Julale premache naate - 6 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६

सकाळी रोजच्या प्रमाणे उठून सगळं आवरून ऑडीमध्ये गेले. तर आज ऑडी बंद होती. मग मी माझा मोर्च्या कॅन्टीनकडे वाजवला. निशांतला कॉल केला तर त्याचा कॉल लागत नव्हता. कॅन्टीनमध्ये जाताना जिन्यात एका मुलाने मला पिंक रोज दिले आणि एक ग्रीटिंग. त्या ग्रीटिंगवर थँक्स असा मॅसेज होता. काही विचारायच्या आत तो मुलगा निघून गेला. असा काय हा...! कोणी दिल हे..? स्वतःशीच पुटपुटत मी कॅन्टीनमध्ये गेले.


काही तरी खायचं म्हणून काऊंटर वर गेले तर तिकडच्या एकाने ही मला पिंक रोज आणि ग्रीटिंग दिल. "हे काय.. कोण देत आहे....?? मला कोणी काही सांगेल का...??" मी त्या मुलाला विचारले. सांगत नव्हतं. मग मी ती फुलं आणि ग्रीटिंग घेऊन थोडं खाल्लं आणि कॅन्टीनमधून निघाले. आज आल्यापासून हे अस सगळं होत होता माझ्यासोबत.

क्लासरूममध्ये जायला निघाले तर जिन्यातून जात असता एका मुलाने मला थांबवलं..... " मॅडम थांबा जरा... आणि एक छान असा गुलाबी गुलाबांचा बुके दिला.. "अहो कोण देतय हे सगळ..?? मला कोणी सांगेल का.??..... कोण आहात तुम्ही..??"


मी त्या मुलाचा चेहरा बघायचा प्रयत्न करू लागले.., पण त्याने कॅपने स्वतःचा चेहरा लपवला होता. "हॅलो मिस्टर..कोण करतय हे सांगाल का मला..?" आता तर मी त्याच्यावर ओरडलीच. त्या मुलाने आपल्या चेहऱ्यावरील कॅप काढली तर तो निशांत होता. मी अवाक होऊन त्याला बघत होते. "आता हे काय नवीन...?? असे माझ्या चेहऱ्यावर भाव होते....


"तुला काल बोललो होतो ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे."..... त्याने मला काही ही न बोलता फक्त मागे यायला सांगितलं..... "अरे...! पण जायचं कुठे आहे..??" "तु चल काही न विचारता..."


आम्ही बाईक वरून एका कॉफीशॉप मध्ये आलो. "अरे इथे कशाला...??.." "तु गप्प चेअरवर बस काही ही न बोलता." त्याने आधीच एक टेबल बुक केलं होतं आमच्यासाठी.. आम्ही बसलो. त्याने छान कॉफी मागवली सोबत चीज गार्लिक ब्रेड.


सोबत गप्पा झाल्या. सगळे चालु असता त्याने माझ्यासमोर एक गिफ्ट बॉक्स सरकवला..... "हे घे तुझ्यासाठी...!!".... मी घेत ओपन केला तर त्यात डायमंडचे सुबक असे कानातले होते. "निशांत हे काय..??" कोणाला द्यायचे आहेत हा.. मी त्याला चिडवत होते. कोणत्या मुलीला प्रपोज वैगेरे तर नाही ना करायचा विचार... मी डोळा मारत विचारल. "नाही ग बाई कोणाला प्रपोज नाही..., तुझ्यासाठी आहेत ते..." या वाक्याला मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. " निशांत अरे एवढं महाग गिफ्ट मी नाही घेऊ शकत...सॉरी." मी तो बॉक्स परत करत म्हटले.

"अग पण का..??..," तु यापेक्षा ही किमती गोष्ट माझ्यासाठी केली आहेस. माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावरच हसु...सो आता तुला हे घ्यावं लागेल. आणि आपण फ्रेंड्स आहोत त्यामुळे मी हक्काने दिल आहे सो आता तू घे गप्प कळलं... तु मला फ्रिएन्ड मानत नसशील तर नको घेऊस. आता काय एवढं इमोशनल केल्यामुळे मला ते घ्यावं लागेल. मी एक स्माईल देत ते घेतलं आणि माझ्या बॅगे मध्ये ठेवून दिल.

"चला आता निघुया का मला उशीर होतो आहे लेक्चरसाठी. खुप वेळ गप्पा मारून झाल्यात." आम्ही परत कॉलेजमध्ये आलो. मी क्लासरूम मध्ये गेले, तर हर्षु माझीच वाट बघत होती. मी जाताच तिचे प्रश्न सुरू झाले.. " अग कुठे होतीस...? मी वाट होते.. मला बोलायच आहे थोडं." मी माझी बॅग ठेवत बेंचवर बसले. हा बोल कशा बद्दल बोलायच आहे. तुझ्या भावा बद्दल ना...??? तिने आजूबाजूला बघतच सॉरी म्हटलं..


"काय सारख सॉरी हर्षु.." त्याला सांग माझ्या वाट्याला परत येऊ नकोस, नाही तर मी काही इतर मुलींसारखी ऐकून घेणार नाही. सरळ जाऊन प्रिन्सिपल ला सांगेल. मी रागात बोलत होते. तिने फक्त मानेनेच होकार दिला. मी देखील जास्त काही बोलले नाही आणि स्वतःचा अभ्यास करत बसले. लेक्चर्स संपताच मी सरळ घरी आले आणि निशांत ने दिलेले गिफ्ट एकदा घालून बघितल. किती सुंदर दिसत आहेत... याला बर मुलींच्या आवडी कळतात... स्वतःशीच बोलत मी ते कानातले परत बघून कपाटात ठेवुन दिले. सोबत गुलाबं सुद्धा टेबलावर छान सजवून ठेवली. बॅगेमध्ये असल्याने आई ला कळलं नाही नाही तर परत तिचे प्रश्न... कोणी दिली..? का दिली...? हे अन ते..


असेच दिवस जात होते.....माझी आणि निशांतची मैत्री अजून घट्ट होत होती. आज त्याने मला लवकरच बोलावून घेतलं होतं. "काय झालं निशांत जे एवढ्या घाईने बोलावलेस...??? ठीक आहे ना सगळं..?"


"अग... तुला बघ मी एकदा बोललो होतो...," आपण ऑडिओ रेकॉर्ड करूया आपल्या डान्ससाठी ते मला सुचलं आहे. तेच सांगायला बोलावं आहे. त्याने सांगायला सुरवात केली.

"आधी आपण ना काही ओळींचे रेकॉर्ड करून घेऊ.., जसे की.., "मैत्री करशील माझ्याशी..." हे माझ्या आवाजात असणार. "मी... मी कशी करणार मी तर गरीब आहे आणि तू श्रीमंत." हे तुझ्या आवाजात असेल.
"मला तर चालेल..!! तु बनशील माझी मैत्रीण..??" हे मी बोलेल. "हो...मला चालेल." हे तु बोलायच. या ओळी आपण ओपनिंगला टाकायच्या.


"सुरुवात कशी करायची ती पण सांगतो.... स्टार्ट अस करायचं की, तु एका टोकाला उभी असणार आणि मी एका. "अरे पण आधी आपलं ठरलं होतं ना तु आधीच स्टेजवर उभा असणार. ??"..... हो पण आता जरा बदल करूया...


ऑडिओ चालू झाल्यावर..पहिल्या वाक्याला तु समोर बघायचं आणि मी तुझ्याकडे. तुझ्या वाक्याला तु मला बघुन चालत यायच. मी देखील येईल आणि आपण स्टेजच्या मधे समोरा समोर येऊन उभ रहायचं. जस गाणं चालू होईल....,


"तू आता है सीने में..," याच्यावेळी माझ्या छातीवर आपला हात ठेवुन हलकं डोलायच आणि ..,"जब-जब सांसें भरती हूँ..," याला माझ्याकडे शांतपणे बघतच सेम स्टेप करायची आपण.... "तेरे दिल की गलियों से..., या ओळीला माझ्यापासून जरा दूर जायचं....
"मैं हर रोज़ गुज़रती हूँ...,या ओळीला मी तुझा हात धरून माझ्या जवळ खेचनार. ठीक आहे.


"त्यानंतर...."हवा के जैसे चलता है तू..., यात तु माझ्या चेहर्याभोवती आपला हात फिरवायचास.... "मैं रेत जैसे उड़ती हूँ,"..आपण एकमेकांच्या समोर येऊन वाकुन गोल फिरायचं. "कौन तुझे यूँ प्यार करेगा?.." ये वाक्याला माझ्याकडे प्रेमाने बघायचं आणि "जैसे मैं ये करती हूँ..," यावेळी मी तुला काखेत पकडून गोल गोल चार वेळा गोल फिरवणार. कळलं तुला...त्याने माझ्याकडे बघत विचारल. यावर मी माझा थम त्याला दाखवला.

