Prem he - 10 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 10

Featured Books
  • ایک لمحے کا یہ سفر

    یہ سفر صرف ایک لمحے کا ہے۔   یہ میرے ساتھی کے ساتھ صرف...

  • Purasra Kitab - 4 - Last Part

    چھ دوست جو گھر سے گھومنے اور انجوائے کرنے کے ارادے سے نکلے ت...

  • Purasra Kitab - 3

    یہ لسی رات آئی تھی اُن دوستوں کی زندگی میں… شاید کالی رات اس...

  • Purasra Kitab - 2

    چھ دوست تھے: رونی، عائشہ، ودیشا، ارینا، کبیر اور ہیمنت۔ یہ س...

  • Purasra Kitab - 1

    جیسا کہ آپ جانتے ہیں ہر انسان کا ایک پَیشن ہوتا ہے کسی کو کہ...

Categories
Share

प्रेम हे..! - 10

........... निहिरा ने हळूच हसून त्याच्याकडे बघितलं फक्त... तिच्या हसण्याला होकार समजून त्याने तिचा हात हातात घेतला.. त्याचा तो स्पर्श निहिरा ला खूप सुखावह वाटला......

आणि दोघेही तिथून बाहेर पडले...! 💕

विहान ला तिचा हात सोडावासा वाटत नव्हता... हा हात कायम असाच आपल्या हातात असावा असं त्याला वाटत होतं..! पण तिला निघायचं होतं... तिने एकदा त्याच्याकडे बघितलं.. तसा त्याने तिचा हात सोडला... आणि ती त्याला 'बाय' करून निघून गेली...

विहान खुश होता.. जरी ती स्पष्ट 'हो' बोलली नसली तरी 'नाही' सुद्धा बोलली नव्हती... याचाच त्याला जास्त आनंद होत होता...!! 😊

सोनिया त्याच्या घरी आली तेव्हा त्याने तिला सर्व सांगितलं.. नाही म्हटलं तरी ती थोडी नाराज झाली... पण तिने विहान वर सर्व सोडून दिलं....

- - - - - - - XOX - - - - - - -

"सोनिया... मी काही लहान आहे का... कशाला हे बलून्स वगैरे... 🙄" विहान वैतागून म्हणाला...

"अरे खाली सोडलेयत फक्त... त्यात काय झालं... 😏.. तू गप्प बस.. " सोनिया पंप ने बलून फुगवून हॉल मध्ये सोडत होती...
विहान सोफ्यावर रेलून टीव्ही बघत बसला होता..त्याने फक्त तिला
'काय करायचय ते कर' या आविर्भावात एक लूक दिला आणि गप्प बसला...

संध्याकाळी सात वाजता सर्व येणार होते... विहान ची आईही त्यांचे घरगडी सदा आणि उषा करवी सर्व आवरून घेत होती.... विहान च्या डॅडींना पहाटे च्या फ्लाईट ने बेंगलोरला जायचं होतं त्यामुळे विहान ने रात्री बारा वाजताच त्याच्या मॉम, डॅड सोबत केक कट करुन बर्थडे सेलेब्रेट केला होता...आता तो त्याच्या फ्रेंड्स बरोबर सेलिब्रेट करणार होता.. 😊

सोनिया सर्व अरेंजमेंट करून तयार होण्यासाठी घरी निघून गेली.. विहान ही त्याचं आवरू लागला.. व्हाईट टी-शर्ट , त्यावर डार्क ग्रे डेनिम जॅकेट आणि मॅचिंग डेनिम जीन्स त्याने घातली होती... जेल लावून केस सेट करून घेतले.. मस्त परफ्यूम स्प्रे केला... आज निहिरा पहिल्यांदाच त्याच्या घरी येणार होती.. म्हणून तो खूपच खुश होता..😄😄 सोनिया लवकरच तयार होऊन आली.. आणि विहान च्या रूम मध्ये गेली.. हाताची घडी घालून दरवाज्याला टेकून ती उभी राहिली.. विहान ने आरशात तिला पाहिलं होतं... तिने त्याच्याकडे बघत शिट्टी वाजवली.... 😗sss

"शट अप सोनिया.... 🙄😃" तो तिच्याकडे न बघताच म्हणाला..

