Koun - 4 books and stories free download online pdf in Marathi

कोण? - 4

भाग – ४
सावलीने फोन कट केला आणि ती कापड बदलण्यासाठी घराचा दिशेने जाऊ लागली होती. तेच तिचे लक्ष घराचा आवारात पडलेल्या त्या वस्तूकडे गेले. तिने जाऊन बघितले तर ते एक पत्र होते त्याच नामर्द मनुष्याचे. सावलीने ते पत्र हातात घेतले आणि ती घराचा आत गेली. आत जाऊन तिने कापड बदलली आणि ती पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघाली. सावलीची गाडी निघाली तर तिचा पाठोपाठ एक दुचाकी सुद्धा निरंतर तिचा पाठलाग करू लागली होती. त्या दुचाकीवर दोन तरूण होते जे सावलीचा पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाने फोन काढला आणि फोन लावला. समोरील व्यक्तीने फोन उचलला आणि म्हणाला, “ काय खबर आहे रे.” तेव्हा तो म्हणाला, “ सावली पोलीस स्टेशनला जाण्यासाठी त्या दिशेने जाती आहे. आम्ही तिचा पाठलाग करत आहोत तर पुढे काय करायचे आहे हे माहित करण्यासाठी मी फोन लावला आहे.” पुढून आवाज आला, “ तिला पोलीस स्टेशनला पोहोचण्याचा आधी तुमचा तावडीत घेऊन घ्या. मी आणखी माणसाना पाठवतो तेथे मोठी गाडी घेऊन तुम्ही त्यांना तुमची लोकेशन सतत पाठवत रहा आणि तिचा पाठलाग करता करता तिला रोखण्याचा प्रयत्न करा.” एवढे बोलून समोरचा व्यक्तीने फोन काटला आणि ते तरून आणखी वेगाने आता सावलीचा मागे जाऊ लागले होते.

सावलीला या गोष्टीचा काहीच भान नव्हते तिला तर काहीच आशंका नव्हती कि तीचावर घराचा दारावर जो हल्ला झालेला आहे. त्यानंतर तिचा माघारी आणखी कुणी असू शकतो आणि तिचा बरोबर पुढे आणखी काही तरी जास्त वाईट होऊ शकते. सावली तिचा गाडीवर जात असतांना ऊन जास्त होते म्हणून तिने सावलीत गाडी थांबवली आणि ती डोक्यावर ओढणी बांधू लागली होती कारण कि ती तिचा गाडीवरचा हेल्मेट घरीच विसरली होती. तर ती थांबली असतांना पुन्हा तिचा फोन वाजला. सावलीने फोन बघितला तर पुन्हा तोच नंबर होता. मात्र यावेळेस न घाबरता तिने फोन उचलला आणि बोलली, “ बोल रे भित्र्या मनुष्या काय म्हणतोस आता.” समोरून आवाज आली, “ तू जेथे आहेस तेथेच रहा, तू जर का पोलिसांत गेलीस तर फार वाईट परिणाम होतील.” मग सावली उत्तरली, “ मी नाही घाबरत रे भेकाळ माणसा तुझ्या धमक्यांना मी पोलीस स्टेशनला जात आहे आणि जाऊनच राहणार.” असे म्हणून तिने फोन काटला आणि ती पुढे जाण्यास निघाली. तेच ती एका सिग्नलला येऊन थांबली. सिग्नल लाल होता म्हणून ती तेथे थांबली असतांना तिने सहज चेहरा बघण्यासाठी गाडीचा आरशात पहिले तर तिला तिचा गाडीचा पाच सहा गाड्यांचा मागे एक दुचाकी दिसली ज्यावर दोन तरुण बसलेले होते. सावलीने अचूक त्या तरुणाला ओळखले होते. तो तरुण दुसरा तिसरा नसून तिचा घराजवळ फुगा फेकणारा तरूण आहे.

आता मात्र ती जास्त सावध झाली होती. तिला कळून चुकले होते कि तिचा पाठलाग कुणी करतो आहे. परंतु तीला हे माहित नव्हते कि तिचा बरोबर पुढे काय बरे वाईट घडणार आहे तर. तिने सुद्धा आता तिचा गाडीची गती वाढवली होती आणि ती पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू लागली होती. याचा घाई गडबडीत तिची गाडीची एका दुसऱ्या गाडीशी भिडत झाली. ती आणि तिची गाडी रस्त्यात पडली. लोक आलेत आणि तिला आणि तिचा गाडीला उचलून त्यांनी बाजूला केले. त्या अपघातात सावलीला थोडे फार लागलेले होते मुख्य म्हणजे तो पूर्णपणे शुद्धीवर होती. रस्त्यावरील लोक तिची विचारपूस करत होते आणि ती तशीच रस्त्याचा बाजूने बसलेली होती. तेव्हा अवसर गाठून ते तरुण सुद्धा तेथे तिचा अवतीभवती वावरू लागले होते. ते बघत होते कि कधी इथली गर्दी कमी होते आणि आम्ही सावलीला येथून उचलून नेतो. सावली तेथे बसलेली होती परंतु सगळी वेदना विसरून तिने आपल्या मेंदुला आणि तिचा चेतनेला जागवून ठेवलेलं होत. ती प्रत्येक तेथे येणार्‍या लोकांचे चेहरे निरखून बघत होती. त्यातील कोण चांगला आणि कोण वाईट आहे हे निरंतर परखत होती. तितक्यात तिची दृष्टी त्या तरुणावर पडली. तर तिने त्याला ओळखले होते, त्यामुळे तिने ती वेळ मारून नेण्यासाठी एक युक्ती लावली. ती सारखी अस्वस्थ होण्याचे तेथील इतर लोकांना दर्शवू लागली कारण तिला त्यांचा हेतू लक्षात आलेला होता. तेवढ्यात तेथे एक गाड़ी येऊन उभी राहिली आणि त्या गाडीतून एक स्त्री आणि पुरुष बाहेर निघून तिचाजवळ आलेत.

त्यांनी तेथील लोकांना काय झाले म्हणून विचारले तर लोकांनी घडलेला प्रकार सांगितला. सावलीने त्या स्त्री आणि पुरुषाकडे बघितले तर तिला ते पारिवारिक लोकं वाटली. म्हणून तिने आपला डाव खेळला आणि त्यांना मला माझ्या घरी सोडून द्या अशी विनंती केली. तेवढ्यात त्या तरुणांनी हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, “ ताई आम्ही तुम्हाला घरी सोडून देतो.” परंतु सावलीला त्याचा सोबत जायचे नव्हते म्हणून तिने हळूच त्या गाडीवाल्या स्त्रीचा कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर ती स्त्री ताडकन उठली आणि कडक आवाजात म्हणाली, “ काही नको आमचाकडे मोठी गाडी आहे, शिवाय हि आमचा घराकडे राहते. तर तीला आम्ही आमचा गाडीत आधी इस्पितळात नेणार नंतर तिला तिचा घरी आम्ही सोडून देणार.” अचानकपणे ती स्त्री तशी का बर बोलली ते तिचा पतीला सुद्धा कळले नाही आणि ते दोघेही तिला घेऊन निघाले.
शेष पुढील भागात...........