मल्ल प्रेमयुद्ध - Novels
by Bhagyashali Raut
in
Marathi Love Stories
डांगेमैदानात नुसता धिंगाणा सुरु होता. चारही बाजूला पब्लिक आरोळ्या देत होते. क्रांतीने मॅटवर रत्नाला चितपट केले होते. नेहमीप्रमाणं या हि वर्षी क्रांतीने तिच्यापेक्षा जास्त वजनाच्या रत्ना देवरे या मुलीला खेळात शक्ती आणि युक्तीने नामोहरण केले होते. क्रांतीचा श्वास फुलाला होता. शिट्टी वाजल्यानंतर तीने रत्नाला सोडले होते. इतके दमूनसुद्धा विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर सर्वानाच दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर लाली आली होती. रत्नाने क्रांतीला मिठी मारली होती. रत्ना क्रांतीची जिवलग मैत्री होती. हा... पण खेळात प्रतिस्पर्धी होत्या नक्की. रत्नाने तिच्या युक्तीचे कौतुक केले. 'बाजी मारलीस म्हंटल. नाहीतर तुझ्याशिवाय मला हरवणारी अजून कोण असणार.' पंचांनी तिचा हात पकडला आणि उंचावून तिला विजयी घोषित केले. मैदानात तिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दादा, क्रांतीचे वडील लेकीच्या जिकंण्याने खुश होते. क्रांतीने महाराष्ट्रात नाव कमवलेच होते पण इथेच न थांबता भारतात आणि भारताबाहेर ओळखलं जावं अशी दादांची इच्छा होती. क्रांतीने बऱ्याच कुस्त्या जिंकल्या होत्या तिला नॅशनल लेव्हलला खेळायचे होते. क्रांतीचे कौतुक करायला तिथल्या जमावाने तिला घेरले होते. त्याच मैदानामध्ये पुरुषांच्या कुस्त्या होत्या. आज क्रांतीला या कुस्त्या पहायच्या होत्या. दादांना ती म्हणाली.
मल्ल - प्रेमयुद्ध डांगेमैदानात नुसता धिंगाणा सुरु होता. चारही बाजूला पब्लिक आरोळ्या देत होते. क्रांतीने मॅटवर रत्नाला चितपट केले होते. नेहमीप्रमाणं या हि वर्षी क्रांतीने तिच्यापेक्षा जास्त वजनाच्या रत्ना देवरे या मुलीला खेळात शक्ती आणि युक्तीने नामोहरण केले होते. ...Read Moreश्वास फुलाला होता. शिट्टी वाजल्यानंतर तीने रत्नाला सोडले होते. इतके दमूनसुद्धा विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर सर्वानाच दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर लाली आली होती. रत्नाने क्रांतीला मिठी मारली होती. रत्ना क्रांतीची जिवलग मैत्री होती. हा... पण खेळात प्रतिस्पर्धी होत्या नक्की. रत्नाने तिच्या युक्तीचे कौतुक केले. 'बाजी मारलीस म्हंटल. नाहीतर तुझ्याशिवाय मला हरवणारी अजून कोण असणार.' पंचांनी तिचा हात पकडला आणि उंचावून
मल्ल - प्रेमयुद्ध संध्याकाळ झाली होती. रायगाव गावात जल्लोषात क्रांतीची मिरवणूक सुरू होती. तालुक्याच्या गावापासून 4 किलोमीटरवर एक छोटं गाव होत. निसर्गाने नटलेलं.... त्याच छोट्या गावातली क्रांती आज महाराष्ट्रात नाव कमवत होती. क्रांती ओपन जीपच्या मध्ये उभी राहिली होती. ...Read Moreगाडी आली आणि चिनू पटकन गाडीमध्ये येऊन बसली. क्रांती तिच्याबरोबर बोलत नाही. " ये तायडे रागवलीस? तुला म्हाईती हाय ना मला तुला कुस्ती खेळताना बघताना लय त्रास व्हतो म्हणून मी अली न्हाय." क्रांती तिच्याकडे बघत सुद्धा नव्हती. "तायडे बोल ना ग... तू जिंकणार याची खात्री व्हती मला पण भीती वाटते खेळात जरी लागले तरी... प्लिज ग बोल की..." क्रांतीने तिच्याकडे
मल्ल- प्रेमयुद्ध भूषण आल्यावर वीरची तंद्री तुटली. भूषण लहानपानापासूनचा वीर आणि भूषण एकमेकांचे खास मित्र… भूषण मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. वीरच्या घरच्यांना त्यांची मैत्री आवडत नव्हती. मैत्री बरोबरच्या लोकांबरोबर असावं असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं होत. दोस्ती श्रीमंत गरीब असा भेदभाव ...Read Moreनाही. कोणताही छोटा मोठा प्रॉब्लेम आला कि भूषणसाठी वीर असायचा अन वीरसाठी भूषण… गावात त्यांची दोस्ती आवडायची. वीर काही वर्ष कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी वीर बाहेर होता तेवढेच दोघे वेगळे. भूषण गरीब असला तरी मानी होता. दोस्ती पैशासाठी नाही तर एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असते. भूषण त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. भूषणला शिकायचे होते पण वडील गेल्यानंतर घरातली जबाबदारी त्याच्यावर
मल्ल- प्रेमयुद्ध. तिघे ट्रेनच्या बाकड्यावर शांत बसले होते. " दादा अशी कशी ट्रेन कॅन्सल व्हईल? आज दोघी निघालो नाही तर परवा तिथे पोहचणार कस आणि नाही पोहचलो तर ऍडमिशन कॅन्सल व्हईल. किती मुश्किलीने तिथे ऍडमिशन मिळाली होती. आमदार साहेबांमुळे ...Read Moreमध्ये शिकणार होते मी आणि रत्ना." क्रांतीच्या चेहऱ्यावर चिंतेच जाळ पसरलं होत तसं रत्नाच्या सुद्धा. " आपण फोन करूया तिथे त्यांना सांगू की ट्रेन पावसामुळे 2 दिवस रद्द झाल्या आहेत किंवा आमदार साहेबांकडून फोन गेला तर...?" रत्ना तिच्या डोक्यात येणाऱ्या आयडिया त्या दोघांना सांगत होती. " हा तस व्हयल… बर आधी घरी चला. रत्ना तू चल आज आमच्या गावाला उद्या
मल्ल - प्रेमयुद्धसूर्योदयापूर्वी दादा उठले होते. सगळी पोर शांत झोपली होती. रात्री पोर उशिरा आल्यामुळे बोलणेझाले नव्हते. दादांनी लक्ष नेहमीप्रमाणे गुरांच्या हंबरण्याकडे खाटेवरून उठून दादा गोठ्यात गेले. सोनेरी, लाल, पिवळे ,नारंगी सूर्यकिरण डोंगरामागून दिसायला सुरुवात झाली होती. "आलो आलो ...Read Moreविठाबाई कशाला गोंधळ करतीस मला माहितीये सकाळ झाली. तुमास्नी भूक लागली असेल."दादांनी वैरण हातात घेतली आणि सगळ्या गुरांपुढं पुढे टाकली. शेळीला सुद्धा खायला दिले . तेवढ्यात आशाबाई शेन काढायला गोठ्यात आल्या."आव... आज मला उठवलं नाही.""बघितलं मी सगळ्यांनी पण सगळे गाढ झोपले होते मन उठवला नाय." आशाने सगळा गोठा सरा सरा सरा झाडून काढले तोपर्यंत दादा तळहातावर मिस्त्री घेऊन खसाखसा दात
मल्ल - प्रेमयुद्ध रत्ना आवराआवर करत होती. तिला तिच्या गावी निघायचं होत. "रत्ना आवर तुला सोडून आल्यावर मला रानात नागरायला जायचंय." संतोष गडबडीत म्हणाला. " मग नाही जात आज ..." रत्ना हसली. " खरच नको जाऊ आज उद्या जा... ...Read Moreफोन करून सांगते बाबांना." क्रांती म्हणाली. " आधीच मी गेले नाही म्हणून टेन्शनमध्ये आहेत सगळे आणि आज नाही येणार म्हंटल्यावर बाबा चिडतील." रत्ना काळजीने म्हणाली. रत्नाच्या लक्षात आले होते की क्रांतीला तिच्यासोबत बोलायचे आहे. "बाबा मला नाही म्हणणार नाहीत. मी एकदा फ़ोन करून बघते. क्रांतीने बाबांना फोन केला. बाबांसोबत बराच वेळ बोलली. रत्नाला त्यांनी राहायची परवानगी दिली. " बघ म्हंटले
मल्ल - प्रेमयुद्ध"अर्जुनराव जे हाय ते तुमच्या समोर... कसला आडपडदा न्हाय की लपवाछपवी... हा शेतजमीन बघायला जायचं असेल जाऊ... संग्राम गाड्या काढा." आबांनी आदेश सोडला तसे संग्राम उठला."नको... नको अमास्नी इशवास हाय आबासाहेब... अन इशवास माणसावर असावा जमीनजुमल्यावर न्हाय..." ...Read Moreशांतपणे म्हणाले." लाखातली गोष्ट बोललात अर्जुनराव... पण तरी सांगतो. तीस एकरात ऊस लावलाय, वीस एकरात हळद, दहा एकरात तरकारी, बाकी हंगामी असलं 25 एकरात... छोटं मोठं हाय अजून बाकी... गुर ढोर, बैलं गडीमाणसं बघत्यात..." आबा सगळ्या संपत्तीचं वर्णन करत होते." आबासाहेब अहो काहीच गरज नाय एवढं सांगायची. तुमची संपत्ती डोळ्यांसमोर दिसती की... अन ही पोर ही भलीमोठी संपत्ती हाय तुमची."
मल्ल - प्रेमयुद्धगाडी दारात पोहचली. गाडीचा आवाज ऐकून दादा,चिनू नि आई बाहेर आले. समोर वीर क्रांती आणि रत्नाला एकत्र बघून त्यांना पहिल्यांदा काय बोलावे सुचत नव्हते.क्रांतिच्या लक्षात आले." दादा संतू ची गाडी बंद पडली म्हणून मग यांनी आमाला सोडलं." ...Read Moreवीरकडे पाहिले त्यांनीही तसच सांगावं अस तिला वाटले." नमस्कार दादा... ह्या प्रायव्हेट गाडी बघत व्हत्या.. आमास्नी वाटलं एकट्या पोरी कश्या जाणार कोणाबरोबर सुद्धा म्हणून आम्ही सोडवण्यासाठी आलो." क्रांतीला थोडा राग आला. तिने रागाने वीरकडे पाहिले."व्हय दादा खरंच देवावानी भेटले हे म्हणून लवकर आलो." रत्ना" व्हय व्हय बर केलंत या आत या दोघे..." दादा" न्हाय उशीर झालाय आम्ही निघतो." भूषण"अस कस
मल्ल - प्रेमयुद्ध संग्रामला खूप उशिरा जाग आली. बेड वर तो उठून बसला. डोकं फार जड वाटत होतं. त्याने दोन्ही हाताने डोकं दाबून धरलं. त्याने आजूबाजूला पाहिले. तेजश्री कुठेच दिसत नव्हती. त्याने जोरात हाक मारली."तेजश्री..." तेजश्री स्वयंपाकघराततुन धावत वरती ...Read More" डोकं जड झालंय... अमास्नी लिंबू पाणी पाहिजे. तेजश्री खाली आली.राजवीर हातामध्ये तेवढ्यात ग्लास घेऊन आला." अरे ती कुठं गेली ते तुला पाठवलं." संग्राम चिडून म्हणाला." वहिनी ना... आधी तू हे घे..." संग्रामने लिंबूपाणी घेण्यासाठी हातपुढे केला. वीरने पाण्याचा ग्लासमधल पाणी त्याच्या तोंडावर भिरकावले. संग्रामला राग आला. वीरची असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते. संग्राम खाडकन बेडवरून उठला."वीर हे काय वागणं?"
