Pyar mein.. kadhi kadhi - Last Part in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-शेवटचा)

प्यार मे.. कधी कधी (भाग-शेवटचा)

आईशप्पथ प्रिती कसली चिकनी दिसत होती. राणी कलरची साडी, पापण्यांना हलक्या त्याच कलर्सचे शेडींग, डोळ्यांना काळ्या लायनर्सने अधीकच अ‍ॅट्राक्टीव्ह बनवले होते तर केसांची एक बट बर्गंडी रंगाने हायलाईट केली होती.

माय हार्ट वॉज रेसिंग हेव्हीली….

थोडक्यात ओळख-पाळख झाल्यावर बाबा लोकांनी टी.व्ही चा ताबा घेतला. मॅच जस्ट सुरु झाली होती. हरभजनला कुत्र्यासारखा धुतला होता. प्रितीचे बाबा त्याला पंजाबी ढंगात शिव्या हासडत होते.

“तुम्हाला नाही आवडत हरभजनसिंग?”, बाबांनी प्रितीच्या बाबांना विचारलं..
“लेट मी टेल यु.. ही वॉज गुड.. अ‍ॅट टाईम्स.. अनप्लेएबल.. पण आता काही अर्थ नाही राहीला त्यात…”, प्रितीचे बाबा..
“ओह.. आय थॉट.. ही इज पंजाबी.. सो तुमचा फेव्हरेट असेल..”
“सो व्हॉट.. ईट्स अ इंडीअन टीम अ‍ॅन्ड आय शुड सपोर्ट इंडीआ, नॉट एनी रिजनल प्लेअर…”

दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

आतमध्ये किचनमध्ये दोन्ही आयांच्या गप्पा चालु होत्या. पण खरं तर प्रितीची आईच जास्ती बोलत होती. आईला फक्त एखादा विषय काढायचा अवकाश, पुढ्चे पंधरा मिनीट प्रितीची आईच सुरु असायची.

बाकीची मंडळी आपल्या तोंडाचा पट्टा चालवत असताना, माझा आणि प्रितीचं व्हॉट्स-अ‍ॅपवर चालु होतं..

“आय विश.. आय कॅन मॅरी यु.. राईट नाऊ..”
” "
"यु आर लुकींग हॉट डिअर.. घसा कोरडा पडलाय माझा…"
"पाणी पी ना मग.. तुझ्या शेजारीच आहे.."
"तु दे ना इकडे येऊन.. प्लिज…"
"तरुण.. प्लिज.. गप्प बसं.."
"ये ना..खरंच.. राहवत नाहीए.. इतकी का लांब थांबली आहेस..? निदान इथे शेजारी तरी बस की.."
"तरुण.. आपलं लग्न ठरलं नाहीये अजुन.. गप्प काय बसला आहेस.. बाबांशी बोल की जरा…"
"सोड ना.. त्यांच त्यांच चालु आहे.. निदान एक मिठी तरी.. प्लिज.. अनबेअरेबल आहे मला.."
"इथे??"
"मी बेडरुममध्ये जातो.. थोड्यावेळाने येतेस..? प्लिज..? जस्ट वन हग..!"
"ओके :-), बट डोन्ट अ‍ॅक्ट स्मार्ट.. मी ओरडेन जोरात…"
"हा हा हा.. ओके.. जंन्टलमन प्रॉमीस.."

मी तडमडत खुर्चीतुन उठलो तेव्हढ्यात प्रितीचे बाबा म्हणाले.. "हाऊ इज युअर लेग तरुण.."
"इट्स गुड.. रिकव्हरींग वेल..", चरफडत खुर्चीत बसत मी म्हणालो..

प्रितीने एकदा माझ्याकडे हसुन बघीतलं आणि मग ती स्वयंपाकघरात मदत करायला निघुन गेली.

"सो.. ऑफीसला सुट्टी?"
"नाही. घरुनच करतो काम.. चालतं तसं..".. पुढची ५ मिनीटं मी त्यांना व्हीपीएन वगैरे बद्दल सांगीतलं..
"वॉव.. टेक्नॉलॉजी दिज डेज.. आय टेल यु..", पुढे प्रितीचे बाबा माझ्या बाबांना म्हणाले.. "आमच्या काळी असली टेक्नॉलॉजी असती ना, तर प्रितीला अजुन एक-दोन भाऊ/बहीण नक्की असते.."

दोघंही एकमेकांना टाळ्या देत हसु लागले.


जेवणं झाल्यावर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते.. प्रितीने सगळ्यांना आईसक्रिम सर्व्ह केले.

“सो.. कधी करताय प्रितीचं लग्न?”, आईने अचानकच विचारलं.

