ती एक शापिता! - Novels
by Nagesh S Shewalkar
in
Marathi Moral Stories
सुबोधराव दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सकाळपासून किती वेळ त्याचे वाचन केले असेल हे त्यांनाही माहिती नसेल. एक चाळा, वेळ जाण्याचे साधन म्हणून वर्तमानपत्र हातात घेणे, एक नजर त्यावर टाकणे आणि लगेच बाजूला ठेवणे असे त्यांचे सातत्याने चालू असे. तितक्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलवर ठेवलेल्या एका कागदाकडे गेले. कदाचित सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी त्या कागदाने फडफड जोरात सुरू केली असावी. त्यांनी तो कागद उचलला. घडी उकलत असताना त्यांचे लक्ष आतील अक्षरावर गेले आणि ते पुटपुटले, 'आँ! माधवीचे अक्षर दिसतंय. तिने चिठ्ठी का लिहिली असावी?' घडी पूर्ण उकलून होताच त्यांनी मजकूरसुरुवात केली... श्री. सुबोधराव... पत्रातील तसा मायना
ती एक शापिता! (१) सुबोधराव दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सकाळपासून किती वेळ त्याचे वाचन केले असेल हे त्यांनाही माहिती नसेल. एक चाळा, वेळ जाण्याचे साधन म्हणून वर्तमानपत्र हातात घेणे, एक नजर त्यावर टाकणे आणि लगेच बाजूला ठेवणे असे ...Read Moreसातत्याने चालू असे. तितक्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलवर ठेवलेल्या एका कागदाकडे गेले. कदाचित सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी त्या कागदाने फडफड जोरात सुरू केली असावी. त्यांनी तो कागद उचलला. घडी उकलत असताना त्यांचे लक्ष आतील अक्षरावर गेले आणि ते पुटपुटले, 'आँ! माधवीचे अक्षर दिसतंय. तिने चिठ्ठी का लिहिली असावी?' घडी पूर्ण उकलून होताच त्यांनी मजकूरसुरुवात केली... श्री. सुबोधराव... पत्रातील तसा मायना
ती एक शापिता! (२) सुबोधच्या आत्याची तेरवी झाली. तेरवीसाठी जमलेली पाहुणेमंडळी निघून गेली. सुबोधचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. त्याची आत्याही बालविधवा होती. सुबोध आत्याकडे राहायला आला. आत्याने त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचा मोठा केला. सुबोधचे बी. कॉम. पर्यंत ...Read Moreझाल्यानंतर तो एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागला. तसे त्याच्या आत्याने अंथरूण धरले ते कायमचेच! आत्याच्या मृत्यूनंतर सुबोध एकाकी पडला... सरकारी काय किंवा इतर कार्यालये काय सारे जणू भ्रष्टाचाराचे आगार! तशा आगारात नोकरीला असलेला सुबोध प्रामाणिकपणे काम करताना भ्रष्टाचारापासून दूर होता हे कुणाला सांगितले तर खरे वाटायचे नाही. जणू कोळशाच्या वखारीत काम करूनही कपडे पांढरेशुभ्र असल्याप्रमाणे! परंतु हा समाज का प्रामाणिकपणे
ती एक शापिता! (३) सकाळी आलेले वर्तमानपत्र सुबोधने उचलले. वर्तमानपत्रात तोच भ्रष्टाचाराचा विषय होता. जिल्हा परिषदेचे भ्रष्टाचार प्रकरण भलतेच गाजत होते. अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले होते आणि एक कारकून पुरता अडकला होता. त्याला हथकड्या पडल्या होत्या. ती बातमी वाचून ...Read Moreअस्वस्थ झाला. त्याच्या ह्रदयाची धडधड वाढली. त्याला वाटले, 'उद्या माझ्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा घोटाळा उघडकीस आला आणि साहेबांनी सारा दोष माझ्या माथी मारला तर? माझे आयुष्य खऱ्या अर्थाने आता सुरू होत असताना नसते लचांड मागे लागले तर? तसे मी साहेबांकडे हिस्सा मागतही नाही. साहेबच जुलमाने देतात. मी हिस्सा नाकारला तरी का साहेब हात आखडता घेणार आहेत? ते मारायचा तेवढा डल्ला मारणारच.