"त्यानंतर म्युझिक चालू होते. त्यात आपण काही स्टेप करूया सालसाच्या." आता जे सांगितलं ते करून बघूया म्हणजे तुला कळले. आम्ही त्याने सांगितलं तस केलं. पटकन नाही पण हळू हळू जमलं. प्रॅक्टिस करण चालू होतं आमचं. अर्धा डान्स बसला होता आता.

तर पुढचा ही पार्ट आजच बसवूया. दोन कडवी झाल्यावर, तु माझ्यापासून वेगळं होत दूर जायचं. मग रेकॉर्ड चालू होणार.. त्यात मी बोलणार....."अग काय झालं अशी का दूर जातेस...??.".... "नाही...!, आपण प्रेम नाही करू शकत. तु श्रीमंत आणि मी गरीब आपली बरोबरी नाही." हे तुझं वाक्य असेल....

त्यांनतर मी तुझ्या जवळ येत तुला माझ्यासमोर उभं करणार. तुझा चेहरा माझ्या ओंजळीत घेऊन मी बोलणार की....., "अग वेडे प्रेमात नाही श्रीमंती बघत आणि नाही गरिबी... बघतात ते दोन मनं. आपली मनं जोडली गेलीत. आपल्यातील मैत्रीचं नातं आता प्रेमात रूपांतर झालाय..." मी माझा हात तुझ्या समोर धरत परत बोलणार..... "देशील मला तुझी साथ....!" ...... तु फक्त माझ्याकडे बघत माझ्यापासून दूर निघून जायचं.


म्हणजे तु स्टेजवर नसणार तु विंगेत जाऊन ड्रेस बदलुन, परत एन्ट्री घ्यायची. ड्रेस बदलून आणि तोही विंगेत हे ऐकताच मी माझे डोळे मोठे करत त्याला बघितले... "हो हो... कळलं." अग आपला पहिला ड्रेस हाच आपण उलटा करून घातला येईल असा शिवून घेऊया. म्हणजे तु फक्त उलटा ड्रेस सुलटा करायचास आणि परत स्टेजवर एन्ट्री घ्यायची. आणि जोर जोरात ओरडून मला होकार द्यायचा. म्हणजे ती आपली शेवटची क्लिप असेल. त्यानंतर एकत्र काही डान्स चे स्टेप्स आणि शेवटला मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन गोल फिरवेन. हा शेवट... मग कसा वाटला शेवट....??" "मस्त आहे सगळं, पण मला जमतील का या स्टेप्स..!"

"अग जमेल.. मी आहे ना.., शिकवेन तुला. आणि हो आता जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. कॉम्पिटेशन ची डेट येईल येत्या आठवड्यात. दोन-तीन विक बाकी बाहेत आपल्याकडे. सो आता जास्त मेहनत करूया."


"प्रांजल कॉलेज सुटलं की, आजच स्टुडिओमध्ये जाऊया.., माझ्या मित्राचा आहे. तिकडे आपल्याला आपल्या क्लिप्स रेकॉर्डिंग करून घेता येतील. आता जा तु क्लासमध्ये. लेक्चर्स संपले की कॉल कर मला." मी हो म्हणत निघाले.

लेक्चर संपवून आम्ही स्टुडिओमध्ये गेलो. रेकॉर्डिंग केल्या. त्यानंतर मी घरी निघुन आले तो आमचं गाणं रेकॉर्ड आणि एडिट करण्यासाठी थांबला. मी निघाले आमच्या एरियामध्ये जाताना काही टवाळगी पोर टपरीवर बसली होती. मला बघताच माझ्या मागे मागे येऊ लागले. त्याचे अश्लील कॉमेंट पास करण चालु झालं. आधी मी टाळलं, पण ती काही ऐकायला तय्यार होत नव्हती म्हणून मी थांबले आणि त्यातल्या एकाच्या कानाखाली चांगली लगावली.

मी मारल म्हणून त्यांना राग आला. ते चार जण आणि मी एकटी. मला ग्रुप करून त्यांनी पकडलं.... क्यो बे.., बोहोत अकडं रही है। रुक तेरी अकडं बाहर निकालात हु...त्यातल्या एकाने माझ्या चांगलीच कानशिलात लगावली. ती एवढ्या जोरात की माझ्या नाकातून रक्त यायला लागले. त्यातल्या एकाने माझी बॅग काढुन फेकली. "बोहोत हात चल राहे है ना..! अब नही चलेंगे।।" अस बोलत एकाने माझा टिशर्ट फाडण्याचा प्रयत्न केला. मी सुटण्याची निश्फल धडपड करत होते....


