Cyanide - 11 books and stories free download online pdf in Marathi

सा य ना ई ड - (प्रकरण ११)

सा य ना ई ड
प्रकरण ११

पाणिनी ने आपली गाडी हम रस्त्याला वळवली. “ कुठे चाललोय आपण?” जयकर ने विचारले.

“ अत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी चाललोय.पोलीस तुला शोधताहेत , बहुतेक मलाही शोधात असावेत.म्हणून मी विचार केला की तुला बरोबर घ्यावं आणि पोलिसांनी अनन्याला शोधण्यापूर्वी आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करावा. आता मुख्य अडचण अशी आहे की आपण हे प्रकरण हाताळण्याचा काही मार्ग जोवर शोधत नाही तो पर्यंत पोलीसाना तुझ्या पर्यंत कसे पोचू द्यायचे नाही.”

“ काय पद्धत आपण वापरायची?’’

“ मला हे उत्तर माहीत असतं तर अशा प्रकारे आपण गाडीतून भटकत बसलो नसतो. एक गोष्ट तुला सांगू शकतो,जर अनन्यादोषी असेल तर तिला वस्तुस्थितीला समोर जावेच लागेल.”

“ ती नाहीये.मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो, ती नाही दोषी.”

“ तुला काय माहिती?”

“ कारण मी तिला चांगलं ओळखतो.”

“ कारण तुझा तिच्यावर विश्वास आहे, आणि विश्वास असायचं कारण तुझं प्रेम आहे.”

तुम्हाला ही तसच वाटत नाही?”

“ अत्ता तरी नाही.मी काही तिच्या प्रेमात पडलेलो नाही. बर आहे तर मग, आपण काय रात्रभर अस गाडीतून फिरत बसू शकत नाही.पोलीस मला शोधत असतील तर तर ते शोधून काढतीलच.मला, त्यांना हे काही सांगायच नाहीये.मी माझा वकील देऊ शकतो, मला माहित्ये की देता येतो.”

पाणिनी पाणिनी पटवर्धन चे यावरील मौन बरेच काही सांगणारे होते.

“ माझं प्रतिनिधित्व करायला मी वकील नाही देऊ शकत? तो मला सल्ला नाही का देणार की मी गोवला जावू शकतो या सबबीवर कशाचेही उत्तर देऊ नको?”

पाणिनी ने मानेने नकार दिला.” त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळेल.”

सौम्या ने पाणिनी कडे मुद्दाम बघून त्याचे लक्ष वेधून घेतले.” कनक ओजस ला काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल असे तुम्हाला वाटतंय का?” सौम्या ने विचारले.

“ बरोबर आहे मुद्दा तुझा सौम्या.” पाणिनी ने मान्य केले.

त्या माणसाचा काहीतरी ठाव ठिकाणा....”

पाणिनी ने मान डोलावली नंतर जयकर कडे वळून म्हणाला,” इकडे बघ निमिष, मला मोकळे पणाने सांग, अनन्याला कसला तरी त्रास होता हे तुला माहीत होत? कशाचा त्रास होता?”

“ हो माहीत होत, पण अत्ता, तेव्हा नव्हत.मिरगल ची आमच्या लग्नाला परवानगी नव्हती.त्यने तिला दूर निघून जायला सांगितलं होत.का ते मला माहीत नाही पण मेलेल्या बद्दल वाईट बोलू ने पण जेव्हा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तेव्हा माझं रक्त उसळतं.”
“ अनन्या तुझ्या साठी अनुरूप नाही अशी त्याची कल्पना होती का?”

“ बहुतेक उलट असेल. मी काही देखणा नाही, सर्व साधारण आहे.मिरगल स्वतःचे असे एकांतात आयुष्य जगला. त्याचेकडे भावनेला थारा नव्हता. तो एक असा थेरडा ...”

जयकर ने स्वतःला पुढे शिवीगाळ करण्या पासून रोखले.” तिने तुला कधीही सांगितले नाही की मिरगल तिच्यावर नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे दबाव आणत असे?”