ती एक शापिता! (४) सुहासिनीला साहेबांच्या दालनात जाऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. त्यामुळे बाहेर सुबोधचे कामात लक्ष लागत नव्हते. 'साहेबांची स्वाक्षरी घ्यायला इतका वेळ? सही घ्यायला स्वतःच का जायला पाहिजे होते? शिपाई कशासाठी आहे? त्याच्यासोबत पंजिका पाठवता ...Read Moreअसती. सुहासिनी नेहमीच साहेबांकडे का जाते? एकदा तिला समजावून सांगितले पाहिजे. हिच्याकडे बघताना साहेबांची नजर काही वेगळीच असते. गल्लीतल्या टारगटांच्या नजरा ओळखणाऱ्या सुहासिनीला साहेबांची नजर ओळखता येत नाही? साहेबांचा स्वभाव लक्षात आल्यानंतरही हिने वारंवार त्यांच्या दालनात का जावे? ' सुबोध तशा विचारात असताना शिपाई किसनने विचारले, का हो साहेब, काय विचार करता? काही नाही रे सहजच. डोकं जड पडलंय. सुबोध
ती एक शापिता! (५) नेहमीप्रमाणे निलेशने सुबोधच्या वाड्यात प्रवेश केला. वाड्याशेजारच्या ओट्यावर बसलेल्या काही टारगटांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या. एक-दोन शब्दही उच्चार. तिकडे दुर्लक्ष करीत निलेश सुबोधच्या खोलीत शिरला. सुबोधच्या त्या आजारापासून निलेशचे जाणे-येणे जास्तच वाढले होते. सुबोध त्या दिवशीनंतर ...Read Moreदिवस झोपूनच होता. ते गोळी प्रकरण निलेशलाही समजलं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्टीने अशक्त झालेल्या सुबोधला निलेशने बरेच सांभाळले. त्याच्या आजारापूर्वी कामानिमित्ताने येणारा निलेश दररोज येऊन त्याची चौकशी करून त्याला धीर देत होता. सुबोधलाही निलेश आला की, खूप बरे वाटायचे. तिघेही एकाच कार्यालयात असल्यामुळे निलेश आणि सुहासिनीमध्ये संकोच नव्हता, वागण्यात मोकळेपणा आणि सहजता होती. डॉक्टरांकडून ते गोळी प्रकरण शेजारी आणि गल्लीतही
ती एक शापिता! (६) "चल रे, अशोक खेळायला जाऊ... कुर्रर्र!... "असे म्हणत निलेशच्या पत्नीने सुबोध-सुहासिनीच्या मुलाचे नाव ठेवले. एक छोटासा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आलेल्या वाड्यातील पाच-सहा बायका फराळ करून गेल्याचे पाहून निलेशची पत्नी म्हणाली, "वहिनी, आमचे हे म्हणत ...Read Moreकी.." "काय म्हणत होते?" सुहासिनीने विचारले. "हेच की.. भाऊजीचे आणि तुमचे..." "पटत नाही. हेच ना?" "होय तेच. पण वहिनी, बायांनी असे आकांडतांडव करू नाही हो." "मग काय करावे?" "गुपचूप राहावे. घटकाभर मिळणाऱ्या सुखातच सुख मानावे. त्यांना घडी-घडी टोचू नये. अहो, दुखावलेला आणि त्यातल्या त्यात 'त्या' गोष्टीसाठी दुखावणारा माणूस जीवनातून उठतो. एखादा माणूस गळफास घ्यायला मागेपुढे पाहत नाही. काही माणसे तर..."
