मुलगी होणं सोपं नाही - 7 - आजीचा मृत्य...

  • 3.8k
  • 1.3k

मामा आणि मामी अगदी सहजपणे घरातुन निघुन गेले. त्यांना आजीची काळजी नव्हती की स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती. दिवसामागुन दिवस जात होते. आजीची तब्बेत ढासळत चालली होती. पण ती तब्बेतीकडे दुर्लक्ष्य करत होती. आमचे तिघेंचेही व्यवस्थित सुरु होते. ताई गजरे विकायला मला सोबत न्यायची आणि माई शाळेत जायची. माईने आज शाळेत खुप दिवसांनी आनंद साजरा केला. बाईंनी वर्गात शिकवत असताना प्रश्न विचारले , काही मुलांना उत्तरच येत नव्हते तर काही मुलं उत्तर देण्याची हिंमतच करत नव्हते. माई मात्र नेहमी उत्सुकच असायची. बाईंनी काही वेळाने विचारले, मुलांनो सांगा पाहु... चार मुख्य दिशा कोणत्या आहेत???बाई मी...बाई मी.. सांगु उत्तर..अगं बाळा..प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुच