Who? - 37 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 37

Featured Books
Categories
Share

कोण? - 37

सावली जेव्हा तीचा कार्यालयाचा काही अंतरावर होती तेव्हा तीला तीची आई ही रस्त्याचा बाजुला उभी असलेली दिसली. सावलीने गाड़ी थांबवली आणि ती तीचा आईकडे भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तीचा आईचे लक्ष तीचाकडे नव्हते. मग सावली तीचा आईचा थेट समोर जाऊन उभी राहिली. सावलीला बघून तीचा आईला आश्चर्य झाले आणि ती सावलीला बघतच उभी राहिली. तेव्हा सावली म्हणाली, “ आई तू काय करते आहेस इथे.” मग आईने म्हटले, "काही नाही जरा सामान घ्यायला आले होते.” मग सावलीने वीचारले, “आई तू कशी आहेस आणि कोमल कशी आहे.” तेव्हा आईने म्हटले, “ मी बरी आहे आणि कोमल सुद्धा बरी आहे. तू सांग तुझे दिवस कसे चालले आहेत आमचा शिवाय. तसे मजेतच जात असतील तुझे दिवस.” आई जेव्हा हे सगळ बोलत होती तेव्हा तीचा मनात आणि तीचा चेहर्यावर सावली बद्दल चिंता आणि हताशा दिसत होती. परन्तु तीचे ओठ सावली बद्दल राग व्यक्त करत होते. सावली कसी का बर असे ना ती तीचा आईची मुलगी होती आणि मुली बद्दल आईचे जीव हे दुखतेच. मग सावलीने म्हटले, “आई माझ्याकडे बघून तुला काय वाटते मी मज्जेत आहे. अग आई माझ्या सोबत माझे जग माझे विश्व म्हणजे माझी आई नाही आहे . माझ्या सोबत माझी सखी संगीनी माझी बहिण कोमल नाही आहे. तरीही मी तुला मज्जेत दिसते आहे.” सावलीने जेव्हा हे सगळ म्हटल तेव्हा अनयास तीचा डोळ्यांतुन अश्रु वाहू लागले होते. तेव्हा मग तीचा आईचे ह्रदय सुद्धा वीतळू लागले होते. मग तीचा आईने सावलीचा डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, “बेटा अशी रडू नकोस तू अशी समजू नकोस की तू एकटी आहेस या जगात........." .." आई अशी म्हणत होती तेव्हाच तेथे शशांक आला आणि त्याने म्हटले, "बरोबर आहे आई ताईला असे आपण एकटे सोडू शकत नाही. ताई तुमचासोबत मी आहे जसा आई आणि कोमलसोबत असतो तसा." शशांकला असे समोर बघून सावलीला राग आला आणि तीने म्हटले, "तू काय करतो आहेस इथे." तेव्हा त्याने आ आईकडे बघीतले आणि मग सावलीकडे बघत तो म्हणाला, "ताई तुम्ही तर आई आणि कोमलला असे एकटे सोडून नीघून गेलात. मग या दोघींची जीम्मेदारी मी या आईचा मुलाने आपल्या खांद्यावर घेतली."

    आता मात्र सावलीला राग भरपूर आला आणि मग ती म्हणाली, "माझ्या या अशा घर सोडण्याला मुख्य कारणीभुत तूच आहेस. तूच माझ्या आई आणि बहिणीला माझ्या विरुद्ध भडकावुन मला त्यांचा पासून दूर केलत. आम्हा माय लेकी मध्ये भांडण लावणारा तूच आहेस आणि तोंड वर उचलून म्हणतो आहेस की मी माझ्या आई बहिणीला सोडून स्वतः घरातून नीघून गेले." आता आईला मध्येच बोलावे लागले, “तो काय वाईट आणि चुकीचे बोलतो आहे ग. तू स्वतः आम्हाला सोडून गेलेली तुला तर कुणीच घरातून बाहेर जाण्यासाठी म्हटले नव्हते. मग तूच सांग तू त्याला अशी कशी दोष देत आहेस.” मग सावलीने म्हटले, "अग आई परंतु तू या धूर्त मनुष्याला ओळखले नाही आहे. अग हा आस्तीनीतला तोच साप आहे जो तेथे लपून राहतो आणि मध्ये मध्ये आपला विषारी दंश मारत असतो. अग हा कोणी देव माणूस नाही तर एक नर पिशाच आहे.” सावली बोलत होती तेव्हाच आईने जोरात म्हटले, “बास झाली तुझी बडबड आता शशांक बद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोलशील तर माझ्या पेक्षा वाईट कोणी नाही असणार. तुला या प्रामाणीक मुलापासून काय शत्रुता आहे हे मला कळत नाही. तू घर सोडून जाण्याचा आधी सुद्धा तू कोमल समोर अशीच काही तरी बोलली होतीस याचा बद्दल. म्हणून कोमलने तुला काही बोलून दिले तर तू स्वतःच घर सोडून नीघून गेलीस आणि आता म्हणते की या मुलामुळे तुला घर सोडावे लागले. अग तू असे सांगुन कोमल आणि याचे संसार उभे राहण्याचा आधीच त्यांचे संसार उध्वस्त केले. तेव्हाच या बिचाऱ्याने ही शपथ घेतली की जेव्हा पर्यंत तू याला स्वीकार करत नाही तेव्हा पर्यंत हा कोमल सोबत लग्न करणार नाही आणि तेव्हा पासून तो आपले घर दार सोडून आमचा घरी आमचा सोबत राहतो आहे आणि माझ्या सोबत कोमलची सुद्धा काळजी घेतो आहे." आई जेव्हा हे सगळ बोलत होती तेव्हा सावलीची नजर ही शशांक याचावर खिळली होती. तीने बघीतले की शशांक याचा चेहऱ्यावर एक वेगळेच विषारी हसू होते. त्या हसण्याचा मागे त्याचा तो कुटीलतेने भरलेला चेहरा सावलीला दिसला होता.