मल्ल प्रेमयुद्ध रत्ना चिंचेच्या झाडाखाली बराच वेळ बसून शब्दांची जुळवाजुळव करत होती. संतुला अस बाहेर भेटणं आवडत नाही हे माहीत असूनसुद्धा तिने त्याला आज आग्रह करून बाहेर भेटायला बोलावल होते. संतू तिच्यासमोर येऊन उभा राहिला होता हे सुद्धा स्वतःच्या ...Read Moreअसल्यामुळं लक्षात आलं नव्हतं."रत्ना भायर का बोलावलं भेटायला?" संतू थोडा रागात बोलला." घाई बोलता आलं नसत म्हणून.... बस" संतू तिच्या शेजारी बसला." एवढं काय महत्वाचं हाय अग घरी लगीनघाई चालू हाय उद्या क्रांतीच लग्न ठरवायला येणार हयात... घरात सगळ्यांची धावपळ सुरू झाली अन तू घाई घाई न इथं बोलावलंस?" संतू एका श्वासात सगळं बोलून मोकळा झाला."उद्या... एवढी घाई...?" रत्नाला धक्काच
मल्ल - प्रेमयुद्ध घराच्या मागच्या अंगणात विहीर होती. विहिरीच्या बाजूला चाफ्याचे झाड होते. सगळीकडे फुलांचा सडा पडला होता. बसायला दगडी ताल होती. जरा अंतर ठेवून दोघे त्यावर बसले. आजूबाजूला घर होती. कोणी ना कोणी येऊन घरांमधून डोकावत होते. कदाचित ...Read Moreकशी आहे यावर चर्चा होत होती.बराच वेळ दोघेही शांत होते.."माफ करा..." वीर म्हणाला."सगळं झाल्यावर माफी कसली मागताय?" क्रांती रागाने बोलली."काय करणार याआधी एवढं कुणी आवडलं नव्हतं...पण मी जबरदस्ती न्हाय करणार ? " वीर शांतपणे बोलला." मग आत्ता काय करताय??? तुमाला म्हाइतीये मला लग्न करायचं न्हाय....आणि तुमच्याबरोबर तर न्हाईत न्हाय..." वीरने पटकन क्रांतीच्या नजरेत बघितले. तो दुखावला हे क्रांतीला लगेचच समजले."
मल्ल प्रेमयुद्धरात्र झाली होती. आचाऱ्याशी बोलून उद्या काय आणि किती वाजता जेवण तयार करायच बोलून आचारी निघून गेला.दादा घरात जायला निघाले तेंव्हा उस्ताद बाहेर उभं व्हते.उस्ताद घराच्या बाहेरच उभे व्हते."उस्ताद घरात या.." दादा म्हणाले."दादा एवढंच सांगतो. पोरीच्या भविष्याच्या दृष्टीन ...Read Moreचांगला निर्णय घेतलाय त्यात माझी ना न्हाय... पण खेळाच्या मैदानातन नकळत माघार घ्यायला लावताय. तेच तीच आयुष्य हाय. तिच्या डोळ्यात म्या बघितलंय क्रांती खुश न्हाय. तीला भविष्यात खुश ठेवायचं म्हणून तुम्ही तीच आयुष्य हिसकावून घेतलंय. दादा मला ठाव हाय तुमचा हरवक्त तिला पाठिंबा होता. मग अस काय झालं की तिचा इचार केला न्हाय तुमी." उस्ताद जवळजवळ रडवेले झाले होते. त्यांना
मल्ल प्रेमयुद्धवीरने क्रांतीचा प्रत्येक साडीतला भूषणला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढायला सांगितला होता. वीर फोटो बघत होता. नऊवारी साडीतली क्रांती झाशीची राणी दिसत होती. प्रत्येक फोटोमध्ये वीर क्रांतीकडे बघत होता पण क्रांतीने एकदाही वीरकडे पाहिलेले नव्हते."अजून ही रागावली वाटत आपल्यावर? ...Read Moreकरायला पाहिजे. खूप कमी दिवस हायत आपल्याकड. या दोन महिन्यात मी माझं प्रेम सिध्द करू शकलो न्हाय तर...? नाय अस न्हाय व्हणार..." तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला. "वहिनी या की." तेजश्री आत आली." मग स्वप्न पडायला लागली वाटतं?" वीर हसला" न्हाय वहिनी, जरा विचारात व्हतो." वीर" काय झालंय का?" तेजश्री"वहिनी मी कोणाला बोललो न्हाय पण...?" वीर"पण...?" तेजश्री"मी क्रांतीला एक वचन
मल्ल- प्रेमयुद्धसंग्राम वेडापिसा झाला होता. खोलीमध्ये येरझाऱ्या घालत होता. तेवढ्यात तेजश्री घाबरतच आत आली. "या आलात आनंद झाला ना...? हो... झाला तर होऊद्यात... आम्ही पाटलाची औलाद हाउत बघू पुढच्या टेस्ट करू अन वारस या घरात आणू..." संग्राम मोठ्याने बोलत ...Read Moreतेजश्री शांत होती."आता मनातून उकळ्या फुटत असत्यात म्हणूनच तोंडातन शब्द फुटत न्हाईत. बोला बोला म्हणा काहीतरी आम्हाला नाहीतर शिव्या घाला." संग्राम अस्वस्थ झाला होता. आता मात्र तेजश्रीचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. "का आनंद होईल मला??? मी वांझोटी राहीन म्हणून की पाटलांना मी धनाची पेटी की वंशाचा दिवा देऊ शकणार न्हाई म्हणून... का खुश होईन मी? मला वांझोटी म्हणून
