Pyar mein.. kadhi kadhi - 13 books and stories free download online pdf in Marathi

प्यार मे.. कधी कधी (भाग-१३)

थोड्या वेळानंतर पुन्हा एक मेसेज आणि नंतर पुन्हा एकामागोमाग एक.
तरुणला कुठलाही मेसेज वाचायची किंवा रिप्लाय करायची इच्छा नव्हती. तो डोळे बंद करुन पडुन राहीला, उशीरा कधी तरी त्याला झोप लागली.

सकाळी फोनच्या आवाजाने मला जाग आली, घड्याळात ६.३०च वाजत होते. चडफडत फोन उचलला..

प्रितीचा होता.

“हॅल्लो…”
“अरे काय? कुठे आहेस? काल किती मेसेज केले.. एकाचा पण रिप्लाय नाही?”
“हम्म.. अगं जरा डोकं दुखत होतं, त्यामुळे लवकर झोपलो..”
“ओह.. मग आता बरं आहे का?”
“हम्म ठिक आहे आत्ता. तु काय सकाळी सकाळी?”
“अरे जॉगींगला आले होते बाहेर.. सॉरी.. झोप मोड केली का?”
“नाही, तसं काही नाही…”

काही वेळ शांततेत गेला.

“तरुण, सगळं ठिक आहे ना?”
“हम्म.. ”
“पण तुझ्या आवाजावरुन तरी वाटत नाहीये..”
“प्रिती.. नंतर बोलुयात? मी मेसेज करतो तुला.. ओके?”
“ऑलराईट तरुण.. टेक केअर…”

परत झोपण अशक्य होतं म्हणुन मग आवरुन लवकरच ऑफीसला गेलो.

सकाळी प्रितीशी तुटकंच बोललो होतो फोनवर.. फार ऑड वाटलं मलाच नंतर.. आणि प्रितीलासुध्दा नक्कीच ऑड वाटलं असणार.

“गुड मॉर्नींग थरुन!! नॉट वेल?”, माझा पडलेला चेहरा बघुन स्वामीने विचारलं.

मला मनातलं सगळं कुणाशीतरी बोलायची फार इच्छा होती. स्वॉमी माझ्यासाठी तसा परकाच होता, पण कदाचीत म्हणुनच तो मला योग्य वाटला. कदाचीत त्याचे ओपिनियन बायस्ड नसते आले आणि म्हणुनच मी त्याला कॅन्टीनमध्ये घेउन गेलो आणि नेहापासुन प्रितीपर्यंतची सगळी कहाणी त्याला ऐकवली.

“लव्ह इज ब्युटीफुल थिंग थरुन..”, सगळं ऐकुन झाल्यावर स्वामी त्याच्या टीपीकल अ‍ॅक्सेंन्ट मध्ये म्हणाला.. “.. बट मोस्ट ऑफ द टाईम्स लॉट ऑफ कॉम्लेक्सिटीज कम विथ इट.. यु मस्ट चुज वाईजली.. इफ़ यु रिअली केअर अबाऊट युअर पॅरेन्ट्स देन बेटर गेट आऊट ऑफ़ युअर रिलेशन्शीप नाऊ विथ प्रिथी बिफ़ोर इट गेट्स लेट..”

सो आय गेस.. हाच ऑप्शन बरोबर होता.. माझं मन सुध्दा मला तेच सांगत होतं आणि स्वामी पण तेच म्हणाला होता.

मी प्रितीबरोबरचं आमचं दोन दिवसांचं नातं संपवायचं ठरवलं.


दिवस असा तसाच गेला. प्रिती व्हॉट्स-अ‍ॅप वर ऑनलाईन दिसत होती. मला असं वाटत होतं जणु ती आमच्याच चॅट विंडो मध्ये आहे.. वेटींग फॉर मी टु राईट समथिंग.. हर प्रोफ़ाईल पिक्चर लुकिंग अ‍ॅट मी टु से समथिंग..

संध्याकाळी प्रितीला मेसेज केला…

“हाय तरुण.. कसा आहेस? बरं वाटतंय आता?”
“हम्म.. काल डोकं दुखतं होतं थोडं. थोडा ताप पण होता.. आता बरं आहे पण..”
“व्हेरी गुड.. बोल.. काय म्हणत होतास…?”

मी मग प्रितीला लक्ष्मी आणि स्वामीची स्टोरी सांगीतली..

“प्रिती.. मला असं वाटतं.. आय मीन मी काल खुप विचार केला की.. आपणं.. इथेच थांबुया.. नो पॉईंट इन गोईंग अहेड.. आय डोन्ट वॉंन्ट टू हर्ट यु प्रिती.. नेहा आणि मी.. कधीच एकत्र होणार नव्हतो.. तरीही.. मनात उगाचच कुठेतरी गिल्ट लागुन राहीलं. मग मी तुझ्याबरोबर उद्या एकत्र नाही होऊ शकलो तर.. तर आयुष्यभर ती टोचणी मनाला लागुन राहील ”

“मी काय बोलु ह्याच्यावर….”, बर्‍याच वेळानंतर प्रितीचा रिप्लाय आला..”तु असं अचानक काही बोलशील असं मला वाटलंच नव्हतं..”
“मी अंधळा झालो होतो प्रिती.. तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नव्हतं.. पण आज.. आज स्वामी आणि लक्ष्मीला पाहीलं आणि जणु मला आपणच त्या जागी आहोत असं वाटून गेलं..”