ती एक शापिता! (७) नव्या विचाराने प्रेरित झालेला, नवी वाट निश्चित केलेल्या सुबोधला एकदम हायसे वाटले. त्याच्या शरीरात एक नवे चैतन्य शिरले. तो एवढा प्रफुल्लित झाला की, मलेरियाच्या आजारातून दोन दिवसातच ठणठणीत बरा झाला. एका नवीन उमेदीने तो तिसऱ्याच ...Read Moreकामावर परतला. कार्यालयातील त्याची उपस्थिती तशी नगण्य ठरली. कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. साहेबांची भेट घेऊन तो स्वतःच्या कामात मग्न झाला. सुहासिनी साहेबांच्या दालनात गेली परंतु नवदृष्टी स्वीकारलेल्या सुबोधला त्याचे काही वैषम्य वाटले नाही. नेहमीप्रमाणे हात जडावले नाहीत, कपाळावर आठ्यांचं जाळ घट्ट झालं नाही, चेहरा उतरला नाही की औदासिन्य पसरलं नाही. उलट त्याला कसं मोकळं मोकळं वाटलं. एक वेगळेच
ती एक शापिता! (८) नव्या विचाराने प्रेरित झालेला सुबोध 'योग्य' व्यक्तीचा शोध घेऊ लागला. सहचर्यात येणारांकडे, परिचितांकडे त्यादृष्टीने, त्या एकाच चष्म्याने पाहू लागला. सुरुवातीला त्याचं लक्ष वेधले ते साहेबांनी! त्याच्या लग्नाच्या वेळी साहेबांनी त्या दोघांना भेट म्हणून दिलेल्या अंगठ्याही ...Read Moreसाहेबांनी स्वतःच अंगठी सुहासिनीच्या बोटात घातली होती म्हणजे त्यांनी... सुबोधच्या मनात विचारांनी गर्दी केली... 'सुहासिनीचे साहेबांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या संबंधात मोकळेपणा, सहजता आहे. कोणताही संकोच नसल्यामुळे त्या दोघांमध्ये ते संबंध सहजपणे स्थापित होतील. त्यांना एकमेकांबद्दल जी आपुलकी आहे त्याचे रुपांतर शारीरिक आसक्तीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. सुहासिनीच्या मनात ते विचार नसतीलही परंतु साहेबांचे काय? बहुतेक अधिकारी हाताखाली काम करणाऱ्या
ती एक शापिता! (९) कार्यालयाच्या पत्त्यावर आलेलं ते पत्रं किसनने निलेशजवळ दिले. तो जाडजूड लिफाफा पाठवणारा सुबोध आहे हे पाहून निलेशला आश्चर्य वाटले. आत्ताच तिकडे गेलेल्या सुबोधने असे जाडजूड पत्र का पाठवले असावे या विचारात त्याने तो लिफाफा फोडला. ...Read Moreलांबलचक पत्रात सुबोधने लिहिले होते, प्रिय निलेश, माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटले असणार कारण इथे येऊन मला फार दिवस झाले नाहीत. परंतु काही गोष्टी अशा असतात की, त्या प्रत्यक्ष सांगण्याचे धाडस माझ्याजवळ नाही. हे पत्र लिहिताना माझे हात थयथरताहेत, शब्द हजारो कोस दूर जाऊ बसले आहेत. ऑडिटर येण्यापूर्वी मी एक आगळावेगळा विचार करीत होतो पण ऑडिट प्रकरणामुळे थोडा वेळ
ती एक शापिता! (१०) त्या सकाळी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीने सुबोधचे स्वागत केले. 'पत्नी आणि प्रियकराने मिळून पत्नीच्या मुलाचा खून केला...' मथळा वाचूनच एकूण घटना त्याच्या लक्षात आली. पुर्ण बातमी वाचण्याची त्याला गरजच भासली नाही. कारण त्या शीर्षकानेच त्याच्या डोक्यात ...Read Moreचमकला...'सुहासिनी-निलेशचे संबंध आता अत्यंत मोकळेपणाने सुरू झाले असतील. सुहासिनी सुखसागरात मनसोक्त विहार करीत असेल. ती समाधानी असेल. परंतु तशा काळात... तिच्या आनंदमयी वाटेत अशोक... अशोक आला तर? कालांतराने तो त्यांच्या संबधात अडसर ठरू लागला तर? ते दोघे मिळून तो अडसर म्हणजे अशोकला ... नाही. नाही. हा काय वेडेपणा करून बसलो मी. मला हा निर्णय घेताना अशोकची आठवण का आली नाही?
ती एक शापिता! (११) सायंकाळी कार्यालयातून परतलेला सुबोध हातपाय धुऊन आरशासमोर उभा राहून भांग काढत असताना त्याचे लक्ष केसांकडे गेले. बऱ्याच केसांची चांदी झालेली पाहून तो आश्चर्यचकित झाला. चाळिशी उलटली नाही तोच बरेच केस पांढरे झाले होते. लग्न होईपर्यंत ...Read Moreविश्व मर्यादित होतं. काही काळजी नव्हती. लग्न झाल्यानंतर सांसारिक अनेक अडचणी मानगुटीवर बसल्या. त्यातल्या त्यात स्वतःचं सामर्थ्य आणि सुहासिनीच्या समाधानासाठी तो तळमळत राहिला. त्याच्या पश्चात, त्याच्या संमतीने फुललेल्या सुहा-निलेशचे संबंधाची नाही म्हटलं तरी त्याला एक प्रकारची चिंताच होती. त्यापूर्वी कार्यालयातला भ्रष्टाचार, ऑडिट प्रकरण अशा विविध घटनांमुळे त्याचे केस पांढरे होत होते... "बाबा, बाबा...." अशोकचा आनंदी आवाज ऐकून तो भानावर आला.
ती एक शापिता! (१२) अशोक दहाव्या वर्गात शिकणारा एक युवक! वय झाले म्हणून त्याला युवक म्हणायचं नाही तर त्याची शरीरयष्टी एकदम कृश! नुसताच ताडासारखा वाढलेला. खायला भरपूर असूनही शरीर म्हणावे तसे भरलेच नव्हते. थोडेसे काम केले तरी त्याला धाप ...Read Moreअभ्यासात मात्र तो भलताच हुशार होता. त्याचे शिक्षक नेहमी म्हणायचे की, अशोक नक्कीच शाळेचे नाव काढणार आहे. मॅट्रिकला तो पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येईल. त्याच्या प्रकृतीची काळजी असलेल्या सुबोध - सुहासिनीला त्याची अभ्यासातील प्रगती पाहून आनंद वाटत असे. पीयूष अशोकप्रमाणे हुशार नसला तरीही विविध स्पर्धांमध्ये तो बक्षिसे मिळवित असे. आशा आठव्या वर्गात शिकत असली तरी वयाच्या मानाने बरीच थोराड वाटत असे.
ती एक शापिता! (१३) त्या रात्री सुहासिनीला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. त्या आवाजाचा तिने अंदाज घेतला. तिच्या शेजारी झोपलेली आशा झोपेत बरळत होती, 'अमर, आय लव यू.. आय ..आय.. लव यू...ओ.. अमर..अमर...' तिच्या तशा शब्दांनी सुहासिनी पूर्ण जागी ...Read Moreतिने आशाला हलवले. गाढ झोपेत असलेली आशा जागी झाली नाही तरी तिची असंबंध बडबड मात्र थांबली. सुहासिनीने घड्याळात बघितले. रात्रीचे तीन वाजत होते. सकाळ होईपर्यंत सुहासिनीला झोप लागली. तिच्या डोक्यात सारखे आशाचेच विचार येत होते. तिला वाटले, 'ही पोरगी अशी का वागते? हिच्या मनात काय आहे?घरकामाचे सोडा परंतु अमरसोबतचे हिचे संबंध कोणत्या स्तरापर्यंत गेले असतील? आत्ताची हिची बडबड झोपेत असेल
ती एक शापिता! (१४) आशाला जाग आली. तिने शेजारी बघितले. अमर शांत झोपला होता. नेहमीप्रमाणे त्याला मिठीत घेऊन प्रणयाचे रंग उधळण्याची इच्छा तिला झाली नाही. का कोण जाणे पण अचानक तिचे डोळे भरुन आले. तसा प्रकार तिच्या जीवनात फारसा ...Read Moreघडला नव्हता. तिचे डोळे सहसा भरून येत नसत. तिला प्रकर्षाने माहेरची आठवण आली. आई-बाबा, दादाला भेटावे अशी इच्छा अनावर झाली परंतु वास्तव लक्षात येताच तिला भरून आले. इतर मुलींप्रमाणे आठवण येताच माहेरी धाव घ्यावी अशी तिची परिस्थिती नव्हती. अमरसोबत लग्न करून ते हक्काचे दरवाजे तिने स्वतःच बंद करून टाकले होते. एका अमरला मिळविण्यासाठी तिने अनेक जिवाभावाच्या नात्यांना, जिवाभावाच्या संबंधाला तिलांजली
ती एक शापिता! (१५) पीयूष चालवत असलेल्या 'गवाक्ष' सदराने, लेखमालेने खूप छान प्रतिसाद मिळवला. त्याच्या गवाक्षमुळे सुजनतामत या दैनिकाचा खप दिवसेंदिवस वाढत होता. लोक सुजनतामत आणि गवाक्षची प्रतिक्षा करायचे. एकदा का अंक हातात पडला की, गवाक्ष सदर असलेले पान ...Read Moreहातात पडावं म्हणून घरातील स्त्री-पुरुष सारे टपलेले असायचे. एवढे ते सदर लोकप्रिय झाले होते. कारण ते सदर विनोदी तर होतेच शिवाय कुणाचा ना कुणाचा पर्दाफाश करणारे असे. मार्मिक भाषेसोबतच विनोदाची, खुसखुशीत शब्दांची झालर अनेकांना आवडायची. पीयूषकडे रोज प्रशंसा करणारी अनेक पत्रं यायची. साहजिकच लोकप्रियता वाढल्यामुळे पीयूषचा उत्साह वाढला तसाच अंकाचा खप वाढल्यामुळे मालकही पीयूषवर खुश होते. दर महिन्याला पगारासोबत पीयूषला
ती एक शापिता! (१६) सायंकाळची वेळ होती. अशोक नुकताच बँकेतून आला होता. नेहमीप्रमाणे तो हातपाय धुवून तयार होत असताना बाहेरून पीयूषचा आवाज आला, "अशोक... अशोक.." "काय रे? आलो. आलो. अग, मी बाहेर जाऊन येतो..." माधवीला सांगून तिच्या उत्तराची प्रतिक्षा ...Read Moreकरता आणि तिच्याकडे न बघता अशोक बाहेर पडला. त्याला पाहताच पीयूष ओरडला, "आशक्या, अबे, लक लागलं. नशीब फळफळलं रे." "अरे, पण झाले काय?" "काकदृष्टी हे आपले वर्तमानपत्र पंधरा दिवसात बाहेर पडणार." "पंधरा दिवसात? काय लॉटरी लागली की काय रे?" "होय. तसेच समज. आपले पालकमंत्री आहेत ना, ते वर्तमानपत्र काढत आहेत. मी सुचवलेले काकदृष्टी हेच नाव त्यांना आवडले आणि त्यांनी निवडले.
ती एक शापिता! (१७) "ये बस! अशोक, आत्ताच पालकमंत्र्यांकडून आलोय. उद्या सारी छपाईची यंत्रे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात पहिला अंक बाहेर पडणार आहे. मीता, चहा कर ना." पीयूष आनंदी आवाजात म्हणाला. "हो. करते..." असे म्हणत मीता आत गेली. ...Read Moreम्हणाले पालकमंत्री?" अशोकने विचारले. "काही विशेष नाही. सध्या तरी सारे अधिकार, वर्तमानपत्राची सारी सुत्रं माझ्याकडेच सोपविली आहेत." "व्वा! छान! एकंदरीत तुझ्या मनासारखे होतंय तर. आता तुला तुझे विचार हवे तसे मांडता येतील." "बरोबर आहे. आता तू बघ. असे एकेकाचे पितळ उघडे पाडतो ना बघच तू. राजकारणी, अधिकारी यांची भ्रष्टाचाराची पाळंमुळं उघडी पाडून यांना नाही खडी फोडायला पाठवले तर..." "त्यांना खडी
ती एक शापिता! (१८) पीयूष सकाळी लवकर उठला. शयनगृहात नजर फिरवत असताना त्याचे लक्ष भिंतीवर लावलेल्या त्याच्या आणि मीताच्या फोटोकडे गेलं. नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्यांनी मोठ्या हौसेने तो फोटो काढला होता. त्यावेळी ते दोघे विशेषतः मीत खूप आनंदी ...Read Moreहोती. का नाही दिसणार? तिचे ज्याच्यावर प्रेम होते, ज्याच्या धाडसावर, वृत्तपत्रातील बेधडक परंतु अभ्यासू आणि वास्तव लेखनावर जिचं प्रेम होते त्या मीताला तिचा प्रियकर पती म्हणून लाभला होता. पीयूषचे तरी वेगळे काय होते? जिच्या रुपावर भाळून तो प्रेम करीत होता ती प्रेयसी त्याच्या जीवनात पत्नी म्हणून आली होती. सहसा बहुतेक कुटुंबात प्रेमविवाहाला विरोध असतो परंतु त्याबाबतीत पीयूष- मीता भाग्यवान ठरले
ती एक शापिता! (१९) सुबोध-सुहासिनी कार्यालयातून परतले. हातपाय धुऊन सुहासिनी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. सुबोध खुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत असताना सुहासिनी चहाचे कप घेऊन आली. सुबोधने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. चहाचा कप घेताना सुबोधने विचारले, "माधवीचा चहा..." "आता तेच ...Read Moreआहे. सुनेच्या पुढे पुढे करायचे. या वयात कार्यालयात काम, घरी आले की, घरकाम करून सुनेचेही कामे करते. वाढलेले ताट तिच्यापुढे ठेवते आणि तिचे उष्टेही काढते..." "काही कळत नाही, माधवी अशी का वागते? आपले सोड पण त्या दोघांमध्ये कधी हसणं-खेळणे, रुसणं-फुगणं दिसत नाही. शेजाऱ्यांप्रमाणे दोघे समोरासमोर बसतात, एका खोलीत झोपतात. वास्तविक या वयात दोघांनी कसं..." "त्यांचंही आपल्यासारखेच आहे असे वाटते." "म्हणजे?"
ती एक शापिता! (२०) दोन-तीन दिवसांनी अशोकला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तो घरी आला. घरातील वातावरण बरेच तंग होते. माधवीने घर सोडायची पुन्हा चर्चा केली नाही. त्या सायंकाळी अशोक बैठकीतल्या पलंगावर डोळे लावून पडला होता. समोरच्या सोफ्यावर सुबोधही चिंताग्रस्त चेहऱ्याने ...Read Moreहोता. अशोकच्या चेहऱ्याकडे सुबोधचे लक्ष गेले. त्याच्या मनात विचार आला, 'अशोकचे असे का झाले? देवाने माझ्यासारख्या अर्धवट पुरुषाला संतती दिली तीही तशीच अर्धवट! मुलगी दिली तीही तशीच वासनांकित! परजातीच्या मुलासोबत पळून गेली. तो घाव अशोककडे बघत सहन केला परंतु भविष्यात हे ताट वाढून ठेवलेय हे माहिती असते तर? मी त्याला समजून घ्यायला कमी पडलो. मी माझ्याच विवंचनेत राहिलो. तो तारुण्यात
ती एक शापिता! (२१) भर दुपारची वेळ होती. सर्वत्र का कोण जाणे भयाण शांतता पसरली होती. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. सुबोधचे कुटुंब राहत होते तो परिसर सारा चाकरमान्यांचा! सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत त्या भागात नीरव शांतता असे. पुरुषांसोबत ...Read Moreकुटुंबातील स्त्रियाही नोकरी निमित्ताने बाहेर पडत असल्यामुळे घराघरात मोजकीच माणसे असायची. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्त्रियांनाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडावेच लागते त्यामुळे कुटुंबासोबत मुलांचेही भविष्य उजळते. आर्थिक बाजू भक्कम असली म्हणजे समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते. मात्र त्याचवेळी घरकामाचा अतिरिक्त बोझाही स्त्रियांवर पडतो आहे. पत्नी दिवसभर घराबाहेर राहून आर्थिक स्थिती बळकट करते म्हणून कुटुंबातील पुरुष तिला घरकामात मदत