मल्ल- प्रेमयुद्धवाड्यासमोर गाडी थांबली. आबा, सुलोचनाबाई, तेजश्री, संग्राम सगळे बाहेर येऊन स्वागताला उभे राहिले. सुनबाई येणार म्हणून सुलोचनाबाई आणि तेजश्रीला काय करावे आणि काय नको असे झाले होते. सुलोचनाबाईच्या हातामध्ये ओवळणी तबक होते. क्रांतीने स्काय ब्लु कलरची साधी साडी ...Read Moreहोती. आधी ड्रेस घातला होता पण नंतर क्रांतीलाच वाटले की पहिल्यांदा सासरी जातीय ते सुद्धा लग्नाआधी तर वीरचा विचार करून नाही आई आबांचा विचार करून साडी नेसायला पाहिजे. क्रांतीने डोक्यावर पदर घेतला. आबा आणि आईच्या पाया पडली. क्रांतीला तेजश्री आणि सुलोचनाने ओवाळले. भाकरी तुकडा ओवाळून टाकला. रत्नालासुद्धा ओवाळले. रत्नाला वेगळे वाटत होते पण सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकी बोलण्याने तिला घरच्यासारखं
मल्ल- प्रेमयुद्धसकाळी 9 वाजता सगळे नाश्ता करायला एक हॉटेलमध्ये थांबले. संग्रामने सगळ्यांच्या पसंतीचा नाश्ता विचारून ऑर्डर केली. क्रांती अजूनही नॉर्मल नव्हती. तिने दादांना फोन केला. नाश्ता करायला थांबलो आहोत. नाश्ता करून इथून निघू. सांगून फोन ठेवून दिला. वीर फ्रेश ...Read Moreनेमक्या क्रांतीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. क्रांतीने पटकन अंग चोरून घेतले. वीरला उगीच तिच्याजवळ बसलो असे वाटले. पण पर्याय नव्हता दुसरीकडे जागाच नव्हती. सगळ्यांनी नाश्ता केला आता संग्राम गाडी चालवायला बसला. साहजिकच त्याच्या शेजारी आता तेजश्री बसणार होती पण ती मागचा दरवाजा उघडून बसणार तोच वीरने आवाज दिला."वहिनी तुम्ही पुढं बसा. असंही घरातले सगळे असत्यात तवा तुमास्नी दादाबरोबर पुढं बसायचा
मल्ल प्रेमयुद्ध आत्याचा टुमदार बंगला आतून वेल फर्निचर होता पण नारळाची झाडं, समुद्राच्या पाण्याचा आवाजामुळे कोकणचा वारा चांगलाच लागत होता. आत्याने मुलींची सोय वरच्या मजल्यावर केली होती आणि मुलांची सोय आत्याचा मुलगा ऋषीच्या रूममध्ये वरच्या मजल्यावर केली होती. ऋषी ...Read Moreस्मार्ट आणि बडबडा... वीर आणि संग्रामचा लाडका असतो. त्याच्या रूममध्ये आरामात आठ दहा लोक झोपतील एवढी मोठी खोली होती. आत्याने सगळ्यासाठी पुरणपोळीचा बेत केला होता. तेजश्री काही मदत हवी का म्हणून विचारायला गेली पण आत्या नोकरांना सूचना देत त्यांच्याकडून सगळं करून घेत होत्या. "का ग बाळा काय पाहिजे का तुला?" आत्याने प्रेमाने तेजश्रीला विचारले. "न्हाई आत्या तुमाला काही मदत पाहिजे
मल्ल प्रेमयुद्ध"वीर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे..." स्वप्नालीच्या डोळ्यात राग, अश्रू एकवटले होते. "हे बघ आपल्याला चिडवत होते हे जरी खरं असलं तरी माझ्या मनात तुझ्या विषयी काही नव्हतं स्वप्ना..." वीर मनापासून स्वप्नालीला सांगत होता." तुला माहिती आहे का सगळे ...Read Moreस्वप्नाली म्हणतात, तू जेंव्हा मला स्वप्नाली म्हणायचास तेंव्हा मला वाटायचं की तू चिडलायस की काय माझ्यावर... आणि स्वप्ना म्हणायचास तेंव्हा वाटायचे की, हा एकटा मला स्वप्ना म्हणतो म्हणजे काहीतरी नक्की खास आहे ह्याच्या मनात..." स्वप्नाली"मला स्वप्नाली हे सगळं नाव घ्यायचा कंटाळा यायचा म्हणून मी तुला स्वप्ना म्हणायचो..." वीर मनात जे होत ते बोलला पण स्वप्नाली त्याच्याकडे रागात बघायला लागली."मंजी मला
मल्ल प्रेमयुद्ध क्रांती आल्यानंतर रूममध्ये बसून उगीचच बॅगमधले कपडे इकडे तिकडे करत होती. रत्ना आणि चिनू तिची होणारी घालमेल बघत होत्या."वहिनी काय हो खरच मस्त हाय ती स्वप्नाली. सुंदर दिसती आणि शिक्षण पण किती झालय! लट्टू हाय बर दाजींच्या ...Read Moreअजून पण तिला वाटतय दाजी तायडीला सोडून तिच्या बर लग्न करतील." चिनू अन रत्ना तिच्याकडे तिरक्या नजरेन बघत होत्या."व्हय ना आणि मला वाटतय तेजश्री ताईच्या पण मनात स्वप्नाली त्यांची जाव असावी असं वाटतं... न्हाय का चिनू त्या दोघी कितीवेळ गप्पा मारत होत्या. इकडं आल्यापासन तेजुवहिनी आपल्याबर बोलायच्या पण कमीच झाल्यात." क्रांतिने बॅगची चैन जोरात लावली. न कळत तिच्या डोळ्यात पाणी
