The Author MB (Official) Follow Current Read रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37 By MB (Official) Marathi Spiritual Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books શ્રીમદ્ ભગવદ્ ગીતા - સંપૂર્ણ ૐ ઊંધ્ટ્ટ થ્ૠધ્ધ્અૠધ્ઌશ્વ ઌૠધ્ઃ ગરુડ પુરાણ અનુક્રમણિકા ૧. પ્રથમ અધ્યાય निलावंती ग्रंथ - एक श्रापित ग्रंथ... - 1 निलावंती एक श्रापित ग्रंथ की पूरी कहानी।निलावंती ग्रंथ মন_তোকে_দিলাম - 8 #পর্ব_৮রবিবার,,,,,,,,,,,,,২৩/০৪/২০১৯,,,,,,,,,,,রাত ১:৩৫আকাশে... অদৃশ্য যুদ্ধ ( সিজন 1 ) (১)আশিবছর আগে স্থা... পরাণ বঁধুয়া - 15 পরাণ বঁধুয়াপর্ব - ১৫জীবনের এই অদ্ভুত সন্ধিক্ষণেও সাহস দেখাল... সুপ্ত প্রেমের আগুন - 8 হঠাৎ বাইকটির থেমে যাওয়ার শব্দে ফোয়ারার চারপাশের নীরবত... মন_তোকে_দিলাম - 7 রবিবার,,,,,,,,,,,,,,,, 23/04/19,,,,,,,,,,, পাশে থেকে আবার ডা... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by MB (Official) in Marathi Spiritual Stories Total Episodes : 297 Share रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37 2.9k 6.5k अध्याय 37 श्रीरामगुण संकीर्तन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुखनिद्रित भास्करवंशभूषण । जेंवी शेषशयनीं नाराय़ण ।तृतीयभाग निशी क्रमोनि भृगुनंदन । पूर्वे आगमन पैं केलें ॥१॥सद्गुरु मावळला । तृतीयभाग रात्रीचा क्रमिला ।पुण्यपुरुषां चेवो झाल ।प्रातःस्मरामि करिते झाले ॥२॥सकळ जनां चेडरें झालें । रतिसुखांपासोनि सुटले ।मार्गस्थ मार्गीं लागले । तीर्थयात्रा करावया ॥३॥विप्रवेदाध्ययन करिती । गाई घरोघरीं दुभती ।एकी त्या दधिमथनीं प्रवर्तती । सारासार निवडोनि ॥४॥कागपक्षी चेडरे झाले । तमेंसी निशीणें प्रयाण केलें ।ऐसें जाणॊनि गंधर्व आले । श्रीरामांतें उठवावया ॥५॥करिती सुस्वरें गायन । वीणा वेणु वाद्यें गहन ।आलाप मूर्च्चना तान मान । सुरस गायन मांडिलें ॥६॥सर्व किन्नरांची गायनध्वनी । ऐकिली श्रीरामें शयनस्थानीं ।अति आनंदला मनीं । श्रीराम कीर्तनीं तुष्टला ॥७॥पर्यकींहूनी श्रीरघुपती । उठलियावरी समस्ती ।आपुलाले प्रयोजनीं सावधान चित्तीं । होते झाले ते काळीं ॥८॥एक पादुका पुढें ठेवोन | एक परिमळ मिश्रित जीवन ।सुवर्णपात्रीं भरोन पूर्ण । समीप तिष्ठत राहिले ॥९॥एकें दंतकाष्ठ आणिलें । श्रीरामें मुख प्रक्षाळिलें ।सवेंचि स्नानतर्पण सारोनि तये वेळे । सेवकंसहित बाहेर आला ॥१०॥आधींच तो श्रीरघुनंदन । कोटि मदनांचा गाभा पूर्ण ।पूर्णावतार गुणनिधान । भक्तजीवन श्रीराम ॥११॥कौसल्यानंदवर्धन । नगरजनां सुखवर्धन ।भक्तचकोरां चंद्र पूर्ण । षोडझ कळां शोभला ॥१२॥पराक्रमें विष्णुसमान । रूप अश्विनौदेवांसम जाण ।बुद्धि ब्हुहस्पतीहूनि गहन । श्रेष्ठपण स्रष्ट्याऐसें ॥१३॥पृथ्वीसारिखी क्षमा पूर्णा । तेजें दुसरा सूर्य जाणा ।वेगे पाहतां मागें पवन । ठाके कोण त्यापुढें ॥१४॥समुद्रासारिखा गंभीरू । धैर्य जैसा पर्वत मेरू ।कांति चंद्राहूनि अपारू । नृपति किंकरू जयाचे ॥१५॥ऐसा तो अवनिजापति । सवें ऋषिमुनि जयांची अगाध कीर्ति ।भद्रासनीं येवोन श्रीरघुपती । समस्तेंसी बैसला ॥१६॥दोहींकडे उभे प्रधान । आणि नगरनागरिक जन ।बैसले असती गुणसंपन्न । सभा सधन घनटवली ॥१७॥इक्ष्वाकुकुळींचा भूपती । क्षत्रियांमध्ये अगाध कीर्ति ।ऐशा श्रीरामभवंत्या ऋषिपंक्ती । तपोधनांच्या बैसल्या ॥१८॥जैसा स्वर्गीं सुरवर । सुधापानियांमध्ये इंद्र ।तैसाचि श्रीरामचंद्र । शेष शत्रुघ्न भरत उभे समीप ॥१९॥शत्रुघ्न भरत लक्ष्मण । सेवा करिती संमुख उभे ठाकोन ।जैसा अध्वरीं हुताशन । नाना अवदानें घेतसे ॥२०॥किंकर सुभट सेवक । सेवा करिती प्रफ़ुल्लितमुख ।हात जोडोनि संमुख । भाट ब्रीदें वर्णिती ॥२१॥श्रीरामाचे पार्श्वभागीं । बैसले महानुभव योगी ।वानर बळियाढे वीर ते प्रसंगीं । सुग्रीवादि अनुसरले ॥२२॥चौघां प्रधानसहवर्तमान । सेवेसी तिष्ठत बिभीषण ।जैसे कुबेरासी गुह्यक जाण । नाना पदार्थे सेविती ॥२४॥ऐसा तो श्रीरामचंद्र । सेविताती ऋषिवृंद ।एक नाना करिती वाद । एक प्रबंध पैं गाती ॥२५॥एक करिती हरिकीर्तन । एक मंजुळ गाती गायन ।एक सांगती पुराण । रामायणादिकथा हो ॥२६॥ऐसा भक्तजनमनोरंजन । लीलाविग्रही श्रीरघुनंदन ।अवतारनाट्य जनार्दन । स्वयें आपण दावीतसे ॥२७॥स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायांश्रीरामगुणवर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥ ओव्यां ॥२७॥ ‹ Previous Chapterरामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 36 › Next Chapter रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 38 Download Our App