Ladies Only book and story is written by Shirish in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ladies Only is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
लेडीज ओन्ली - Novels
by Shirish
in
Marathi Fiction Stories
लेडीज ओन्ली || एक ||'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे चार पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या कोपर्यात मेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे... शेवटी ती न राहावून
लेडीज ओन्ली || एक ||'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे चार पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या ...Read Moreमेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे... शेवटी ती न राहावून
{ लेडीज ओन्ली - या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. कॉपीराईट कायद्यानुसार 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे ...Read Moreआहेत.} || लेडीज ओन्ली (भाग - दोन) ||" टेन.. नाईन.. एट.. सेवन... " प्राईम टाईमचं काऊंटडाऊन सुरू झालं. होस्ट, गेस्ट सगळेच लाईव्ह टेलिकास्ट साठी सज्ज झाले," थ्री.. टू.. वन... गो.. "" नमऽऽस्कार... महाराष्ट्र..!! मी निकिता - घेऊन आली आहे आपल्या नंबर वन मराठी न्युज चॅनेल 'प्रो महाराष्ट्र' चा नंबर वन प्राईम टाईम शो.. "सवाल महाराष्ट्राचा..! ", निकिताच्या निवेदनाला सुरूवात झाली, "मराठी न्यूज चॅनेलच्या इतिहासातला एकमेव शो
|| लेडीज ओन्ली ||( भाग - तीन) { लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या ...Read Moreकादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.} || लेडीज ओन्ली - 3 ||'ट्रिरिंग... ट्रिरिंग.. ट्रिरिंग.. ' विजयाताईंचा मोबाईल बराच वेळ खणखणत होता. कानाला तो कर्कश्श आवाज अगदीच असह्य झाला तेव्हा त्यांनी डोळे उघडले. कॉटच्या बाजूच्या स्टुलावर पडल्या पडल्या भणभणणारा मोबाईल हातात घेताना 'इतक्या पहाटे कुणाला आठवण झाली?' असं मनाशीच पुटपुटल्या. उशीजवळ ठेवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला अन् मोबाईलच्या स्क्रीन वर नजर फिरवली. 'बछडी' असं नाव दिसलं अन् विजयाताईंचा
|| लेडीज ओन्ली ||{ भाग - ४} [ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या ...Read Moreसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.] " लेडीज ओन्ली - ( 4 ) "'टिंगटाँग..' दारावरची बेल वाजली. "आलं माझं बछडू", असं म्हणत विजयाताई ताडकन उठून दरवाजाच्या दिशेने झेपावल्या. घाईनेच कडी सरकवली. दार उघडलं. समोर एक पन्नाशीतली दांडग्या शरीरयष्टीची बाई उभी होती. "राधाबाई.. तुम्ही आहात होय.. " अपेक्षाभंग झाल्यागत विजयाताई बोलल्या. " म्हंजी.. दुसरं कोण येणार व्हतं या टायमाला? मार्निंगचे सात मंजी माझाच ड्युटी टायम न वं?" राधाबाई. या घरात धुणी
|| लेडीज ओन्ली ||(भाग - 5) या दोन बायांच्या राजकीय वाद संवादाच्या दरम्यानच्या वेळात राधाबाईंची भांडी धुवून घासून पुसून फळीवर लावून झाली होती. आता त्यांनी फरशी ...Read Moreआपला मोर्चा वळवला. विजयाताई अजूनही राजकारणाचाच विचार करत बसलेल्या होत्या. आणि एकदमच काहीतरी त्यांच्या लक्षात आलं अन् त्यांनी राधाबाईंशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली, " राधाबाई, तुमचं नावही याच वॉर्डात आहे ना मतदानासाठी?" "आं? ठाव न्हाई... वारड फिरड कळत न्हाई आमास्नी... " ओलं केलेलं फडकं फरशीवर फिरवत त्या उत्तरल्या. " अहो मग मतदान कसं करता तुम्ही? " " कसं मीन्स... असंच खटका दाबून.. "" आणि कोणाचा खटका दाबायचा ते कसं