इतक्या अचानकपणे तो प्रश्न होता.. माझ्या हातातला चमचाच गळुन पडला..
“नो.. मॉम.. प्लिज.. असं काय विचारतेस..?”, माझ्या तोंडाशी अगदी शब्द आले होते..

सगळं काही छान चाललं होतं. मी घाबरुन प्रितीच्या आई-बाबांकडे बघत होतो.

“तुम्ही म्हणाल तेंव्हा.. ” दोघंही एकदमच म्हणाले..
“ओके.. मग असं करु..”, माझे बाबा म्हणाले.. “तरुणचा पाय पुर्ण रिकव्हर झाला की मुहुर्त बघुन साखरपुडा उरकुन घेऊन.. आणि मग डिसेंबर अखेरीस लग्न.. चालेल?”
“चालेल की.. तुम्ही म्हणाल तसं..”, प्रितीचे बाबा म्हणाले..

व्हॉट्स-हॅप्पनींग.. मी आणि प्रिती एकमेकांकडे आश्चर्याने बघत होतो.

“तरुण.. आहे ना रे तुझं नक्की?”, आईने मला विचारलं..
“हो.. हो आई..”, मला अजुनही काहीच सुधरत नव्हतं

“ऑलराईट देन.. बाकीचं तर आपलं बोलणं झालेलं आहेच..चला निघतो आम्ही.. “, प्रितीचे आई-बाबा उठत म्हणाले..
“प्रिती.. तु थांब जरा.. मला माहीते तुम्हा दोघांना अनेक प्रश्न पडले असतील. तरुण सोडेल नंतर तुला..”, आई म्हणाली..

प्रितीचे आई बाबा निघुन गेल्यावर आम्ही हॉलमध्ये बसलो. आईने डेझर्ट्सचे बाऊल आत नेउन ठेवले आणि आमच्या समोर येउन बसली.
मी बाबांकडे बघीतलं.. त्यांना बहुतेक ह्याची सर्व कल्पना होती.

“तरुण.. तु परवा प्लॅस्टर घालायला गेला होतास तेंव्हा तुमची फ्रेंड आली होती घरी..”, आई म्हणाली
“आमची फ्रेंड? कोण?”
“नेहा…”, आई म्हणाली..

मी आणि प्रितीने एकमेकांकडे बघीतलं.

“खरं तर ती मलाच भेटायला आली होती. तिने तुमच्याबद्दल.. आय मीन तुझ्या आणि तिच्याबद्दल आणि नंतर तुझ्या आणि प्रितीबद्दल सगळं सांगीतलं. शी वॉज डिपली हर्ट तरुण.. आणि मी समजु शकते. माझा विश्वास बसत नव्हता तरुण की तु असा वागु शकतोस.. तिच्याशी असा वागला असशील.

तुला माहीत होतं की इंटर-कास्टला आमचा विरोध होता तरीही तु अशी चुक केलीस? एकदा नाही.. दोनदा??

तुझं माहीत नाही, पण नेहा तुझ्यावर अजुनही प्रेम करते तरूण, तिच्या डोळ्यात दिसत होतं. मला खरंच खुप वाईट्ट वाटलं तिचं. पण आता नाईलाज होता. पण त्याचवेळी माझ्या डोक्यात दुसरा विचार आला. ह्यावेळेसही तसंच झालं तर? तर प्रितीची दुसरी नेहा कश्यावरुन होणार नाही? उद्या तिचं दुसरीकडे लग्न होईल.. पण ती सुखी होऊ शकेल?

मला पर्सनली असं वाटतं.. मुलांना तुलनेने सोप्प असतं मुव्ह-ऑन करणं.. मुलींसाठी मात्र ते खुपच यातनादायक असतं.

जेंव्हा तुझा अपघात झाला.. जेंव्हा तु बेशुध्द होतास तेंव्हा तुझ्यासाठी प्रितीला रडताना मी पाहीलंय. दिवसभर काहीही न खाता-पिता ती बाहेर थांबुन होती. मी जरा जास्तीच बोलले तिला त्या दिवशी, पण तरीही.. तुझ्यासाठी ती थांबुन होती.

वुई आर युअर पॅरेंन्ट्स तरुण, तुझं वाईट होईल असं आम्हाला कसं वाटेल. तुझे बाबा तर केंव्हाच तयार झाले होते.. पण का कुणास ठाऊक, माझंच मन तयार होतं नव्हतं. मला सगळं मान्य होतं त्या दिवशी बाबा प्रितीबद्दल जे बोलले ते.. पण तरी पण..

म्हणुन काल मी प्रितीला भेटले…”

मी आश्चर्याने प्रितीकडे बघीतलं.. मला ह्याची काहीच कल्पना नव्हती.

