Prem he - 17 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 17

......... कुणीतरी म्युझिक बंद केलं... सर्वजण त्यांच्या बाजूला गोळा झाले.. काय झालंय कुणालाच काही कळेना... 😓 क्षणापुर्वी दंगामस्तीत गुंग झालेला फार्म हाऊस... एकाएकी शांत झाला... एक भयाण शांतता तिथे पसरली......

"झालं ना तुझ्या मनासारखं..? आता समाधान झालं असेल ना मनाचं???😡की अजूनही काही शिल्लक आहे?? " निहिरा खूप रागात होती...

"कशाबद्दल बोलतेयस तू?? काय झालंय?नीट सांगशील का 😧" विहान काहीही न कळून विचारत होता..

"नेमका कसला सूड उगवलायस?? मूव्ही च्या वेळी सर्वांसमोर स्कूटी वरुन ओरडण्याचा..? तुला ऑफिशियली होकार न देण्याचा...? की माझ्या प्रोजेक्ट ला importance देऊन तुला दूर ठेवण्याचा???? 😡😢... सांग ना....की प्रेमाचंच नाटक केलंस माझ्यासोबत??? 😠😩😩" निहिरा खूपच संतापली होती... विहान मात्र सुन्न झाला होता....

" निहिरा..... 😡 काय झालय एवढं react व्हायला??? तो ऐकून घेतोय म्हणून काहीही काय बोलतेयस " विहान वर निहिरा काहीही आरोप करत होती म्हणून सोनिया ला चीड आली होती...

" विचार ना त्यालाच काय केलंय त्याने....??? तू असं करशील असा स्वप्नातही विचार केला नव्हता मी विहान!! 😢" निहिरा विहान वर ओरडता ओरडता रडत होती...

" निहू प्लीज... शांत हो.. आणि काय झालय ते नीट सांग.. 😓.. त्याशिवाय मला कसं कळणार? 🙁" विहान शक्य तितका शांत राहून तिला विचारत होता...बाकी सर्वजण ही तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.... पण ती आज शांत होणार नव्हती....

" what?? काय म्हणालास???? Don't call me that!😡 फक्त माझे फ्रेंड्स आणि माझ्या जवळचे मला त्या नावाने हाक मारतात... तुला आता फ्रेंड ही म्हणावसं वाटत नाहिये मला 😑😩 आपल्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं नातं उरलं नाहीये... 😫"

" निहिरा shut up!! 😠.. तू काहीही बडबडतेयस... काय झालंय ते स्पष्ट सांग...." सोनिया ही चिडून बोलली..

"..... माझा सिंगापूर वाला प्रोजेक्ट डिलीट केलाय ह्याने माझ्या लॅपटॉप मधून.. नुसता डिलीट नाही.. Permanent डिलीट केलाय... 😫😫... तूच गेला होतास ना आत्ता त्या रूम मध्ये... पाच मिनिटांपूर्वी सर्व व्यवस्थित होतं.. आणि परत आले तर बॅकअप सह सर्वच files डिलीट!!.. जादूने तर नाही होणार ना... 😡😧 सर्व files डिलीट झाल्यात म्हणजे कुणीतरी प्रोजेक्ट नेम सर्च मारून जाणुन बुजून त्या files डिलीट केल्यात.... आणि तुझ्याशिवाय इतर कुणीही तिथे गेलं नाहीये.... का केलंस तू असं 😭😭😭 बोल विहान बोल.... 😫".. निहिरा ला रडू आवरत नव्हतं.. ती जोरजोरात रडायला लागली.. अवनी, रीतू आणि अदिती तिला सावरायला तिच्या जवळ आल्या... त्याही तिला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या....

