Love stories - Premveda - 3 books and stories free download online pdf in Marathi

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ३

आई: अरे वाह!! बर चल हात-पाय धुवून घे, मी चहा बिस्कीटे देते खाऊन घे आणि अभ्यासाला बसा...

अमु: हो आई,.. आलोच

अस बोलुन तो सर्व आवरायला गेला. आई ने छान गरम आलं घालून चहा केलेला. तो पिऊन आपला अमु अभ्यासाला बसला.

पण काही केल्या त्याचं लक्ष अभ्यासात नव्हतंच तो तिच्यातच हरवुन गेलेला... तिचा विचार करण्यात एवढा गुंतलेला की आई हाक मारतेय हे देखिल त्याला कळलं नाही...

आई: अरे अमु.. काय लक्ष कुठेय तुझं कधीची हाक मारतेय मी..?

अमु: (भानावर येत) अह.. सॉरी आई.. लक्षच नव्हतं माझं ते आता वार्षिक परीक्षा जवळ येत आहेत ना तर अभ्यासाची तय्यारी करण्यात मग्न होतो.. काय बोलत होतीस?

आई: अरे तुझे बाबा आलेत ते ही कधी पासून हाक मारत होते; पण तुझ काही लक्ष नव्हत..जाऊदे चल जेवायला ये मी पानं वाढायला घेतेय, हात धुवून ये जेवायला...

अमु: हो आई आलोच...

बघा परत एक धाप मारली आपल्या हिरोने.. स्वतः तिच्या विचारात होता आणि आपल्या आई काय भलतच सांगतोय... काय करणार हिरो प्रेमात जो पडला होता.. आपण ही पडलो की असच होईल कदाचित... असो

अमु आपल जेवण आवरून झोपायला आला, देवाला हात जोडून प्रार्थना केली; आणि बेड वर आडवा झाला.. पण झोप काही येत नव्हती.. डोळे बंद केले तरीही तिचाच चेहेरा समोर येत होता. मग काय तिच्या विचारात कधी झोप लागली कळलीच नाही... जाग आली ती आईच्या हाकेने. आई बाजुला येऊन त्याला प्रेमाने उठवत होती.

आई: अमु बाळ उठा आता सकाळ झाली...

मग काय अमु बाळ अजूनच लाडात आलं..

अमु: आई च्या कुशीत शिरत अमु बोलला., आई असंच आयुष्यभर तुझ्या कुशीत झोपायच गं..,.

आई: आज आईवर प्रेम येतय तर... आता अस बोलतो आहेस,. पण एकदा का तुझी बायको आली की मला विसरू नकोस म्हणजे झालं..

आपला अमु पण काही कमी नव्हता; बर त्यानेही आईच्या या प्रश्नाला चांगलाच उत्तर देऊ केल.

अमु: अग आई बायको काय उद्या येईल;..पण तु आधीही होतीस आणि अशीच आयुष्यभर अनंतकाळासाठी माझ्या हृदयात राहशील. आपल्या बायको वर मी प्रेम करेनच, पण तुला आयुष्यभर जपेल, खुप काळजी घेईन जशी तु घेतेस ना तशीच माझ्या लाडक्या आई....

आपल्या मुलाचं आपल्यावरच प्रेम पाहुन त्या माऊलीने तर होतच जोडले; आणि अमुला उठण्याची आज्ञा देखील केली. तसा अमु उठला,..सकाळची नित्याची काम आवरून शाळेत जाण्यास निघाला.

आज तो खुप आनंदी होता, कारण त्याने आपल्या आई वरचे प्रेम तिच्या समोर व्यक्त केले होते..,आता व्यक्त व्हायचे होते ते प्रिया समोर तेच जमत नव्हते आपल्या हिरोला.. पण व्हावे तर लागणार पण एवढ्यात घाई करून चालणार नव्हतं..बघू आता कसं आणि कधी तो आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करतो ते!...

अमु शाळेच्या पटंगणावर पोहोचला, सगळे मुल-मुली ग्रुप करून गप्पा मरण्यात व्यस्त होते, अमुने सगळीकडे आपली नजर फिरवली; पण ती काही दिसली नाही मग इवलस तोंड करून तो आपल्या मित्रांमध्ये जाऊन उभा राहिला.

