स्वप्नस्पर्शी - Novels
by Madhavi Marathe
in
Marathi Moral Stories
स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपूर्ती पार पाडल्यानंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पुर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी ...Read Moreजगावे. त्यावेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो तर नंतर काळ आणि कुटुंब दोघही तुमची किंमत करत नाही. घरासाठी कितीही कष्ट उपसले तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं. पण त्या समाधानाची फिकीर समोरचा करेलच असे जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगता अश्या विचारावर समोरच्याचा भर असू शकतो. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो त्या पध्दतीने जगतो. हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्या हीन भावनेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळेच तर जगात इतके प्रकार तयार होऊ शकले. वैविध्यता आली. त्या वैविध्यतेतून आपल्याला काय आवडतं ते जगून तृप्त होण्याची संधी मिळाली. पण फार कमी जणांना आपल्याला खरच काय हवे आहे हे लक्षात येते. मग त्यांनी त्या वाटा निवडल्यावर, त्या जरा जगावेगळ्या असल्या की टीकेचा सामना करावा लागतो. त्याच्याशी सामना करण्याची कुवत एखाद्यापाशी नसली तर त्याला आपलं स्वप्न, आवड दूर सारावी लागते. मग ती कुवत शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अश्या कितीतरी प्रकारानी नसू शकेल. पण त्यावरही मात करून एखाद्याने झेप घेतली तर ती भलेही बाकीच्यांच्या दृष्टीने फार मोठी नसेल पण त्या व्यक्तीसाठी ती एक गरुडझेप असेल. त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. त्याच्या आनंदात जगाला सहभागी करायलाही उत्सुक असेल. पण जगाने सहभागी होणे नाकारले तरी त्याला त्याची खंत नसेल. या पुस्तकात सरळ साध्या माणसांची साधी स्वप्न पुर्णतेची कहाणी आहे. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतातच. पण त्या अडचणींनाच आपलं जीवन न बनवता ओघवतं राहणारं कुटुंब दर्शवलं आहे. प्रत्येकाच्या स्वप्नांचा आदर करा. एव्हढाच या पुस्तक लिहिण्यामागे उद्देश आहे.
स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपूर्ती पार पाडल्यानंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पुर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी ...Read Moreजगावे. त्यावेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो तर नंतर काळ आणि कुटुंब दोघही तुमची किंमत करत नाही. घरासाठी कितीही कष्ट उपसले तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं. पण त्या समाधानाची फिकीर समोरचा करेलच असे जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगता अश्या विचारावर समोरच्याचा भर असू शकतो. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो त्या पध्दतीने जगतो. हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्या हीन भावनेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल.
स्वप्नस्पर्शी : २ रोजच्या ऑफिसच्या रस्त्यांचा राघवांनी मनानेच निरोप घेतला. कार घरापाशी थांबली. बाळू रोजच्या सवयीने ऑफिसबॅग घेण्यासाठी मागे गेला. ते पाहून राघव हसू लागले तसा बाळूही हसू लागला. “ पहा आता मला पण किती सवयी तोडाव्या ...Read Moreक्षणभर उसासा टाकत ते म्हणाले. पण परत सावरून उत्साहाने गप्पा मारत आत शिरले. दोघांना घरात अकारण शांततेची झुळूक
स्वप्नस्पर्शी - ३ सवयीप्रमाणे पहाटवाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, आणि राघवांची साखरझोप चाळवली. पहाटेच्या थंडाव्यात उबदार पांघरूणात पडून राहायचं सुख अनुभवत दिवसाचं वेळापत्रक ठरवायचा त्यांचा रोजचा नियम होता. पण.. आता काय ठरवायचं ? खुप छान वाटत राहिलं त्यांना. आता ...Read Moreनियम बांधून घेण्याची गरज नव्हती. पण मग हे ही लक्षात येत गेलं
स्वप्नस्पर्शी : ४ पंधरा दिवसांसाठी आलेला नील, जायचा दिवस आलेला पाहून खंतावू लागला. किती घडामोडी झाल्या होत्या या पंधरा दिवसात. बाबांची पार्टी झाल्यावर, सर्वांनी केलेल्या विचारविनिमया प्रमाणे आबांनी त्यांच्या मित्राला फोन केला. ते तयारच होते. जमिन पहाण्यासाठी त्यांचं ...Read Moreआल्यावर सगळ्यांनीच मी पण येणार अशी घोषणा केली. मग कौटुंबिक सहल गुहागरला न्यायची ठरली. घरी तीन