ISHQ - 10 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग १०)

ज्या दिवशी राधा कबिरला सोडुन निघुन गेली होती त्या रात्रीपुर्वीच्या गप्पांच्या सेक्शनचे पान कबिरने लॅपटॉपवर उघडले. ह्यातील प्रसंगात अजुन काही भर घालण्याच्या हेतुने कबिरने लिहायला सुरुवात केली..

“हे बघ राधा.. ठिक आहे.. यु आर नॉट हॅपी विथ युअर हजबंड.. पण नॉट हॅपी विथ लाईफ़..?? मला नाही पटत… तुझं आयुष्य मे बी अनेकींसाठी एक ड्रिम लाईफ़ असेल.. गडगंज नवरा.. हाताशी भरपुर पैसा.. फिरायला २४ तास गाडी, पार्टी लाईफ़, सेलेब्रेटी स्टेट्स.. आय मीन व्हॉट्स रॉग?”

“असेल.. इतरांसाठी असेल.. माझ्यासाठी नाही..”, राधा
“पण का? “
“कारण मला माझं स्वातंत्र्य महत्वाचं आहे कबिर… मला लग्नानंतर माझं पुर्ण आयुष्य असं डोळ्यासमोर दिसत होतं. मुलं-बाळं त्यांच खाणं-पिणं.. मग त्यांच शिक्षण.. मग परत दुसरं मुल.. मग परत ते सगळं चक्र.. ठिक आहे.. कदाचीत मला हाताशी दहा बायका असतील मदत करायला.. पण म्हणुन माझी जबाबदारी तर कमी होत नाही ना…मला हे रुटीनलाईफ़ नको आहे समहाऊ.. निदान आत्ता तरी नाही..”

“जस्ट बिकॉझ इट्स रुटीन, डझंन्ट मिन इट्स बोअरींग.. इट इज कॉल्ड लाइफ़.. दॅट एव्हरीबडी लिव्ह्ज.. फक्त त्यात आपल्या प्रमाणे रंग भरायचे असतात.. त्यात थोडा स्पाईस आणुन हेच रुटीन लाईफ़ रंगतदार कसं करता येईल हे बघायचं असतं… तुला मुलं बाळं नको होती.. तर तसं सांगायचंस लग्नाआधी.. त्याचं आयुष्य कश्याला खराबं करतेस…?”
“तसं नाही.. मी म्हणत नाही की मला आयुष्यभरच असं भटकत रहायचंय.. पण निदान जे काही वर्ष माझ्या हातात होती तोवर तरी? आणि ह्यामध्ये मी माझ्या सो कॉल्ड सोल-मेटची थोडीशी साथ अपेक्षली तर कुठं बिघडलं. जसं मी इच्छा नसताना त्याच्या फाईव्ह-स्टार बोअरींग पार्ट्यांना हजेरी लावत होते.. तसं एखाद्या महीन्यात तो आला असता माझ्या बरोबर डोंगर-दर्‍यांतुन फिरायला तर काय बिघडलं असतं ?”

“एनिवेज.. लेट्स टॉक समथींग एल्स…”
“हेच.. हेच मला आवडत नाही.. तुम्ही सगळे पुरुष एकसारखे.. जरा चार शब्द बोलुन तुमचं बोलणं खोडुन काढायचा प्रयत्न केला की तुम्ही संवादच थांबवता….”
“आता अख्खी पुरुष जात ह्यात आणायची काय गरज? आणि तुमची स्त्री जात अगदी सप्तरंगी किनई…”, वैतागुन कबिर म्हणाला…

कबिरने अजुन दोन पानांची भर घातली आणि मग तो थांबला. फाईल-सेव्ह करुन इंटरनेटवर अपलोड करुन ठेवणे गरजेचे होते. परंतु साईट्स काही उघडेनात. नेहमीचाच इंटरनेट-बंदचा मेसेज पाहुन कबिर चरफडला. त्याने घड्याळात नजर टाकली. फक्त सातच वाजुन गेले होते. अजुन एक तास-दीड तास तो सहज लिहुन फाईल्स मेहतांना पाठवुन देऊ शकत होता. कदाचीत तसे झाले असते तर तो कामातुन मोकळा झाला असता आणि राधाच्या शोधार्थ त्याला निघताही आले असते.

खिडकीतुन त्याने रस्त्या-पलिकडच्या ‘कॅफे-कॉफी-डे’ मध्ये नजर टाकली. शुक्रवारचा दिवस आणि नुकतेच दोन नविन झळकलेले सिनेमे त्यामुळे सगळी तरुणाई बहुदा सिनेमागृहांकडे वळाली होती. सि.सी.डी तसे ओसच होते.

