बळी -१ केदार सकाळपासून त्याच्या आॅफिसमध्ये काम करत होता, आणि आतापर्यंत बोअर झाला होता, आज. त्याचा जिवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर सिद्धेश आला नव्हता. सिद्धेशच्या खळखळुन हसण्यामुळे एरव्ही ही खोली भरून गेलेली असायची! समोर आलेल्या फाइल्स कधी संपायच्या, हे कळत सुद्धा नसे! कोणाची तरी चाहूल लागली, म्हणून केदारने दरवाजाकडे पाहिलं; त्याची नवपरिणित पत्नी रंजना आत आली! सकाळपासून त्या खोलीत बसून

Full Novel

1

बळी - १

बळी -१ केदार सकाळपासून त्याच्या आॅफिसमध्ये काम करत होता, आणि आतापर्यंत झाला होता, आज. त्याचा जिवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर सिद्धेश आला नव्हता. सिद्धेशच्या खळखळुन हसण्यामुळे एरव्ही ही खोली भरून गेलेली असायची! समोर आलेल्या फाइल्स कधी संपायच्या, हे कळत सुद्धा नसे! कोणाची तरी चाहूल लागली, म्हणून केदारने दरवाजाकडे पाहिलं; त्याची नवपरिणित पत्नी रंजना आत आली! सकाळपासून त्या खोलीत बसून ...Read More

2

बळी- २

बळी - २ मीराताईंच्या आग्रहास्तव केदार रंजनाला बघायला काटेगावला गेला खरा; पण त्याने स्पष्ट शब्दांत सांगून ठेवलं होतं," मला जर पसंत नसेल, तर नकार द्यायचा-- माझ्यावर दबाव आणायचा नाही" मीराताईंनीही त्याची अट कबूल केली होती; ...Read More

3

बळी - ३

बळी - ३ रंजनाच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या वैवाहिक जीवन कसं असेल; विषयी केदारला शंका वाटू लागली होती; पण त्याने मनातले विचार झटकून टाकले, " मी उगाच घाबरतोय! हे कदाचित ती इथे नवीन असल्यामुळे असेल--- ती काही दिवसांनी नक्कीच बदलेल! माणसाची पारख व्हायला थोडा काळ जावा लागतो! ---- " तो स्वतःची समजूत घालू लागला. "मी विचारलं---- थोडा वेळ गार्डनमध्ये बसूया का? आपण खूप लवकर निघालो आहोत! सिनेमा सुरू व्हायला वेळ आहे! ---" तो रंजनाला विचारू लागला, "नको! आपण अगोदर माझ्या ...Read More

4

बळी - ४

बळी - ४ बराच वेळ झाला, तरीही मिठाईचं एकही दुकान दिसेना. केदारच्या मनावरचा ताण प्रत्येक वाढत होता. शेवटी त्याने चिडून विचारलं, " राजेश! मिठाईचं एक मोठं दुकान दुकान जवळ आहे म्हणाला होतास नं? एवढा वेळ का लागतोय?" "ते दुकान बंद होतं! दुसरं कुठे दिसतंय का-- ते शोधतोय! घाबरू नका! तुम्हाला परत सोडूनच मी जाईन!" राजेशने उत्तर दिलं; पण त्याचा आवाज बदललेला होता. आता त्याच्या स्वरात केदारला जरब जाणवली. "यांनी मला किडनॅप तर केलं नाही---- पण मला पळवून ...Read More

5

बळी - ५

बळी -- ५ केदार बराच वेळ टॅक्सीतल्या लहानशा सीटवर झोपला होता; शिवाय हालचाल करायचीही नव्हती; त्याला हालचाल करताना पाहिलं असतं, तर त्या दोघा गुंडांना संशय आला असता. आता त्याचे हातपाय ताठरले होते. हा जीवघेणा प्रवास कधी संपतोय; असं त्याला झालं होतं. पण राजेश आणि दिनेशचं मात्र पुढचं प्लॅनिंग चाललं होतं.. "आपण गोराईला पोहोचेपर्यंत तिथली वर्दळ खूप कमी झालेली ...Read More

6

बळी - ६

बळी - ६ केदार बेशुद्ध नाही; तर नाटक करतोय, हे त्या गुंडांपैकी लक्षात अजूनपर्यंत आलं नव्हतं. पण बहुतेक राजेशला संशय आला. तो केदारच्या जवळ आला, " याला क्लोरोफॉर्म देऊन खूप वेळ झाला, अजून शुद्धीवर कसा आला नाही? ओव्हरडोस तर झाला नाही?" तो त्याला हलवून बघत म्हणाला. दिनेश त्याला थांबवत म्हणाला," हा दिसायलाच हीरो आहे! तब्येत नाजूकच दिसतेय! आणि ...Read More