पण त्यांना काही माझी दया देत नाही बघून मी त्यांच्याकडे माफी मागत मला सोडून देण्याचा हलका प्रयत्न केला.., पण ते नराधम माझी अब्रू घालावण्यावर अटळ होते. ते चालू असता अचानक एकाने माझ्या टिशर्ट फाडु पाहणाऱ्याच्या कमरेत लाथ घातली. मला आधी निशांत वाटला..., पण तो राज होता. त्याला बघुन त्या चौघातले दोघे त्याच्याशि मारणारी करू लागले.


त्याने सर्वांना चांगलाच इंगा दाखवला. त्यांची आणि राजची चांगलीच मारामारी झाली. हे सुयू असतानाच त्यातल्या एकाने राजच्या डोक्यात पाठुन वार केला. मारताच राज खाली कोसळला... त्याच्या डोक्यातुन घळा घळा रक्त येऊ लागले. हे बघुन मी आरडा ओरडा करताच काही माणसं धावून आमच्या मदतीला आली. माणसं बघताच ते गुंड मुलं तिथून सटकली. मी राजला स्वतःच्या मांडीवर झोपवले त्याच्या डोक्यातुन चांगलच रक्त वाहत होत. त्याला आधार देत काही माणसांच्या आधाराने मी त्याला आधी माझ्या घरी आणले आणि डॉक्टरला बोलावून घेतले. डॉक्टरांनी त्याची मलमपट्टी केली आणि त्याला झोपेचे इंजेक्शन दिले.

त्यानंतर आई ला मी झाला प्रकार सांगितला. तिने देवाचे आभार मानले. मी हर्षुला कॉल करून झाला प्रकार सांगितला. आधी ती देखील यायला तय्यार झालेली पण मीच तिला त्याप विचारून सांगते.. अस सांगून कॉल कट केला.


दोन- एक तासाने राज शुद्धीत आला. मी त्याच्या बाजूलाच बसून होते. "राज कस वाटतंय तुला..???... तु ठीक आहेस ना..?" 'हो मी ठीक आहे.., पण मी आहे कुठे..?'
"राज तु माझ्या घरी आहेस." तु मला वाचवताना त्या मुलांपैकी एकाने तुझ्या डोक्यावर वार केला त्यामुळे तुझ्या डोक्याला जरा लागलं म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन आले. डॉक्टरने तुझी मलमपट्टी केलीये. राज आजच्यासाठी थँक्स.. मनापासून धन्यवाद. तु आज आलास म्हणून माझी अब्रू वाचली..... हे बोलताना माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले....


"पण तु इकडे काय करत होतास..?? "अग मला काकांनी काम सांगितले होते इकडच्या त्यांच्या एका मित्राकडे जायला. जाताना त्या मुलांना घोळका केलेलं पाहिलं आणि आलो. "नशीब टाईमात पोहोचलो. तुला काही केलं तर नाही ना....? तुझ्या गालावर वळ कसले आणि नाकावर पट्टी कसली..???"


"अरे काही नाही. थोडं लागलं पण ठीक आहे मी. तु सांग तुला कस वाटतंय.? बर वाटतय का.? सॉरी माझ्यामुळे तुला एवढं लागलं." मी मान खाली घालुन बोलले.... "अरे वेडी आहेस का.??! तुझ्यासाठी तर जीव ही द्यायला तय्यार आहे मी.." त्याच्या या वाक्याला मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला पाहिलं. त्याने फक्त एक स्माईल दिली. "अरे मला कोणी चहा., कॉफी विचारणार आहे का..?? त्याने हसत माझ्याकडे पाहिलं...,"हो हो आणते काय घेणार..," 'मला एक कप चहा चालेल.."राज. मी रूममधून बाहेर येत. चहा आणण्यासाठी गेले.


चहा घेऊन आईच त्याच्या रूमध्ये गेली.. "बाळा कस वाटतंय तुला..? आणि हा घे तुझा चहा. थँक्स काकु. "काय नाव तुझं बाळ.?"..... 'मी राज सरनाईक." प्रांजलच्या कॉलेजमध्ये एक वर्ष सिनिअर आहे. "बाळा..! आजच्यासाठी मनापासून धन्यवाद. तु आज माझ्या मुलीला त्या नराधमांपासून वाचवलस."


"अहो त्यात धन्यवाद काय..." प्रांजलच्या जागी कोणी असत तर मी हेच केलं असत. तुम्ही धन्यवाद बोलून मला लाजवु नका."..... मग जरा गप्पा मारून तो निघाला. "आई मी याला खाली सोडून येते ग... आम्ही खाली आलो. "राज आजच्यासाठी परत एकदा थँक्स आणि हो प्लीज कोणाला काही सांगू नकोस नाही तर उगाचचे लोकं चर्चा करत राहतील.

"हे मी कोणाला ही सांगणार नाही पण एका अटीवर..! मी जरा घाबरतच त्याच्याकडे पाहिलं. माझ्याशी मैत्री करावी लागेल आणि मला तुझ्याकडुन ट्रीट हवी कॅन्टीनमध्ये वडा-सांबरची त्याने डोळा मारत सांगितलं. मी जोरात हसले आणि मानेनेच होकार दिला. "मग फ्रिएन्ड," त्याने हात पूढे केला.. मी देखील हात पूढे करत मैत्रीची नवीन सुरुवात केली.

"पण तू जाशील ना घरी..??? की हर्षु ला बोलावू..?"..... " नको ग मी जाईन तु नको टेंशन घेऊस." मला बाय करून तो निघून गेला. मी देखील घरी आले. थोड्या वेळात बाबा आले आणि आईने त्यांच्या कानावर घडलेला प्रकार घातल. मग बाबा मला भेटले आणि पोलिसांमध्ये तक्रार करू सांगू बोलले. मी फक्त होकार देत स्वतःच्या रूमध्ये आले. आज लवकर झोपली थकाव्यामुळे झोप देखील लागली.

रोजचा रुटीन करून मी आणि बाबा पोलिस स्टेशनमध्ये गेलो आणि आम्ही रीतसर तक्रार करून ठेवली. तिथून बाबांनीच मला कॉलेजमध्ये सोडलं आणि ते ऑफिसला निघून गेले. मी ऑडी मध्ये दाखल झाले. निशांत येऊन बसला होता. मी देखील त्याच्या बाजूला जाऊन बसले. "काय मॅडम कुठे धडपडलात..?? हे काय नाकाला लागलं..?" मी मग त्याला कालच सगळं वृत्तांत जसाच्या जसा त्याला सांगितला. एक क्षण त्याला काहीच कळलंच नाही. तो शांत झाला आणि स्वतःला दोष देऊ लागला.

"प्राजु तु ठीक आहेस ना..?" त्यांनी तुला काही केलं तर नाही ना..? आज मला त्याच्या डोळ्यात माझ्यासाठीची काळजी, प्रेम दिसत होतं. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. "शीट यार मी काल तुला एकट सोडायलाच नाही पाहिजे होत. माझीच चूक आहे. पण नशीब तो राज आला म्हणून..." आणि त्याने स्वतःचा हात चेअर वर मारून घेतला. "अरे पागल आहेस का अस करून सगळं ठीक होणार आहे का निशांत...?" जाऊदे जास्त काही नाही झालं.. मी ठीक आहे. ऐक ना आज आपण नको करूया का प्रॅक्टिस. मला जरा बर वाटत नाहीये. चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. मला आज राज ला ट्रीट द्यायची आहे. तो ही जास्त आडेओढे न घेता माझ्यासोबत आला.

कॅन्टीनमध्ये राज आणि हर्षु बसले होते. मला बघून हर्षुने मला मिठी मारत माझी विचारपूस केली. मग आम्ही देखील त्यांना जॉईन झालो. "राज कशी आहे तब्बेत...?" एकदम मस्त.. तु ट्रीट देणार म्हणून लवकर येऊन बसलो आहे. यावर आम्ही सगळेच छान हसलो. राज हा निशांत आणि निशांत हा... हो म्हाहित आहे..., हा राज. "राज थँक्स मित्रा. काल तु प्रांजल ला वाचवलस. मनापासून धन्यवाद."..... "इट्स ओके ब्रो.." मग मी राज सोबत सर्वांनाच छान ट्रीट दिली. गप्पा गोष्टी करून आम्ही घरी निघालो.


आता राज ही छान मित्र झाला होता माझा आणि सोबत निशांतचा ही. आमचा चार जणांचा छान ग्रुप झाला होता. ते दोघे एका वर्गात आणि आम्ही एका. त्यामुळे आता लेक्चर्स संपले की आम्ही कॅन्टीनमध्ये चौघे धमाल करत बसायचो. त्यानंतर मला कधी निशांत घरी सोडायचा. सगळं कसं छान चालू होतं. पण बोलतात ना आयुष्यात काय वाढून ठेवलंय हे फक्त भागावतालाच म्हाहित. तसाच काही आमचं ही....

पण पुढे काय वाढून ठेवलं आहे हे कोणालाच म्हाहित नव्हतं.

to be continued............