मल्ल - प्रेमयुद्ध "तुमच्यात काय बिनसलंय का?" आत्याने क्रांतीला जवळ घेऊन प्रश्न विचारला."न्हाय आत्या..." क्रांती"एवढ्या वर्षांचा अनुभव हाय अमास्नी वीरच्या तोंडाकड बघूनच समजल आम्हाला... जर झाल असलं काय तर गैरसमज असत्यात कारण वीर शरीरानं रांगडा असला तरी मनानं लई ...Read Moreहाय..." आत्या म्हणल्यावर क्रांतीला काय सांगावे हा मोठा प्रश्न पडला. "मला म्हाइत हाय तुम्हाला सांगता येत न्हाई पण एक सांगू? आमच्या स्वप्नामुळं जर काय बाय इचार येत असतील तर तुम्ही चुकताय... त्यात तिची चुक न्हाय ... चूक आमची व्हती. आम्ही त्यांना लहानपणापासून चिडवायचो त्याचा परिणाम वीर वर न्हाय पण स्वप्नावर झाला. ती वीरची स्वप्न बघायला लागली. तिच्या मनात वीरशिवाय कोणाचा
मल्ल- प्रेमयुद्ध सगळे गणपती पुळेला पोहचले. "आधी दर्शन घेऊ अन मग जेवायला हॉटेल बघू" ऋषी संग्रामला म्हणाला. ऋषी सतत चिनुच्या मागेपुढे करत होता. ऋषी इंजिनिअरिंग च्या 2nd इयरला होता. चिनुच्या लक्षात आले होते. की ऋषी बोलायचा प्रयत्न करतोय. ती ...Read Moreबोलायला लागली."ऋषी तू घाबरतोय का माझ्याशी बोलायला?" चिनू"घाबरत नाही बाई तुझी बहीण रेसलर आहे बाबा...आणि तुला बोललेलं आवडतंय की नाही म्हणून बोलयाला घाबरत होतो." ऋषीने जे आहे ते सांगितले. चिनू हसली. "अरे त्यात घाबरायला काय??? आपण बोलू शकतो. ऋषी तू काय करतोस? म्हणजे मी ऐकलंय की तू इंजिनीअरिंग च्या 2nd इयर ला हायस पण???" चिनू" मेकॅनिकला आहे.. " ऋषी"अच्छा..." चिनू"आम्ही
मल्ल प्रेमयुद्धपहाटे 4 चा अलार्म वाजला. क्रांती तयार झाली आणि उठून पटापट सगळे आवरून पळायला. तेलणीच्या पठारावर गेली. दहा राऊंड झाल्यावर थोडी बसली अन लगेच एक्सररसाईझ करायला सुरुवात केली. तेवढ्यात मागून आवाज आला."मला ठाव व्हत तू थांबणाऱ्यातली पोरगी न्हाईस. ...Read Moreतगाव व्हत तू येणार...म्हणून मी..." उस्ताद बोलता बोलता थांबले."म्हणून तुम्ही रोज येत व्हता... आणि माझी वाट बघत व्हता." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले."व्हय... मला रोज वाटत व्हत तू येणार... मला वाटत तू आता इथंच न थांबता पुढं जावं... शहरात चांगल्या ठिकाणी कोचिंग लावावी. मी काय गावातला पैलवान आता तुला कोणीतरी असा कोच पाहिजे जो मोठ्या मोठ्या स्पर्धेत कस खेळतात हे शिकवील.."
मल्ल प्रेमयुद्धतेजश्री विचार करत होती. संग्रामला हे सांगितले तर त्याला काय वाटल तो परत लताबाईकड गेला तर...? मला वाटतय की नको सांगायला न्हायतर परत मगच दिस पुढं... तेवढ्यात वीर आला... वहिनी बोलावलं व्हय मला... "भाऊजी घाई न्हाय ना??? मला ...Read Moreव्हत तुमच्याशी..." तेजश्री"वहिनी मी क्रांतीला भेटायला निघालोय... आपण आल्यावर बोलायचं का?" वीर"चाललं..." तेजश्री एकदम शांत होते."वहिनी काय काळजीच हाय का?"व्हय तस हाय पण तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री"न्हाय क्रांतीला सांगतो उद्या भेटू... तुम्ही आत्ता बोला..." वीर खिशातून मोबाईल काढला."असाही हे घरात हायत त्यामुळं आपल्याला नीट बोलता येणार न्हाय तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री"वहिनी काहीही असलं तरी
मल्ल प्रेमयुध्ददोघे बराच वेळ फक्त बसून होते. "वीर थँक यु..." तिच्या डोळ्यात दिसणारे भाव वीर वाचत होता. बराच वेळ तिच्या डोळ्यात तसाच बघत होता. तिला लाजल्यासारखे झाले तिने उगीचच खाली बघून स्वतःच्या ओढणी हातांच्या बोटाना गुंडाळू लागली."का खाली बघताय??? ...Read Moreदिवस झाले सांगीन म्हणतोय... तुमच्या डोळ्यात जादू हाय... तुमच्या डोळ्यात अस काय हाय की मी स्वतःला सुद्धा ओसरून जातो." क्रांतीने एक नजर वीरकडे बघितलं. तिच्याकडे यापूर्वी अनेक मुलांनी बघितलं होत पण वीरच्या बघण्यानं ती विरघळून गेली होती. तिला समजतच नव्हते की काय बोलावे."निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्याल... " क्रांती"काय म्हणालात का? " वीर"म्हंटल निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्यात."