7

बळी - ७

बळी -- ७दिनेश त्याच्या माणसांना सांगत होता, "आपण किना-यापासून खूप आता- खोल पाण्यात आलोय! आपण ज्या इथपर्यत आलोय; ते पूर्ण करा--- म्हणजे आपण परत फिरायला मोकळे!" बोटीवरचे लोक केदारपासून जरा मागे सरकले. केदारला इथपर्यंत कशासाठी अाणलं गेलं आहे, हे सगळ्यांनाच माहीत होतं; पण वेळ आली, तेव्हा सगळेच कचरायला लागले!! प्रत्येकाला वाटत होतं, की हे अमानुष कृत्य दुस-या कोणीतरी करावं! प्रत्येकजण दुस-याकडे बघत होता! साथीदारांकडे बघत क्रूर हास्य करत दिनेश म्हणाला, "आता एकमेकांकडे का बघताय? त्याला जलसमाधी द्यायची वेळ आलीय! आता वेळ घालवू नका--- रात्र वाढतेय! भीमा ...Read More

8

बळी - ८

बळी -- ८ आज केदारला नशीबाची भक्कम साथ मिळत होती. इतक्या काळोखातही, कोणी समुद्रात पोहून येत आहे, आणि हात हलवून मदत मागत आहे; हे शामने पाहिलं. दुस-याच क्षणी त्याच्या लक्षात आलं; की तो माणूस आता बुडणार आहे. "अरे संदीप! तो माणूस बुडतोय बघ!" म्हणत त्याने केदारकडे इशारा करत पाण्यात उडी मारली, आणि पोहत केदारजवळ गेला; त्या वेळी केदारची शुद्ध पूर्णपणे हरपली होती. शाम उत्तम पोहू शकत होता, पण बेशुद्ध केदारला धरून बोटीपर्यंत आणणं; त्याच्यासारख्या किरकोळ देहयष्टीच्या माणसासाठी सोपं नव्हतं. तो ...Read More

9

बळी - ९

बळी - ९ पत्नीच्या आग्रहाखातर मोठी जोखीम घेऊन डाॅक्टर पटेलनी एका अनोळखी रात्री हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतलं होतं! तो पेशंट शुद्धीवर आला, हे कळल्यावर ते एका माणसाचा जीव वाचवल्याच्या समाधानात होते; पण तो विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत नाही; आणि गोंधळून इकडे -तिकडे बघतोय; असा रिपोर्ट डाॅक्टर प्रकाशकडून मिळालाl; आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला. "तो जागा झाला, ...Read More

10

बळी - १०

बळी - १० कपाटातून रंजनाचे स्त्रीधन अचानक् अदृश्य झालेले पाहून घरातल्या सगळ्यांच्या चेह-याचे रंग होते. एकामागून एक धक्के बसत होते. शरीराने आणि मनाने थकलेल्या मीराताईंमध्ये आता उभं रहाण्याचीही शक्ती नव्हती. डोळ्यासमोर काळोखी येऊ लागली होती. त्या किर्तीला म्हणाल्या, ""घरात कोणी आलं नाही! कपाटातल्या वस्तू कुठे जाणार? तिथेच कुठेतरी ठेवल्या असशील! कीर्ती! इकडे ये; आणि जरा बघ बाळ!" मीराताई म्हणाल्या! कीर्तीने पूर्ण कपाट शोधून काढलं, पण तिला काहीही मिळालं नाही."नाही आई! कपाटात कपड्यांशिवाय काहीही नाही!" ती हताश स्वरात म्हणाली."कपाटाची चावी तुमच्या दोघांकडेच असते ...Read More

11

बळी - ११

बळी -- ११ मोठ्या माणसांमध्ये बोलणं बरं दिसणार नाही; हा विचार करून नकुल आणि कीर्ती - दोघंही आतापर्यत गप्प होती. पण मोठ्या भावाची बदनामी नकुलला सहन होईना; तो रंजनाकडे बघत रागाने म्हणाला,"आमचा दादा असा वागू शकत नाही. त्याच्यावर असले घाणेरडे आरोप लावू नका! तो कुठे-- आणि कसा असेल?--- मला त्याची खूप काळजी वाटतेय! चला काका! आपण पोलीस कंप्लेट देऊन येऊ!" आता कीर्तीसुद्धा बोलू लागली, ...Read More

12

बळी - १२

बळी- १२ मीराताई द्विधा मनःस्थितीत होत्या. रंजनाने केदारच्या चारित्र्यावर उभं केलं होतं खरं; पण त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सिद्धेश केदारचा जवळचा मित्र होता. घडलेला सगळा प्रकार मीराताईंनी त्याला सांगितला होता. फक्त रंजनाचे दागिने घरातून गायब झाले होते; हे मात्र त्याला माहीत नव्हतं. त्या स्वतःशी विचार करत असत, -- " जर केदारचं खरोखरच काही प्रेमप्रकरण असेल, तर सिद्धेशला नक्कीच माहीत असेल;" आणि त्याला परत-परत विचारत ...Read More

13

बळी - १३

बळी- १३ डाॅक्टर पटेलनी केदारला हाॅस्पिटलमध्ये कुठेही फिरायची मुभा दिली होती. ज्या पेशंटजवळ त्याच्या कोणी येत नसत, त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करणे, त्यांना औषधे किंवा इतर काही लागलं तर हाॅस्पिटलच्या फार्मसीतून आणून देणे, स्टाफपैकी कोणाला काही गरज पडली, तर मदत करणे; हे सगळं करण्यात केदारचा दिवस जात ...Read More

14

बळी - १४

बळी -- १४ केदार घरी असल्यामुळे प्रमिलाबेन अानंदात होत्या; डाॅक्टर पटेलनाही तो मनापासून आवडत होता; "एवढे दिवस झाले, तरी अजून पोलीसाना काही धागा दोरा कसा मिळाला नाही? इतका हुशार मुलगा नक्कीच चांगल्या घरातला अाहे --- त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं!" असं डाॅक्टर पटेलना मनापासून वाटत होतं. ते ...Read More

15

बळी - १५

बळी १५ सकाळी उठल्यापासून केदारचं चित्त था-यावर नव्हतं.प्रमिलाबेननी त्याला हाक तीसुद्धा त्याला ऐकू गेली नाही. "रजनी! आज तुझं लक्ष कुठे आहे? किती हाका मारल्या --- तुला ऐकू गेल्या नाहीत! " त्यांनी केदारला विचारलं. केदारने रात्रीचं स्वप्न त्यांना सांगितलं. ...Read More

16

बळी - १६

बळी - १६ अनामिक भीतीने केदारला ग्रासलं होतं. तर दिवसाही त्याला भास होत होते. त्याने डाॅक्टर श्रीकांतना याविषयी सांगितलं.डाॅक्टर हसून म्हणाले,"तुला कोणतेही भास होत नाहीत; तर बहुतेक तुला पूर्वयुष्यातले काही प्रसंग आठवू लागले आहेत! कोणती तरी भीती तुझ्या अंतर्मनाला भेडसावत आहे! पण शांत रहा! इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस, घाबरण्याचं कारण नाही! आणि हे तुला स्वतःलाच ठामपणे सतत ...Read More

17

बळी - १७

बळी १७ केदार अचानक् घाबरून ओरडू लागला आणि घेरी येऊन खाली कोसळला; हे बघून सगळेच घाबरले होते. बोट किना-याला लागली होती. त्याला तिथून सरळ हाॅस्पिटलमध्ये न्यायचं असं ठरलं. "माझी गाडी येणार आहे! आपण लगेच त्याला घेऊन निघू! पण तू डाॅक्टरना फोन करून सगळं सांगून ठेव!" त्यांचा एक मित्र म्हणाला.केदारला अॅडमिट केलं ...Read More

18

बळी - १८

बळी - १८ काय खरं-- काय खोटं; हे केदारला कळत नव्हतं. तो वेळ डोकं धरून बसला होता -- विचार करत होता, "सहा महिन्यांपूर्वी मी रंजनाबरोबर सिनेमाला निघालो होतो? हे कसं शक्य आहे?" पण नंतर त्याचं मन त्याला सांगू लागलं,"ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्याशी नक्कीच खोटं बोलणार नाहीत.--- पण हा सहा महिन्याचा घोळ काय आहे? मला नक्की ...Read More