“ त्याची तिच्यावर अमर्याद हुकुमत होती. मी त्याच्याशी आदराने वागायचा प्रयत्न केला.तो कौटुंबिक मित्र होता.अर्थात तो वयाने मोठा होता.”

“ बर, आपण आता जरा बुद्धीसागर बद्दल बोलू.”

“तुम्हाला त्याच्या बायको बद्दल बोलू अस म्हणायच आहे का?”

“ नाही त्याच्या बद्दलच. नवरा.”

“ त्याच्या बद्दल काय?”

“अनन्याला त्याच्या बद्दल काय वाटायचे?”

“ दुसऱ्या कोणाबद्दल सुद्धा वाटायचे नाही एवढे मैत्रीपूर्ण संबंध होते. तो नेहेमीच समंजस पणे वागायचा “ दोघांत काही वैयक्तिक आकर्षण?”

”छे,छे, अजिबात नाही.”

“ नक्की?”

“अर्थात, खात्रीच आहे मला. मिलिंद बुद्धीसागर ने लीना शी म्हणजे मृणालिनी शी लग्न केलं आणि मी....म्हणजे अनन्या आणि माझ्यातील प्रेम .....म्हणजे आम्ही लग्न करणार आहोत.”

“ तिच्यात आणि मिलिंद बुद्धीसागर मधे समान धागा असा काही नाही?”

“ काहीही नाही”

पाणिनी ने आपली गाडी मुख्य रस्त्यावरून एका दुसऱ्या रस्त्यावर घेतली. “ कुठे जातोय आपण ?” जयकर ने घाबरून विचारले. “ मी फोन करणारे एक.एका गुप्त हेराला मी कामाला लावलय आणि या प्रकरणात त्याला काय काय समजलंय ते मला बघायचयं. मी फोन करे पर्यंत अनन्या कुठे असू शकेल त्या प्रत्येक शक्यतेचा विचार करून ठेव. तिला किमान फोन वरून कुठे संपर्क करता येईल हे कदाचित तुला आठवेल.”

“ समजा आज मी घरीच गेलो नाही तर? ते वाईट दिसेल का?”
“ खूपच वाईट दिसेल.पोलिसांना संशय येईल असे काहीही करू नकोस.पण त्यांना सामोरे जाण्या पूर्वी तुझ्या हातात दोन तास आहेत, किंवा तीन तास.काहीतरी संशोधनाच्या कामात होतो असे त्यांना सांगू शकतोस तू.”

“ समजा मी सिनेमा बघत होतो अस सांगितलं तर?”

“ ते त्याच्या बद्दल सर्व विचारतील.”

“ मी करू शकतो ते.जो सिनेमा मी आधीच बघितलाय तोच मी सांगीन.”

“ तो मोठया थिएटर मधे असला पाहिजे,जिथे तुला कोणी ओळखणारे भेटणार नाही. तिकीट घे आत जा,तिकीट जपून ठेव,थोड्या वेळाने बाहेर पड. माझा फोन झाला की मी तुला थिएटर मधे सोडतो. “

“ तुम्ही दोघे थांबा इथेच,” पाणिनी ने ओजस ला फोन लावला.

” काय नवीन? अनन्याचा पत्ता लागला का?”

“ तिचा नाही पण मिलिंद बुद्धीसागर चा लागला.”

“ आणि ती त्याच्या बरोबर आहे ?”

“ बिलकुल नाही. त्याला शोधण्यासाठी तो ज्या ज्या क्लब चा सभासद होता त्यासर्वांना फोन लावले. आणि निरोप ठेवला की महत्वाचे काम आहे, तो आला तर मला फोन करायला सांगा म्हणून., थोड्या वेळाने मला क्लब मधून त्याचा फोन आला.तो म्हणाला की मी अत्ताच क्लबात आलो आणि निरोप मिळाला.मी त्याला सांगितलं की मला फारच तातडीने म्हणजे अगदी लगेचच अनन्याला भेटायचे आहे. त्यावर त्याचा प्रतिसाद एकदम थंड होता.तो म्हणाला ,ती जिथे राहत्ये त्या घरी फोन आहे, मिरगल च्या नावाने तो डिरेक्टरीत सापडेल तिथे फोन करा. मी त्याला म्हणालो की तो प्रयत्न करून झालाय माझा पण दुर्दैवाने संपर्क होत नाहीये. मी त्याला हे ही म्हंटल की ती संध्याकाळी तुमच्या बरोबर होती अस कळलं. त्यावर तो म्हणाला की तुम्हाला चुकीची माहिती मिलाल्ये. एवढ तो म्हणाल्यावर त्याचावर बॉम्ब टाकायचा निश्चय मी केला. त्याला सांगितलं मी की माझ्या हेराने मला माहिती दिली आहे की अनन्या गुळवणी हाय टाईड हॉटेल सोडून बाहेर पडली आणि त्यावेळी तिच्या बरोबर तुम्ही होतात.”

“ याचा परिणाम काय झाला?’’

“ आर या पार असा व्हायला हवा होता. त्याने मला सांगितलं की माझा नक्कीच गैरसमज झाला आहे. माझ्या बोलण्यातील खोच आणि पद्धत, अजिबात आवडलेली नाही. मी अजिबात गुळवणी बरोबर नव्हतो, आणि मी जर तेच वाक्य परत उच्चारले तर त्या विरुद्ध मी कायदेशीर कारवाई करीन.”

“ अत्ता कुठाय तो?”

माझ्या माहिती नुसार त्याच क्लबात आहे.मी माझ्या माणसाला खात्री करायला तिकडे पाठवलाय पण तिकडे पोचायला त्याला वेळ आहे अजून.”

“ मला भेटायचं आहे त्याला कनक.”-पाणिनी

“अरे मग इथेच का नाही येत आणि माझा माणूस माहिती देई पर्यंत इथे बसत ?”-

“ कारण मी एकदम पेटलोय आणि माझ्या बरोबर कोणीतरी आहे जो माझ्या पेक्षा गरम आहे.”

“ अनन्या गुळवणी?”

“ वेडेपणा करू नको ”-पाणिनी

“ मग तो....”

“ नाव नको घेऊ फोन वरून.”

“ ज्याला भेटायला तू बाहेर पडलास तो ?”

“ मला खूप महत्वाची माहिती मिळाली आहे.मिलिंद बुद्धीसागर ला क्लबात गाठण्याची संधी मी घेतोच.मला त्याची मुलाखत घ्यायची आहे “

“ माझे काही मित्र खनिज व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यातला कोणीतरी या क्लब चा सदस्य असेलच.तुला गेस्ट कार्ड ची गरज लागेल?”

“ ते असेल तर सुकर होईल बरंच काही.पण वेळ घालवता येणार नाही.मी सरळ क्लब च्या दारात जाऊन मिलिंद बुद्धीसागर ला बोलावणे पाठवीन.त्याने नकार दिला ...”

“ तुला काही अडचण आली तर सांग मला. काय करता येईल ते बघेन मी.” ओजस म्हणाला. पाणिनी ने फोन ठेवला.गाडीपाशी आला तर जयकर नव्हता. “ जयकर कुठाय? पाणिनी ने सौम्या ला विचारलं

“ त्याला काहीतरी सुचलं., अनन्या कुठे सापडेल हे त्याला खात्रीलायक पणे समजलंय. जिथे ती भेटेल तिथे जावं प्रत्यक्ष, फोन करण्या पेक्षा अस त्याने विचार केला. “

“ कुठे आहे ती या बद्दल काही म्हणाला तो?”

“तू काढून घ्यायला हवं होतंस त्याच्या कडून.त्याला असे मोकळे सोडायची कल्पना मला आवडलेली नाही.”- पाणिनी

“ पोलीस पकडतील त्याला? पण त्यांच्या पासून लांब राहण्याचे महत्व त्याला समजलंय.”- सौम्या

” दे सोडून , मी त्याला इथेच वाट बघत थांबायला सांगितले होते.तू ही ऐकले होतेस सौम्या. तू त्याला रोखायला हवं होतंस.” पाणिनी च्या आवाजातून चीड जाणवत होती.