मल्ल प्रेमयुध्द वीर घरी आला, तेव्हा आबा नोकरांना कोणाला किती गोण्या द्यायच्या कशाच्या गोण्या द्यायच्या हे सगळे सांगत होते.वीर आत मध्ये आला आणि विचारले, "आबा हे काय करताय?"तेव्हा आबांनी सांगितले, "अरे कांद आलेत, ज्वारी, तांदूळ हायत म्हंटलं दोन्ही सुनांच्या ...Read Moreपाठवून...आता तसं काय मोठ्या सूनच्या घरी काय कमी न्हाय पण तरीपण पाठवाव दरवर्षाला आपण पाठवतो. तर यंदा क्रांती च्या घरी पण पाठवाव. दहा पाच पोती भरतील. एवढी पाठवून देतो." "दादाना फोन करून आधी विचारात्यांना पटणार हायका, ती माणसं साधी त्यांना हय पटल की नाही मला जरा शंका हाय, तरीपण फोन करा एकदा विचारा." वीर म्हणाला.आबा म्हणाले मी पाठवलं म्हंटल्यावर ते
मल्ल प्रेमयुध्दरात्र कीरररर... झाली होती. आबांना झोप येत नव्हती. दिवसभर वतवत करून सुद्धा बाबांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आबा खिडकीतून एकसारखे आकाशाकडे बघत होते चंद्र चांदण्या लख्ख दिसत होत्या. आज पौर्णिमा होती. थंड हवा सुटलेली.सुलोचनाबाई कधी डोक्यावरचा पदर नीट ...Read Moreत्यांच्या मागे येऊन उभ्या राहिल्या हे सुद्धा त्यांना समजले नाही." अहो काय झालंय नेमकं या खिडकी तुम्ही उभ राहता तवा कळतं की काहीतरी बिनसल हाय... काय झाल मला सांगणार नाय व्हय?" आबा तरीही शांत खिडकीतून बघत होते. "हे घ्या हळदीचे दूध पिऊन घ्या, तुमास्नी सांगायचं असल तर सांगा नाय तर माझा काय आग्रह न्हाय, पण सांगितलं नाय तर मन मोकळ
मल्ल प्रेमयुध्ददादा आणि आशा दरवाजात उभे राहून वीर आणि आबांचे बोलणे ऐकत होते. वीरचे त्याच्याकडं लक्ष गेल. " नमस्कार आबासाहेब" दादा म्हणाले.आबांनी सुद्धा नमस्कार केला. आदराने स्वागत केले. सुलोचनाबाई बाहेर आल्या. आशाताई आणि सुलोचनाबाई आतमध्ये गेल्या.चहापाणी झाले . दादांनी ...Read Moreविषयालाच हात घातला. "आबासाहेब माफ करा पण आम्ही तुमचा आणि वीररावांचे बोलन ऐकलं. चुकीच नाय तुमचं... तुम्ही तुमचं मत मांडाव आम्हाला काय वाईट वाटत नाय, तुम्हीच सांगा कारण आधीच आम्ही सांगितलं होतं तुम्हाला क्रांतीच्या आयुष्यात महत्त्वाच्या स्थानावर असलेला कुस्ती हा विषय संपणार नाय पण तुमचं मत नसेल तिला पुढे पाठवायचा तर आत्ताच आपणही लग्न मोडलेल बरं नंतर वितुष्ट नको, वाद
मल्ल प्रेमयुध्द संध्याकाळ झाली होती. वीर स्वतः आज गुरांच्या गोठ्यात गेला. प्रत्येकवर त्याचा जीव होता. प्रत्येकाला त्याने वेगवेगळी नावं ठेवली होती त्याच्या आवडीची.... खरं तर हे सगळं रघुदादा बघायचा. रघुदादा गुरांना वैरण घालत होता, पाणी देत होता.गोठा अगदी स्वच्छ... ...Read Moreप्राण्यांना बोलता यत नाय म्हणून घाणीत ठेवायचं का? असं वीर म्हणायचा. आठवड्यातून दोनदा तरी तो गोठ्यात जायचा, कारण आबासाहेबांच्या प्रगतीला या सगळ्यांची मदत झाली होती. अगदी नीटनेटकं सगळ्यांना व्यवस्थित जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटची सोय सगळं व्यवस्थित होतं. आज त्याची लाडकी गाई "निरा" तिच्याजवळ तो उभा राहिला. निराने त्याला बघितलं आण त्याच्या हाताला चाटायला लागली. वीरच्या डोळ्यात पाणी आलं. "निरा
मल्ल प्रेमयुध्दतेजश्रीने स्वप्नालीला फोन केला."हॅलो स्वप्नाली... तुला समजलं का जे झालं ते.." "हो मामींचा फोन आला होता आईला सगळे डिस्टरब आहेत." स्वप्नाली"अय येडे अग तू का नाराज हायस? तुला तर खुश व्हायला पाहिजे. आयती संधी मिळाली तुला... आता तुला ...Read Moreघरात येण्यापासन कोण आडवणार हाय? अगदी भाऊजी सुद्धा नाय..." तेजश्री"पण मनाविरुद्धच ना...?" स्वप्नाली"अग मन वळण की नंतर... तुझ्यात तेवढं स्किल हाय की..." तेजश्री"उद्या आम्हाला बोलावलंय तिकडं मामा मामींनी तवा ठरवू.." स्वप्नाली"स्वप्नाली... आनंदात ये ग बाई उद्या आणि भाऊजीबरोबर तुझच लग्न झालं पाहिजेत बघ... आता क्रांती या घरात येन अशक्य हाय करण एकदा आबांच्या मानतात कोणी उतरलं की मग उतरलं." तेजश्री"मला
