं नाही.मी जे ...Read Moreवाचलं किंवा मला जे सांगण्यात आलं त्यावरून मी ते उत्तर दिलं.”“ मला कंटेनर मधे बसतांना ज्याने पाहिलं अशा एखाद्याशी तू बोललास का?” पाणिनी म्हणाला.“ नाही.” तारकर म्हणाला.“ मग मी कंटेनर मधून बसून बाहेर पडलो असं वाटायचं तुला काय कारण होतं?”“ कारण तो एकमेव मार्ग होता तुझ्यासमोर, पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर पडण्याचा.” तारकर म्हणाला.“ वस्तुस्थिती अशी होती तारकर की मी संध्याकाळी
सावधप्रकरण २१ “ मिस्टर खांडेकर, मला वाटतंय की तुम्ही मला आव्हान दिले होतेत की रुद्रांश गडकरी ला साक्षी साठी बोलावणार आहात, तर मग बोलवा. बघूया आपण त्याला आता काय म्हणायचं आहे ते.”“ अशी वैयक्तिक टीका मला आवडणार नाही मी....” ...Read Moreखेकसत म्हणाले.“ पटवर्धन फक्त तुम्हाला तुमच्या आव्हानाची आठवण करून देताहेत.” चेहेऱ्यावरील हसू दाबत न्या. आगवेकर म्हणाले.“ मी केवळ पाच मिनिटांची विश्रांती घ्यावी अशी कोर्टाला विनंती करतो.” हेरंब खांडेकर म्हणाले.“युअर ऑनर, साक्षीदाराला शिकवण्यासाठी सरकारी वकील ही मागणी करत आहेत.माझा विरोध आहे.” पाणिनी म्हणाला“ साक्षीदाराला शिकवण्याची काही गरज नाहीये.”“ मग बोलवा त्याला लगेच साक्षीला.” पाणिनी म्हणाला“ मला माझ्या सहकारी वकिलाशी बोलायचं आहे
सावध प्रकरण २२ न्यायाधीश आपल्या आसनावरून उठताच मायरा पाणिनीला म्हणाली, “ तुम्ही भारीच आहात.त्या साक्षीदाराला मस्तच गंडवलत तुम्ही.” “ त्याने मला ओळखलं नाही हे मी दाखवू शकलो पण तू तिथे नव्हतीस हे आपल्याला सिध्द करता आलं नाही तर तू ...Read Moreहोतीस हे सिध्द होणार आहे.” पाणिनी म्हणाला “ ते बरोबर आहे.” मायरा म्हणाली. “ आणि ज्या बंदुकीने खून झालाय परब चा, ती रिव्हॉल्व्हर तुला आदित्य कोळवणकर ने दिली होती. आणखी एक म्हणजे परितोष हिराळकर चा सुध्दा खून झालाय आणि तू त्याचा वीस लाख रकमेचा आयुर्विमा उतरवला आहेस.” “ अहो पटवर्धन, आमचं लग्न ठरलं होतं.एका स्त्रीला लागणारी सुरक्षितता, घर,प्रेम सर्व काही
प्रकरण २३दुपारी दोनच्या जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा ज्या वेळेला कोर्टाचे कामकाज सुरू झालं तेव्हा अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले . त्यांचे चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती."युवर ओनर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे माझं असं मत झालं आहे की ज्या ...Read Moreने खून झाला आहे त्याचा संबंध ठशाच्या दृष्टीने या खटल्यातले वकील पाणिनी पटवर्धन यांच्याशी जोडला जाऊ शकतो आणि कुणाच्या वेळेचा विचार केला तर त्या वेळेला पाणीनी पटवर्धन हे आरोपीच्या बरोबर गॅरेजमध्ये असल्यामुळे आरोपीचा देखील संबंध या रिव्हॉल्व्हरशी जोडला जाऊ शकतो. पाणिनी पटवर्धन यांना ओळखणारा जो साक्षीदार आम्ही आणला होता त्याला पाणिनी पटवर्धन यांनी काहीतरी मखलाशी करून ओळख पटवून अशक्य करून
सावधप्रकरण २४दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं तेव्हा न्यायाधीश म्हणाले, “ मिस्टर कीर्तीकर ची उलट तपासणी चालू होती काल, ती पुढे चालू करा.”खांडेकर उठून उभे राहिले. “ युअर ऑनर, एक छोटी विनंती आहे, काल कोर्ट संपल्यावर घरी जातांना कीर्तीकर ला ...Read Moreअपघात झालाय, त्याला मुका मार लागलाय त्यामुळे आज कोर्टात येत येणार नाही त्याला आणि त्याची उलट तपासणी पूर्ण करता येणार नाही.”“ ठीक आहे तुम्हाला आणखी कोणाची साक्ष घ्यायची आहे खांडेकर?” न्यायाधीश म्हणाले.“ नाही. खरं म्हणजे आरोपीला परब चा खून करायचं कारण होतं कारण तो तिचा पूर्वाश्रमीचा पती होता, तिला त्याच्या पासून सुटका हवी होती, तिच्या रिव्हॉल्व्हरनेच त्याचा खून झाला आहे
सावधप्रकरण २५कीर्तीकर पिंजऱ्यात येऊन उभा राहिला.“ हिराळकर, दुग्गल आणि तू असे एकत्र व्यवसाय करत होता?”“ नाही ” कीर्तीकर म्हणाला.“ तुम्ही एकमेकांना ओळखत होतात?” पाणिनी म्हणाला.“ हो.”“ तुमची ओळख कुठली?”“ आम्ही एकाच क्लब चे मेंबर आहोत.बऱ्याच वेळा आम्ही संध्याकाळी पत्ते ...Read Moreएकत्र बसतो. ”“ तुम्ही तिघे स्टोन क्रशिंग च्या आणि बांधकाम व्यवसायात एकत्र भागीदार आहात ही वस्तुस्थिती आहे की नाही?”“ बिलकुल नाही.”“ माझ्याकडे आर्थिक बँकेचे खाते उतारे आणि तुमच्या भागीदारीची कागदपत्रे आहेत.पुरावा म्हणून मी ती कालच कोर्टात सदर केली आहेत.”“ तुम्ही माझीच उलट तपासणी का घेताय पटवर्धन? आदित्य ला दोषी ठरवण्यासाठी तुम्ही माझी साक्ष घेणार होतात ना? ”“ त्याच दिशेने जातोय