कबिरने लॅपटॉपचा चार्जर काढला, अंगात एक स्पोर्ट्स जॅकेट अडकवले आणि फ्लिप-फ्लॉप्स घालुन तो बाहेर पडला. सि.सी.डी.मध्ये बसुन वाय-फाय वापरण्याचा त्याच्या इरादा होता.

सि.सी.डी.चे दार उघडताच मंद कॉफीचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. एखादी मस्त कॉफी ऑर्डर करावी ह्या विचाराने त्याने खिश्याकडे हात न्हेला आणि त्याच्या लक्षात आले आपण पाकीट न घेताच बाहेर पडलोय.

वैतागुन कॉफीचा विचार त्याने बाजुला सारला आणि कोपर्‍यातल्या सोफ्यावर जाऊन त्याने कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा सेव्ह केलेली फाइल त्याने क्लाऊड-बॅक-अप वर अपलोड केली आणि मग तो उरलेल्या कथेकडे वळला.

साधारण अर्धा-पाऊण तास होऊन गेला असेल तोच वेटरने ट्रे मधुन कॉफी आणुन कबिरसमोर ठेवली.

“एक मिनीटं…”, कबिर मान वर करुन म्हणाला… “मी काहीच ऑर्डर केली नाहीये….”
पण कबिरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आधीच तो वेटर तो तेथुन निघुन गेला.

कबिर त्याला थांबवण्यासाठी उठणार इतक्यात त्याचे लक्ष ट्रेच्या कडेला चिकटवलेल्या पिवळ्या स्टिकी-नोटकडे गेले.

“वन हॉट कप ऑफ हॅजलनट कॅपेच्युनो विथ ३०-सेकंड्स ऑफ़ हिटींग, स्टर्ड नॉट शेक, टु स्पुन स्मकर्स चॉकोलेट संन्डे सिरप विथ एक्स्ट्रा क्रिमी हॅजलनट सिरप… ऐन्जॉय युअर कॉफी…”

कबिरने चमकुन आजुबाजुला बघीतले. कबिरची ही फ़ेव्हरेट कॉफी माहीती असणारी अख्या जगात एकच व्यक्ती होती जी कॅफेच्या दुसर्‍या टोकापाशी कबिरकडे हसत बघत होती.. मोनिका..

कबिरने तिच्याकडे बघताच ती हसत कबिरपाशी आली..

“मोना ! तु? इथे कशी?”
“अरे तुझ्याकडेच गेले होते.. पण तुझ्या दाराला कुलुप.. म्हणुन परत चालले होते, म्हणलं जाताना बघावं इथे आहेस का.. तर दिसलास..”
“ओह.. थॅंक्स फॉर द कॉफी फर्स्ट..” असं म्हणुन कॉफीचा मग उचलुन त्याने ओठाला लावला.. पहीला घोट घेऊन त्याने अतिव सुखाने डोळे मिटले आणि तो पुटपुटला.. “पर्र्फेक्ट…”

“बाय द वे.. काय काम काढलंस?”, कबिर
“म्हणजे? काम असल्याशिवाय येऊ नये का मी?”, मोना हसत हसत म्हणाली.. तसा कबिर शांत झाला..

“चिल.. काम होतं म्हणुनच आले होते.. एक गुड न्युज द्यायला.. म्हणजे.. तशी न्युज आहे.. गुड का बॅड तु ठरव…” हसत मोनिका म्हणाली..
“बोल.. काय न्युज आहे..”, कॉफी पित कबिर म्हणाला..

“एss..एकटाच पिणार आहेस का..? मला कर की ऑफर…”, असं म्हणुन मोनिकाने खाली ठेवलेला कॉफीचा कप उचलला आणि दोन-तिन घोट कॉफी घेतली…

“अम्म… मस्तच ए रे… हा तर.. न्युज अशी आहे की.. आपण दोघं पुन्हा एकत्र काम करतोय..”, मोनिका
“कसलं?” न कळुन कबिर म्हणाला..
“अरे तुझ्या नविन बुकचं फोटो कव्हर मीच करतेय.. मेहतांच्या ऑफीसमधुन फोन आला होता…”
“हो?? कसं काय?”
“अरे पहिल्या तिनही पुस्तकांचं मीच केलं होतं नं.. मग नॅचरली त्यांनी मलाच पहीला फोन केला करशील का म्हणुन.. मी कश्याला नाही म्हणु. आणि तुझा तो पोर्टफोलीओ फोटो पण बदलायचाय म्हणत होते, मागच्या पेज वरचा.. सो बोल.. उद्या फ्रि असशील तर करुयात शुट?”, मोनिका नुसती उत्साहाने वहावत होती…