मल्ल प्रेमयुध्द दोघेसुद्धा पूर्ण रस्त्याने काहीही बोलत नव्हते.वीर गाडी चालवत तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत होता. "दोन महिन्यात तुम्ही माझं मन वळवणार व्हता. पण माझ्या मनासारखं झालं... तुम्हाला प्रयत्न करायची गरज न्हाय आपल्या दोघांवरच राज्य हुकल अंबानी आपला मार्ग मोकळा ...Read Moreतुम्ही माझा इचार नका करू मी खुश हाय हे लग्न मोडलं म्हणून..." क्रांती म्हंटल्यावर वीरने गाडी बाजूला घेतली आणि गाडीचा ब्रेक जोरात दाबला. " हा आता बोला काय म्हणाला? आणि हो हे माझ्या डोळ्यात बघून बोला." क्रांतीने नजर खाली केली."का आता काय झाल?" वीर"तुम्ही आबांचं ऐकावं एवढंच मला वाटतं... मी तर अजून तुमास्नी होकार पण दिला नाय...मग उगच कशाला माझ्यात
मल्ल प्रेमयुध्द"काय खरं सांगतोयस?" संग्राम जवळ जवळ किंचाळला."व्हय दादा लंग्न करिन... नक्की करिन पण फकस्त क्रांतीबर" वीर म्हंटल्यावर संग्रामच्या चेहऱ्यावर आनंद पण बाकी सगळे बसलेले उठून उभे राहिले. "वीर... खेळ न्हाय हा..." सुलोचनाबाई म्हणाल्या."खेळ तुम्ही लावलाय म्या न्हाय... तुम्ही ...Read Moreम्हणून म्या लग्न करायच तुम्ही म्हणाला कि माझं ठरलेलं लगीन मोडायचं... आबा माझं मन हाय का न्हाय? मला इचारात घ्यायला पाहिजे व्हतं तुमी... आत्या तुला ठाव हाय माझं किती प्रेम हाय क्रांतीवर तुम्ही तरी आबा अन आईला समजवायचं..."वीर बोलून गेला."म्हंजी गावातला प्रत्येक माणूस माझा शबूद मानतो ते येडे हायत अन तुमी एकटेच शाहने..." आबा रागाने बोलले."न्हाय आबा आज तुमचा हा
मल्ल- प्रेमयुध्द आबा वीरच्या लहानपणीचे अल्बम बघत होते. लहानपणापासून मिळालेल्या ट्रॉफी, इनाम, प्रत्येकवेळी ज्या ज्या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेसाठी गेले त्या सगळ्यांचे आबांनी फोटो काढून ठेवले होते. लहानपणी आबांच्या गाडीत वीर ऐटीत बसायचा. त्यावेळी फक्त गावात आबांची गाडी होती. अस ...Read Moreझाले नाही की वीर कुस्ती न जिंकता गावात आला. "तिथेही सतत बाप लागायचा. आणि आता पोर एक पोरीपायी बोलायला लागलं. आबांकड डोळ वर न करता बोलणारा हा पोर बोलतोय आता. म्हणजे मला ह्या पोरांच्या मनातलं समजत नव्हतं व्हय? खरच समजलं न्हाय मला?"मामा... आत येऊ...?" स्वप्ना म्हणाली."व्हय या की स्वप्ना..." आबा वीरच्या फोटोकडं बघत बोलले."आबा.." स्वप्नाने डोळ्यात पाणी आणले."आव कशापायी रडताय...
मल्ल प्रेमयुद्ध हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसून क्रांती तयार झाली. पण तिच्या मनात भीती होती. नक्की येत्यात घरी पण कशासाठी?स्वप्ना काय म्हणलं? तिला उगच तरास सगळ्यामुळ... कधी सगळं नीट व्हणारे... चिनू आईला मदत करत होती. ऋषीचे सगळे लक्ष चिनुकडे ...Read Moreआत्या मामा दादासोबत बोलत बसले होते. स्वप्न क्रांतीबरोबर बोलायची संधीची वाट बघत होती."दादा अस व्हायला नको होतं. आम्ही समजावलं दाजींना." मामा म्हणाले."शेवटी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असत्यात तिथं आपलं काय चालत व्हय... पण ह्या पोरांच्या मनात हाय म्हंटल्यावर म्या त्यांच्या माग खंबीरपण उभं राहणार हाय...आबा बापमाणुस हाय... त्यांना त्यांच्या लेकच्या मनातलं समजल, व्हय येळ लागल पण समजल... तोपर्यंत म्या हाय..."