19

बळी - १९

बळी -१९ रंजनाने आपल्या घराविषयी कोणतीही माहिती त्या गुंडांना दिली नाही; हे सांगताना केदार इन्सपेक्टर साहेबांवर चिडला होता. रंजनाविषयी त्याच्या मनात खूपच विश्वास होता! तिला कोणी काही बोललेलं त्याला सहन होत नव्हतं.केदार हट्टी स्वरात पुढे बोलू लागला,"रंजना जरी फार शिकलेली नसली तरीही खुप स्मार्ट आहे! तिने अनोळखी व्यक्तीला अशी माहिती कधीच दिली नसती! त्यांच्या गप्पा त्यांच्या गावपर्यंत मर्यादित होत्या! त्याच्याशी ...Read More

20

बळी - २०

बळी - २० या केसमधील ब-याचशा गोष्टींचा उलगडा केदारची आई करू शकते, इन्सपेक्टर दिवाकरना खात्री होती. दुस-याच दिवशी ते मीराताईंना भेटायला गेले. पोलिसांना दारात पाहून त्या घाबरून गेल्या. "आमच्याकडे निनावी कंप्लेंट आली आहे; की तुमचा मोठा मुलगा ब-याच दिवसांपासून बेपत्ता आहे; खरं आहे का हे?" त्यांनी तिला विचारलं. मीराताईंना उत्तर काय द्यावं, हे सुचत ...Read More

21

बळी - २१

बळी -- २१ स्वतःच्या मुलावर आपण विश्वास ठेवला हे इन्सपेक्टर साहेबांना आवडलेलं नाही; हे मीराताईंनी ओळखलं होतं. त्या त्यांच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ लागल्या, "केदार अभिमान वाटावा असा मुलगा आहे; माझ्यावर आणि भावंडांवर जीव लावणारा माझा केदार असं काही करेल; यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही; पण कपाटाची ...Read More

22

बळी - २२

बळी - २२केदारच्या अपहरणानंतर रंजना काटेगावला गेली; आणि त्यानंतर एकदाही घरच्या माणसांना भेटायला घरी आली नाही; असं मीराताई म्हणाल्या; इन्सपेक्टरना मोठं आश्चर्य वाटलं! केदारने तिच्याविषयी जो विश्वास दाखवला होता, त्याच्याशी तिचं हे वर्तन सुसंगत नव्हतं. त्यांनी मीराताईंना प्रश्न विचारला, "फोनवर तिच्याशी बोलणं होत असेलच! ती धक्क्यातून सावरली की नाही? किती दिवसांचा कोर्स आहे --- इकडे परत कधी येणार आहे --- काही कळवलं का तिने?" इन्सपेक्टरच्या या प्रश्नावर मीराताई म्हणाल्या,"नाही! तिच्याशी माझं बोलणं झालं नाही! तिच्या घरी अनेक वेळा फोन केला, ...Read More

23

बळी - २३

बळी -२३ "दिनेशचा पत्ता आम्ही शोधून काढला आहे! --- ही पूर्ण स्टोरी ऐकाल; तर तुम्हाला पडलेले सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जरा पुढे ऐका ----" काटेगावचे इन्स्पेक्टर जाधव हसून म्हणाले, "त्यांचं प्रेमप्रकरण कळल्यावर श्रीपतरावांनी रंजनाला घरातून बाहेर पडायला बंदी घातली -- तिची शाळा बंद केली! त्यानंतर घरी अभ्यास करून कशीबशी एस. एस. सी. झाली! त्यांनी तिचं लग्न मुंबईच्या एका मुलाशी ठरवलं! आश्चर्याची ...Read More

24

बळी - २४

बळी -- २४ बंद कपाटातून पैसे आणि दागिने कोणा अज्ञात व्यक्तीने पळवले आणि चोरीचा आळ आपल्यावर आला; हे ऐकून केदारचे डोळे संतापाने लाल झाले होते. आपल्या पाठीमागे आपली एवढी मोठी बदनामी झाली -- या विचारानेच त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. एवढा मोठा कालावधी गेल्यानंतर तो स्वतःला निरपराध सिद्ध कसा करू शकणार होता? "बंद कपाटातला ऐवज कोण घेऊ शकतो?" --- तो स्वतःशीच ...Read More

25

बळी - २५

बळी - २५ "आज रंजना कुठे आहे? दिनेशकडे गेली असेल; तर तिकडेच जाऊया! दिवाकर जाधवांना म्हणाले. त्यांना हा गुंता लवकरात लवकर सोडवायचा होता. केदारच्या आयुष्याचा प्रश्न होता! एकदा का रंजना सावध झाली; की नंतर तिला सापळ्यात पकडणं कठीण होतं. "आज ती त्याच्या घरी गेली नाही! काॅलेजलाच गेली आहे. आणि दिनेशसुद्धा सकाळपासून त्याच्या कामावर गेला आहे! त्यामुळे आज रंजना आणि दिनेश दोघंही एकत्र भेटणार ...Read More

