Cyanide book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Cyanide is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सा य ना ई ड - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Detective stories
गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा हात लांब पसरला होता.
तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता.
"तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले.
माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला.
त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला.
त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने सावकाश पुन्हा प्रश्न विचारला
"तुझं नाव काय आहे?"
गुंगीत असलेली मुलगी चुळबुळली,तिच्या पापण्या फडफडल्या.
माझी रहस्य कथा सायनाइडक्रमशः प्रसिध्द करत आहे.यातील सर्व प्रसंग घटना भूमिका पात्रे काल्पनिक असून त्याचा अन्य कोणत्याही भाषेतील कोणत्याही कथेशी तसेच वास्तवातील भूमिका पात्रे प्रसंग याच्याशी संबंध नाही.सायनाईड सायनाईड प्रकरण १गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा ...Read Moreलांब पसरला होता. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता."तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले.माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला.त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला.त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने
सायनाईडप्रकरण दोन दुपार च्या कामासाठी पाणिनी पटवर्धन ऑफिस मधून बाहेर पडायच्याच तयारीत होता. त्याच वेळी त्याची सेक्रेटरी सौम्या सोहनी म्हणाली, “ बाहेर च्या ऑफिस मध्ये डॉ. कार्तिक बसले आहेत, ते आपल्या ऑफिस मधे सारखे अस्वस्थ पणे ...Read Moreघालत होते. मी त्यांना सांगितलं की ५ वाजायला आलेत आणि....”“काय हवंय त्यांना ? “ पाणिनी पटवर्धन ने मधेच विचारलं. “ ते म्हणताहेत की काही झालं तरी तुम्हाला भेटायच आहेच त्यांना , त्यांच्याकडे एक मोठ उपकरण आहे, ते टेप रेकॉर्डर सारखे दिसतंय “‘ मी भेटतो त्यांना , “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. “काहीतरी अती महत्वाचे असल्या शिवाय डॉ. कार्तिक असे तडकाफडकी येणार नाहीत ““तडकाफडकी?” सौम्या सोहनी ने
सायनाईड प्रकरण ३दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरे आलेत इथे, त्यांना आपण दिलेल्या वेळे नुसार.”“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “तिने मान डोलवली.“ कशी आहे ती दिसायला सौम्या ? “सौम्या ...Read Moreसंकोचली.नंतर म्हणाली,’’ चांगली आहे दिसायला.”आणखी काय विशेष असं ? ““ लाजरी बुजरी ““ नकारात्मक व्यक्तिमत्व ? ““ नाही , नाही ,तसं अजिबात नाही.पण नेमकी कशी आहे माहित्ये का, घोटीव पाय आहेत, उभारीचे शरीर आहे पण त्याचे प्रदर्शन करणारी नाही.सुंदर डोळे आहेत पण नजर खाली आहे.,हात छानच आहेत पण घडी घालून बसली आहे.डोळे खूप बोलके आहेत पण हळुवार पणे संवाद साधणारे आहेत.तुमच्या लक्षात आले
सा य ना ई डप्रकरण ४पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी एका अशिला बरोबर मिटींग मध्ये होता पण सौम्या ने इतर ...Read Moreदिसणार नाही अशा पद्धतीने मान हलवून त्याचे लक्ष वेधून घेतल्यामुळे, तो उठून सौम्या बरोबर ऑफिस मधील लायब्ररी च्या खोलीत आला.तिने फोन च्या दिशेने त्याचे लक्ष वेधले. “ डॉ.डोंगरे लाईन वर आहेत,ते म्हणताहेत खूपच तातडीचे काम आहे.तुम्हाला भेटलेच पाहिजे.मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या अशीलाबरोबर आहात पण मी त्यांना बाहेर बोलावून आणते.”पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला. “ हॅलो.” “ पाणिनी पटवर्धन,” डॉ.डोंगरे उद्गारले. त्याचा आवाज
सा य ना ई ड प्रकरण ५हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत ओढलेली टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहेरा, चंद्रा सारखा गोल गरगरित होता. आपुलकीने हात पुढे ...Read Moreत्याने पाणिनी पटवर्धन शी हस्तांदोलन केले.“ वा: वा: वा: पाणिनी पटवर्धन, किती तरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करण्याची संधी मिळाली ! नाही का ? ““ अगदीच फार काळ नाही, दोन वर्ष असतील.”“ खूप काळ गेलाय. काय विशेष या वेळी ? ““ कोरगावकर, हा झुल्पीपरकारनावाचा मुलगा आहे.त्याला काहीतरी सापडलंय.त्यानेच तुला सांगू दे स्वत:च्या तोंडून कुठे मिळाली आहे ही वस्तू.”“ हो हो चालेल ना. “