Stree Janmachi Sangata - 2 books and stories free download online pdf in Marathi

स्त्री जन्माची सांगता ( भाग -2)





नाचणं म्हणजे एक कला ती इतर कलेसारखीच साऱ्यांनाच अवगत नसते .... पण , केलेला कला म्हणून न बघता आपला हा 

समाज धंदा म्हणून बघतो आणि नाचणारींनला धंदेवाली ... 

शेवंताचा जन्म तसा कोल्हाटी समाजात झालेला . ती शाळेत शिकायला जाई तेव्हा सारा वर्ग तिला कोल्हाटनी म्हणूनच हाका मारत . 

अभ्यासात रमणारी शेवन्ता कधी कधी विचाराच्या घागरीत बुडून जातं आणि स्वतःशीच पुटपुटत राही , 

" कोल्हाटणी म्हणजे नाचणारीचं का ?? " 

हा च प्रश्न घेऊन ती तिच्या आई जवळ गेली आणि तिला म्हणाली , " माय , ये माय कोल्हाटीण म्हणजी नाचणारीचं काय ?" 

तिचा प्रश्न ऐकत सखूलाही वाटलं ह्या लहानग्या पोरीला का समजणं नाचणं आणि कोल्हाटणीचा जन्म पण उद्या ही पोर मोठी झाली की हिले बी नाचयले आपल्या संग घेऊन जा लागणं . तेव्हा ती शेवंताला म्हणते , " होय पोरी कोल्हाटीण म्हणजे नाचणारीण . " 

ह्यावर काहीच न बोलता वेणीला रिबीन बांधत चौथ्या वर्गात शिकणारी शेवंता पाठीवर दप्तर टांगत घराच्या बाहेर पडते . 

दारू ढोसकत आलेला सखूचा नवरा , ग्लडलतच दारा जवळच्या खंबाला रेटत म्हणतो , '' ये सखे मले शंभरी दे . ''

त्याच्यावर चिढतचं सखू म्हणते , '' का गा एवढी ढोसून आला थे लागली नाह्य का तुले ? आता एक फुटकी कवडी नाह्य माह्याजवळ जा तिकडं . ''

कोल्हाटी समाजात स्त्रीनं जन्म घेणं म्हणजेच तिचा तो दोष समजलं जायी . ह्या समाजात स्त्रियांनी नाचायचं घरातल्या नवऱ्याला बापाला भावाला तिनं आपल्या पैशावर पोसायचं . ह्या समाजात बापाचं आणि भावाचं नातं असूनही नसल्यासारखं . 

सखू डोक्यावर घमीलं घेऊन नदीवर कपडे धुवायला जात होती तिच्या सोबत तिची वहिनी आली होती वाटेत चालताना ती सखूला म्हणाली , ' आपल्याले 

दोन दिवसांन आकलकोव्याले जायचं हाय ठावं हायंन व्हयं ?? ' ह्यावर सखू म्हणाली , ' व्हय व्हयं वहिनी हाय मले ठावं दहा दिवस मोडणं आपले तिकडं . ' 

'' व्हय की पैसा बि तसाच भेटणं सखू आपल्याले .'' 

'' व्हय विहिणी , पोरीची लय चिंता वाटतीय बघा ! '' 

'' आव चिंता कायसनी हाय की लेकरांचे बाप घरी . '' 

'' माया दारूडा नवरा तो कायले पोरीकडं लक्ष देईन त्याले दारू ढोसकाले पैसा पाहिजे दुसरं काय नाह्य .. "

दोघीही कपडे धुऊन घराकडे परतल्या . सखून दहा दिवसाचं आपलं बिरडं बांधून घेतलं उद्या पहाटेचं तिला निघायचं होतं . नदीवरून आल्यापासून मात्र सखूला काही बरं नव्हतं वाटतं डोकं घुमल्यावानी वाटतं होतं म्हणून सखू खाली गोधडीवर निजली . 

सूर्य मावळतीला आला तेव्हा वावरातून सोला घेऊन येतं शेवंता घराच्या दिशेनं निघाली हातात तिच्या चण्याचं डाळकं होतं एक एक घाटया तोंडात टाकत ती जात होती . घरात पाय ठेवताच ती माय माय म्हणून आपल्या आईला आवाज देऊ लागली . पण तिच्या आईचा कातर आणि क्षीण आवाज ऐकून तिला जाणवलं आपल्या मायची तब्येत बिघडली आहे .

आईच्या डोक्यावर हात ठेवताच शेवंता म्हणाली , " माय व्ह माय व्ह तुह्य डोकं लैय सन्न तापून हाय बघ ! " 

ह्यावर कण्हह्तच सखू म्हणाली , " व्हय पोरी मले लै घायबरल्यावाणी वाटतं हाय जीव जाते का राह्यते असं झालंय . " 

पाणी दाटल्या डोळ्यानं आईकडे बघत शेवंता म्हणते , '' माय तू न चिंता करू मी तुह्या डोक्यावर थंड्या पाण्याच्या पट्या ठेवते थांब .. " 

असं म्हणतच शेवंतान एक भांड आणून त्यात थंड पाणी ओतलं फडकं ओले करून ती तिच्या आईच्या डोक्यावर पट्या ठेऊ लागली . सखूची तब्येत जास्तच खालावली होती शेवंता तिच्या डोक्यावर आपला हाथ ठेवतं म्हणाली , 

" माय मी मामीलै आजीले बोलून आणतो .. " ती आजीला आणि मामीला बोलवायला निघून गेली . 

सखू तापाने विव्हळत आपल्या कण्हत्या गळ्याने शेवंता शेवंता करतं शांत झाली ... 

शेवंता जेव्हा तिच्या मामीला आणि आजीला घेऊन आली तेव्हा पर्यंत सखूने देह त्यागला होता . घरात येतंच तिची आजी सखूच्या उशाशेजारी जाऊन हंबरडा फोडत होती ... मोठं मोठ्याने रडतं होती , आजीचा लुगड्याचा पदर पकडत शेवंता आजीला म्हणू लागली , " आजी आजी मायला उठवणं .... " 

शेवंता तिच्या लहानपणातच मातृ प्रेमाला मुकली ... 

सुरु झाला तिच्या जीवनात काटेरी प्रवास नाच गाण्याचा .... शाळा सोडून तिच्या बापानं तिला घरी बसवलं . 

मामी तिला तिच्या सोबत घेऊन जायची . शेवंताच तिथं मन नव्हतं रमतं केविलवाणा चेहरा करून ती एकटीच आपल्या विचारत आईच्या आठवणीत रडतं राहायची .. 

नाचणाऱ्या स्त्रिया तिच्या मांडीवर आपली लहान लेकरं निजवायची कोणी तिला केसं विंचरायला सांगायची कोणी गजरे मळायला .... 

हे सर्व सोडून तिला शाळेत जावं वाटायचं पण शाळेची दार तिच्यासाठी कायमची बंद झाली होती हे तिला कळून चुकलं आणि ती नाचणारीचा नाच बघायला पडद्यांच्या बाजून डोकावून बघायला लागली . तिची मावशी आणि मामी नाचत होत्या त्यांचा नाच बघून लोक टाळ्या पिटाळीत होते ... 

शेवंता दहा दहा दिवस त्यांच्या सोबत घराच्या बाहेर गावाच्या कोसो मैल दूर जाऊन राहू लागली . घरी तरी कोण होतं तिचं आपलं दारुडा बाप ? माय मेल्यावर आजी , आत्या , मामी तिला हेडसवाडस करायच्या लहानसहान गोष्टी साठी रागवायच्या पण तिला रागरस्ता नाही यायचं ... 

शेवंता आता पंधरा वर्षाची झाली .. 

तिच्या पायात तिच्या अक्काने घुंगरू बांधली आणि तिला बैल दाव्याला बांधून वखराला जुंपतो तसं नाचायला काढली . शेवंताचा नाईलाज होता .

अंगावर नवीचोळी साडी नेसून जांभळ्या रंगाच्या साडी मध्ये ती जणू अप्सराच भासत होती ... ती निघाली ... ती निघाली नाचायला 

साऱ्या पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या तिला ओशाळ्यल्या गत भासलं ... तिला ओशाळल्या गत भासलं .. पण करणार काय ??

दोन्ही हात कंबरेवर तिच्या सरसावले घुंगरू पायांची छन्न छन्न्न झाली ... ती नाचली बेधुंद नाचली मायचे शब्द अंतर्मुख करत होते तिला नाचायला कारण 

जन्म तिने कोल्हाटणीचा घेतला होता ..... जन्मच तिने कोल्हाटणीचा घेतला होता .