“ त्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली ही ती अचानक येते तशीच अत्ता आली आणि त्याच्या लक्षात आले अनन्या कुठे असेल ते लगेचच त्याला तिच्याकडे जायचे होते.”

“ बरं, कसा गेला तो? एकदम काही त्याने चालायला सुरुवात केली नसेल !”

“ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हर शी तो बोलला.तो त्याला घेऊन गेला.”

“ त्याचा नंबर काय होता?” कुठली गाडी होती?”

“ नंबर नाही माहीत, काळ्या रंगाची मध्यम आकाराची सेडन होती.बऱ्यापैकी नवी होती.”

“ थोडक्यात तू नीट पाहिलं नाहीस. “

“ खरंच नीट नाही पाहिलं.”

“ माझ्याकडे बघ सौम्या, या तुझ्या वागणुकी वरून वाटतंय की तू वेगळीच सौम्या आहेस. माझा फोन होई पर्यंत तू त्याला थांबवून ठेऊ शकली असतीस. स्पष्ट सांग मला, मोकळी हो.काय करत होतीस तू? कुठे लक्ष होत तुझं?”-पाणिनी

“ मी वकिली करत होते.”
“ काय? “

“ हो. तुमच्या मनात जे होतं त्याचं माझ्याकडे उत्तर होत आणि मला वाटलं की ते उत्तर तुम्हाला जयकर ला सांगायचं नाहीये. तो सारखाच विचारात होता मी काय करू म्हणून. शेवटी मी त्याला ते उत्तर सांगितले .”

“ ते प्रेमात आहेत, लग्न करायचं आहे त्यांना. मिरगल ने त्यांना आडकाठी केली होती.”

“ थोडक्यात तू त्यांना लग्न करा अस सुचवलंस !”

“ हो. नवरा , बायको एकमेकांच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत, त्यामुळे तसा सल्ला दिला. तसे ते आधीपासूनच प्रेमात पडले आहेत, त्यामुळे केवळ अशी साक्ष देता येवू नये म्हणून लग्न केले असे कोणालाही सिद्ध करता येणार नाही.”

पाणिनी बराच वेळ स्तब्ध राहिला.

“ रागावलात?” सौम्या ने विचारले.

“ नाही.” तो हसून म्हणाला. तुला जे शक्य होते ते तू केलेस. पण आशा आहे की बार असोसिएशन कमिटी अनधिकृतपणे कायद्याचा वापर केल्याबद्दल तुला ताब्यात घेणार नाही. ! “

सौम्या हसून म्हणाली. ” त्याने तुम्हाला अशक्य अशा परिस्थितीत आणून ठेवलं होत. तो शेवटी साक्षीदार आहे,तुमचं अशील नाहीये.त्याने तुम्हाला कायदेशीर दृष्टीने महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. उदा.चार गोळ्यांचा हिशोब न लागणे, तुम्ही ही गोष्ट लपवून ठेवली किंवा पोलिसांना सांगू नको असा सल्ला त्याला दिला असता तरी तुमची स्थिती कायद्याने अडचणीचीच झाली असती. हे समजण्या इतपत मला कायदा कळतो ! “

“ मला हे ही कळल की निमिष जयकर ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा करून त्याची गोष्ट सांगायला लावली रे लावली की न्यायाधीश, अनन्या गुळवणी वरील गुन्हा सिद्ध झाला म्हणून तिला दोषी ठरवतील., सरकारी वकील असं पवित्रा घेतील की जयकर ला खुनी तरुणीशी विवाह करायला मज्जाव करावा.”

“ जेव्हा तो मला म्हणाला की अनन्या कुठे असेल याचा मला पक्का अंदाज आलाय,आणि ती तिथे असेल तर पोलीस तिथे शोधण्याची शक्यता नाही, तेव्हा मी त्याला सुचवले की पोलिसांनी त्याला तिच्या विरुध्द साक्ष द्यायला भाग पाडण्या पूर्वीच त्याने आणि तिने परदेशी जावे. जिथे लग्न करण्यासाठी आधी नोटीस दयावी लागत नाही अशा देशात जावं. आणि लग्न करावे. एकदा लग्न झाले की कायद्याने तिच्या म्हणजे बायको च्या विरुध्द त्याला साक्ष देण्यासाठी पोलीस बळजबरी करू नाही शकणार.”