“तुला काय वाटतं प्रिती?”, प्रिती बराच वेळ काही बोलली नाही तसं मीच तिला विचारलं

“प्रश्न माझ्या काही वाटण्या-न-वाटण्याचा नाहीये तरुण. प्रश्न तुझ्या आई-वडीलांचा आहे.. अ‍ॅन्ड आय एम नॉट ब्लेमींग देम ऑर समथींग. प्रत्येकाची काही विचार असतात, तत्व असतात आणि आपण त्याचा आदर केलाच पाहीजे. प्रश्न आहे की तु त्यांना समजावु शकणार आहेस का? तु .. किंवा आपण दोघंही त्यांच मन वळवु शकु का? उत्तर ‘नाही’ असेल तर….. तु म्हणतोस तेच योग्य आहे..”

“प्रिती.. उत्तर ‘नाही’ असंच येतं आहे ना.. म्हणुन तर.. मला नाही वाटतं ते कधी समजु शकतील.. तसं असतं तर मी नेहाबद्दलच त्यांना..”
“तरुण.. तुझं नेहावर प्रेम होतं?”, प्रितीने मध्येच थांबवत विचारलं.

“नव्हतं..”
“मग नेहाचा विषय आपल्या डिस्कशनमध्ये नको प्लिज..”
“ऑलराईट..”

“ऑलराईट देन… तु ठरवलंच आहेस तरुण तर मग.. फ़ाईन… गुड नाईट देन..”
“नो प्रिती.. मी नाही.. आपण मिळुन ठरवायचं आहे काय करायचं.”
“नाही तरुण.. माझ्या ठरवण्याच्या प्रश्नच नाही.. ठरवायचं तुला आहे. तु दोन्ही दगडांवर पाय ठेवतो आहेस.. एकीकडे तुझे आई वडील आहेत.. आणि एकीकडे मी…”

“शट यार.. काय लाईफ़ आहे हे.. असले गहन प्रश्न लोकांना लग्नानंतर २-४ वर्षांनी उद्भवतात, जेंव्हा एकत्र फॅमीलीत प्रॉब्लेम्स असतात.. आणि इथे दोन दिवस नाही झाले तर…”
” ”

“तु माझ्या जागी असतीस तर तु काय केलं असतंस प्रिती? जर तुझ्या आई-वडीलांचा विरोध असता तर..”
“माहीत नाही तरुण, पण निदान मी एकदा तरी आई-वडीलांशी बोलले असते ह्या विषयावर..”

“तरुण मला सांग.. तुझी कंपनी तुला ऑनसाईट वगैरे नाही का पाठवत.. कित्ती तरी लोकं वर्षानुवर्ष परदेशी जातात. तसं असेल तर हा प्रश्नच रहाणार नाही ना..”
“प्रश्न राहील प्रिती.. जरी मी आई-वडीलांबरोबर नसलो तरी मनाने तर असेन. त्यांचा विरोध पत्करुन आपलं लग्न झालंच तर आमच्यातलं नातंच संपुन जाईल.. ”
“ठीक आहे तरुण, मी तुला फोर्स नाही करणार.. तु जे ठरवशील ते मला मान्य आहे.. आणि तु म्हणतोस ते ही खरं आहे.. दोन वर्षांनी एकमेकांपासुन वेगळं होण्यापेक्षा दोन दिवसांनीच झालेलं बरं…”

“हम्म.. आणि आपण चांगले मित्र म्हणुन राहुच की..”
“नो तरुण प्लिज. मला ह्या असल्या ‘चांगले मित्र’ वगैरे गोष्टींवर विश्वास नाही. तुझ्यासाठी कदाचीत ते सोप्प असेल.. माझ्यासाठी नाही. मनात एक.. ओठांवर एक असं मी नाही वागु शकत..”
“म्हणजे.. उद्यापासुन आपण एकमेकांशी बोलणार पण नाही का?”
“ऑफकोर्स नो. ज्या रस्त्याने जायचंच नाहीये.. आय मीन..तुझं माहीत नाही.. पण माझ्या मनात तरी तु ‘फक्त मित्र’ वगैरे म्हणून नाही राहु शकत. सो नो एस.एम.एस, नो व्हॉट्स-अ‍ॅप आणि नो फोन कॉल्स..”

“प्रिती.. धिस इज टु मच..”
“येस इट इज.. आपण कालच म्हणालो होतो ना.. दोघांपैकी एकाला कुणाला तरी स्ट्रॉंग व्हायला हवं..”