कबिर मोनिकाकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होता. जणु ती पहीलीचीच मोनिका त्याच्या समोर होती. नकळत त्याच्या मनात राधा आणि मोनिकाचं कंम्पॅरिझन सुरु झालं.. मोनिका म्हणजे नुसता उत्साहाचा झरा.. अखंड वाहत रहाणारा.. तर कधी प्रचंड खवळलेला समुद्र.. ताड ताड खडकांवर आपटणारा.. मोठ्याच्या मोठ्या लाटा घेऊन सागर-किनार्‍यावर विसावणारा. बेभान-बेफिकिर.. एखाद्याने त्याबरोबर नुसत वाहवत जावं.. त्याच्या बेफ़ाम रौद्र सौदर्यात..

आणि राधा.. राधा म्हणजे एकदम विरुध्द.. शांत.. निश्चल.. नदी. एखाद्याने कितीही विचार केला.. कितीही आजमावुन पहायचा प्रयत्न केला तरी त्याच्या खोलीचा अंदाज न येणारी.. एकदम प्रगल्भ.

राधा कबिरला कितीही आवडली असली तरी.. मोनिका आणि त्याच्यामध्ये कितीही वितुष्ट येऊन गेलं असलं तरीही.. मोनिकाबद्दल त्याच्या मनात कोपर्‍यात कुठेतरी प्रेमाची एक भावना अजुनही जागृत होती. तिच्याशी बोलताना ती भावना अजुनच उचंबळुन येई आणि मग कबिरच्या मनात खळबळ माजे.

“अरे वेड्या मना.. नक्की कुणाचा आहेस तु? नक्की कोण आवडते तुला?” कबिर मनातल्या मनात आक्रंदत होता. त्याला दोघींपैकी कुणालाही सोडवत नव्हते. मोनिकाचा चार्मच असा होता की नकळत तो तिच्याकडे ओढला जाई..

“अरे ए… हॅल्लो….”, आपले हात त्याच्या डोळ्यापुढे नाचवत मोनिका म्हणाली.. “ओ लेखक महाशय.. जरा मिडीयाला बाईट्स देता का…?”

“अं.. नको उद्या नको.. पुढच्या आठवड्यात करु कधी तरी…”, कबिर म्हणाला..
“जशी तुमची इच्छा… पण निदान मला पुस्तकाची कंन्सेप्ट तरी सांग.. मी कव्हर-पेजसाठी थिमचा विचार सुरु करते.. तुझ्या कथेतल्या नायिकेला शोभणारी मॉडेल पण शोधावी लागेल ना…”
“नको शोधुस…”, तिला थांबवत कबिर म्हणाला..
“अं?”
“नको शोधुस.. मलाच सापडत नाहीए तर तुला काय सापडणार…”, कबिर
“म्हणजे…”
“म्हणजे.. नको शोधुस.. सिंपल.. तिच्यासारखी तीच आहे.. सो मला दुसरी कुठली मॉडेल चालणारच नाही कव्हर-पेजला..”
“मग? काय पांढरं फटक्क ठेवणार आहेस का?”
“नाही.. माझा विचार आहे एखाद्या आर्टीस्ट कडुन पेन्सील आर्ट काढुन घ्यावं.. बघु.. विचार चालु आहे.. थोडा वेळ दे.. मी सांगतो तुला..”

“बरं निदान स्टोरी तरी ब्रिफ कर थोडी.. इतकं तर करु शकतोस ना?

“माय गॉड हिचे डोळे…”, कबिर स्वतःशीच पुटपुटला…”मी हिला नाही म्हणायला कधी शिकणार?”
“ओके सांगतो..”

“बरं.. फक्त एक मिनीट.. थांब..” असं म्हणुन मोनिका काऊंटरवर गेली आणि येताना दोन चॉकलेट ब्राऊनी आणि १०-१५ मिनिटांनंतर कॉफी रिपीटची ऑर्डर देऊन आली.

“ओके सर.. स्टेज इज युअर्स…”, कबिरला खेटुन बसत मोनिका म्हणाली.

कबिरने डोळे मिटुन दीर्घ श्वास घेतला आणि त्याने मोनिकाला कथा सांगायला सुरुवात केली.