“आय लव्ह तरुण फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मम्मीजी..”, माझा हात हातात घेऊन काल प्रिती म्हणाली.. आई सांगत होती.. “आय विल टेक एव्हरी केअर नॉट टु हर्ट हिम.. ऑर हिज पॅरेन्ट्स.. कदाचीत मी तुमच्या कास्टची नसेन.. तुमच्या रिलीजन ची नसेन पण म्हणुन माझ्या तुमच्या विषयीच्या भावना.. तरुणविषयीचं प्रेम तर नाही ना बदलंत? लव्ह नोज नो लॅग्न्वेज.. जेंव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तेंव्हा आम्हाला कुठं माहीती होतं कोण कोण आहे.. तेंव्हा फक्त एकच नातं होतं आमच्यात.. आमच्या प्रेमाचं. आणि आयुष्यभर तेच राहील..”, प्रिती माझ्या नजरेत नजर देऊन बोलत होती तरुण…”ऑन्टी.. मी तुमची पुर्ण संस्कृती शिकेन.. तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक शिकेन.. तुमचे सर्व सण.. सर्व समारंभ तुमच्या पध्दतीने पार पाडेन..तुम्हाला बाबांना.. कुठल्याही प्रकारे माझ्यामुळे अन्कंफर्टेबल वाटणार नाही.. मी सर्व..”

तरुण.. काल मी तिचं वाक्य मध्येच तोडलं.. तिला पुढे काही बोलायची गरजचं नव्हती.. तिच्या केवळ डोळ्यातल्या त्या सत्यतेने माझं मन जिंकलं होतं. मी हरले तरुण. माझी चुक होती. हे जाती-धर्म..लग्नाच्या-आड, प्रेमाच्या आड का यावेत? नेहाचा तु जितका गुन्हेगार आहेस, तितकीच.. किंबहुना त्याहुनही जास्ती मी गुन्हेगार आहे.. पण निदान ही चुक पुढे घडू न देणं तरी माझ्या हातात आहे आणि म्हणुनच.. मी तुमच्या लग्नाला तयार आहे..

तरुण.. प्रिती.. परत एकदा.. मला माफ करा..”

प्रितीच्या आणि आईच्या डोळ्यातुन अश्रु वाहात होते.. आणि इतक्यावेळ सांभाळुन ठेवलेला माझाही बांध फुटला आणि आश्रुंना मी वाट मोकळी करुन दिली..

बाबा खुर्चीतुन उठुन माझ्याजवळ आले आणि पाठीवर हात मारत म्हणाले.. “राजे.. रडताय कसले मुळुमुळु.. झालं ना आता मनासारखं?”
मी उठुन उभा राहीलो आणि बाबांना घट्ट मिठी मारली..


हिअर वुई गो.. फ्रेंन्ड्स.. दोज लास्ट मॅजीकल मंत्राज आर अबाऊट टु बिगॅन..थॅक्यु फ्रेंड्स फॉर बिईंग विथ मी.. विथ अस थ्रु-आऊट द जर्नी.. पण आता मला जायला हवं.. माझी डार्लींग.. माझी स्विटहार्ट.. माझी हक्काची लग्नाची बायको.. सौ.प्रिती तरुण माझी वाट बघतेय.. थॅंक्स वन्स अगेन..

“तदेव लग्नं…”, सुरु झालं होतं..

मी अंतरपाटावरुन पलिकडे हळुच प्रितीकडे बघीतलं. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. ऑफकोर्स.. आई-वडीलांना.. आपल्या घराला सोडुन येण्याचं दुःख होतंच.. पण मला पक्की खात्री होती.. की ते केवळ दुःखाचे आश्रु नव्हते.. आम्हा दोघांच प्रेम जिंकलं.. आम्ही ज्याचं स्वप्न पाहीलं होतं ते पुर्णत्वास गेलं ह्याचे ते आनंदाश्रु होते..

अंतरपाट बाजुला झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.. दुरवर कुठेतरी गर्दीत सायकॉलॉजीच्या टीचर.. देसाई मॅम आमच्यावर अक्षता टाकत होत्या. आम्ही दोघांनीही आवर्जुन त्यांना बोलावलं होतं. तो सायकॉलॉजी-थिसीसचा घाट त्यांनी घातला नसता तर आम्ही कदाचीत कधीच भेटलो नसतो.

अंतरपाट बाजुला झाला आणि समोर प्रिती तिची मिलीयन-डॉलर स्माईल देत उभी होती.. अ स्माईल दॅट ऑलरेडी हॅव स्टोलन माय हार्ट अवे…

T H E B E G I N N I N G

Rate & Review

Mahesh Salvi

Mahesh Salvi 2 months ago

शारदा जाधव
supriya ainkar

supriya ainkar 5 months ago

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 months ago

Chetan

Chetan 1 year ago

Superb story