मल्ल प्रेमयुद्ध वीर क्रांतीबरोबर बोलून आत आला. आबा आणि आई बाहेर वीर ची वाट बघत सोफ्यावर बसले होते.खरं तर सुलोचनाबाई यांची धावपळ सुरू होती. तेजस्वी त्यांना मदत करत होती. फक्त एक बॅग खाण्यापिण्याचे भरली होती. हे सगळं बघून आईला ...Read More"आई एवढं संपणार हाय का? कशाला उगच भरलीस? खराब होईल एवढं सगळं... मग सुलोचनाबाई ) म्हणाल्या, "तू एकटाच आहेस व्हय, रत्ना क्रांती हाय म्हंटल्यावर लागलं, जाताना पण प्रवासात लागलं की, एवढं असू देत काही फरक पडत नाय, नाश्ता पाण्याला सुद्धा लागल. सुलोचनाबाई प्रेमाने म्हणाला खरं तर त्याला आश्चर्य वाटल त्यांनी क्रांतीचं नाव घेतलं. आबासाहेब नुसतेच ऐकत होते. शेवटी न राहवून
मल्ल प्रेमयुद्ध गुगल मॅप नुसार गाडी धावत होती. संतुने गाडी अकॅडमीच्या पुढे थांबवली सगळ्यांनी खालूनच नाव वाचलं "फायटर पॉईंट ॲकॅडमी" बिल्डिंग, मैदान खूप मोठं होतं. बाहेरूनच एवढ मोठं दिसत होत. क्रांती आणि रत्नाने एकमेकींकडे बघितले. त्यांच्या मनात भीती होती. ...Read Moreबिल्डिंगकडे बघून डोळे विस्फारले आणि आत निघाले. क्रांतीने स्वप्नाचा निरोप घेतला. म्हणाली, काळजी घे... तू नको तू खाली उतरू, तुझा पाय दुखतोय.." भूषण म्हणाला, " मी थांबतो यांच्याजवळ तुम्ही जा." वीरने त्याची गळाभेट घेतली. भूषणने. गाडी मधून सामान काढून दिलं सगळ्यांचं आणि भूषण स्वप्नाली गाडीतच बसले. बाकी सगळे उतरून सामान घेऊन अकॅडमीच्या दिशेने गेले.भूषण ने गाडी एका झाडाखाली लावली. त्याने
मल्ल प्रेम युद्धसंध्याकाळचे सात वाजले होते. रत्ना आणि क्रांतीने त्यांची रूम व्यवस्थित आवरून ठेवली. कपाटामध्ये दोघींच्या बॅग लावून ठेवल्या. आवरून दोघी बसल्या होत्या तेवढ्यात वीरचा क्रांतीला फोन आला. "सगळं व्यवस्थित झालं ना?" क्रांतीला काळजीने विचारत होता. तेवढीच काळजी क्रांती ...Read Moreजरात होती. वीरचीसुद्धा व्यवस्थित रूम लावून झाली होती, अर्थातच सगळ्यांनी मदत केली म्हणूनच वीरची रूम लवकर आवरून झाली होती. सकाळी लवकर उठायचे असे सांगून वीरने फोन ठेवून दिला. क्रांती आणि रत्नाच्या रूमच्या दरवाज्यावर नॉक झाले. जेवायची वेळ झाली होती. जेवढ्या मुली होस्टेलवर राहायला होत्या. तेवढ्या सगळ्या दरवाजात उभ्या होत्या. सगळ्यांची तोंड ओळख झाली होती पण सायलीने परत सगळ्यांची ओळख करून
मल्ल प्रेमयुद्धगाडी थांबल्यावर स्वप्नाली आणि ऋषि थबकले. त्याची शेती बघून..."ताई हे बघितलंस का?" स्ट्रॉबेरीच्या रोपांना लालचुटुक स्ट्रॉबेरी बघून ऋषि खुश झाला."बापरे... किती मस्त! आणि हे कसं शक्य आहे. शेती एवढी स्वछ???" स्वप्नालीने एकवेळ सगळ्या शेतीवर नजर फिरवली."ऋषि पायीजे तेवढी ...Read Moreखा... सिझनला मी स्ट्रॉबेरीच लावतो." भूषण म्हणाला."हे तू वीरदादाला का नाही सांगितलंस? ऊस लागवडीत काही अडचण नाही पण...." त्याचा शब्द मध्येच थांबवत भूषण म्हणाला."आर तुझ्या आबा मामांना पटायला पाहिजे ना... आधुनिक शेतीच किती खूळ वीर आणि संग्रामदादान त्यांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला पण ते ऐकतील तवा न... ते जुन्या ईचाराच पोरांच्या मताला ते जुमानत न्हाईत. संग्रामदादा ऐकतो त्यांचं पण वीर
मल्ल प्रेमयुद्धक्रांती आवरून खाली आली. वीरने बाईक आणली होती. एकतर त्याला एवढा भारी बघून तिच्या काळजात धड धड होत होती. ब्लॅक टीशर्ट, जॅकेट नि ब्लु जीन्स, गॉगल अन बुलेट बापरे क्रांती जरावेळ त्याच्याकडे बघत बसली." काय बघताय??? प्रेमात पडाल ...Read More... अन मग म्हणाल माझं प्रेम न्हाय..." वीर हसत म्हणाला.क्रांतीने पटकन नजर फिरवली आणि एक साईडला बसली. वीर गाडी स्टार्ट करेना."काय झालं???" क्रांती "बुलेटवर अस बसत्यात व्हय.." "मग???" "दोन्हीकडून पाय टाकून बसा... चौदा किलोमीटर जायचंय तुम्हाला अवघडल्यासारखं व्हईल" वीर"एवढ्या लांब??? कुठं???" क्रांती गाडीवरून खाली उतरली."लांब न्हाय मुंबईचा समुद्र दाखवणार हाय तुमास्नी..." वीर म्हणाला. क्रांती दोन पाय दोन्हीकडून टाकून बसली. वीर
मल्ल प्रेमयुद्ध आबासाहेब शांतपणे बसले होते. त्यांच्या डोक्यावरच ओझं कमी झाल्यासारख वाटत होतं. सुलोचनाबाई आल्या."काय झालं ? शांत बसलात महान ईचारल.." आबासाहेब तरी शांत होते. "काय व बोला नव्ह... दादा न्हाय ऐकलं का? उलटसुलट बोललं का?" सुलोचनाबाई"न्हाय वो आपण ...Read Moreवाईट वागलो त्यांच्याबर त्यांच्या मनातसुद्धा न्हाय अस... लोकांचं मन लै मोठं हाय...व्हय म्हणाले लग्नाला.. आता कोणतं बी विघन नक्को लवकर लवकर तयारीला लागा." तेवढयात संग्राम आले."आबा उसाचं दहा ट्रक गेलं साखरकारखान्याला मी चेक घिऊन येतो..." संग्राम लगबगीनं जायला निघाला. " थांबा संग्राम ते काय बँकेचे ऑनलाईन झाले ना ते करून दिली ना मला बँकेचे पैसे माझ्या खात्यावर ऑनलाईन जमा व्हत्यात