ती एक शापिता! (२२) पीयूष लगबगीने अशोकच्या घराकडे निघाला. तो अतिशय आनंदात होता. स्वतःच्या आनंदात माधवीला सहभागी करून घेण्यासाठी तो धावपळ करत निघाला होता. रस्त्यावर एक्कादुक्का माणसे होती. त्याने पीयूषचे घर असलेल्या गल्लीत प्रवेश केला. तितक्यात त्याला एक मुंगुस ...Read Moreगेलं. तो मनाशीच म्हणाला, 'व्वा! योगयोग चांगला दिसतोय. अलभ्य लाभ होणार असे दिसतेय. लाभ होईल तो कोणता? माधवीकडून आलिंगन की हवहवसं चुंबन! अशोकने जाणीवपूर्वक दिलेली मूक संमती असतानाही आम्ही 'ती' पायरी ओलांडली नाही. आताही घरी अशोक असणारच..." अशा विचारात पीयूष अशोकच्या घरात शिरला. दिवाणखान्यातील पलंगावर अशोक नसल्याचे पाहून पीयूष सरळ बेडरूममध्ये शिरला. नेहमीप्रमाणे माधवी पलंगावर पहुडली होती. तिला पाहताच पीयूष
ती एक शापिता! (२३) बँकेच्या घड्याळाने 'टण' असा आवाज दिला. अशोकने घड्याळाकडे पाहिले. दुपारचे अडीच वाजत असलेले पाहून अशोक मनात म्हणाला, 'अडीच वाजले. म्हणजे पीयूष घरी पोहोचला असेल. त..त.. त्याने माधवीला मिठीत घेतले असणार आणि ज्या स्पर्शासाठी माधवी आसुसलेली ...Read Moreती ज्या सुखासाठी तळमळत होती ते सारे घडत असणार, घडले असणार. त्यांच्या प्रेमाला बहर आला असणार. माझा अडथळाही नसल्यामुळे ते दोघे अधिक उन्मुक्तपणे, बिनधास्तपणे, आक्रमकपणे ते सुख लुटत असणार...' त्या दिवशी दुपारी पीयूष-माधवी या दोघांमध्ये अशोकला हवे असलेले संबंध स्थापित झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अशोक बँकेच्या कामावर हजर झाला. त्यामागेही त्याचा त्या दोघांना पूर्ण एकांत मिळावा, ते संबंध अधिक दृढ व्हावेत,
ती एक शापिता! (२४) दुसऱ्या दिवशी सकाळी सुहासिनीने सुबोधसोबत रजा पाठवली. दुपारी नेहमीप्रमाणे पीयूष शीळ वाजवत घरात शिरला. सुहासिनीला दिवाणखान्यात पाहून तो गडबडला. बोबडी वळल्याप्रमाणे झालेल्या अवस्थेत त्याने विचारले, "काकू, आज घरीच?" "रजा घेतलीय. तुला तर माझी काही अडचण ...Read Moreनाही ना?" सुहासिनीने विचारले तसा पीयूष जास्तच गोंधळला. त्याने गडबडून विचारले, "मला कशाची अडचण? उलट बरे झाले, दिवस कसा नुसता जात नाही. खोली कशी खायला..." "का रे, माधवी असते ना?" "असते. बोलते थोडेफार. पण किती वेळ? तिला तिचीच कामे संपत नाहीत..." असे म्हणत पीयूष खोलीत निघून गेला... सुहासिनीने अधिक खोलात जाऊ नये म्हणून. कारण सुहासिनीने अधिक चौकशी केली तर त्याच्या
ती एक शापिता! (२५) त्या दिवशी सकाळी सुबोधला जाग आली. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याच्या शेजारी सुहासिनी शांत झोपलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. कारण भिंतीवरच्या घड्याळात सात वाजत होते. एवढा वेळ सुहासिनी कधीच झोपत नसे. परंतु आदल्या दिवशी रात्री माधवीचे ...Read Moreत्यांना मिळाले. अशोकच्या मृत्यूला बरोबर महिनाही झाला नाही तोच माधवी पीयूषचा हात धरून निघून गेली. तो धक्का सुबोधप्रमाणेच सुहासिनीलाही बसला होता. त्यारात्री अन्नाचा कणही न खाता ते दोघे झोपण्याचा प्रयत्न करीत होते परंतु उपाशी पोटी झोप येत नाही असे म्हणण्यापेक्षा बसलेल्या धक्क्याने ते उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे दोघांनाही उशिरापर्यंत झोप लागली नाही. झोप लागली आहे तर तिला झोपू द्यावे या