Savadh - 1 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | सावध - प्रकरण 1

Featured Books
  • Reborn to be Loved - 4

    Ch - 4 पहली मुलाकातपीछले भाग में आपने पढ़ा.…शीधांश सीधा कार...

  • बीच के क्षण

    अध्याय 1: संयोग बारिश की हल्की-हल्की बूँदें कैफ़े की खिड़किय...

  • My Devil Hubby Rebirth Love - 46

    अब आगे थोड़ी देर बाद कार आके  सिंघानिया विला के बाहर रुकी रू...

  • 16 साल बाद तलाक

    मेरा नाम रश्मि है. मेरी शादी एक बहुत अच्छे घर में हुई थी. मे...

  • जंगल - भाग 3

     -------------"मुदतों बाद किसी के होने का डर ---" कौन सोच सक...

Categories
Share

सावध - प्रकरण 1

सावध

प्रकरण १

दहा हजार बक्षीस ! या महिन्याच्या ३ तारखेला द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक वर आपल्या गाडीचा टायर बदलत असणाऱ्या व्यक्तींनी फोक्स व्हॅगन आणि गडद रंगाच्या सिटी होंडा यांची झालेली धडक पाहिली असेल आणि त्यातील सिटी होंडा चे अचूक वर्णन कनक ओजस याच्या गुप्तहेर कंपनीला पोस्ट बॉक्स नंबर ७७७ ला केले, तर त्या व्यक्तीला दहा हजार चे बक्षीस मिळेल.अपघात पाहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की टायर बदलणाऱ्या व्यक्तीने धडक देणाऱ्या सिटी होंडा चा नंबर टिपून ठेवला आहे,परंतू अँब्यूलन्स येण्यापूर्वी ती व्यक्ती टायर बदलून झाल्यामुळे निघून गेली होती.त्यामुळे आता त्याच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे.

कनक ने पाणिनी च्या समोर पेपर टाकला. पाणिनी ने जाहिरात वाचली.

“ छान, ही जाहिरात काहीतरी माहिती मिळायला उपयोगी पडेल हे नक्की.” पाणिनी म्हणाला

“काय मागवलं आहेस खायला?” कनक समोरची खुर्ची ओढून पाणिनी ने विचारलं

आज खूप दिवसांनी दोन मित्र बाहेर निवांतपणे हॉटेल मधे बसले होते.

“ पाणिनी, सौम्या ला तू नेहेमीच ऑफिसच्या खर्चाने हॉटेलात जेवायला नेतोस. मला मात्र ते भाग्य क्वचित मिळतं. आज सगळ बिल तू द्यायचं आहेस.” कनक म्हणाला.

“ माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नाही पण.”

“ सूप सांगितलंय, आणि स्टार्टर. ”

“ ही जाहिरात वाचून समज कोणी पुढे आलं माहिती द्यायला पण त्यांची साक्ष तुझ्या अशिलाला उपयोगी नाही ठरली किंवा तुला हवंय त्यापेक्षा उलट काही माहिती देणारी ठरली तर?” –कनक

“ तसं नाही होणार,ते खरं बोलणारे असतील तर आपल्याला काळजीचे कारण नाही. फक्त मला ते आयत्या वेळी माझ्या विरोधी पक्षाचे साक्षीदार म्हणून यायला नको आहेत.” पाणिनी म्हणाला

वेटर त्यांनी ऑर्डर केलेलं खाणं घेऊन आला. “ साहेब तुमच्या सेक्रेटरीचा फोन होता, तुम्हाला निरोप आहे की तुमच्या जाहिरातीला उत्तर आलंय.”

“ मस्तच.लगेचच प्रतिसाद आला बघ. पेंढारकर चं कंबरेचं हाड मोडलंय. धडक देणाऱ्या त्या फोक्स व्हॅग चा ड्रायव्हर मला हवाय. ” पाणिनी म्हणाला

“ बहुदा तो दारू प्यालेला असावा.त्याच वेळी तो पकडला गेला असता तर ते सिध्द करत आलं असतं आता ती वेळ गेली.आता तो अशी काही कथा रचेल की पेंढारकर च्याच गाडीने जणू काही त्याला धडक दिली.

तो पर्यंत त्यांचं खाणं संपल आणि पुढची ऑर्डर घेण्यासाठी वेटर आला तेव्हा त्याच्या हातात एक पाकीट होतं.

“ ओजस साहेब तुमच्या ऑफिस मधून हे पाठवलंय तुमच्यासाठी.” वेटर म्हणाला.

कनक ओजस ने ते मोठं पाकीट उघडलं.आतून एक किल्ली खाली पडली.शिवाय एक पत्र होतं ते कनक ने बाहेर काढलं.

“ अडचणीतल्या परिस्थितीला उत्तर देणारी किल्ली.” पाणिनी म्हणाला. त्याच्या कडे दुर्लक्ष करून कनक ने पत्र वाचायला सुरुवात केली.

‘ज्यांच्या कडून तुम्ही तुमच्या जाहिरातीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा करताय ते तुम्हाला स्वतःहून कधीच संपर्क करणार नाहीत.माझी सद्सद विवेकबुद्धि मला स्वस्थ बसून देत नाही म्हणून मी तुम्हाला माहिती देतो आहे. धडक देणाऱ्या फोक्स व्हॅगन चा नंबर मायरा कपाडिया या बाईने लिहून ठेवला होता.तिच्या बरोबरच्या माणसाला तिने तसं केल्याचं सांगितल्यावर तो माणूस प्रचंड घाबरला.त्याने तिला सांगितलं की तो तिच्या बरोबर तिथे असल्याचं कोणाला कळलं तर तो आयुष्यातून उठेल.तो माणूस कोण आहे आणि तो का घाबरला याची मला अजून माहिती नाही पण मायरा कपाडिया ही माझी चांगली मैत्रीण आहे.आणि त्या माणसाला संरक्षण देण्यासाठी ती तुमच्या जाहिरातीला शंभर टक्के प्रतिसाद देणार नाही.पण माझ्याकडे तिच्या अपार्टमेंट ची डुप्लीकेट किल्ली आहे. तिचं हे अपार्टमेंट नंबर २०८, दक्षिण गोंडोला इथे आहे पाच तारखेला दुपारी दोन ते पाच या वेळात तिथे कोणी नसेल.बाहेरच्या हॉल मधे एक टेबल आहे, त्या टेबलच्या वर एक रॅक आहे,त्यात चामडी कव्हरची एक छोटी नोटबुक आहे,त्याच्या शेवटून दुसऱ्या पानावर तुम्हाला हव्या असलेल्या फोक्स व्हॅगन चा नंबर टिपून ठेवला आहे.तुम्हाला हवी असलेली गाडी तीच आहे याची खात्री झाली की मी तुम्हाला संपर्क करून माझी बक्षिसाची रक्कम दहा हजार तुमच्याकडून वसूल करीन.’

तुमचा मित्र.

पत्राखाली सही नव्हती.

“ मला जरा नजरेखालून घालू दे पत्र.” पाणिनी म्हणाला

कनक ने त्याच्या हातात पत्र दिलं पाणिनी ने बारकाईने तपासलं. “अत्यंत नवशिक्या टायपिस्ट ने जुन्या टाईपरायटर वर टाइप केलंय.”

“ मला पण तेच वाटतंय.” कनक म्हणाला.

“ मला तर हा एक सापळा वाटतोय आपल्या साठी लावलेला. जरा सौम्या चं मत काय आहे बघतो.बायकांना जरा वेगळी नजर असते.” पाणिनी म्हणाला आणि त्याने कनक ने दिलेली किल्ली पाणिनी ने तपासली, त्यावर २०८ नंबर कोरलेला होता.किल्ली आपल्या खिशात टाकून तो म्हणाला, “ सापळा असला तरी आपण तो नजरेआड करून नाही चालणार.”

“ मला वाटलंच होतं, तुझ्या स्वभावाप्रमाणे तुला ते किल्ली वापरून त्या घरात शिरण्याचा मोह होणार.त्या वेळी तू पकडला गेलास तर ते पहिल्यांदा हवेत गोळी घालतील आणि मग प्रश्न विचारतील. ....” कनक म्हणाला.

“ ते काहीही असलं तरी हातात आलेली एवढी माहिती सोडून देणे परवडणार आहे का आपल्याला?”

“ नाही परवडणार.”

“ मला हा सापळा का वाटतोय माहित्ये कनक?” कनक ने मान हलवली. “ त्या माणसाला जर एवढी माहिती आहे की गाडीचा नंबर लिहिलेली वही कुठे आहे आणि त्या फ्लॅट ची किल्ली सुध्दा त्या माणसाकडे आहे तर त्यानेच आपल्याला गाडीचा नंबर कळवून बक्षिसाची रक्कम का नाही मागितली?” पाणिनी ने विचारलं.

“ आहे खरा माशाला लावतात तसा गळ.” कनक म्हणाला.

“ त्याला लावलेलं आमिष मला मोहात पाडतंय कनक.”

“ त्याच आधारावर आमिष लावलेलं असतं गळाला.” कनक म्हणाला.

खाणे संपवून दोघेही उठले.आपल्या ऑफिस मधे आले.दोघांची ऑफिसेस एकाच मजल्यावर होती. आल्यावर पाणिनी ने सौम्या ला ते पत्र आणि किल्ली दाखवली.

“ तुला काय वाटतंय पत्र वाचून सौम्या?”

“ मला नाही येणार सांगता.” सौम्या म्हणाली.

“ अरे ! मी तर कौतुकानं कनक ला सांगितलं की तू काहीतरी क्लू देशील.” पाणिनी म्हणाला “ सापळा असेल?”

“ कोणासाठी सर? ” सौम्या ने विचारलं.

