Mall Premyuddh - 14 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 14

Featured Books
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 14

मल्ल- प्रेमयुद्ध

संग्राम वेडापिसा झाला होता. खोलीमध्ये येरझाऱ्या घालत होता. तेवढ्यात तेजश्री घाबरतच आत आली.
"या आलात आनंद झाला ना...? हो... झाला तर होऊद्यात... आम्ही पाटलाची औलाद हाउत बघू पुढच्या टेस्ट करू अन वारस या घरात आणू..." संग्राम मोठ्याने बोलत होता. तेजश्री शांत होती.
"आता मनातून उकळ्या फुटत असत्यात म्हणूनच तोंडातन शब्द फुटत न्हाईत. बोला बोला म्हणा काहीतरी आम्हाला नाहीतर शिव्या घाला." संग्राम अस्वस्थ झाला होता. आता मात्र तेजश्रीचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता.

"का आनंद होईल मला??? मी वांझोटी राहीन म्हणून की पाटलांना मी धनाची पेटी की वंशाचा दिवा देऊ शकणार न्हाई म्हणून... का खुश होईन मी? मला वांझोटी म्हणून लोक हिनवतील म्हणून की मला ताठ मानाने बाहेत पडता येणार नाही म्हणून... का आतल्या आत गुदगुल्या होतील मला...?
मला आई व्हायचंय अहो... मला आई व्हायचंय... तेजश्री ठसाठस रडत होती. "तुम्ही याआधी मला दोष देत होता... आणि आताही मलाच... का??? का??? काहीही झालं तर मला आई व्हायचंय... ती जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला पुढच्या टेस्ट करून घ्याव्या लागतील त्या निगेटिव्ह आल्या तर ठीक नाहीतर..." तेजश्रीने डोळे पुसले. तिच्या डोळ्यात पाण्यासोबत आग होती. डोळे आग ओतत होते. संग्रामने याआधी तिचा असा अवतार बघितला नव्हता.
" नाहीतर... काय?" त्याने तेजश्रीला जवळ घेतले. खूप वर्षांनंतर तिला त्याच्या मिठीतली प्रेमाची ऊब जाणवत होती. आधी तिने त्याला बाजूला केले पण त्याची ती पकड इतकी मजबूत होती की तेज पुन्हा त्याच्या बाहूत गेली.
"तेजु शांत हो... अग अस कसं तू आई होणार नाय.... मी हाय ना काळजी नको करु. आणि डोळ्यातून पाणी काढायचं न्हाय या आधी मी तुला लय ताप दिला व्हय ना..." संग्रामला तेजश्रीची आपुलकी वाटली. तिची अशी अवस्था पाहून तो स्वतः शांत झाला नि तिला शांत केले. तिच्या डोळ्यातले पाणी पुसले आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले. दोघे कितीतरी वर्षांनी एकरूप झाले होते.


"नमस्कार... दादासाहेब..." दादांचा रांगडा आवाज कानावर पडले आणि दादा सुखावले.
"साहेब कशापायी?? मी तुमच्या लहान भावासारखा हाय आबासाहेब.
"मग मोठ्या भावाला चालत की नुसतं दादा म्हणलेलं... तुम्ही कशाला साहेब लावायला पाहिजे." दादांच्या लक्षात आले की आपण त्यांना आबा न म्हणता आबासाहेब म्हणतोय म्हणून आबांनी आपली फिरकी घेऊ चूक दाखवली. दादा हसायला लागले.
"आबासाहेब अहो तुम्हीं मुलाकडचे तेवढा मान तुम्हाला मिळायला पाहिजे.
"मुलगा अन मुलगी कुठे काय राहिलय दादा आता सगळीकडे समान हक्क हायत.तवा आतापसन फक्त आबा म्हणायचं आपुलकी वाटती बघा." आबा
"व्हय आबा आता फक्त मोठ्या भावाप्रमाणे 'आबा' अशी हाक मारणार." दादा
"हे भारी झालं...बर फोन अशासाठी केला व्हता. आमची थोरली बहीण साखरवाडीत रत्नागिरी जिल्ह्यात राहती. तिला एवढ्या लांबून साखरपुड्याला यायला जमलं न्हाय म्हणून मग तीन आत्ता तेजश्री - संग्राम बरोबर क्रांती आणि वीरला सुद्धा बोलावलंय." आबा
"पण आबा..." दादांच्या बोलण्यातल 'पण' आबांनी ओळखल.
"काळजी करू नका दादा... अहो आपल्या पोरांवर आपला इशवास हाय की... अन संतू, चिनू, रत्ना ह्यांना पण पाठवा. पोर मजा करून येत्याल तेवढीच...अन आमचा वीर हाय म्हंटल्यावर भूषण पण जाणार... बघा मला दुपारपर्यंत कळवा. उद्या निघायला लागलं पोरांना." आबा बोलून त्यांनी फोन ठेवला.
आशा कान देऊन सगळं ऐकत होती.
"आशा काय करायचं हो आता... आपल्या गावात समजलं पोर लग्नाच्या आधी नवऱ्याबरोबर फिरायला गेली तर लोक नाव ठेवत्याल." दादांनी त्यांची काळजी बोलून दाखवली.
"आबांचा शब्द मोडता येणार न्हाय..." आशा म्हणाली. तेवढ्यात चिनू आली.
"काय झालं आई?" चिनूने विचारल्यावर दादा आणि आशाने तिला सगळे सांगितले.
"सांगायलाच कशाला पाहिजे सगळ्यांना आम्ही कुठे गेलो ते... सकाळी जायचं तर आज रात्रीच आम्ही सगळे दाजींकडे राहायला जातो म्हणजे दाजी इथं येणार न्हाईत अन कोणाला कळणार सुद्धा नाई आम्ही त्यांच्याबरोबर गेलो ते... सांगा आम्ही मामाकडे गेलो म्हणून..." चिनूने नेहमीसारखा तिचा मेंदू चालवला.
" हे बरोबर वाटतय..." आशा म्हणाली. बाहेरुन आलेली क्रांती सगळं ऐकत होती.
"काय बरोबर वाटतय मी कुठं जाणार न्हाय... मला न्हाय पटत ते.." क्रांती रागाने म्हणाली.
"आग तुला बरोबर वाटत न्हाय म्हणून आबांचा शब्द मोडायचा का?" आशा म्हणाली तेवढ्यात संतू सुद्धा आला.
"क्रांते आग आम्ही सगळे बरोबर येणारे तुला काय एकटीला पाठवणार हाय व्हय..." संतू.
"आला व्हय तुला फोन... सगळ्या बातम्या अगदी वेळेवर तुझ्यापर्यंत पोहचतात." क्रांती रागातच म्हणाली.
"चिडतीस कशाला??? मला दाजींचा फोन नव्हता आला आबांनी रत्नाच्या वडिलांचा नंबर मागायला फोन केला व्हता तवा मला म्हणाले." संतू
"मग काय म्हणाले? रत्नाने वडील..." दादा
"ते म्हणाले सगळे असत्याल तर न्या रत्नाला. आमचा इशवास हाय पोरीवर." संतू
" हिचाच इशवास न्हाय वाटत स्वतःवर..." चिनू हळूच संतुला कानात म्हणाली. दोघे हळूच हसायला लागले. क्रांती दोघांकडे रागाने बघत होती.
"बघा रत्नाच्या वडील किती समजदार हायत... कसा इचार केला त्यांनी आपण लै इचार करतो म्हणून निर्णय घेता येत न्हाईत." आशा
"संतू... मी कळवतो आबांना तुम्ही आजच जा रात्री आपली गाडी घेऊन त्यांच्याकडे राहायला. अन तिथून लागलच गाडी आपली एक मग दोन गाड्या घेऊन जा..." दादांनी क्रांतीला काहीही न विचारता पटकन निर्णय घेतला आणि सरळ आबांना फोन लावला.
"आबा आज राच्याला पोर तिकडं राहायला येत्याल मग उद्या सकाळी लवकर निघत्याल." आबा खुश झालं.
"जा आपापली कपडे भर चार दिवसाची..." आशा म्हणाली.
"आई दोन दिवस ना..." चिनू
"आग आवडलं तिकडं कोकण तर अजून दोन दिस वाढत्याल ना जा जा मजा करा... अन संतू रत्नाला घेऊन ये... चिनू भरलं तुझी कपडे.." संतू लगेच बाहेर पडला.
क्रांतीला मात्र काय कळायला मागत नव्हतं. ना दादांचा म्हणणं टाळता येत व्हत न आबांच. तीन तेजश्रीने वीरचा नंबर दिलेला परत पहिला.
"करू का वीरला फोन... हे नवीन नाटक काय हाय इचारायाला... नको आणखी कायतरी वेगळा अर्थ काढायचा" चिनू तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव बघत व्हती.