अजूनही तो तिचाच विचार करत गेट कडे लक्ष देऊन उभा होता आणि शेवटी ती आली आणि आपला अमु सुखावला. ती येताच आपल्या मैत्रिणीशी बोलण्यात मग्न झाली. शाळेची घंटा वाजली तसे सगळे आप-आपल्या वर्गात निघुन गेले, ती सुद्धा.

अमोघ ही वर्गात येऊन बसला. मागोमाग बाई देखील आल्या. कालच्या कार्यक्रमा बद्दल बोलुन व सर्वांचे अभिनंदन करून, बाईंनी शिकवायला सुरुवात केली. तास सुरू झाले पण अमु मात्र अजून ही तिचाच विचार करत होता. बाईंनी विचारलेल्या प्रश्नाने त्याचा विचार भंग पावला; गडबडीत उभा राहत त्याने बाईंच्या प्रश्नाचे उत्तर देऊ केले व खाली बसला. तेव्हा बाजुला बसलेल्या मित्राने खुणेनेच काय झाले? विचारले. पण काही नाही बोलत; त्याने आपले तोंड पुस्तकात खुपसले.

अमुला आपल्या मनातलं आपल्या खास मित्राला सांगायचं होत. कधी एकदा आपण आपल्या मनातील तिच्या बद्दलच्या भावना व्यक्त करतो असे त्याला झालेलं. तो वाट बघत होता ते बाई वर्गातून जाण्याची; आणि तसाच झालं तास संपला आणि बाई वर्गातून गेल्या. तस अमोघ ने आपला मोर्चा सागराकडे वळवला.

अमु: सागर ऐक ना,..मला तुला खूप
महत्त्वाच
सांगायच आहे..

सागर: हा ह् बोल ना ऎकतोच आहे मी...अस बोलुन त्याने आपलं डोकं पुस्तकात खुपसले.


अमु: अरे मित्रा अस नाही रे नीट बघ ना माझ्याकडे.. अस बोलून त्याने सागर च पुस्तक खेचून घेतल..

सागर: बर बाबा बोल आता काय ते.., काय झाल काय एवढं
महत्त्वाच बोलायच आहे तुला..?

अमु: तु काल त्या सहवीतल्या मुलींच नृत्य बघितलस का..? किती गोड करत होत्या त्या.. आणि खास करून ती पुढे उजव्या बाजुला होती ना ती मुलगी तर वा वा काय सुंदर होती ती दिसायला, म्हणजे छान नृत्य करत होती नाही..

सागर: जरा सवंशयास्पद चेहऱ्याने बघत... अमु तू आणि मुलगी बघितली क्या बात है।....! हे कधी पासून हा.? डोळा मारत सागर ने चिडवण्याच्या भानवेने विचारले.

अमु: तस काही नाही रे बस ती खूप छान दिसत होती; म्हणून बोललो मी कधी मुलींना बघतो का.?

सागर: तेच तर अमु..!आज तु एखाद्या मुली बद्दल बोलतो आहेस म्हणून विचारलं.. जे जाऊदे काय नाव आहे आणि कोणत्या वर्गातली?? सांग ना....

अमु: हो हो सांगतो... मला ही कालच कळल की तीच नाव प्रिया आहे,आणि ती सहावीत आहे. हे मला कालच्या कार्यक्रमामुळे कळलं.

सागर: ओह प्रिया..

अमु: हो किती गोड नाव आहे ना प्रिया.. अगदी एका परी सारख. मी तर तिला परीच बोलेल माझी स्वप्नंपरी...

ती आहे अगदी तिच्या नावासारखी गोड,

कधी मधाळ तर कधी अवखळ लोणच्याची फोड...

ऐसेही नही हमने तुमको दिल दिया...

आवडते एक मुलगी तीच नाव आहे प्रिया...

सागर: बस बस बाहेर या स्वप्नातून..! मग काही ठरवलं आहेस का तिला सांगायचं वेगेरे..?

अमु: अजून तरी नाही. अस कस सांगू लगेच तिला. ती काय विचार करेल माझ्या बद्दल..? नको लगेच पण एक सांगू का सागर...

सागर: बोल ना अमु..

