Naa Kavle kadhi - 1 - 3 in Marathi Novel Episodes by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी - Season 1 - Part - 3

ना कळले कधी - Season 1 - Part - 3

आर्या केबिन च्या बाहेर आली आणि आशिष व रेवा लगेच तिच्या जवळ आले. सिद्धान्त चा वाढलेला आवाज  ऐकून त्यांना आत काय झालं ह्याची कल्पना होतीच. 'अरे पण आज तिचा पहिलाच दिवस आहे ना कमीत कमी आज तरी तिला बोलायचं नाही', रेवा म्हणाली. 'अरे रेवा, तो तसाच आहे. आपल्याला काही नवीन नाही हे', आशिष म्हणाला. 'हे बघ आर्या तो तसाच आहे तू  त्यांच्याकडे अजिबात लक्ष नको देऊ,आम्ही कसं ignore करतो same तू पण तेच कर, कारण हा माणुस  नाही सुधारु शकत. so just ignore him..' रेवा आर्या ला समजावून सांगत होती. अग रेवा पण माझी खरंच चुक नव्हती ग माझी गाडी बंद पडली होती. हो आर्या I know तू खोटं बोलत नाही आहेस पण हे त्याला नाही सांगू शकत आपण. सिद्धान्त हे आतुन बघत होता त्याला तर रेवा आणि आशिष चा खूप राग येत होता की काय हा सकाळी सकाळी timepass चालवलाय ह्यांनी. पण तो आर्या कडे पाहून काहीही बोलला नाही.
    थोड्या वेळाने सगळं नॉर्मल झालं आणि सगळे आपआपल्या कामामध्ये गुंतून गेले.आर्यालाही आज काम मिळाले होते तर तिचेही काम चालूच होते पण सकाळचा प्रसंग मनातून काही केल्या जात नव्हता. इकडे सिद्धान्त स्वतःला खूप नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण  एकतर सकाळचा फोन आणि ऑफिस मधला प्रसंग ह्यानी तो थोडा डिस्टर्बच झाला. 'साला आजचा दिवसच खराब आहे. एक सॉरी म्हणाली असत तर काय गेलं असत एकतर चुका करायच्या आणि त्या स्वीकारायचा ऐवजी स्पष्टीकरणे द्यायची, पण म्हणुन तिच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत मी तिला बोलायचं', सिद्धांतला आर्याला बोलला त्याचं वाईट पण वाटत होतं आणि तिचा राग पण येत होता. लंच ब्रेक झाला सगळे लंच करताना सकाळच्या प्रसंगावर बोलणे टाळत होते आणि शक्य तितकं आर्या ला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करीत होते त्या सगळ्यांसोबत आर्यालाही सकाळचा तात्पुरता विसर पडला तिही त्यांच्यासोबत मजा मस्ती करू लागली.  सिद्धान्त त्यांच्या मागच्याच टेबल वर येऊन बसला तरीही कोणाचेच लक्ष नव्हते. त्याने आर्याला सगळ्यांसोबत मस्ती करताना पाहिले आणि त्याला आर्याचा प्रचंड राग आला,काय मुली असतात मी इतका बोललो सकाळी तेव्हा तर चेहरा पडला आता मात्र ही इतकी नॉर्मल.. अश्या कश्या असू शकतात मुली म्हणजे ह्यांना काहीच फरक नाही पडत कोणी बोलल्याचा आपण केलेल्या चुकांचा .आणि मी तिला वाईट वाटलं असेल म्हणून पश्चाताप करत होतो. मग मात्र त्याने आपल्या जेवणावर लक्ष केंद्रित केले. सगळे लंच करून कामाला लागले. संध्याकाळ झाली आणि सगळे एकेक करून घरी जाण्यासाठी निघाले आर्या मात्र थांबली. कारण तिच्या मते आज ती उशिरा आली तर उशीराच जाणार. ती सगळ्यांपेक्षा उशिराच निघाली ती निघतांना सिद्धांतने पाहिलं. काही नाही नव्याचे नऊ दिवस मग ही पण सगळ्यांसोबतच निघेल .
    आर्या पार्किंग मध्ये आली एव्हाना सगळे निघून गेले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे अंधारही पडला होता. ती तिच्या गाडी जवळ आली आणि गाडी स्टार्ट करू लागली पण परत सकाळचाच प्रॉब्लेम तिची गाडी स्टार्ट होईनाच. आर्या ने लाख प्रयत्न केले पण गाडी काही स्टार्ट झाली नाही. शेवटी तिने आपल्या मित्र मैत्रिणींना फोन केले पण तिच्या ऑफिसच्या एरिया मध्ये कोणीच नव्हतं. आणि लांबवून बोलावून तिला कोणाला त्रासही द्यायचा नव्हता.तिने घड्याळ पाहिले 8 वाजूनगेले होते. आधी तिने घरी कॉल करून आईला कळवले की थोडा उशीर होईल.आणि आता मात्र तिला टेन्शन आले तिने परत आपल्या गाडीकडे मोर्चा वळवला आणि गाडी स्टार्ट करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिला मागून आवाज आला what happend आर्या..????तू अजून इथेच हो ना माझी गाडीच स्टार्ट होत नाही आहे, परत सकाळचाच प्रॉब्लेम. सिद्धान्तचा मात्र एकदम चेहराच उतरला म्हणजे खरच हिच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. आणि मी उगाचच सुनावलं तिला. 'आर्या may I help you????', आर्या ने मागे बघितलं सिद्धान्त सर!!!!! आर्या हो म्हणायच्या आत सिद्धांत ने गाडीचा ताबाही घेतला. त्यानेही खूप प्रयत्न केला पण त्याच्याकडूनही गाडी काही केल्या स्टार्ट होईना. शेवटी तो म्हणाला, 'आर्या, what I think की गाडी तर काही केल्या स्टार्ट होत नाही आहे. गाडी इथेच राहू दे  I will drop you.' 'No thanks sir, I will manage.', आर्या म्हणाली. आर्या रात्रीचे 9 वाजताहेत आणि आता काय manage करणार आहेस तू.

Rate & Review

Ashish Sultane

Ashish Sultane 2 months ago

Aditya  Khule.

Aditya Khule. 4 months ago

more .

more . 8 months ago

nice story

Preeti Patil

Preeti Patil 11 months ago

Srushti Punde

Srushti Punde 1 year ago