कथा सांगुन संपल्यावर दोन क्षण शांततेत गेले…

“काय झालं? नाही आवडली गोष्ट?”, काहीश्या संशयाने कबिरने मोनिकाला विचारलं

मोनिका आपले टपोरे डोळे कबिरच्या चेहर्‍यावरुन फिरवत होती. जणु काही ती काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती..
“काय? बोल ना? नाही आवडली का?”, कबिरला तिची भिरभिरणारी नजर सतावत होती. जणु काही ती कबिरचे मन वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि कबिर आपले मनातले गुपित मोठ्या कष्टाने दाबुन ठेवत होता..

“कबिर !!.. एक विचारु?”, काऊंटरवर बिलाची खुण करत मोनिका म्हणाली..
“हो.. विचार…”
“आर यु इन लव्ह?”

मोनिकाच्या त्या प्रश्नाने कबिर पुरता गोंधळुन गेला..

“ही जी कोण मीरा आहे.. ती तुला गोव्यात भेटली होती ना.. हे जे पुस्तक तु लिहीले आहेस.. इट्स अ ट्रु स्टोरी राईट?”, मोनिका
“खरं सांगु का खोटं सांगु?”, कबिर
“काहीही सांग.. तु जे सांगशील ते मी खरं मानेन…” खुर्चीतली पर्स उचलत मोनिका म्हणाली

कबिर काही बोलणार इतक्यात त्याचा फोन किणकीणला…

“हॅलो.. रोहन बोलतोय.. कबिर कुठे आहेस…?”, धापा टाकत रोहन पलिकडुन फोनवर बोलत होता..
“मी सि.सी.डी. मध्ये आहे घरासमोरच्या.. का? काय झालं?”
“पट्कन न्युज लाव.. सिआयएन न्युज…”, रोहन..
“अरे पण का? कश्यासाठी..”, रोहन
“तु न्युज चॅनल लाव.. तुझं उत्तर तुला मिळेल…”, असं म्हणुन रोहनने फोन बंद केला…

कबिर पट्कन चालत काऊंटरपाशी गेला आणि त्याने टी.व्हीवर चालु असलेला प्रोग्रॅम बदलुन सिआयएन न्युज लावायला सांगीतले…

१५…१४…१३..१२..११ काऊंटर संपवत जाहीराती जाऊन ‘आज की बडी खबर.. ब्रेकिंग न्युज’ वगैरे लागले..
खाली फ्लायर्सही येत होते..

“अनुराग दीक्षीत ह्याची पत्नी राधा दीक्षीत गोकर्ण पोलिस स्टेशनमध्ये कैद…”

बातमी वाचुन कबिरचे डोळे विस्फारले गेले.. दोन दोनदा त्याने ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली.

काही सेकंद पुढची बातमी टीव्हीवर झळकु लागली…

“नशेच्या हालतमध्ये पकडलेल्या राधा दिक्षीतवर अ‍ॅटेम्प्टेड मर्डरचा आरोप ठेवण्यात आलेला आहे..”

“व्हॉट…???”, कबिर जवळ जवळ किंचाळतच म्हणाला..

एव्हाना कबिरची रिअ‍ॅक्शन बघुन सि.सी.डीमधले बाकिचे लोकं सुध्दा टिव्ही भोवती जमले होते.

कबिर आपले कपाळ धरत पुढची बातमी बघत होता.

एव्हाना कंन्ट्रोल न्युज-रुम मधुन कॅमेरामॅन कडे गेला होता. प्रचंड गर्दी उसळलेल्या गोकर्ण-पोलिस स्थानकातील तुरुंगाच्या अंधार्‍या कोपर्‍यातील एका स्टुलावर राधा पेंगलेल्या अवस्थेत भिंतीला टेकुन बसलेली होती

कबिरने प्रथम तिला ओळखलेच नाही.. पाठीपर्यंत रुळणारे काळेभोर केस जाऊन शोल्डर-कट सोनेरी केसांनी जागा घेतली होती.. हातावर, खांद्यावर, मानेवर कसलेसे रंगीत टॅटू होते.. नाकात मोठ्ठी नोज रिंग होती.. आणि गालावर… वाळलेल्या रक्ताचे पोपडे तरंगत होते….

लाखो-करोडो रुपायांची लॉटरी लागलेल्या आवेशात बातमीदार ब्रेकींग न्युज ओरडत होता…

“गोकर्ण पोलिस-स्टेशनमै राधा दिक्षीत नशे-के-हालत मे धुत…विथ अ‍ॅटेंप्टेड मर्डर अंडर हर नेम…..”

कबिर विस्फारलेल्या डोळ्यांनी टीव्हीवर दिसणार्‍या राधाकडे बघत होता…

[क्रमशः]