“ आता बरोब्बर प्रश्न विचारलास.”

“ जर एखाद्याने असा विचार केलं असेल की कनक ओजस ला हे पत्र मिळाले की तो लगेचच तुम्हाला ते दाखवेल, आणि तुम्ही तिथे वैयक्तिक जाल,तर हा सापळा आहे असं म्हणता येईल, तुमच्यासाठी लावलेला.पण हे पत्र कनक ने दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून आलंय ही गोष्ट विचारत घेतली तर पाठवणारा माणूस स्वाभाविक पणे अस गृहित धरत असेल की पत्र मिळताच कनक ओजस त्याचा एखादा माणूस त्या फ्लॅट मधे पाठवेल तर तो सापळा आहे असं नाही म्हणता येणार.”

पाणिनी ने पटल्या प्रमाणे मान डोलावली.

“ तर मग सर, हा सापळा नाही असं मानलं तर पुढे काय? आणि सर,ते पत्र त्या बाईनेच म्हणजे मायरा कपाडिया नेच लिहिले नसेल कशावरून?” सौम्या ने शंका विचारली.

“ का? ” पाणिनी ने विचारलं.

“ कदाचित तिच्यासोबत असलेल्या माणसाला चारचौघांसमोर न आणण्यासाठी आणि बक्षीसाची रक्कम मिळवण्यासाठी.तुम्हाला वाटतं सर, की तुम्हाला एकदा ती गाडी शोधता आली तर त्याच गाडीने दुसऱ्या गाडीला ठोकल्याचं तुम्ही सिध्द करू शकाल?”

“ मला वाटतं मी करू शकेन सिध्द.ती गाडी खूप जोरात जात होती पुढे जाणाऱ्या पेंढारकर च्या गाडीला तिने धडक दिली.ती गाडी पूर्ण पणे फिरली.आणि दोन्ही गाड्यांची तोंडे एकमेकासमोर आली आणि पुहा धडक झाली.टॅक्सी सगळ्यात पेंढारकर च्या खुब्याचे हाड मोडले.” पाणिनी म्हणाला

“मायरा कपाडिया बाबत काय करायचं ठरवलंय तुम्ही? ” सौम्या ने विचारलं.

“ तिला भेटणार आहे मी.”

“ तुम्हाला मिळालेली किल्ली वापरून तिच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन? कोणालातरी साक्षीदार म्हणून घेतल्या शिवाय जाऊ नका सर.” –सौम्या

“ ती घरी नसतांना घरी जायचं डोक्यात नाहीये माझ्या. आपल्याला हवी असलेली साक्षीदार ती आहे की नाही हे तिच्याशी बोलूनच ठरवता येईल. ” पाणिनी म्हणाला

“ दुपारी दोन ते पाच या वेळात भेटणार? ” –सौम्या

पाणिनी हसला. “ नाही सौम्या.त्या वेळेमधे ती नसणार.मी तिला दहा ते अकरा या वेळेत भेटेन. ”

“ माझी मदत लागेल? साक्षीदार म्हणून?”

“ नाही.”

“ आपल्याला आलेल्या पत्राबद्दल काही बोलणार आहात?”—सौम्या.

“ नाही बहुतेक. सौम्या या पत्राची मला एक झेरॉक्स दे. कदाचित गरज वाटली तर मी तिला झेरॉक्स दाखवीन. मूळ पत्र आपल्याचकडे सुरक्षित राहील.”

सौम्या ने दिलेली झेरॉक्स घेऊन पाणिनी निघाला.

“ सर, तुम्हाला अटक झालीच तर मला कळवा, मी जामिनाची व्यवस्था करून तुम्हाला भेटायला येईन.” सौम्या हसून पाणिनी ला डोळा मिचकावून म्हणाली.

“ धन्यवाद सौम्या.”

“ ती घरात नसेल तर कृपा करून किल्ली ने दार उघडून आत जाऊ नका.का कोण जाणे, मला या प्रकरणात काहीतरी आवडलं नाहीये.”-सौम्या

“ मला तर काहीच आवडलं नाहीये सौम्या. काय पैज लावशील माझ्याशी, मी आत गेल्यावर मला एखादं प्रेत सापडणार नाही या बद्दल? ” पाणिनी ने विचारलं.

“ तुमच्याशी मी पैज लावायची डेरिंग कधी करणार नाही सर.”

“ ते मूळ पत्र आणि ते ज्या पाकिटातून आलंय ते पाकीट आपल्या सेफ मधे ठेऊन दे.कदाचित पोलिसांशी वाद घालताना मला ते लागेल.” पाणिनी म्हणाला

“ म्हणजेच ती घरात नसेल तर किल्ली लावून आत शिरायचा विचार नक्की आहे तर तुमचा.”-सौम्या

“ मी कधी काय करीन भरोसा नाही देता येणार सौम्या.” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.

(प्रकरण १ समाप्त.)