26

बळी - २६

बळी -- २६ रंजनाची किंकाळी ऐकून दिनेश धावत आला. तो असा ध्यानी- मनी दिसला; -- आणि आपल्याला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला; त्या इसमाला त्या निर्जन स्थानावरील घरात रंजनाबरोबर बघून केदारचा संयम सुटला, " हाच तो दिनेश! त्याला लगेच बेड्या घाला; नाहीतर तो रंजनाचंही काही बरं- वाईट करेल! त्या राक्षसाचा काहीच भरवंसा नाही! तुम्ही वाट कसली बघताय?" आपण कुठे आहोत; याचं भान त्याला राहिलं नव्हतं. " आम्ही पुरावे ...Read More

27

बळी - २७

बळी - २७ रंजनाच्या मनावरील भीतीचा पगडा अजूनही कायम होता. आपण केलेल्या चुका नजरेसमोर दिसत होत्या. दिनेशच्या नादाला लागून ही पापे तिने केली नसती; तर आज केदार मृत्यूनंतर तिच्यामागे लागला नसता, असं तिला वाटत होतं. तिच्या मनातील काही अनुत्तरित प्रश्न ती दिनेशला विचारू लागली. अजूनही तिचा आवाज थरथरत होता, " लग्नासाठी केदारने माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती -- पैशाची किंवा इतर कोणतीही अपेक्षा त्याने लग्न ठरवताना ...Read More

28

बळी - २८

बळी- २८ रंजनाला आता केदारच्या भुताचा विसर पडला होता! आता तिच्या नजरेसमोर वर्दी दिसत होती! मीराताईंचे शब्द तिला भेडसावत होते. त्या म्हणाल्या होत्या,"पोलीस माझ्याकडे चौकशीसाठी आले होते-- केदारविषयी खोदून खोदून विचारत होते -- तुझ्याविषयी विचारत होते-- बहुतेक ते तुझ्याकडेही येतील!" " जर पोलीस चौकशी चालू झाली; तर आपण काय करायचं? मला खूप भीती वाटतेय! ते असे काही उलटे सुलटे प्रश्न विचारतील, की माझं खोटं बोलणं लगेच ...Read More

29

बळी - २९

बळी -२९ रंजनाला आता तिच्या भविष्याची काळजी वाटू लगली होती. ना तिचं शिक्षण झालं होतं; ना कुठल्या कलेची आवड होती. आई-वडील वडिलांच्या मागे मुलीसाठी माहेर नसतं; हे ती जाणून होती; त्यामुळे दिनेश दागिन्यांविषयी बोलायला टाळटाळ करतोय; हे लक्षात अाल्यावर ती संतापली, "दिनेश! मला माझे दागिने कधी देणार तेवढं सांग! उगाच विषय बदलू नकोस! या बाबतीत मला मस्करी नकोय!" तिचा आवाज रागामुळे थरथरत होता. आता दिनेशचा पारा चढला, "नाही देणार! काय करशील? "माझे दागिने - माझे दागिने ...Read More

30

बळी - ३०

बळी -- ३० " आंबेगावात दिनेशची बायको आहे! तुझे दागिने तिच्याकडे सुखरूप आहेत; पण आता तिचे आहेत--- तुला परत मिळतील; अशी आशा करू नकोस!" जाधवांनी हा गौप्यस्फोट केला; आणि दिनेशला काय बोलावं हे सुचेना--- तो रंजनाकडे फक्त बघत उभा राहिला होता! तिची प्रतिक्रिया बघत होता. " हे साहेब बोलतायत ते खरं आहे? तू असा गप्प का दिनेश? हे सगळं खोटं आहे नं? " दिनेश लग्न करून आपल्याला फसवू शकतो; यावर रंजनाचा विश्वास बसत नव्हता. " रंजना! तुझं लग्न ...Read More

31

बळी - ३१ - अंतिम भाग

बळी -- ३१ रंजनाचा खेळ परत चालू झाला! ती इन्स्पेक्टरना डोळ्यात पाणी आणून सांगू लागली , " साहेब! कसा आनंद होणार? लग्न होऊन महिनासुद्धा झाला नव्हताl; आणि हा केदार मला वा-यावर सोडून परागंदा झाला. माझ्या सगळ्या स्वप्नांचा ह्याने चुराडा केला! माझं मन आता संसाराला कंटाळलंय! याच्याशी कोणतंही ...Read More