Tree pal murder cash - 1 books and stories free download online pdf in Marathi

ट्रिपल मर्डर केस - 1

अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत होत. पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी बराच वेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे पण अजून एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे त्या घरात बाळ कोणाचंच न्हवत त्यामुळे सर्व शेजारी बुचकळ्यात पडले. त्या घरात एक आई आणि तिचे दोन मुलगे व एक मुलगी असे चार जणांचं कुटुंब राहत होते बाबा दोनवर्षांपूर्वींच वारले होते आणि आईच त्या सगळ्यांचा संभाळ करत होती, तिन्ही मुलांची लग्न झालं न्हवती. मुलीचं आताच ठरलं होत, पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होते. बराच वेळ वाट बघून बघून शेवटी जमावातील एकाने पोलिसांना कळवलं पुढच्या अगदी काही क्षणातच पोलीस घटनास्थळी हजर झाले त्यांनी पूर्ण विचारपूस करून, कुठला अजून आत जाण्याचा मार्ग आहे का हे पडताळून बघून शेवटी घराचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि तो दरवाजा धक्का देऊन उघडण्यात आला.

घराच्या आतील दृश्य खूपच धक्कादायक होत. पूर्ण घरभर एसीमुळे वातावरण अगदी गार झालं होत पण तो प्रसंग हा अंगावर काटे आणणारा होता. सोफ्यावर त्या बाईची एक मुलगी आणि दोन मुलं हे निवांत पडले होते काहीच हालचाल न्हवती आणि किचन मध्ये त्या मुलांची आई मांडीवर एका लहान बाळाला जो 4 महिन्याचा असेल त्याला घेऊन शांत पणे बसून होती आणि ते बाळ खूपच रडत होत. कोणाला काहीच कळत न्हवत कि नक्की झालं काय आहे..? पोलिसांनी चेक केल पण त्या मुलांचा आणि त्या मुलीचा एव्हाना मृत्यू झाला होता, मृत्यू बहुतेक विष प्राशन केल्यामुळे किंव्हा विष दिल्यामुळे झाला होता पोलिसांनी आई आणि त्या बाळाला ताब्यात घेऊन सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि पूर्ण घराची झडती घेतली. घरातला कोपरा न कोपरा शोधून काढला तरी त्यांना काहीच विशेष असं सापडलं नाही. आता त्यांना हे समजण खूपच कठीण होत कि एक आई आपल्या मुलांचा जीव का घेईल..? आणि जर तिने हे नाही केल मग हे सर्व एवढं झालंच कस..? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मांडीवर असलेलं बाळ नक्की कोणाचं होत..? ह्या बंद खोली मध्ये नक्की झालय तरी काय..? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर मिळवणं पोलिसांसाठी आता खूप गरजेचं झालं होत...कारण या घरात एक तिहेरी हत्यांकांड झाला होता आणि ज्याचे सर्व पुरावे हे त्यांच्याच आई विरोधात जातं होते. हि केस जितकी साधी सोप्पी वाटत होती तितकीच ती गुंतलेली असणार याची कल्पना एव्हाना सिनियर उपनिरीक्षक जाधव यांना आली होती आणि त्यांनी त्या दृष्टीने आपला तपास चालू केला.

पोलिसांनी आजूबाजूला विचारपूस केली तेव्हा त्यांना कळलं कि त्या बाईला 3 मुलं होती आणि तीचा त्या सर्वांवरच खूप जीव होता मग ती असं काही करेल यावर कोणाचाच विश्वास बसत न्हवता. तसेच त्याघरात मुलांपैकी कोणाचही लग्न झालं न्हवत तर मग ते बाळ कोणाचं होत याचा अंदाजच आजूबाजूच्या कोणाला येत न्हवता..त्यांनी याआधी याबाळाला पाहिलं सुद्धा न्हवत. एवढ्यात एक बाई धावत आली आणि तिने आपला मुलगा कालपासून घरी आला नसल्याचं पोलिसांना सांगितलं आणि तो इकडे याच घरी आला असल्याच कळलं तेव्हा पोलिसांनी त्यांना सापडलेल्या मृतदेहांचे फोटो दाखवले, त्यातला एक फोटो पाहून ती जोरातच रडू लागली, तिला अश्रूच आवरत न्हवते कारण तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता ज्याचं त्या मुलीशी लग्न होणार होत आणि म्हणूनच त्याच या घरात नेहमी येन जान होत असे तसंच तो कालही आला होता.तो रात्री घरी परातलाच नाही आज सकाळी इकडे काही तरी गोंधळ झाला हे कळल्यावर ती बाई धावतच इकडे आली होती पोलिसांनी बाळाचा फोटो देखील तिला दाखवला पण ती त्या बाळाला ओळखत न्हवती तसेच तो कोण हे सुद्धा तिला माहीत न्हवत. आता खूप मोठं कोडं तयार झालं होत कारण घरात सापडलेल्या मृतदेहांमध्ये मोठा भाऊ सुयश हा न्हवताच. मग सुयश कुठे आहे..? त्यानीच तर काही केल नाही ना..? असे अजून काही प्रश्न आता पोलिसांपुढे तयार झाले होते. सर्वात आधी बाळाची ओळख पटवण्यासाठी बाळाचा फोटो सर्व वर्तमानपत्रात पाठवण्यात आला आणि आता त्यांनी आता पोलिसांनी त्या मुलांच्या आई ची चौकशी करायला सुरुवात केली...


(पुढचा भाग लवकरच....)