Nabhantar book and story is written by Dr. Prathamesh Kotagi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Nabhantar is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
नभांतर - Novels
by Dr. Prathamesh Kotagi
in
Marathi Fiction Stories
अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी त्याचप्रमाणे शाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे घ्या” असे रिक्षेवल्याला बसता क्षणी तिने सांगितले. तिची लगबग आणि हॉस्पिटल असे ऐकताच रिक्षावाल्याने सुद्धा तितक्याच लगबगीने रिक्षा चालू करून रस्त्यावरच्या रहदारीत घातली.
भाग - १ संध्याकाळी साधारण 5 ची वेळ... अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी ...Read Moreशाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे
भाग - २ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला २ प्रश्न नक्की पडलेले असतात, “माझा जन्म कशासाठी झाला ?” आणि “माझा मृत्यू केंव्हा होईल ?” पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण हे आपल्याला गरजेच वाटत नसत. दुसऱ्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासंदर्भात आपण ...Read Moreविचार करत नाही. परंतु जीवनातील त्या एका क्षणाला आकाश ला त्याची उत्तर शोधण गरजेच बनल; कारण जीवन आणि मृत्यू याच्या संघर्षामध्ये त्याचे काउंट डाऊन सुरु झाले होते. त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते एक म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी लढा देणे आणि दुसरा हसत हसत मृत्यूला सामोरा जाणे अगदी निर्भयी कर्णाप्रमाणे. त्याला कुणाला तरी दिलेले वचन पाळायचे होते. त्याच्या हातात खूपच कमी वेळ
भाग – ३ दुसऱ्या दिवशी चहा पिताना सर्वांची गप्पांची मैफिल रंगली. कुणालाही कसलीही गडबड नव्हती त्यामुळे सगळे अगदी निवांत बसले होते. थोडेच पाहुणे उरले होते मात्र तरीसुद्धा गप्पांना ऊत येत होता. सर्वांच्या चर्चेचे एकच केंद्र होते ते ...Read Moreहे लग्नकार्य ! “अगदी आदर्श म्हणाव इतक छान झाल ! ना वारेमाप पैसा खर्च केला, ना अन्नाची नासाडी केली. पण भाऊजी तुम्हाला सुचल तरी कसं हो एवढ परफेक्ट ?” तसे आकाशचे बाबा म्हणाले, “ह्या मागच सगळ डोक याचच आहे !” आकाश कडे हात दाखवत ते म्हणाले. “व्वा ! पोरग भारी हुशार निघाल तुमचं !” असे कौतुकाचे बोल कानी आले. “मग कालची
भाग – ४ सहा सात वर्षापूर्वी....... असाच तो गॅलरी मध्ये एकटाच बसला होता. तसा तो एकटाच असायचा. पण आज त्याला एकटेपणाची जाणीव होत होती. झालेले प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते आणि विशेषकरून त्यातील ...Read Moreदुखवणारे प्रसंग तर हल्लीच्या मालिकांमध्ये जसे एका विशिष्ट प्रसंगी एकच शॉट ३ – ४ वेळा कॅमेराचा अँगल बदलून दाखवतात त्याप्रमाणे “ते” विशिष्ट प्रसंग २ – ३ वेळा त्याच मन त्याला दाखवत होत. तो खूप प्रयत्न करत होता हे सर्व विसरण्याच पण.. हा पण जिकडे येतो ना तिकडे सगळ पणाला लावायला लावतो.. पण त्याला ते विसरता येण अशक्य होतं. सानिका पुन्हा असं वागेल
भाग – ५ प्रत्यक्ष बोलून तोडगा काढलेला बरा म्हणून त्याने “मला महत्वाच बोलायचं आहे तुझ्याशी, उद्या कॉलेज संपल्यावर थांब लगेच जाऊ नकोस.” असा मेसेज पाठवला... डिटेकटिव्ह सिनेमे आणि मालिका बघून, तशी पुस्तके वाचून तयार झालेलं याच गुप्तहेर ...Read Moreयातील खोच शोधात होता.. नेमक काय झाल आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हे केवळ सानिकाच सांगू शकत होती आणि म्हणून तिच्या उत्तराची वाट बघत बसला..... थोड्या वेळाने मेसेज आल्याची रिंग वाजली. आकाश च लक्ष नव्हत सुरवातीला तो त्याच्याच तंद्रीत होता, मग अचानक त्याला मेसेज आल्याचे कळले तसा तो पटकन उठला आणि चार्गिंग ला लावलेला मोबाईल घेण्यासाठी धावला,