Mall Premyuddh - 22 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 22

मल्ल प्रेमयुद्धपहाटे 4 चा अलार्म वाजला. क्रांती तयार झाली आणि उठून पटापट सगळे आवरून पळायला. तेलणीच्या पठारावर गेली. दहा राऊंड झाल्यावर थोडी बसली अन लगेच एक्सररसाईझ करायला सुरुवात केली. तेवढ्यात मागून आवाज आला.
"मला ठाव व्हत तू थांबणाऱ्यातली पोरगी न्हाईस. मला तगाव व्हत तू येणार...म्हणून मी..." उस्ताद बोलता बोलता थांबले.

"म्हणून तुम्ही रोज येत व्हता... आणि माझी वाट बघत व्हता."
क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले.
"व्हय... मला रोज वाटत व्हत तू येणार... मला वाटत तू आता इथंच न थांबता पुढं जावं... शहरात चांगल्या ठिकाणी कोचिंग लावावी. मी काय गावातला पैलवान आता तुला कोणीतरी असा कोच पाहिजे जो मोठ्या मोठ्या स्पर्धेत कस खेळतात हे शिकवील.." उस्ताद।
"उस्ताद मला थांबायचं न्हाय पण हे लग्नाचं आलं मधीच... मला नव्हतं करायचं लग्न अन आजूनसुद्धा मनात न्हाय.. मी आजच दादांशी बोलणार की मला शहरात गेलच पाहिजे." जरांती
"पोरी माझ्याच न्हाय तर सद्य गावाच्या तुझ्याकडून लय अपेक्षा हायत. त्यावर हे लग्नाचं खुल डोक्यात घेऊन तुझ्या माझ्या स्वप्नांवर पोटीर फिरवू नकस..." उस्ताद

"न्हाय उस्ताद दादा मला कधीच अडवणार न्हाईत पण आई... आई आता इरोध करणार.." क्रांती
"दादा त्यांना समजावून सांगतील..." उस्ताद
"व्हय नक्की सांगत्याल..." क्रांती


क्रांती घरी आली आणि खाटेवर बसली.
दादा पूजा करत व्हत. ।।वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघनम कुरुमेदेव सर्वकार्ये सुसर्वादा।।
"आलीस का बाळा..." दादा
"दादा तुमास्नी समजलं मी गेलेली ?"
"व्हय की तू गेलीस अन मला समजणार न्हाय अस कधी झालाय आत्ता पर्यंत..."दादा
"व्हय समजलं तर पाठवायची कशाला? आता बस झालं लग्न आलंय ते उरकायच..." आई बोली तेवढ्यात चिनू आली.
"मग लग्न ठरल म्हणून काय तीन दोन महिने घरात बसून ठेवायची का तायडीला?" चिनू

"दादा... मला शहरात जायचंय कोचिंग लावायला.." क्रांती
"का..? आता उस्ताद शिकवत्यात ना मग कशाला शहरात अन आता बस उस्ताद पण न्हाय अन शहर पण न्हाय... आता फजत लग्न..." आई

"दादा ही नक्की आमची सख्खी आई हाय ना??" चिनू
"चिने..." आई
"आग तू अशी बोलतोस म्हंटल्यावर पोरी आणखी काय म्हणणार." दादा हसत हसत म्हणाले.
"जा ग तू क्रांती काही हरकत न्हाय.." दादांनी परमिशन दिली सुद्धा
"हा जा म्हण आव जावयाला इचारायला नक... आता काय ती फकस्त आपली न्हाय राहिली. त्यांच्या कानावर घालायला नको?" आई
"झालं इथं दादा बिनदिक्कत परमिशन देत्यात अन ह्या आईच वेगळच..." चिनू
"बरोबर हाय के बी वेगळं न्हाय..." "आई
"मी बोलीन आज वीर बरोबर.." क्रांती।
"तू बोलून घे मग मी आबासाहेबांच्या कानावर घालतो." दादा
"व्हय दादा..." क्रांती उठली आणि अंघोळीला गेली.

"नको ती थेर कशाला? तुम्ही लढवून ठेवलाय पोरींना... आता लग्न ठरलं सासरकडच्या मंडळींना आवडायला नको का? कशाला पाहिजे आता कुस्त्या अन फड... पोरी कधी पुढं जात न्हाईत... आता चूल अन मुलं हेच क्रांतीला बघावं लागणार हाय..." आई बोलती तशी चिनू रागानं म्हणाली.
आग आई तू आईच हायस ना... कशी बोलती? दादा पुरुष असूनसुद्धा पाठिंबा देत्यात अन तू...काय चूल अन मुलं घेऊन बसलीस. आताच्या पोरी कुठं गेल्यात तू अन तुझं इचार ह्या खेडेगावातन कधी बाहेर पडणार." चिनू रागानं आत गेली.

"हाय आई म्हण काय आदर... फटाकडी नुसती तोंड सोडती... मी कुठं काहीच चुकत न्हाय... क्रांतीच्या घरच्यांना हे पटणार न्हाय, आधी इचारायच अन नंतर तिला व्हय म्हणायला पाहिजे व्हत तुम्ही." दादा आशाला काहीच उत्तर देत नव्हते. त्यांनी अगरबत्ती पेटवली अन देवापुढे लावली.