विहान तर निहिरा चा आरोप ऐकून मटकन सोफ्यावर बसला.. 😧😧 सर्वजण शॉक लागल्यागत निहिरा कडे बघत होते... 😨😨

"निहिरा.... काहीही आरोप करतेयस तू विहान वर... तो का असं करेल..??? तुझ्या प्रोजेक्टशी त्याचा काय संबंध??? 😧😰".. सोनिया

"तेच तर... सूड घ्यायचा होता त्याला माझा.. म्हणूनच प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत... 😭 आता हेही सांगून टाक ना... की तू माझ्यासोबत फक्त time pass केलास... प्रेम तुझं दुसर्‍याच कुणावर तरी आहे... 😭😭.. You cheated on me विहान 😫😫".. निहिरा गप्प बसायचं नावच घेत नव्हती.. ती विहान च्या अंगावर ओरडून ओरडून बोलत होती.. एकीकडे हमसून हमसून रडत होती.. विहान मान खाली घालून दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरून बसला होता...

सोनिया ला त्याची अवस्था बघवली नाही...

" निहिरा😠😠... जर विहान चं तुझ्यावर प्रेम नसतं ना... तर एकही शब्द ऐकून घेतला नसता तुझा... 😡😡 आत्ताच्या आत्ता इथून हात धरून बाहेर काढलं असतं.. 😠" सोनियाही आता अजूनच चिडली होती... विहान शून्यात नजर हरवून बसला होता... निहिरा चा एक एक शब्द त्याच्या मनावर घणासारखा घाव घालत होता!

"हो.. जाणारच आहे मी... एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाहीये मला... 😧😧 माझी पूर्ण लाइफ spoil केलीयस तू विहान.. माझ्या तीन वर्षांच्या मेहनतीवर तू पाणी फेरलंयस... 😫 आता दोन महिनेच बाकी आहेत प्रोजेक्ट submission ला... आता प्रोजेक्ट बनणं शक्यच नाहीये...
तुला काहीच फरक पडणार नाहीये... फरक तर मला पडणार आहे... दुसर्‍यांच्या भावनांशी खेळणे हा तर खेळच आहे तुझ्यासारख्या पैसेवाल्या मुलांचा.. त्यात आम्ही मात्र भरडले जातो.. पण तुम्हाला काही देणं घेणं नसतं.. पैसा आहे.. मजा केली.. आणि सोडून दिलं... 😫😫.. Everything is finished now!! 😭"

आता मात्र विहान ताडकन उठला आणि कुणाकडेही न बघता आतल्या खोलीत निघून गेला... आणि धाडकन दरवाजा बंद केला... सोनिया धावत त्याच्या मागे गेली होती... पण काही उपयोग झाला नाही... तिने रागाने निहिरा कडे बघितलं...

निहिरा ने ही आपली बॅग उचलली आणि ताडताड करत बाहेर निघून गेली.. अदिती आणि रीतू धावतच तिच्या मागे गेल्या.. अवनी सोनिया जवळ आली.. आणि म्हणाली...

"सोनिया प्लीज... जे झालं ते खूप वाईट झालं..सॉरी बोलून काही होणार नाही पण तरीही निहिरा कडून मी सॉरी बोलते.. आपण या विषयावर नंतर बोलू... तू विहान ला सावर.. प्लीज..." आणि ती धावतच बाहेर गेली.. निहिरा कडून स्कूटी ची चावी घेतली आणि तिला मागे बसायला सांगितलं... आणि चौघी ही सोबतच निघाल्या....
बाकी सर्वांनाही सोनिया ने सॉरी बोलून जायला सांगितलं...सर्वांनी तिला विहान ची काळजी घ्यायला सांगितली आणि सर्व निघून गेले...

सोनिया थोडावेळ सोफ्यावर सुन्न बसून राहिली...आता फक्त ती आणि विहान दोघेच होते तिथे..... विहान ला वेळ हवा होता हे तिला माहीत होतं.... म्हणून तिने त्याला बाहेर बोलावलं नाही... सर्वत्र शांतता पसरली होती... पंधरा वीस मिनिटांनी विहान बाहेर आला....

"चल तुला सोडतो..." एवढं बोलून तो बाहेर पडला... त्याचा चेहरा एकदम निर्विकार दिसत होता...