"तायडे यात दाजींचा काहीएक प्लॅन न्हाय तुला वाटत तस तर बिल्कुलच न्हाय...उगाच नको ते इचार करू नकोस..." चिनू पटकन बोलली.
"तुला भारी म्हाइत ग..." क्रांती.
"आग साधं आहे ना की जर आबांचा फोन आला म्हंटल्यावर हे मोठ्यांमधलं हाय जर आबांनी फोन केला नसता अन हा प्लॅन दाजींचा असता तर यात संतू किंवा मला त्यांनी तुला पटवायला सांगितलं असत. तुला जो इचार करायचा तो कर तुझी इच्छा नसली तरी तुला यालाच लागणार हाय..." चिनूने कपाटातली तिचे चार पाच चांगले ड्रेस काढले आणि तिच्या सॅक मध्ये ठेवले.
" क्रांती... दोन महिने दिलेत तुला मनापासुन वीर आवडत नाय या दोन महिन्यात ना त्याच्याशी बोलायचं न बघायचं... बघू कसा पटवतोय." क्रांतीने स्वतःशी बोलत चार ड्रेस बॅगमध्ये भरले.
"पण दादा आणि आई च काय? मी स्वतःचा इचार करती. दादा हळवं हायत त्यांना मी माझं लग्न मोडलेल सहन व्हईल व्हय? त्यांना माझ्यामुळ काय झालं तर सहन व्हानारे व्हय?" क्रांतीच्या मनाच्या कोपऱ्यातील हळवा कप्पा उघडला. अन काहीही न विचार करता तिने वीरच्या घरी जायचा निर्णय घेतला.


आज तेजश्री लै खुश दिसत व्हती तिच्या गालावरची लाली सगळं सांगून रिकामी झाली व्हती.
"तेजश्री चेहरा लय उजळलाय बया... लय दिवसातनी अशी तेजश्री मला दिसली." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई व्हय मी आज लय खुश हाय..." तेजश्री लाजत म्हणाली.
"बर कारण मला समजातय थोडंस पण म्या काय ईचारणार न्हाय. पण दृष्ट मात्र काढणार. माझ्या सोन्यासारख्या सुनेच्या खळखळत्या हसण्याला कोणाची दृष्ट नको लागायला." सुलोचबाईंनी मीठ मोहरी हातात घेतली आणि लागलीच तिची दृष्ट काढली. तेवढ्यात संग्राम आला.
"आई आमची पण दृष्ट काढा ह्यांच्या ह्या हसऱ्या चेहऱ्यामाग आमची कर्तृत् हाय..." तेजश्री अजून गोरीमिरी झाली. सुलोचनाबाईनि त्याच्या खांद्यावर धपाटा मारला.
"आईसमोर बोलतोय कस काय वाटत न्हाय.." सुलोचनाबाई
"हा सुनेचा न्हाई कान पकडलास अन मला मारुती व्हय..." संग्राम बोलत आईशी व्हता पण सगळं लक्ष तेजश्रीकडे होत.
"बर भूक लागली. नाश्ता मिळल का?" संग्राम म्हणाला अन बाहेर जाऊन बसला. तेजश्रीने पोह्यांची प्लेट त्याच्या आणि आबांच्या हातात दिली.
"संग्राम आवो अत्यामी बोलावलंय उद्या सगळ्यांना..."आबा
"व्हय तेजश्री म्हणाली अमास्नी..." संग्राम
"मग तयारी करा म्हंटल...अन क्रांती त्यांचा भाऊ, चिनू अन रत्ना पण हाय तुंव्ह्या बरोबर... धमाल करा" आबा
"व्हय आबा... तेजश्री बॅग भरायला घ्या. आम्ही आलोच...." संग्राम म्हणाला अन तेजश्री बॅग भरायला खोलीत गेली.


लताबाई रागात व्हत्या. किसन त्याच्या बाजूला बसला व्हता.
"संग्रामराव यायचे बंद झालं वाटत." किसन
"किसन आज जाशील वाड्यावर नक्की काय झालंय समजना..." लताबाई
"म्या...न्हाय बा...खुळी का तू... पाटील चपलीन मारलं मला." किसन
लताबाईने केसांच्या बातूचा आकडा बोटात अडकवला.
"माझं येणार पैस बंद कशी होऊन दिन म्या... संग्रामराव तजमास्नी यायलाच पाहिजे... म्या काय तुमास्नी अशी सोडणार न्हाय...? लताबाई
"काय करणार बया तू..." किसन
"कळलं लवकरच..." लताबाई फंकाऱ्यान म्हणाली.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

(क्रांतीची तगमग वीरच्या लक्षात येईल? संग्राम खर्च पुन्हा तेजश्रीच्या प्रेमात पडला आहे? लताबाईने काय प्लॅन केला असेल? रत्नागिरीत धम्माल येणार की वीरचा मूड ऑफ होणार? नक्की वाचा पुढच्या भागात...
तुमची भाग्या...)