"स्पेशल तयारी... ह्म्म्म्म!!" ती त्याला म्हणाली.

"yeah फॉर समवन स्पेशल ... 😍😉"

"ह्म्म.. आता आम्हाला कोण विचारतंय.. 😒" तीने रागावल्याचं नाटक केलं..

विहान अजूनही आरशासमोर उभा होता..
"नाटकी... 😅" तो आपल्या केसांवर हात फिरवत म्हणाला..

"कुणीतरी गिफ्ट केलेला टॉप मी आज घातलाय तर त्याचं लक्ष ही नाहिये माझ्याकडे 😏😏" सोनिया मुद्दाम रागावून बोलली..

" हो.. बघितलं मी आल्या आल्याच!... आणि काही गिफ्ट वगैरे केलेला नाही हां.. जबरदस्ती घ्यायला लावलेला टॉप आहे तो.. आणि हो.. जेवढं तू मला लुटलंयस ना ते सर्व तुझ्या होणार्‍या बॉयफ्रेंड कडून सूत समेत वसूल करणार आहे मी 😜🤣🤣🤣" विहान तिला चिडवत म्हणाला..

तशी ती त्याच्या अंगावर धावली...
" आज जरी तुझा बर्थडे असला ना तरी तू माझ्या हातचा मार खाणार आहेस... 😅😅😂😂"

आणि दोघांची पकडापकडी सुरू झाली 😁😁
इतक्यात बेल वाजली...

" विहान.. निहिरा आली वाटतं... " ती मुद्दाम त्याला चिडवायच्या हेतूने म्हणाली.. 😅 आणि पळतच दार उघडायला गेली... विहान ने पटकन स्वतःचा अवतार ठीक केला.. आणि तो बाहेर आला..

बघतो तर समोर त्याचे कॉलेज फ्रेंड्स होते..! सोनिया ने हळूच विहान ला डोळा मारला आणि हसली..😜😄
विहान ने 'नंतर बघून घेईन तुला' अशा अर्थाचा चेहरा केला.. आणि फ्रेंड्स ना आत बसायला सांगितलं..

त्यांच्या पाठोपाठ मेधा, रिया, वर्षा, पियुष, अंकित, अमित सर्व सोबतच आले... दहा मिनिटांनी अदिती आणि रीतू ही आल्या.. आता फक्त अवनी आणि निहिराच यायच्या बाकी होत्या.. सोनिया ने अदिती ला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की त्या दोघींना थोडा लेट होणार होता म्हणून त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं... येतीलच त्या इतक्यात!
विहान चे डोळे निहिराच्याच वाटेकडे लागून राहिले होते.. त्याला वाटलं.. येईल ना ही.. आज सकाळी जे काही झालं त्याचा विचार करता तिने येणं कॅन्सल तर नाही केलं ना.... 🙁

इतक्यात सोनिया आणि विहान ची मॉम सर्वांसाठी ज्यूस आणि ड्रायफ्रूट्स घेऊन आल्या .. विहान ही त्यांना हेल्प करत होता .. तेवढ्यात बेल वाजली ..
"मी बघतो.." म्हणत विहान धावतच गेला .. त्याची मॉम त्याच्या फ्रेंड्स सोबत बोलण्यात बिझी होती .. सोनिया मात्र त्याला बघून गालातल्या गालात हसली...!

विहान ने दरवाजा उघडला ...समोर निहिरा आणि अवनी उभ्या होत्या .. विहान निहिरा कडे बघतच राहिला... आजही ती खूपच गोड दिसत होती!! तिने चंदेरी सिल्क मध्ये printed लाँग ब्लॅक कुर्ती आणि त्यावर फुल स्लीव्हज् चं मरून कलर चं जॅकेट घातलं होतं... तो तिच्यात एवढा हरवला की त्या अजूनही बाहेरच उभ्या आहेत हे ही त्याच्या लक्षात आलं नाही... अजून कसं कुणी आत येत नाही म्हणून सोनिया बघायला आली.. ती येऊन विहान च्या मागे उभी राहिली तरीही विहान चं लक्ष नव्हतं... अवनी तोंडावर हात ठेऊन खुदुखुदू हसत होती.. सोनिया ला ही हसू येत होतं.. 😄 निहिरा ही लाजून गालातल्या गालात हसायला लागली.. तशी सोनिया म्हणाली...

"बघून मन भरलं असेल तर येऊ दे आता तिला आत... 😂😂😂🤣🤣"

सोनिया च्या आवाजाने विहान शुद्धीवर आला.. आणि लाजला.. 'सॉरी' म्हणून त्याने त्यांना आत यायला सांगितलं ..
दोघीही आत आल्या.. विहान ला तिच्या लेट येण्याचं कारण कळावं म्हणून सोनिया ने मुद्दाम जरा जोरातच तिला विचारलं..
" निहू.. उशीर का गं झाला... "

" सॉरी actually बाबांची बाइक अचानक बंद पडली म्हणून माझी स्कूटी घेऊन गेले ते.. थोडा वेळ त्यांची वाट बघितली पण त्यांना यायला लेट होणार होता म्हणून मग ऑटो ने आलो.. त्यामुळे लेट झाला..." निहिरा ने सांगितलं..

"इट्स ओके .. नो प्रॉब्लेम .. 😊" विहान पट्कन म्हणाला..

आणि ते आतल्या खोलीत गेले जिथे सर्वजण बसले होते...
निहिरा ला विहान चं घर खूपच आवडलं... कित्ती मोठ्ठं होतं..!! हॉल च किती लांबलचक होता... पण त्यात जास्त काही वस्तू न ठेवता त्यांनी तो मोकळाच ठेवला होता..फक्त एक उंची सोफा सेट.. टेबल... त्याखाली सुंदर गालिचा अंथरला होता आणि समोरच्या भिंतीवर टीव्ही आणि भिंतीलाच attached डिझाईन मध्ये ड्रॉवर्स बनवले होते.. त्यामुळे हॉल आणखीनच प्रशस्त वाटत होता...समोरच्या भिंतीवर डिझायनर वॉलपेपर लावला होता.. रंगसंगती ही लाईट कलर ची होती.... 😍 हॉल मधून आत गेल्यावर एक बाल्कनी attached मोठा रूम होता जिथे आत्ता सर्व बसले होते.. त्या रूम मध्ये C शेप मध्ये मोठा सोफा ठेवला होता आणि त्यासमोर एक मोठं टेबल... एका कोपर्‍यात उंच फ्लॉवर पॉट.. आणि एका कोपर्‍यात एक सुंदर कपाट... बाल्कनी मध्ये एक बीन बॅग ठेवली होती.. बहुदा तिथे विहान बसत असावा... कधीतरी मन रमवण्यासाठी😃... बाकी सामानाची इथेही जास्त गर्दी नव्हती.. तिथून आत गेल्यावर बर्‍यापैकी मोठं किचन आणि दोन बेडरूम्स होते... 😍 निहिरा तर पाहता क्षणीच विहान च्या घराच्या प्रेमात पडली..

विहान स्वतः तिच्यासाठी आणि अवनी साठी ज्युस घेऊन आला... तोपर्यंत सोनिया ने हॉल मध्ये केक आणून ठेवला.. टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं.. आणि candles लावल्या.. खाली बलून्स सोडलेलेच होते...सर्वजण हॉल मध्ये गेले.. सोनिया ने सभोवताली ठेवलेले सेल वरचे दिवे चालू केले... लाइट ऑफ़ केली.... विहान ने केक कट केला.. सर्वांनी 'हॅप्पी बर्थडे टू यू..... हॅप्पी बर्थडे डिअर विहान....' म्हणत एकसुर लावला... 😄 विहान ने त्याच्या मॉम ला केक भरवला.. त्यांनीही केक चा एक तुकडा कट करुन विहान ला भरवला... सोनिया आणि विहानने ही एकमेकांना केक भरवला... बाकी फ्रेंड्स नी त्याच्या चेहर्‍यावर क्रीम ची बोटे लावली.. 😅😅 निहिरा दुरूनच त्यांच्याकडे बघून हसत होती... सोनिया ने केक उचलून आत नेला... सर्वजण विहान ला गिफ्ट्स देऊन मोबाईल मध्ये फोटोज् काढत होते...! निहिरा ने ही त्याचं बाइक चं वेड लक्षात घेता त्याच्यासाठी स्पोर्ट्स शॉप मधून एक्सपेन्सिव्ह असं एक बाइक चं किचेन आणलं होतं आणि एक मस्त परफ्यूम छान wrap करून आणलं होतं... विहान ने निहिरा सोबत ही फोटोज् काढून घेतले...😊😊

विहान तोंड धुण्यासाठी आत गेला... त्याच्या जॅकेट वर ही क्रीम लागलं होतं म्हणून तो चेंज करण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेला...