सोनिया काही बोलली नाही.. तिने बॅग घेतली.. लाईट्स ऑफ केले आणि लॉक करून ती कार मध्ये जाऊन बसली.. विहान ने कार स्टार्ट केली... घरी पोहोचेपर्यंत तो एक शब्दही बोलला नाही.. की एक अश्रूही नव्हता त्याच्या डोळ्यात..! कॉलनी च्या मेन गेट वरच त्याने गाडी थांबवली.. आणि सोनिया ला उतरायला सांगितलं...

"तू घरी नाही जाणारेस???" सोनिया ने चाचरत विचारलं..

तो काहीच बोलला नाही...

"विहान.... तू कुठे जाणारेस सांग मला... Aunty वाट बघताहेत तुझी... चल घरी...😢".. सोनिया रडवेली होऊन म्हणाली..

"सोनिया प्लीज... I m not a kid... Don't tell me what to do and what to not!! " विहान तिच्यावर पहिल्यांदाच एवढा चिडला होता... पण तिला त्याच्या ओरडण्याची पर्वा नव्हती... तिला त्याची काळजी वाटत होती...

नाईलाजाने ती गाडीतून उतरली... विहान ने वेगाने कार पुढे घेतली आणि तो भर्रकन निघून गेला... सोनिया कितीतरी वेळ तो गेला त्या दिशेने बघत होती...

जड पावलांनी ती घरी गेली... तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं... तिने दोन तीन वेळा विहान ला कॉल करायचा प्रयत्न केला... पण फोन बंद!! तिला खूपच काळजी वाटायला लागली त्याची.... काहीही झालं तरी तो चुकीचं पाऊल उचलणार नाही याची खात्री होती तिला... आजपर्यंत त्याने त्याच्या लाइफ मधली प्रत्येक situation स्वतःच हॅन्डल केली होती.....मॉम डॅड पर्यंत शक्यतो कोणतीही गोष्ट त्याने जाऊ दिली नव्हती... त्यांना त्याने त्याच्यामुळे कधीच त्रास होऊ दिला नव्हता.... कोणत्याही परिस्थितीत तिने त्याच्या डोळ्यांत पाणी बघितलं नव्हतं... पण आजची गोष्ट वेगळी होती...! निहिरा त्याचा वीक पॉईंट होती.... जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचे आरोप सहन करण्याएवढं धैर्य असेल त्याच्यात???? त्याने वरुन दाखवलं नसलं तरी आतून तो साफ कोलमडलाय हे तिलाही माहीत होतं... पण आता त्याच्या रिप्लाय ची वाट बघणं एवढंच तिच्या हातात होतं... 🙁

- - - - - - - XoX - - - - - - -

विहान ने सोनिया ला सोडलं.. अर्ध्या रस्त्यातून त्याने मॉम ला कॉल करुन मित्रांसोबत असल्याचं आणि उशीर होणार असल्याचं सांगितलं... आणि त्याची कार भरधाव वेगाने किनारा हॉटेल जवळ पोहोचली.. जिथे त्याने निहिरा चा बर्थडे सेलिब्रेट केला होता..!! जिथे तिथे न्यू इयर पार्टीज् चालू होत्या...किनारा मध्ये ही बरेच लोक सेलिब्रेशन साठी आले होते... विहान ने हॉटेल च्या बाहेर एका बाजूला कार पार्क केली... आणि तो चालतच त्या बीच वर गेला जिथे त्याने निहिरा ला सरप्राइज दिलं होतं...! संपूर्ण बीच आज रंगीबेरंगी रोषणाईने झगमगत होता!! ✨आकाशात रंगीबेरंगी फटाके आपला रंग उधळत होते... 🎇🎆 बीच वर ही बर्‍याच लोकांचं सेलिब्रेशन चालू होतं.... कुणी स्पीकर लावून नाचत होते.. तर कुणी खाण्या पिण्यात दंग होते..कुठे काही जोडपी खडकांवर बसून प्रेमाच्या आणाभाका घेत होते... सर्वांच्या आनंदाला अगदी उधाण आलं होतं...!!! पण...... विहान च्या आयुष्यात मात्र आज काळाकुट्ट अंधार पसरला होता.... 😑 बीच वर बराच पुढे तो चालत आला.. आजूबाजूला काय घडतंय तिकडे त्याचं जराही लक्ष नव्हतं... तो मान खाली घालून स्वतःच्याच तंद्रीत चालत होता... 😔 बरंच पुढे चालत आल्यावर त्याला एकाएकी शरीरातील सर्व शक्ति निघून गेल्यासारखं झालं आणि त्याने नकळत खाली वाळूवर आपले गुडघे टेकले... 😑😑 आणि त्याला एकदम उचंबळून आलं...😫 तो जोरजोरात रडू लागला.. 😭😭