अमु: पहिल्यांदाच कोणीतरी एवढं मनापासून आवडलंय, म्हसणजे ते नाही का चित्रपटात दाखवतात तसच काहीस झालाय तुझ्या मित्राचं अस समज... अंगारवर मोरपंख फिरवाव तसच काहीस होत ती समोर आली की..! पोटात गुदगुदल्या होतात.

सागर: अमु मित्रा तू तर प्रेमात पडलास की तिच्या...

अमु: आता तूच मला मदत कर. माझ्यात तर हिम्मत नाही तिच्या समोर जाऊन व्यक्त होण्याची.

सागर: अरे... यार है तू मेरा, तुझे मदत नही करुंगा तो किसे करुंगा।..आप हुकूम करो ये बंदा हाजीर हो जायेगा, आपकें खिदमत मै।

अमु: बस बस तुझे डायलॉग...फक्त पाहिजे तेव्हा मदत कर म्हणजे झाल..

सागर: जो हुकूम मेरे आका... अस बोलताच दोघे मित्र खदखदून हसु लागले..

ती समोर येता भान, मला न राहते;

तिला बघता मला, काही न सुचावे,

काय करू तिच्यात जिव गुंतला,

पण तिला सांगण्याचे भय वाटते......

असा हा अमु आपल्या मित्राला सगळं सांगून झालेलं बस आता फक्त ती राहीली होती जिच्याकडे मन व्यक्त करायचं होतं आणि नेमक तेच जमत नव्हत, आपल्या अमुला..

मधली सुट्टी झाली तसे दोघांनी आप-आपले डब्बे संपवून तिला शोधण्याची कामगिरी सुरू केली. पण ती काही दिसलीच नाही. मग काय हताश चेहऱ्याने दोघेही वर्गात जाऊन बसले. आपला अमुचा मूड जरा खराबच झाला, काय करणार तीच दर्शन जे झाले नव्हते. एकदाचे तास संपले पण अमुचा काही लक्ष नव्हता त्यात, तो तिच्यात हरवलेला जणू....

शाळा सुटली तसे दोघे निघाले. अमुने ठरवले होते आज तिच्याशी बोलूया आपण. निदान प्रयत्न तरी करून बघु बोलते का आपल्याशी..!

पळतच जाऊन त्याने आपली सायकल घेतली आणि तिला शोधत निघाला. हिरोईन मैत्रिणींसोबत पुढे आणि आपला हिरो मागे असे चालत होते. मग नेहमी सारख मैत्रिणींना बाय करून ती एकटीच निघाली आणि मागून आपला अमु.... कारण आज काही करून त्याला तिला गाठून बोलायच होत. पण ही योग्य वेळ आहे का बोलण्याची.? आपण घाई तर करत नाही आहोत ना..? अस सारख त्याला वाटत होत.

दोघे पुढे जात तिच्या सोसायटी समोर पोहोचले आणि ती घरात निघून देखील गेली.. आपला अमोघ मात्र विचार करतच बसला.

असेच काही दिवस तो रोज तिचा पाठलाग करत होता.
एक दिवस असाच पाठलाग करताना तिने पाहिल आणि मग काय अमोघ चांगलाच घाबरला...मग त्याने तिला सर्व खर सांगायचं ठरवल. पण सुरुवात कुठून करायची कळत नव्हती.

एक दिवस त्याने तिला विचारायचं ठरवल, पण त्या आधीच तिने व तिच्या मैत्रीने त्याला जाब विचारला होता; मग बघू काय होत पुढे...

अमु: तर हे असं झालं सर्व वर्षा.. आता तूच काही तरी कर गं..


वर्षा: अच्छा तर अस झालं सगळं... हे बघ मी तिला सांगेन पण होकाराची अपेक्षा नको ठेवुस. कारण तिचा घरी हे सर्व नाही आवडत आणि ती तिच्या घरच्यांना नाही दुःखाणार. तसही खूप अभ्यासु आहे ती मला नाही वाटत ती तुला होकार देईल. तरीही मी विचारते एकदा बघू काय बोलते...!
अमुने मानेनेच होकार दिला व ते दोघेही आपल्या वर्गात निघून गेले.

आता बघु आपली हिरोइन काय उत्तर देते ते...



(to be continue.... लवकरच)