सोनिया सर्वांना केक चे डिश देत होती... विहान च्या आईने सर्वांसाठी रसमलाईही बनवली होती... 😋

विहान हॉल मध्ये नव्हता म्हणून ती त्याचा डिश घेऊन त्याच्या रूम मध्ये गेली.. तो टॉवेल ने तोंड पुसत होता त्यामुळे ती तिथेच टेबल वर त्याची डिश ठेऊन निघून आली... निहिरा आणि अवनी सोनिया ला हेल्प करू का म्हणून विचारायला गेल्या... सोनिया ने अवनी ला बाउल मध्ये रसमलाई घ्यायला सांगितलं आणि निहिरा ला म्हणाली की मघाशी विहान च्या रूम मध्ये ट्रे विसरून आले तेवढा घेऊन ये प्लीज.....!

निहिरा विहान च्या रूम चा दरवाजा ढकलून आत शिरत होती... तिने बघितलं तर समोर विहान चेंज करत होता.. क्रीम चे डाग लागल्याने त्याने आधीचा tshirt अन्‌ जॅकेट काढला होता आणि नवीन टी-शर्ट घालणार तेवढ्यात निहिरा तिथे पोहोचली होती...!! निहिरा त्याचे muscles बघतच राहिली...गोरापान विहान खूप हाॅट दिसत होता... 😍 इतक्यात विहान ने निहिरा ला आरशात पाहिलं... तशी निहिरा ने पट्कन जीभ चावली.. डोळे गच्च मिटून घेतले आणि गर्रकन मागे वळून जायला निघाली ... विहान ने घाईघाईत टी-शर्ट घातला.. आणि निहिरा ला अडवलं...

"निहिरा... प्लीज... एक मिनिट...."

निहिरा मागे वळून न बघता तिथेच थांबली... विहान ने मागून तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं... निहिरा ने गोंधळून त्याच्याकडे बघितलं... त्याने त्याच्या डिश मधला केक उचलला आणि तिला भरवत म्हणाला...
"सॉरी.. मघाशी सर्वांसमोर भरवता नाही आलं..!"

निहिरा लाजून हसली.. 🙈 तिने थोडंसं खाऊन उरलेला केक विहान ला भरवला... आणि त्याला घट्ट मिठी मारली... तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून दोन अश्रू ओघळले.. विहान तिच्या या अनपेक्षित वागण्याने गोंधळून गेला.. परंतु पुढच्याच क्षणी त्यानेही तिला आपल्या बाहुपाशात घेतले.. काही क्षण असेच गेले अन्‌ निहिरा एकदम उठली आणि काही न बोलता तिथला ट्रे घेऊन बाहेर निघून गेली.. जाता जाता कोणाला दिसू नये म्हणून पट्कन स्वतःचे डोळे पुसले.. तिच्या अशा वागण्याने विहान पुरता गोंधळून गेला असला तरी त्याच्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट आज त्याला निहिरा कडून मिळालं होतं... काही न बोलताही ती खूप काही बोलून गेली होती....

🎼🎼🎼🎼🎼
तेरा बनेगा वो जो, तेरा नही है..
ऐ दिल बता क्यूँ तुझको, इतना यकीन है..
मेरे.. दिल-ए-बेक़रार
हाँ... दिल-ए-बेक़रार
यही होता प्यार है क्या
मेरे दिल-ए-बेक़रार.....

ख्वाबों में कोई क्यूँ है यूँ रहता..
ए दिल तू क्यूँ मुझे हैं यह कहता..
वो मेरा रस्ता भी है, और वो ही मंज़िल
वो मेरा सागर भी है, और वो ही साहिल
कैसी बता यह बेताबियाँ हैं
हम चलते चलते आए कहाँ हैं...
दिल-ए-बेक़रार
यही होता प्यार है क्या.....💖

To be continued..
🙏
#प्रीत 🍁