lag aadhichi gosht - 2 books and stories free download online pdf in Marathi

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 2)

तीन वर्षापुर्वी

तीन वर्षापुर्वी....ट्रेन नगरच्या दिशेने धावत असते.. मुलांचा ग्रुप टवाळक्या करत बसलेला असतो. प्रशांत, सागर, वैभव , अक्षय, गणेश आणि सूरज. तेवढ्यात एका स्टेशनवर तीन मुली येऊन पुढच्या बाकावर बसतात . नेहमीप्रमाणे सूरज खिडकीजवळ बसलेला असतो . त्याच्या समोर एक सलवार घातलेली सुंदर मुलगी बसते .. तिचे ते काळेभोर डोळे व हवेत उडणारे केस यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते .

सूरज च्या मनात एका कवि ने म्हटलेले काही शब्द घुमू लागले, "समोर एखादी सुंदर स्त्री असेल तर तिच्याकडे न बघणे हा तिच्या सौंदर्याचा केलेला अपमान असतो " त्याच्या तिच्याकडे बघण्यात कोणतीही वासना नव्हती. ती एवढी सुंदर होती की इंद्र लोकमधल्या अप्सरा पण त्याला तिच्या समोर फिक्या होत्या.

थोड्या वेळाने समोरचा मुलगा आपल्याकडे बघतोय हे तिच्या लक्ष्यात येते . सूरज लाजून मान खाली करून मनात विचार करतो , काहीही करून हिच्याशी बोलायला हव.

सकाळचे 1 ची वेळ बोगी मध्ये सगळे झोपलेले असतात . सगळीकड अंधार पसरलेला असताना फक्त दोघेच जण जागे असतात सूरज व ती मुलगी . अधून मधून नकळत नजरेला नजर भिडत असते . तसा प्रशांत पण अर्धे डोळे मिटून त्या दोघांचे काय चालले आहे हे बघत असतो. सूरज मोबाईल चार्जिंग ला लावता लावता हात पुढे करून आपली ओळख करून देतो, "मी सूरज कदम " . तिला पण सूरज साधा मुलगा आहे , ही खात्री पटल्यामुळे ती आपली ओळख करून देते, "सपना पाटील " .…सपना त्याला विचारते,"तुम्ही कुठे चालला आहात सगळे ? " सुरज तिला आपण नगरला जाणार असल्याचे सांगतो. सपना हसून म्हणते, "आश्चर्य आहे, पुण्याची मुले नगर ला फिरायला ! " . सुरज तिला तसच हसून उत्तर देतो, " फक्त फिरायला नाही एक कार्यक्रम पण आहे तिकडे, त्यामुळे चाललोय आणि तसंही आलो नसतो तर तुमच्याशी भेट नसती झाली. " सपना हसून म्हणते, "सो क्यूट " दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात इतक्यात प्रशांत खोकतो व दोघेही शांत बसतात.

सगळे मित्र आपल्याला जे हवे आहे ते खाण्यात मग्न असतात आणि ट्रेन सुरू होते .बाहेर आरडाओरड चा आवाज घुमू लागतो. एवढयात एक मुलगी ट्रेन च्या विरुद्ध दिशेने पळत येत असताना सर्वाना दिसत असते. तिच्या इकडे तिकडे उडणार्या केसांमुळे तिचा चेहरा कोणाला दिसत नसतो. तिचे कपडे काही ठिकाणी फाटलेले असतात. तिच्या मागे चार जण लागलेले आहेत आणि ती आपला जीव ,आपली अब्रू वाचण्यासाठी पळत आहे, हे मात्र आजूबाजूच्या सर्वांच्या लक्ष्यात आलेलं असत.

ट्रेन चालू झालेली असताना सुद्धा ती चालत्या ट्रेन मध्ये आत शिरते तिच्या पाठोपाठ ते चार जण सुद्धा आत शिरतात. काहीही करून त्यांना हे सावज सोडायचे नसते .त्यामुळेच एखाद्या शिकारी मागे लागावा अस तिच्या मागे लागलेले असतात. ती आत आल्यानंतर आपल्याला मदत करू शकेल अस कोणी दिसतय का हे बघत बघत सूरज समोर येते व त्याच्याजवळ येऊन बेशुद्ध पडते. ते चार जण तिच्या जवळ येऊन तिला खेचू लागतात पण तेवढ्यात तिच्या चेहर्‍यावरील केस बाजूला होतात व सूरज बघतो तर ती "सपना "असते. बाकीचे मित्र सूरज च्या मदतीला आलेले पाहून बाकीच्या लोकांची ही साथ त्यांना मिळते. आपल्याला होणारा प्रचंड प्रतिकार आणि आपल मोजक्या लोकांचा समूह लक्ष्यात घेता ते चौघे माघार घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरतात.

आता पर्यंत मुलींकडे बघून टवाळक्या करणारे हे मित्र आज मात्र एका मुलीच्या संरक्षण करण्यासाठी उभे ठाकले होते . आणि अर्थातच त्यांना ट्रेन मधल्या लोकांची ही साथ मिळालेली असते. आता काय करायचं असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतो.