Naa kavle kadhi - 2 - 9 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 9

सिद्धांत ने आर्या ला दिलेली सगळी कामे तिने व्यवस्थित पूर्ण केली. त्यामुळे तो बराच खुश होता. पण आर्या मात्र खूप थकली होती. चल आर्या निघायचं तो तिला म्हणाला. हो अरे एक 10 मिनिटे थांबतो का? ती अजूनही कामातच होती. अग करशील उद्या, चल ना! तो म्हणाला. आता नाही गेलं तर पुन्हा ह्याला राग येईन आणि मग पुन्हा चिडेल नको ऑफिस मध्ये भांडण नको घरी जाऊन तेच करायचं आहे ! तिने लगेचच सिस्टीम बंद केली आणि निघाली. गाडी मध्ये बसल्यावर तिला चांगलाच क्षीण जाणवायला लागला तिने डोळे मिटुन घेतले. आर्या काय झालं बर नाही वाटत आहे का? सिद्धांत ने विचारलं. नाही थकले होते फार! अरे इतक्यात थकलीस तु ना तुझा stamina वाढवायला हवा. 'त्यासाठी exercise करायला हवी. proper diet घ्यायला हवा'. तो बोलत होता. 'आज हा इतक्या चांगल्या मूड मध्ये कस काय? एकदम मला diet an all advice देतोय'.आर्या मनातच विचार करत होती. तिने त्याला फक्त हो म्हनूनच रिप्लाय दिला. तिच डोक खूप दुखत होत तिला ह्यावेळेस सिद्धांत च बोलणं ही नको वाटत होत. तिच परत डोळे लावून घेतले.हिला ना ,काही advice पण देऊन फायदा नाही. सरळ ignore करते अरे नाही ऐकायचं तर सांगायचं ना की नको बोलू ! मला पण काय गरज आहे म्हणा मला वाटत आमच्यात संवाद कधीही होऊ शकत नाही. मान्य आहे मी थोडा काल rude वागलो, पण आज नीट वागण्याचा प्रयत्न केला तर हिचा वेगळाच attitude . त्याचा विचार चालू होता.
काय ग आर्या तुला अजूनही बर वाटतच नाही आहे का? तिला आल्या आल्या त्याच्या आई ने विचारलं. नाही फार काही नाही थोडं डोक दुखत होत आणि थोडासा थकवा,आर्या म्हणाली. अरे सिध्दांत तिला डॉक्टरांकडे का नाही घेऊन गेला? नको नको मी थोड्यावेळ आराम करते मग वाटेल बर इतकं काही नाही झालं,आर्या म्हणाली आणि ती रूम मध्ये निघून गेली. ती लगेच फ्रेश होऊन झोपली देखील. कठीण आहे आर्याच !सिद्धांत म्हणाला. खरच बर नसेल वाटत का हिला? नाही ऑफिस मध्ये तर चांगली होती. उगाच नाटक करीत असेल तिला अस वाटत असेल असं करून sympathy मिळवता येईल ! पण मला नाही काही फरक पडत. सिद्धांत खाली जेवायला आला अरे आर्या नाही आली ? त्याच्या आई ने विचारलं. नाही अग झोप लागली आहे तिला म्हणून नाही उठवलं! सिद्धांत म्हणाला. 'अरे पण तिने काहीही खाल्लेलं नाही!''अग हो मग भूक लागल्यावर उठेल ना!' 'आणि आई ,असही प्रत्येकाला आपल्या पोटाची काळजी असते ! 'सिद्धांत काय बोलतोय अरे तू अस ! अस बोलू नाही तुला अजूनही काहीच वाटत नाही तिच्या बद्दल? त्यांनी थोडं काळजीनेच विचारलं. अरे यार आई समोर अस नको होतं बोलायला! तो मनातच म्हणाला. अग आई तस नव्हतं म्हणायचं मला आणि मलाही तिची काळजी आहेच ना ! 'आता ती नाही म्हणत आहे त्याला मी काय करू'! तो म्हणाला. 'बर बर पण तिला काही खाऊ घाल ह थोड्यावेळाने तस नको झोपू देऊ!'मी फार थकली आहे मी आराम करते'हो ग आई, तू नको tension घेऊ बर त्याच!'.त्यांनी जेवण आटपले.
तिला जेवू घाल म्हणे काहीही असत आईच. आणि तिला तर हेच हव असणार म्हणून तर नाटक नसेल ना करत? जाऊ दे मला काय मी तर काही नाही बोलणार तिला. तिला पण कळू देत तिने अस कितीही नाटक केलं तरीही मला नाही काही फरक पडत. असा विचार करत तो मस्त tv बघत बसला.तो रूम मध्ये गेला आर्या अजूनही झोपूनच होती. वा बर झाल ही अजूनही झोपुन आहे चला म्हणजे आता मला शांत झोप लागेल. जागी असती तर उगाच भांडली असती माझ्यासोबत. त्याने तिच्या कडे बघितले किती सुंदर दिसते ना ही झोपेत पण शांत निर्विकार एकदम निरागस! आणि ही इतकी गर्मीत कस काय झोपू शकते AC का बंद ठेवला हिने? अस म्हणून त्याने AC on केला. आणि तो ही झोपला.
अरे ही अजूनही उठली नाही इतकी कोणती झोप आहे कुंभकर्णाच्या पलिकडे ! मी morning walk, exercise करून आलो तरीही आर्या झोपूनच. अरे सिद्धांत आर्या उठली नाही का अजून? त्याच्या आई ने विचारलं. बघतो उठायला हवी होती ना इतक्या वेळ! चांगल्या सवयी लावून घ्यायचाच नाही तो म्हणाला. रोज उठते रे ती ! 'काल थोडी थकल्या सारखी पण वाटत होती',जेवली ना पण ती रात्री?त्याच्या आई ने त्याला विचारलं. बापरे ! आता काय सांगू आई ते सगळं नंतर बोलू मला आधी आर्या ला उठवू दे! आणि तो लगेच रूम मध्ये आला. "आर्या ",त्याने आवाज दिला. पलिकडून काहीही response नाही आला. त्याने तिचा हाताला हात लावला आणि त्याला एकदम जोरात चटका बसला. त्याने पटकन हात काढुन घेतला. "आर्या", बापरे किती तापलीये ही! त्याने लगेच त्याच्या आईला बोलावले आणि डॉक्टरांना फोन केला. काय झालं असेल हिला अचानक? काल पर्यंत तर चांगली होती. आर्या उठ ना! तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ती तापाने चांगलीच फणफणली होती.हे सगळं माझ्या च मुळे झालं रात्री काय झालं असत मी तिला उठवलं असत तर! आता मात्र त्याला तिच्या कडे पाहून टेन्शन आणि तिची दया ही येत होती. इतक्यात डॉक्टर आले. त्यांनी चेक केलं, काही टेस्ट कराव्या लागतील मी तस blood sampel घेतलंय आता बघू काय रिपोर्ट्स येतात सध्या तरी ताप खुप आहे, अशक्त पणा ही खूप आहे काही खाल्लेलं नाही का ह्यांनी? सलाईन द्यावं लागेल आणि आधी काहीतरी खायला द्या त्याशिवाय मला मेडिसिन देता येणार नाही. आणि हो तो AC आधी बंद करा! त्यांनी भरमसाठ सूचना दिल्या. आणि ते निघाले मीथोड्या वेळाने येईल जर काही फरक नाही पडला तर मात्र admit करावं लागेल. आणि ते निघाले. अरे बापरे ! सिद्धांत तू AC इतक्या कमी temperature वर ठेवला होता रात्र भर त्याच्या आईने विचारल. हो आई मला लागतो AC आणि हे तुलाही माहिती आहे! आणि त्यात काय झालं. तो म्हणाला. अरे सिद्धांत तुला काहीच कस आठवत नाही रे! तिला AC अजिबात सहन होत नाही त्या एकदम काळकुतीला येऊन म्हणाल्या. काय! आई sorry! मला खरच माहिती नव्हत ग मी मुद्दामून अस का करेन?. 'माझीच चुकी आहे मी उगाचच हट्ट केला तिला ह्या घरात आणण्याचा'! anyway मी सूप करून देते तिच्यासाठी तू थांब आणि त्या ही निघाल्या.
त्याने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. बिचारी उगाचच माझ्या मुळे suffer करावं लागतंय, पण मी तरी करु मला नव्हतं माहिती. नकळत का होईना पण माझ्या मुळेच तिची ही अवस्था झालीये. अस नाही व्हायला पाहिजे. माझ्या कडून त्रास नाही व्हायला हवा तिला. आवडीनिवडी नाही पण कमीत कमी तिला कशाचा त्रास होतो हे तरी मी जाणून घायला हवं होतं. आता ह्या गोष्टींचा विचार करूनही काही फायदा नाही जे घडायचं ते तर घडून गेल . आर्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यावे नाहीतर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार! त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने हलकेच आपले डोळे उघडले, "आर्या"तो इतकंच म्हणाला. खर तर कुठल्याही औषधनपेक्षा सिद्धांत इतका जवळ आहे हे पाहूनच तिला थोडं बर वाटल आणि तिच्या चेहऱ्यावर थोडस हसू आलं.
क्रमशः