“हम्म.. सो धिस इज इट देन?”
“येस तरुण.. धिस इज इट.. अपना साथ इधर तक ही था.. ”
“प्रिती.. अधुन मधुन तर आपण बोलु शकतोच की? ठिक आहे.. रेग्युलर नको.. पण असं अचानक उद्यापासुन तु माझ्या आयुष्यात नसणार… इमॅजीनच होत नाहीये..”

“तरुण.. जर मी तुझ्या आयुष्यात कायमची नसणारच आहे, तर मग उद्यापासुनच का नको? कश्याला स्वतःला आणि दुसर्‍याला त्रास द्यायचा? कश्याला आयुष्यभरासाठी आठवणींचं गाठोडं घेऊन फिरायचं..? त्यापेक्षा नकोच ना ते..”
“प्रिती, कित्ती तरी लोकांची ब्रेक-अप्स होतात.. अनेक वर्ष एकत्र राहील्यानंतरही ते ब्रेक-अप नंतर मित्र-मैत्रीण म्हणुन रहातातच की. माझं आणि नेहाचंच बघ.. आम्ही काय एकमेकांपासुन तोंड फिरवली का?”

“परत नेहा!!”
“सॉरी प्रिती… पण हा ऑप्शन मला नाही पटत…हे असं एकदम बोलणंच तोडून टाकतं का कोणी..”
“तु मला तुझा निर्णय सांगीतलास, मी माझा.. जसा मी तुझ्या निर्णयाचा रिस्पेक्ट करते, आय थिंक तसं तु पण करायला हवंस ना?”

“आय विल मिस आवर चॅटींग प्रिती..मला असं खूप आतमध्ये कुठेतरी काही तरी तुटल्यासारखं वाटतंय.. ”

“आय एम सॉरी तरुण.. मी स्वतःला थांबवायला हवं होतं ना? मला माहीती होतं आपलं नातं नाही बनु शकत.. पण तरीही मी स्वतःला मुर्खासारखं सोडून दिलं होतं वार्‍यावर.. बट थॅक्स.. तु हे वेळीच थांबवलंस..”

” ”

“तरुण, यु मेड मी क्राय टुडे … बाय फॉरेव्हर… ”
“सो सॉरी प्रिती.. डिड्न्ट मिन इट.. पण नंतर आयुष्यभर हे अश्रु बाळगण्यापेक्षा.. आत्ताच केंव्हाही चांगलं नं?”

प्रितीकडुन काहीच रिप्लाय आला नाही..

“ट्रिंग.. ट्रिंग.. यु देअर प्रिती..? धिस इज नॉट द वे टू से गुड बाय विथ अ सॅड फ़ेस..”
बराच वेळ शांततेत गेला..

“सॉरी.. आई येत होती खोलीत म्हणुन मी बाथरुममध्ये पळाले.. आय डोन्ट वॉन्ट हर टू सी टिअर्स इन माय आईज..”, थोड्यावेळाने प्रितीचा रिप्लाय आला..

पुन्हा बराच वेळ शांततेत गेला..

“बाय तरुण.. टेक केअर.. हॅव अ हॅप्पी लाईफ़.. होप तुला आणि तुझ्या आई-वडीलांना पाहीजे तशी मुलगी तुला मिळेल…”
” ”
“हे काय? आता तु का सॅड फेस..? लेट्स स्माईल ओके…?”
“ओके..”
“बाय तरुण ”
” बाय प्रिती…”

क्षणार्धात.. अवकाशामधील पोकळीमध्ये असल्यासारखं वाटलं.. आजुबाजुला काहीच नाही.. सर्वत्र एक व्हॅक्युम.. काळाकुट्ट अंधार.. मनाला.. डॊक्याला घुसमटवुन टाकणारा एक व्हॅक्युम..

रात्रीचीच परतीची फ्लाईट होती.. बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधारात मधुनच विमानाच्या पंखांवरील लुकलुकणारे लाल-पांढरे दिवे उठुन दिसत होते. बॅंगलोरला येताना मी कित्ती खुश होतो. विमानातले ते प्रितीबरोबर बोलताना घालवलेले दोन तास.. अविस्मरणीय होते. आणि आज तिन दिवसांतच जणु इकडचे जग तिकडे झालं होतं. येताना खिडकीबाहेर दिसलेला तो सुर्योदय, ते निळे आकाश आज बाहेरच्या त्या काळोखात कुठेतरी हरवुन गेले होते.

प्रितीशिवाय माझे पुढचे आयुष्य हे असंच काळोखाने भरलेले असणार होते का? मी जणु आधुनिक काळातला देवदास झालो होतो. दोन-दोन मुली आयुष्यात येउनही एकही नशीबी नव्हती.

राहुन राहुन चित्रपटातला तो संवाद सारखा डोक्यात येत होता..

“अपने हिस्से की जिंदगी तो हम जी चुके चुन्नी बाबु
अब तो बस्स.. धडकनोंका लिहाज करते है..
क्या कहै ये दुनिया वालों को.. जो
आखरी सांस पर भी ऐतराज करते है….”

[क्रमशः]