मुलगी होणं सोपं नाही - Novels
by Vrushali Gaikwad
in
English Fiction Stories
भाग एक- मुलीचा जन्म.... नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश ...Read Moreमाझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी
भाग एक- मुलीचा जन्म.... नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश ...Read Moreमाझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी
भाग दोन - आनंदाचा क्षण दवाखान्यातुन आजी आम्हांला तिघींना घेऊन तिच्याच घरी आली. मोठी बहिण म्हणजेच ताई आता जवळ जवळ सात वर्षांची होत आली होती आणि दोन नंबर बहीण म्हणजेच माई ती देखिल पाच वर्षाची होत आली होती. मी ...Read Moreनुकतीच जन्मलेली होती आणि माझ्याच जन्मामुळे ..माझी आई आम्हांला तिघींना सोडुन गेली आहे, हे देखिल मला कळणार नव्हते. ताईला मात्र सर्व समजत होते, माईला ही समोर घडणा-या घटनांची थोडी थोडी जाणिव होत असावी. त्या वयात त्यांना स्वतःची नावे देखिल व्यवस्थित सांगता येत नव्हती, त्यावेळी त्या तरी काय करणार होत्या??? आजीच्या घरी आम्ही तिघी आणि मामा राहत होतो. मामा गावाबाहेर एका कारखान्यात
आज आजी.. कामाचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर घरी आली होती. आजची संध्याकाळ जणु आजी आणि नातींसाठीच होती. रात्रीचे जेवण ही आजी आणि ताईने चमचमीतच बनवले होते. मला मात्र माई तिच्या हाताने भरवत होती. मामालाही चमचमीत जेवण खुप आवडले. आई, ...Read Moreजेवणाचा बेत भारी चमचमीत आखला आहेस बघ,... मी तर तुझ्या हातचं असं जेवण खुप दिवसांनी जेवतोय'. मामा, रुमालाला हात पुसतच म्हणाला.. 'हो रे, आज मला काम मिळाले ना, मग आता तुझा त्रास पण कमी होईल आणि माझ्या नाती पण आनंदात राहतील, म्हणुन मला इतका आनंद झाला बघ..' आजी.. मामा... आता बस झाल्या तुमच्या गप्पा, आराम करा आता, मी पण भांडी घासुन घेते.'
संध्याकाळी सात वाजायला आले होते, मी अणि माई वाटेकडे डोळे लावुन बसलो होतो. तेवढ्यात समोरून ताई आणि आजी येताना दिसल्या.. त्यांना दोघींना बघुन माई धावत घरात गेली आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. चिऊ, "काय गं अशी दरवाजात बसलेस??"काही नाही ...Read Moreआजी, मी आणि माई तुमचीच वाट बघत होतो.माई आजीला पाणी देत, "हो ना.. सात वाजत आले आजी, तरीही तुमचा पत्ता नाही.. म्हणुन आम्हांला काळजी वाटत होती."अगं माझ्या चिमुकल्यांनो मला रोजच ऊशिर होत राहील.. ताई तु लवकर येत जा गं.. तु नको इतका वेळ थांबु बाहेर.."चालेल आजी ऊद्या पासुन मी लवकरच जाईल आणि लवकरच येईल."जा.. तुम्ही दोघी हात पाय धुवुन घ्या..
ताईसोबत ते काही तास कसे गेले मला कळलेच नाही. आज पहिल्यांदा मी संपुर्ण गाव बघत होती. मला फिरायला मज्जा ही येत होती आणि मी फिरुन दमली सुद्धा होती. ताईसोबत गजले विकता विकता, सहा केव्हा वाजले ते समजले सुद्धा नाही. ...Read Moreआपल्याला आता घरी जावं लागेल.. ""का गं..? दमलीस का काय तु???"मी नाही दमली गं, "पण माई आली असेल ना आता शाळेतुन घरी..""हो गं.. चल इथुनच मागे जाऊ आपण .."आम्ही गावाच्या वेशीवरुन मागे वळणार तेवढ्यात आजी आम्हांला धडकली... काय गं चिऊ? तु काय करते ताईसोबत??"मी ताई सोबत गजरे विकायला आले .. "हो मग आता तु पण गिव फिरणार का? काय गं ताई
मामा, मामी घरातुन बाहेर जाऊन जवळजवळ एक तास होत आला होता, तरीही ते पुन्हा घरी आले नव्हते. मी एकटीच घरात होती आणि दरवाजाला बाहेरुन कडी होती. मला बाहेर जाण्यासाठी काही मार्गच नव्हता. मी कोणीतरी येण्याची वाट बघत होती. ताईला ...Read Moreआज दररोज पेक्षा जास्तच ऊशिर झाला होता. मला घरात गुदमरायला लागले होते. मी जोरजोरात दरवाजा ठोकत होती, जेणेकरुन बाहेरुन कोणी जात असेल तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल. मी दरवाजा ठोकुन ठोकुन थकली, दोन तीन तास झाले होते, मला काहीच सुचत नव्हते. मला गरगरायला लागले, डोळ्यासमोर अंधार आले आणि मी दरवाजा ठोकता ठोकताच खाली कोसळली. दुपारी तीनच्या सुमारास ताई
मामा आणि मामी अगदी सहजपणे घरातुन निघुन गेले. त्यांना आजीची काळजी नव्हती की स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती. दिवसामागुन दिवस जात होते. आजीची तब्बेत ढासळत चालली होती. पण ती तब्बेतीकडे दुर्लक्ष्य करत होती. आमचे तिघेंचेही व्यवस्थित सुरु होते. ताई गजरे ...Read Moreमला सोबत न्यायची आणि माई शाळेत जायची. माईने आज शाळेत खुप दिवसांनी आनंद साजरा केला. बाईंनी वर्गात शिकवत असताना प्रश्न विचारले , काही मुलांना उत्तरच येत नव्हते तर काही मुलं उत्तर देण्याची हिंमतच करत नव्हते. माई मात्र नेहमी उत्सुकच असायची. बाईंनी काही वेळाने विचारले, मुलांनो सांगा पाहु... चार मुख्य दिशा कोणत्या आहेत???बाई मी...बाई मी.. सांगु उत्तर..अगं बाळा..प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुच
डॉक्टरांच्या तोंडुन आजीचं असं झाल्याचं ऐकुन माईला धक्का बसला होता, तीला बोलताही येत नव्हतं, ताई मला मिठी मारुन रडत होती. ताईने स्वतःला सावरण्याचा खुप प्रयत्न केला. कारण आजी गेल्याचं सांगितल्यानंतर मामा इकडे येईल याची काहीच कल्पना नव्हती. पण आमच्यासोबत ...Read Moreड्रायव्हर काका थांबले होते. त्यांनी तरीही मामाला फोन केला आणि फोन मामीने उचलला.. काकांनी आजीबद्दल मामीला सांगितले, मामीने हो बोलुन फोन ठेवुन दिला. आम्ही बराच वेळ मामाची दवाखान्यात वाट बघितली पण मामा काही आला नाही. आत्ता ह्या लहान मुली काय करतील??? आजीचं अंत्यसंस्कार कोण करणार?? हे प्रश्न काकांना पडले होता. त्यांनी आमच्या शेजारच्या काकुंना फोन करुन आजीबद्दल सांगितले."तुम्ही लगेच आजींना