Paar - ek bhaykatha - 1 books and stories free download online pdf in Marathi

पार - एक भयकथा - 1

पार - एक भयकथा

भाग १


दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळ-जवळ मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम चार कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्यादिवसा साठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लाऊन घेतली.

“साहेब येतो आम्ही” सामान आत लाऊन झाल्यावर कामगार बोलले.

“थांबा चहा टाकलाय तेवढा घेऊन जा ” मनीषा बोलली.

तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्या प्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत करत होत्या. चहा पिऊन झाल्यावर सगळे चार्ज झाले पुन्हा कामाला लागले. अरविंदने कामगारांना पाचशे रुपये दिले.

“साहेब याची काय गरज आहे कामच आहे आमच”

“तुम्हाला कंपनीच काम करायचा पगार मिळतो हे माझं पर्सनल काम आहे ” अरविंद बोलला. मनीषा त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती.

“आणि जेवणाचा काही प्रोब्लेम झाला तर सांगा लाजू नका तुमच्या साहेबांना विचारायची गरज नाही थेट माझं कडे या ” मनीषा बोलली.

“बरं वैनी ”त्यांनी हसत निरोप दिला ते लोक शेजारच्याच घ्ररात राहणार होते.

ते जाताच अरविंदने सामानातील जपून आणलेली रोपं काढली आणि गार्डनिंगची किट घेऊन अंगणात जाऊ लागला.

“मिस्टर सिव्हील इंजिनीअर आपण इथे येऊन दोनतास पण झाले नाही आणि तुम्ही पसारा आवरायचा सोडून वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाला चाललात ” मनीषा थोडे वैतागून बोलली.

“अग हि जागा construction खाली येणार नाही तशीच राहणार आहे म्हणून इथेच रोपे लावतोय आणि माझी सवय आहे मनु नवीन जागी मी पहिल्याच दिवशी रोपं लावतो निरोप घेताना त्यांची झालेली वाढ पाहून खूप आनंद मिळतो ”

“स्टुपिड जा लवकर आणि उन्ह आहे जास्त वेळ नको लाऊस ” मनीषा जाणाऱ्या अरविंद कडे एकटक पाहत होती. तिचे पाणावलेले डोळे पाहून मालती मावशीने विचारलं

“काय झालं ताई ”

“भरून आलं जरा, अरविंद सारखं जोडीदार मिळायला नशीब लागतं ”

“खरय ताई मापल्या सारख्या नोकर मानसालाबी खऱ्या खुऱ्या मावशी वाणी वागवतात ”त्या सुद्धा भारावल्या.

“तुम्ही मावशीच आहात ”असे म्हणत मनीषा हसली तिने डोळे पुसले आणि पुन्हा दोघी घर आवरायला लागल्या.

बाबांना हातात रोपे घेऊन येताना पाहून मुले खुश झाली सगळ्यांनी मिळून अंगणात त्याचं रोपण केलं.कशा प्रकारे खड्डा खणून रोपे लावल्यावर पावसाच पाणी साचून राहत हे अरविंद त्यांना शिकवत होता.दिवस सारा अवरावारीतच गेला.रात्री जेवण झाल्यावर मनीषा आणि अरविंद अंगणात चटई टाकून गप्पा मारत बसले होते.

“मनु खरतर तुम्हा लोकांना इथे राहायला यायची काय गरज होती, इथे तुम्ही एक महिना राहणार तितक्यात आर्याची स्विमिंग चॅम्पिअनशिपची तयारी झाली असती, पोरांचे समर वेकेशन वायाला जातील आता, आणि मी नाही त्रास द्यायला तर एक महिना तुही मजा करायची ना ” अरविंदने तिला चिडवले तिने त्याला हळूच एक धपाटा मारला.

“वर्षभरातून कितीदा तरी एकटाच असा लांब राहतोस, मला मुलांच्या शाळेमुळे तुझ्यासोबत यायला भेटत नाही पण या वेळी न येत येण्या सारखं काहीच न्हवत मुलांना पण प्लान पटला आणि मला किती वेळ भेटेल तुझ्यासोबत स्पेंड करायला ” असे म्हणत तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. आणि थोडावेळ तशीच थांबली

“अरविंद खरतर तुझं काम सिव्हील इंजिनीअरच तरी तू आत्ताच का यायचं ठरवलंस, अजून तर कसलीच तयारी नाही इथे ”

“तुला खरं तर नंतर सांगणार होतो पण आता ऐक, हे माझं शेवटच प्रोजेक्ट असणार आहे, हे झालं की मला स्वताची कंपनी टाकायची आहे त्यासाठी गेले दोन वर्ष मी ग्राउंड लेवल पासून सगळं काम शिकतोय खरतर तुला सरप्राईज द्यायचं होतं घरी गेल्यावर पण आता सांगून टाकलं ”

“आई शप्पत खरच ” मनीषाने त्याला आनंदाने मिठी मारली

“हो ” तो तिचे कपाळावरचे केस सावरत बोलला.

“आज खूप काम पडत असेल ना धुणे भांडी घरीच स्वयपाक घरीच माझ्या सोबत राहायला मिळाव म्हणून काय काय कराव लागतंय तुला,पण आता थोडे दिवसच ”

“चालत रे ”

“ह्याच हातांनी काम करतेस ना strong वुमन ” त्याने तिच्या हातावर कीस केले.

“आम्ही स्त्रिया ताकदवान असतोच वेळ आलीकी माया करणाऱ्या हातांनी दगडपण फोडू शकतात ”

“वेळ आलीकी फोड बरका आत्ता हात माझ्या हातातच राहूदे ”

“अरविंद अरे..” अचानक मनु थोड्या चिंतेने बोलली

“बोलना ”

“हि जागा सेफ तर असेल ना ”

“हो,फक्त रात्री अपरात्री एखादी हडळ निघेल अस वाटतंय ”

“मूर्ख तुला माहितीये माझा भुताखेतांवर विश्वास नाही दोन पायाच्या भूतांचीच भीती वाटते बघना एक तर तळ मजल्याच घर त्यात दोन तीन खिडक्या आहेत गज काढून कोणीही सहज आत येईल”

“पागल तिथे पहा ” त्याने उजव्या बाजूला हात दाखवत तिला खुणावले तिथून शिर्पाद आणि राम्मांना हातात कुऱ्हाड घेऊन येत होते. त्यांना पाहून हे दोघे उठून उभा राहिले.

“दोन जण रोज रात्री आलटून पालटून पहारा देणार आहेत आणि हे घर दगडी भिंतीच आणि सागवानाच्या दरवाज्याच आहे एकदम मजबूत” अरविंद बोलला. मनीषा निश्चिंतपणे झोपायाला गेली.

*****