शाहिर... - Novels
by Subhash Mandale
in
Marathi Fiction Stories
शाहीर.!
शाहीर म्हंटले की डोळ्यासमोर येतात,
त्या त्यांना लोकांनी दिलेल्या उपाध्या..
जसे...
राष्ट्रशाहीर...
लोकशाहीर...
शिवशाहीर...
भिमशाहीर...
पोवाडे गावून समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम...
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य...
अशा विविध विषयांवर शाहिरी ...Read Moreसादर केले जातात.
त्या त्या काळातील ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजासमोर आपली शाहिरी काव्य सादर करत असतात.
आज आपण अशाच एका शाहिरांबद्दल जाणून घेणार आहोत. कलेचा कोणताही वारसा नसताना ज्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून आपले जीवन कलेसाठी अर्पण केले आणि सर्वत्र 'शाहीर' या नावाने लोकप्रिय असलेले, या शिवाय त्यांनी गावात कुणाचं लग्न लावलेलं नाही, लग्नाचा विधी केला नाही किंवा त्यांच्या पहाडी आवाजात लग्नातील मंगलाष्टका खणखणली नाही, असे चुकूनच एखादं लग्न असेल, असे सर्वांचे आवडते,
शाहिर खाशाबा मंडले यांच्या मुलाखतीत अखंड कलाकार मंडळींची माहिती सामावलेली आहे.
'शाहीर'!क्रमशः..... भाग- २"...या नाटकात मी नवरा, रामभाऊ कंडक्टर(रामभाऊ मोरे- यांना उत्तम प्रवचनकार म्हणून ओळखतातच, पण ते आटपाडी एस. टी. डेपोमध्ये कंडक्टरची नोकरी करत होते, त्यामुळे ...Read Moreकरून त्यांना लोक 'रामभाऊ कंडक्टर' या नावानेच ओळखतात.) यांनी माझ्या बायकोचं म्हणजे बाळाच्या आईचं काम केलं होतं. बंडातात्या सासरा आणि राजाभाऊ सासू अशी चार मुख्य पात्रं होती. या पात्रांभोवती नाटकाचं कथानक फिरत रहायचं. रामभाऊंनी बाळासाठी वेडी झालेल्या-आईचं काम इतकं एकरूप होऊन केलं होतं, की लोकांच्या मनातून वेड्या आईची छबी जाता जात नव्हती. काही लोकं अजूनही सांगतात, 'ज्यांनी नाटक बघिटलंय, ते झोपेत सुद्धा चावळत उठायचे-' तिचं बाळ, तिला परत द्या.' म्हणायचे...बाहेर
'शाहीर'! भाग- तीनक्रमशः.... "...मिरजतलं नाटक ...Read Moreआन् गावोगावच्या कार्यक्रमासाठी सुपाऱ्यांचा ओघ सुरू झाला. गणेश चतुर्थीनिमित्त मिरजेत कार्यक्रम झाला आन् पुढच्याच महिन्यात दसऱ्याला घरणिकीच्या कार्यक्रमाची सुपारी आली. दसऱ्याला घरणिकीला रात्री कार्यक्रम झाला आणि दुसरी दिवशी सकाळी तिथंच त्या गावच्या लोकांनी जमून ठरवलं, की प्रत्येक वर्षी दोन खेळ करायचे. यात्रंला आणि दसऱ्याला, असे पुढच्या सलग दहा वर्षांसाठी करार करायचा आणि तो करार केला सुद्धा. आमच्या मनात सुरवातीला धाकधूक होती, की आमचं बेभरवशाचं कलापथक; दहा वर्षांसाठी करार कसा करावा! पण जे व्हायचं हाय ते होऊदे, असं ठरवलं आणि काम करत राहिलो.
'शाहीर'!क्रमशः.. भाग- चार".. कव्वाच झालं न्हाय, की कुठल्या प्रयोगाला मी गेलो नाही. 'माणसाच्या अंगात ...Read Moreगोडी भिनली, की त्याला जा म्हणून सांगावं लागत न्हाय, त्याची पावलं आपोआपच तिकडं वळत्याती. मग त्याला बांधून ठेवलं तरी सुध्दा.' तुला सांगायचं म्हंजी, आमचा आर्वी ला कार्यक्रम होता आन् आम्ही कार्यक्रमासाठी बैलगाडी जुंपून इथनं दुपारचंच निघाल्यालो. बैलगाडीत पुढच्या बाजूला कलापथकाचं सगळं सामान बसवल्यालं आन् मागच्या बाजूला चार पाच जणांना बसता येईल इतकी जागा होती; त्यात आम्ही दाटीवाटीनं बसल्यालो. वर उन्हाचा नुसता रक हुता.असल्या उन्हाच्या रकीत बाकीचे आळीपाळीनं रस्त्यानं चालत होते. जाताना वाटेत एक वढा (ओढा)
'शाहीर'! क्रमशः.. भाग- पाच "...तुमच्या गुडघ्याला इतकं लागलं, तर त्या वेळी डॉक्टर, दवाखाना असतीलच की! " " ही मागच्या ...Read Moreवर्षां अगोदरची गोष्ट. त्या टायमाला सरकारी दवाखान्याशिवाय कवचितच कुठंतरी एखादा दवाखाना असायचा. आन् दवाखान्यात जायाचं म्हंटल्यावर अंगावर काटा उभा राह्याचा, त्या वेळची माणसं दुखण्यानं जाग्यावर बसून राह्यली तरी दवाखान्याचं नाव काढत नसायची. हळद, झाडपाल्याच्या औषधावरच लय लोकांचा विश्वास. त्यामुळं दवाखान्याचा इचार कुणाच्या डोक्यात सुद्धा येत नसायचा. आन् मग कुठला दवाखाना न् काय..! , पण आत्ताच्या लोकांचं कसं झालंय, कष्टाचं प्रमाण कमी.. खाणं नाजूक.. त्यामुळं जीवन नाजूक झालंय, ह्यांना त्यावेळच्या माणसांसारखं किरकोळ दुखणं सुद्धा अंगावर काढणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे."
'शाहीर'! क्रमशः.. भाग- सहा "कलापथक बंद केलं नाही, बंद झालं. चांगल्या फळालाच किड लागायचा थोका जास्त असतो, त्यासाठी ते फळ ...Read Moreलागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तसं कलापथकात काम करणाऱ्या कलाकारांचं झालं. त्यांनी स्वतःच्या जीवनाची काळजी घेतली नाही. तुला तर ठावं आहेच; बाकी मी अजून काय सांगणार. पाच सहा पोरं दारूचं व्यसन करत होती, तरीही आमचं कलापथक चालू होतं, कलापथकात काम करणारी काही चांगली चांगली माणसं वयोमानानं गेली आणि जी काम करण्यारखी होती, त्यांना व्यसनाची किड लागलेली. वाईट येवढंच वाटतंय, की ज्यांच्या अंगात वेगवेगळी चांगली कला होती, अशी सहा सात पोरं दारूच्या व्यसनामुळं वयाची पन्नाशी सुद्धा गाठू शकले नाहीत.