   आता सावलीने म्हटले, "अग आई तू मला चुकीची ठरवत आहेस. माझा हेतु हा कुणाचा संसार उध्वस्त करण्याचा नव्हता परंतु...” मग आईने म्हटले, “बास झाले आता तुझे किंतु परंतु आता गुमान आपल्या रस्त्याला लाग आणि आम्हाला सुद्धा घरी जाऊ दे कोमल घरी एकटीच आमची प्रतीक्षा करत असेल.” असे म्हणून आई पुढे नीघाली आणि तीचा मागे शशांक हा सुद्धा निघाला होता. मग जाता जाता त्याने सावलीला म्हटले, “ताई असे मला केव्हा पर्यंत तुमचा पासून लांब ठेवाल मी क्षणोक्षणी तुमचा अवतीभवती आहे आणि असणार." असे म्हणून त्याने सावलीचा हाताला स्पर्श केला. सावलीला तो स्पर्श फारच घाण असा वाटला तीचा शरीरावर आणि मग तीने त्याचाकड़े बघीतला तर त्याची वाईट नजर ही सावलीचा मानेचा खालील अवयवावर खिळली होती. मग सावलीने ओढ़नी ने तीचा छातीचा भाग झाकला. आता शशांकने ओठांवर जीभ फेरत सावलीला बाय केला. सावलीला त्याचे ते बघणे वागणे आणि त्याचा तो स्पर्श हा किळसवाना वाटला होता. आता सावली आपल्या कार्यालयाचा दिशेने नीघाली होती. मग सावली कार्यालयात जाऊन तीचा कामात व्यस्त झाली होती त्यामुळे सकाळी काय घडले होते ती सगळ विसरली होती. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर ती आपल्या फ्लैटवर पोहोचली आणि दार उघडून ती आत गेली. मग तीने ते दार आतून लावून घेतले आणि ती किचनकडे जाण्यास नीघाली होती तेव्हाच तीला दिसले की एक मांजर तेथे फरशीवर पडलेले आहे. मग ती किचन मध्ये गेली तेव्हा तीने बघीतले की तीने ठेवलेले दूध हे फरशीवर पडलेले आहे. सावलीचा लक्षात आले की किचनची खिड़की ही उघडी राहून गेलेली होती. आता सावलीने म्हटले, “अरे देवा किचनची खिड़की तर उघडीच राहून गेलेली होती आणि म्हणून या मांजरीने खिडकीतुन येउन हे दुधाचे पातेले पाडले असेल. बघा किती निवांतपणे सगळ दूध संपवून ही मनी माऊ गाढ़ झोपलेली आहे.”

    मग सावलीने एक काठी हातात घेतली आणि तीने शुक शुक करून त्या मांजरीला उठवण्याचा प्रयत्न केला. ती मांजर काही केल्या उठली नाही. मग सावलीने आपले सारे धैर्य एकवटून त्या मांजरीला हाथ लावून उठवण्याचा प्रयत्न पुन्हा केला. परंतु ती तशीच पडून होती. आता मात्र सावलीला काही वेगळ वाटू लागल होत म्हणून तीने त्या मांजरीला हाताने स्पर्श करून तीचा शरीराची हालचाल बघीतली तर तीला कळले की ती मांजर तर मेलेली आहे. आता मात्र सावलीने म्हटले, “अरे देवा या मांजरीने एकतर माझे सगळ दूध हे नासवुन टाकले त्यानंतर ती ते दूध प्याली आणि आता जास्ती खाऊन पीऊन येथेच मरुन गेली.” सावलीने हे सगळ सहज म्हटले होते तीला तर कसली ही कल्पना नव्हती की हे दुसऱ्या तर्हेने घडले असेल म्हणून. मग तेवढ्यात सावलीचा फोन वाजू लागला होता. मग सावलीने तो फोन घेतला आणि बघीतले तर तोच नंबर होता त्या अज्ञात मनुष्याचा. आता सावलीने स्वतःला त्याचा सोबत फ्लर्ट करण्यासाठी तैयार केले आणि तीने म्हटले, "हेलो कसे आहात तुम्ही.” मग त्या व्यक्तीने म्हटले, “ तुझ्या विचार करून करून कासावीस झालेलो आहे मी." मग सावलीने म्हटले, “ इकडे म्हणता कासावीस झालेले आहात आणि फोन करायला इतका उशीर करता. तुमचापेक्षा तर मी उतावीळ झालेली आहे तुम्हाला भेटायला. मग त्याने म्हटले, “सगळ्या आधी मला तुझी क्षमा मागायची आहे." आता सावलीने म्हटले, “ क्षमा आणि ती कशासाठी " मग त्याने म्हटले, " हो क्षमा आणि ती माझ्या हातून एक चुक झाल्याबद्दल." तेव्हा सावलीने म्हटले, ' चुक कसली चुक.“ मग त्याने म्हटले, "माझ्या प्रीयेचे प्राण घेण्याचा प्रयत्न करण्याचे." सावलीने म्हटले, " कुठली तुमची प्रीय." तेव्हा त्याने म्हटले, तूच माझी प्रीय.” मग सावलीने म्हटले, “हो माझे प्राण तर तुम्ही घेतच आहात त्या दिवसापासून माझ्या तनात आणि मनात आपल्या दोघांचा मीलनाची अग्नी लावून.”

     शेष पुढील भागात ..