“ अर्थात सौम्या, हे सगळ खर असल तरी पत्रकार लोक त्याचा कसा अर्थ लावतील तुला माहित्ये.ते पोलीस आणि सरकारी वकिलांची विधाने घेतील, त्यातून असं प्रतित करतील की अनन्या खुनी आहे पण सिध्द करता येऊ नये म्हणून तिने घाई घाईत लग्न उरकले.”

“ सर, परंतू हे सर्व करायला त्यांना वेळ लागेल आणि तो पर्यंत तरी तिला थोडा अवधी मिळेल आयुष्य जगायला. नाहीतर एकदा का ती तुरुंगात गेली तर बाहेर सुटून येई पर्यंत तिच तारुण्य संपलेलं असेल तिचा प्रियकर गेलेला असेल. जयकर काही दिवस दु:खात काढेल, नंतर एखादी सहानुभूती दाखवणारी मुलगी त्याच्या मागे लागेल,त्याच्यावर बहिणी सारखी माया करते आहे असे दाखवून शेवटी त्याची पत्नी होऊन जाईल ! “

“ सौम्या, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुला नाही वाटत की थांबायची तयारी दाखवण्या इतकं त्याचं तिच्यावर प्रेम आहे.”

“ अत्ता आहे,पण इतकी वर्षे थांबायची तयारी कोण दाखवतो? लग्नाच्या बाजारातली स्पर्धा बघा,एखादी चुणचुणीत पोरगी, वाटच बघत असेल बहिणी सारखी सहानुभूती दाखवायची संधी मिळत्ये का याची.”

‘’ तू जिंकलीस सौम्या ! तू हे केलंस मला आनंद झाला.आपण तिला शोधण्यात यशस्वी झालो असतो तर मी तिला हेच सुचवले असते.”

“ तुम्ही तिला काहीच सुचवलेले नाहीये सर. वकील म्हणून तुमची विवेक बुध्दी आणि कर्तव्य याचा योग्य वापर तुम्ही केलाय. मी त्याला स्पष्टच सांगितलं की वकील म्हणून तुम्ही त्याला कधीच सल्ला देणार नाही की तिच्याशी लग्न कर म्हणजे तिच्या विरुध्द साक्ष देण्याची वेळ येणार नाही.पण तू स्वतःहूनच ते करू शकतोस.”

“ ठीक आहे सौम्या, मला मिलिंद बुद्धीसागर चा तपास लागलाय जाऊया भेटायला त्याला. आणि बघू काय म्हणतोय तो “

“.मी पैजेवर सांगते सर, की एखाद्या सदाचारी माणसाला सात्विक संताप येतो तसा आव तो आणेल, आपण अनन्याच्या जवळपास असल्याचे सुद्धा तो नाकारील.”

“ त्याने कनक च्या बाबतीत आधीच हे सगळ केलय ! “

“ समजा व्यक्ती ओळखण्यात चूक झाल्याचा हा प्रकार असेल तर? “

“ तसे असेल तर मी फार मोठी जोखीम घेतोय. पण मला नाही वाटत. कारण मिलिंद बुद्धीसागर हा अत्यंत थंड डोक्याचा , सभ्यतेचा बुरखा पांघरलेला खोटारडा आहे.”

“ तुम्ही तो बुरखा फाडू शकता?”

“ मी प्रयत्न करू शकतो.”

पाणिनी ने क्लब च्या बाहेर गाडी नेऊन थांबवली. “ साक्षीदार लागणार आहे तुम्हाला ? “ सौम्या ने विचारले.

“ लागेल, पण बहुतांशी भाग मी साक्षीदारा शिवाय च पूर्ण करून टाकतो. सध्या गाडीतच थांब आणि किल्ला लढव.”
११ समाप्त