सदा सर्वदा योग तूझा घडावा |

तुझे कारणी देह माझा पडावा |

उपेक्षू नको गूणवंता अनंता |

रघूनायका मागणे हेचि आतां ||कैलास राणा शिव चंद्रमौळी |

फणींद्र माथा मुकुटी झळाळी ||

कारुण्य सिंधू भवदु:खहारी |

तुजवीण शंभो मज कोण तारी ||मोरया मोरया मी बाळ तान्हें |

तुझीच सेवा करु काय जाणे ||

अन्याय माझे कोट्यानुकोटी |

मोरेश्वरा ब तू घाल पोटी ||ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |

त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ||

मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी |

तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |

तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र |

तया आठविता महापुण्यराशी|

नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी ||"मी काय म्हणायला गेले की सगळे माझ्यावर येत्यात अन मी चुकीची बाकी सगळे बरोबर... मला म्हणायचंय आता हे खेळाचं साखर कशासाठी...? पोरींना एक कळत न्हाय पण बाप... बापसुद्धा माझं न ऐकता पोरीचं ऐकतो... मी।काय कुणाचं ऐकणार न्हाय निसत वीररावांनी जरी नकारघंटा वाजवली तरी झालं मी हाय..." आशाची बडबड चालूच व्हती.क्रांतीने धुतलेल्या केसांचा टॉवेल काढला. छान केस झटकले आणि मागे पाठीवर टाकले. तेवढ्यात तीचा मोबाईल वाजला. तिने हातात घेतला आणि नाव बघितले. वीरचा फोन होता तिला आनंद झाला करण किती वेळ तिने फोन स्वतःहून करायचा का नाही यामध्ये घालवला होता. वीरचं नाव घेतल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर तिला पहिल्यांदा इतका आनंद झाला होता. तिने नाव बघितलं आणि फोन उचलला.

"हॅलो..हा वीर बोला..." याआधी तिला एवढा आनंद झाला नव्हता. पण तिने तो आनंद वीरला दाखवला नाही.

"हॅलो... काय करताय?" वीर
"आत्ताच आवरलं... आईला स्वयंपाकघरात मदत करायला निघाली.
"आज भेटुया का???" वीरने सरळ मुद्याला हात घातला.
"आज...? का???" खरंतर ती यासाठीच फोन करणार होती पण वीर बोलला अन सोने पे सुहागा..."
"हॅलो..." वीर
"हा बोला..."

"मी म्हणालो आज भेटायचे का?" वीर
"का? म्हणजे कशासाठी...?" क्रांती एकदम गडबडली.
"अहो तुम्ही जोपर्यंत मनापासून या लग्नाला तयार व्हत न्हाय तोपर्यंत मला तुम्हाला भेटावं लागणार. तुमचा होकार मिळवायला तुमची मनधरणी करायला लागणार ..." वीर

"ठीक हाय भेटूया... तालुक्याला फक्त आई दादांना सांगते आणि निघते." क्रांती.
"तूम्हाला न्यायला येतो यष्टीन नका येऊ.." वीर
"बर...ठेवू...?" क्रांती
"तासाभरात येतो..." वीरने एवढं बोलून फोन ठेवला. त्यालाच कळलं नाही की क्रांती लगीच कशी तयार झाली. तिच्या मनात तर व्हय न्हाय मग...? अत्याकडं गेल्यापासन स्वप्नामुळं झालाय असावी माझ्याबाबतीत हळवी. वीर स्वतःच आवरत होता. आवरल्यावर आनंदात शिट्टी वाजवत खाली आला. तेवढ्यात भूषण आला.
"तालुक्याला चाललास व्हय???" भूषण
"व्हय... व्हय मंजी न्हाय..." वीर
"तू कसा काय हित...?" वीर
"व्हय न्हाय काय? चाल मला पण जायचंय जर काम हाय तू चालला हायस तर न्या पण येतो..." भूषण
" न्हाय र मित्रा मी भायर चालल्योय... एक सुपारी घ्याची एकाचा वाढदिवस हाय त्यांना मला बोलवायचं हाय कुस्तीसाठी." वीर बोलत व्हता संग्राम ऐकत व्हता.
"कसली सुपारी?? आज तर अस कायच ठरलं नव्हतं अन मला कस म्हाइत नाय...?" संग्राम डायरी घेऊन चाळत बसला.
"दादा तुला ठाव न्हाय मला म्हाइत हाय... आलोच मी..." वीर
"थांब की मग एकटा कुठं जातोस मी हाय की?" संग्राम
"दादाला तू नको येऊ मी जातो..." वीरने पळ काढला.
"काय र हा असं काय वागतोय?" भूषण
"नक्कीच हा खोट बोलतोय..." संग्रामने अंदाज बांधला तोपर्यंत वीरच्या गाडीचा गेल्याचा आवाजसुद्धा आला.
"दादा तुला काय वाटत आपल्याला समजलं नाही की हा क्रांती वहिनीला भेटायला चाललंय हे कळलं नाय" भूषण म्हणाला तस संग्राम मोठयाने हसला.


क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत.