Koun book and story is written by Gajendra Kudmate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Koun is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
कोण? - Novels
by Gajendra Kudmate
in
Marathi Thriller
भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही. आज आपण तिचा अध्यायचा समापन करूनच येथून जाऊ. चल आता तिचा शोध घेऊ तू तिकडे जा मी इकडे जातो. तुला जर दिसली तर तू तो आपला गुपित इशारा मला कर आणि मला दिसली तर मी तसे करतो.” असे म्हणून दोघेही इकडे तिकडे तिला शोधण्यासाठी वेगळे झाले. ती त्यांचे सगळे बोलने ऐकत होती आणि आता जरा जास्तच सावध झाली होती.
भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता ...Read Moreठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही.
भाग - २ ह्याचा विचार करता करता सावली हि तिचा जीवनाचा १० वर्ष पूर्वीचा काळात जाऊन पोहोचली. सावली हि एक सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या एका मोठ्या कंपनीत काम करते. ...Read Moreहि शिक्षणासोबतच खेळकूद, आत्मसुरक्षेसाठी मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मध्ये पारंगत आहे. शिक्षणात ती आजवर फारच उत्तम होती आणि आताही आहे. ती स्वभावाने एकदम शांत आणि सहयोगी वृत्तीची आहे. कुणी कसल्याही अडचणीत सापडला असेल तर त्याची मदत करण्यासाठी हि सदैव तत्पर असते. तीचा याच वृत्तीमुळे तिचा जीवनात तिचे अनेक शत्रू हे जन्माला आलेले होते. ती कुठल्याही परोपकारी आणि प्रोफेशनल कार्यात
भाग – ३ त्याच श्रेणीत एक दिवस सावली तिचा घरी बसलेली असतांना तिचा फोनची घंटी वाजली. तिने फोन बघितला तर तिला अनोळखा नंबर दिसला. तिने तरीही तो कॉल उचलला आणि ती म्हणाली, “ हेलो कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला.” ...Read Moreसमोरून काहीच आवाज नाही आला तर तिने पुन्हा तोच प्रश्न केला. परंतु या वेळेस सुद्धा समोरून काहीच प्रतिक्रिया झाली नाही. म्हणून मग सावलीने शेवटी त्रासून तो फोन कट केला आणि ती म्हणाली, “ कोण बावळट आहे तर माहित नाही. सारखा फोन करतो आणि काहीच बोलत नाही, मूर्ख कुठला.” असे म्हणून ती फोन तेथेच ठेवून उठून चालली गेली. ती जाऊन तिचे
भाग – ४ सावलीने फोन कट केला आणि ती कापड बदलण्यासाठी घराचा दिशेने जाऊ लागली होती. तेच तिचे लक्ष घराचा आवारात पडलेल्या त्या वस्तूकडे गेले. तिने जाऊन बघितले तर ते एक पत्र होते त्याच नामर्द मनुष्याचे. सावलीने ते पत्र ...Read Moreघेतले आणि ती घराचा आत गेली. आत जाऊन तिने कापड बदलली आणि ती पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघाली. सावलीची गाडी निघाली तर तिचा पाठोपाठ एक दुचाकी सुद्धा निरंतर तिचा पाठलाग करू लागली होती. त्या दुचाकीवर दोन तरूण होते जे सावलीचा पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाने फोन काढला आणि फोन लावला. समोरील व्यक्तीने फोन उचलला आणि म्हणाला, “ काय खबर आहे
भाग – ५ त्यांची गाडी तेथून काही अंतरावर निघाली तेव्हा त्या स्त्रीचा पती बोलला, “ काय झाले ग असे तेथे आणि तू का बर अशी आवाज चढवून त्या तरुणांना बोललीस.” मग त्या स्त्रीने तिचा पतीला सावली बद्ल सांगितले आणि ...Read Moreती सावलीकडे वळली. ती स्त्री म्हणाली, “ तर सांग बेटा काय झाले होते आणि ते तुझ्या मागे का बर लागलेले होते.” मग सावलीने तीचाबरोबर घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो सगळा प्रकार ऐकून त्यांनी म्हटले, “ फार बरे झाले कि तू आमचा सोबत आलीस. तर आता सांग तुला इस्पितळात नेऊ कि तुझ्या घरी.” मग सावली बोलली, “ मला तसे फार