"Why Nihira.. Why??? काय कमी राहिली माझ्या प्रेमात.. जे तू माझ्यासोबत अशी वागलीस 😫😫... कुठल्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस मला??? तो गुन्हा.. जो मी केलाच नाही??? 😓😭😭" विहान गुडघ्यांवर उभा राहत मान वर आकाशाकडे करून डोळे मिटून जोरजोरात ओरडत होता... पण त्याचं ओरडणं आज कुणालाच ऐकू जाणार नव्हतं... जो तो आपापल्या आनंदात धुंद होता...!! इकडे विहान चे अश्रू मात्र थांबायचं नाव घेत नव्हते.... आयुष्यात पहिल्यांदाच तो असा असहाय्य होऊन रडत होता.. 😫😫
" तुझ्याशिवाय कसा जगू मी निहिरा?? 😭 एवढा अविश्वास का दाखवलास माझ्यावर?? का असं एकटं सोडलंस मला...?? प्रेम काय असतं हे कळायला लागल्यापासून फक्त तुझ्यावरच प्रेम केलं मी निहिरा...तरीही माझ्यावर असले आरोप का केलेस?? का??? 😫😫" कितीतरी वेळ तो तिथे बसून रडत होता... पण आज त्याचे अश्रू पुसायला कुणीही येणार नव्हतं.... त्याला सावरायला आज सोनिया ही त्याच्यासोबत नव्हती... 🙁

त्या बीच वरच्या नजाऱ्यात आज किती विरोधाभास होता.... एकीकडे कुणीतरी धुंद होऊन आनंदाची उधळण करत होतं.. तर एकीकडे कुणीतरी दुःखाच्या सागरात खोल बुडाला होता...!😥😥

बर्‍याच वेळाने तो शांत झाला... त्याने आपले रडून रडून सुजलेले डोळे पुसले... किती वाजलेत याचं त्यालाही भान नव्हतं... तो चालत चालत परत हॉटेल च्या दिशेने निघाला... सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते याचा अर्थ बारा नक्कीच वाजून गेले होते...!!

- - - - - - - XOX - - - - - - -

रात्रीचे बारा वाजून गेले तरीही विहान चा काहीच रिप्लाय नव्हता... म्हणून सोनिया ला खूप काळजी वाटायला लागली... ती या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती... अशा अवस्थेत झोप तर तिला येणारच नव्हती... विहान च्या घरी ती फोन करू शकत नव्हती... विहान घरी यातलं काहीच सांगणार नाही हे तिला माहीत होतं... त्यामुळे उगीच मी फोन करायचे आणि आँटींना समजायचं... विहान आला नसेल तर त्यांनाही काळजी लागून राहील.. म्हणून तिने त्याच्या घरी कॉल केला नाही...

साधारण एक च्या नंतर तिच्या फोन ची मेसेज टोन वाजली.. तसा तिने पट्कन मेसेज open करून बघितला...

📱 I m home..
Don't worry
I m OK
Good night..

विहान चा मेसेज होता...!

To be continued..
🙏
#प्रीत