मास्टरमाईंड - Novels
by Aniket Samudra
in
Marathi Detective stories
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि ...Read Moreत्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली. “साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला “व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला त्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि ...Read Moreत्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली. “साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला “व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला त्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट
इस्पेक्टर पवार, तरवडे गावामध्ये प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता. त्या दिवशी सुध्दा घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना ...Read Moreस्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते. हॉटेलचा परीसर पोलीसांच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स, बाईट्स मिळवण्यासाठी आलेले पत्रकारांच्या गर्दीने गजबजुन गेला होता. खोलीमध्ये इन्स्पेक्तर पवार पंचनामा करत होते. १५ वर्षाच्या त्यांच्या काराकिर्दीत इतका क्रुर गुन्हा त्यांनी पाहीला नव्हता. फोटोग्राफर्स ने गुन्ह्याचे फोटो काढले. “चव्हाण, ठसे मिळाले का काही?” पवार “सर,
“अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार होता. चालण्यात, वागण्यात एक तडफदारपणा होता. गावातील लोक त्यांना बिचकुन ...Read Moreगावातली भांडण, मारामाऱ्या भाऊसाहेबांच्या नुसत्या जाण्याने मिटत असत. गावाच्या मध्यावर महालासारखा पसरलेला मोठ्ठा वाडा, गावाबाहेर द्राक्ष, ज्वारी, बाजरीची शेतं, त्यामध्ये राबणारी असंख्य लोकं, गावात २ पेट्रोल पंप, गावाच्यावेशीवर गर्द झाडीमध्ये दडलेली अवाढव्य वाडी, दिमतीला महागाड्या गाड्यांचा ताफा, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चेहऱ्यावर करारी भाव आणि त्याला साजेश्या झुपकेदार मिश्या. अंगात बहुतेक वेळा कडक इस्त्रीचा क्रिम रंगाचा शर्ट, स्वच्छ पाढरेशुभ्र धोतर आणि
शेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता. शेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या मृत्युने पुर्ण गावं हळहळला. ‘तरवडे’ गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला ...Read Moreगावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या. गावातील व्यवहार थंडावले होते. प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होता. गावातल्या कुठल्याही लॉज, खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहीती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी करुन ठेवली. गावातील निर्जन स्थळं, गावाबाहेरील शेतं, पडके वाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला. गावात अनोळखी असा इसम कुणाच्या पहाण्यात आला नव्हता. गावाबाहेरील
“शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्याच्या एका बाजुला नक्षीकाम तर ...Read Moreबाजुला दोन सिंहांचे चित्र कोरलेला आणि सुर्याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचीत्र आकाराचा तो सुरा होता. “म्हणजे शिंदे असं बघा!! अश्या प्रकारचा सुरा कोणाकडे असु शकतो? खाटीक, चिकनवाला, भंगारवाला, हॉटेलवाला??? कोण अश्याप्रकारचा विचीत्र चाकु बाळगत असेल? बरं ते जाऊ देत, गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नविन आलं आहे तपासलेत का तुम्ही?” “हो साहेब. म्हणजे गावाकडच्या जमीनीबद्दल
डॉली आपल्या कार्यालयात कामात मग्न होती त्या वेळेस शेजारील फॅक्स मशीन वर ‘इनकमींग फॅक्स’ ची अक्षर उमटली. डॉली ने शेजारील ‘ऍक्सेप्ट’ लिहीलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्स चा पेपर रोल फिरु लागला. त्या फॅक्स पेपरवर उमटणारे ते विचीत्र चित्र ...Read Moreडॉलीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने तो पेपर उलटसुलट करुन पाहीला आणि मग तिचे लक्ष कोपऱ्या फिक्कट अक्षरात उमटलेल्या जॉनच्या अक्षरांकडे गेले. डॉलीने तो कागद टेबलाच्या कडेला ठेवुन दिला आणि ती आपल्या कामात पुन्हा मग्न झाली. संध्याकाळी घरी निघायच्या वेळेस टेबलवरील पेपर आवरताना तिचे लक्ष पुन्हा एकदा त्या फॅक्सकडे गेले. तिने तो कागद पुन्हा एकदा निरखुन पाहीला. “कश्याला हवी असेल ही
दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला ... तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला. हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर आणि काळ्या रंगाची स्लॅक घातलेली डॉली पाहुन गावकर्यांचे डोळे ...Read Moreहोते. अर्थात डॉलीला अश्या " सेकंडलुक " ची सवय होतीच. शहरातील तरूण सुध्दा डॉलीला पाहुन वळुन बघत तिथे हे तर बिच्चारे गावकरी होते. डॉली स्वतःशीच हसली आणि जॉनला घट्ट पकडुन चालु लागली. संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघंही पोलिस चौकीवर गेले. जॉनने डॉलीने सुर्याबद्दल काढुन आणलेल्या माहीतीचा कागद पवारांना दाखवला. “ह्या कोण?”, हातातल्या कागदाकडे बघतच इ. पवार म्हणाले
“काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच ”, पवार म्हणाले “नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकांदेखत नानासाहेबांनी भैय्यासाहेबांना जिवे मारण्याची ...Read Moreदिली होती”, चव्हाण वरमुन म्हणाले. “अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं”, पवार “ते आहेच हो .. पण संपत्ती! नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैय्यासाहेबांना ना मुल ना बाळ!!”, चव्हाण “बरं. एक वेळ तसं समजुन चालु. पण मग शेवंता आणि अनिताताई? खुन तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खुनसुध्दा नानासाहेबांनीच
“तुला माहीती आहे शशांक, नानासाहेबांपेक्षा भैय्यासाहेब मला जास्त जवळचे होते. लहानपणापासुन मी त्यांच्याच जवळ जास्ती असायचे. ‘डॉल’ होते मी त्यांची. लहानपणी मला ते ’ये डॉले..’ म्हणुन हाक मारायचे ना.. पण आता सारंच संपल! त्यांच्या ह्या अश्या जाण्याने मला खरंच ...Read Moreधक्का बसला आहे..” सुमन डोळे टिपत बोलत होती. “मला का कळत नाही का तुझं दुःख सुमी! पण इथं अजुन किती दिवस थांबणार आपणं? परत आपल्याला जायलाच हवं ना?” शशांक सुमनची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होता. “हो शशांक, पण मला असं वाटत होतं की भैय्यासाहेबांचा खुनी पकडला जाईपर्यंत तरी आपणं इथं थांबावं! मला त्या नराधमाचा चेहरा पहायचा आहे आणि विचारायचं आहे,
पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आणि इतर जुजबी तपास पुर्ण होईपर्यंत तरी जॉनच्या नशीबी तुरुंगवास लिहिलेला होता… “नशीब बलवत्तर असेल तर ह्यातुन सुखरुप बाहेर पडु”.. जॉन विचार करत होता.. “परंतु नानासाहेबांचा खुन अगदी त्याच वेळेस झाला असेल तर मात्र कठीण आहे.. नानासाहेबांची ...Read Moreतशी बर्यापैकी कोमट होती ह्यावरुन तरी निदान खुन फार पुर्वी झाला असेल असे वाटत नाही…” “पण डॉली?? तिने का केले असेल असे?? खरंच तिचा माझ्यावर संशय होता.. भावनेच्या आहारी जाऊन तिने असे केले.. की..??”.. जॉनला राहुन राहुन डॉलीबद्दल एकमत होत नव्हते.. “का केले असेल असे डॉलीने.. का????” जॉन विचारात मग्न असतानाच इ.पवार जॉनच्या सेल पाशी येऊन उभे होते.. “काय जॉन