Tujhach me an majhich tu..bhag 3 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग ३

तुझाच मी अन माझीच तू...भाग ३

दोघी गप्पा गोष्टी करत डबा खात होत्या. पाच दहा मिनिटे झाली आणि राजस दोघींसमोर हजर झाला... त्याला बघून नेहा तर आनंदी झालीच पण आभा ला सुद्धा छान वाटले.. आपण सकाळी जरा जास्ती बोलून गेलो ह्या जाणीवेने राजस ने आभा शी बोलणे टाळले.. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही.. पण नेहा ने मात्र त्याच्याशी बोलायला चालू केलं,

"राजस? येणार नव्हतास ना लगेच?"

"ठेवलीस ना ग मला भेंडीची भाजी? भेंडी च्या भाजीच नाव ऐकलं आणि मला पुढच्या क्षणी उत्तर मिळाला..मग पटापट काम आवरून आलो लगेच डबा खायला.. पोटात कावले ओरडत होते.." राजस ने हसत नेहा शी बोलायला चालू केले...

"आम्ही आत्ताच चालू केल होत जेवण...बर झालं आलास.. आणि भाजी ठेवली का हे काय विचारणं झालं? तुझ्याशी जरा जास्तीची भाजी आणली होती आज.. आय नो यु लव भेंडी भाजी.. आणि ट्राय आभा चं भरलं वांग... फार टेस्टी आहे..यमी!!"

"थँक्यू नेहा.. सो ओन्ली आय लव यु..आणि आभा ची भाजी तू का खाल्लीस? मैत्री केल्याशिवाय कोणाकडून काही मागून खायचं नसत.. इतकही माहिती नाही का?"नेहा चे बोलणे ऐकून राजस वैतागला.. आणि राजस ने नेहा शी बोलतांना हळूच आभा ला टोमणा मारला... आभा शांतपणे डबा खात होती. उगाच मध्ये का बोलायचं ह्या विचारानेच ती शांत बसून होती. पण राजस चे हे बोलणे ऐकून ती किंचित ऑकवर्ड झाली.. पण तिला राजस च्या बोलण्याचा राग मात्र आला नाही.. तिला हा टोमणा आपल्यासाठी आहे हे जाणवलं आणि हे सुद्धा जाणवलं की सकाळी आपण जे रूड वागलो त्याची ही प्रतिक्रिया आहे.

"आय थिंक माझ्यामुळे कोणालातरी त्रास होतोय.. मी जाऊ का इथून? म्हणजे जातेच..दुसरीकडे बसून डबा खाते.. उगाच कोणाचा मूड खराब करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये.." आभा राजस ला उद्देशून बोलली. तिच बोलण ऐकून नेहा ने कपाळावर हात मारून घेतला.

"अग, आभा...तू कशाला जातेस! आणि कॅंटीन मध्ये कुठे रिकामी जागा नाहीये... आणि तू राजस कडे जास्ती लक्ष देऊ नकोस! आणि त्याचं बोलण मनावर सुद्धा घेऊ नकोस..टोमणे मारायची त्याची सवय काही जाणार नाही.. तो चिडला की उगाच समोरच्याला टोमणे मारतो..आणि तुझा आज पहिला दिवस आहे ऑफिस मध्ये.. तू तुझा मूड अजिबात खराब करून घेऊ नकोस आणि ते सुद्धा राजस मुळे..तो असाच आहे!! इंसेन्सेटीव्ह..." नेहा ने चिडून राजस कडे पाहिले..आणि पुटपुटली, "सुधार राजस सुधार.. दुखवू नकोस उगाच कोणाला!!" पण नेहा चे अनपेक्षित वागणे पाहून राजस वैतागला..

"काय लुक्स देतेस मला नेहा? मी काय चुकीच बोललो ग? ह्या महाराणींनी सांगितलं होत मला सकाळी, मी लगेच कोणाशी मैत्री करत नाही.. म्हणून मी म्हणालो तुला मैत्री केल्याशिवाय कोणाकडून काही मागून खायचं नसत.. कशाला खायचं ना अनोळखी लोकांच्या डब्यातून... तुला हवी असेल तर समोरून आणून देऊ का कुठली भाजी?? आणि तू माझी फ्रेंड आहेस ना.. ती आल्या आल्या साईड चेंज का?" राजस नेहा वर गुरकावला..

"चूप रे राजस... बस कर तुझी नौटंकी.. इथे भरलं वांग मिळत? मिळत असेल तर आण आणि मिळत नसेल तर त्यांना सांग भरलं वांग करायला.. बघू ऐकतात का तुझ.. आणि तुला आभा च्या डब्यातली भरली वांगी ची भाजी खायची नसेल तर तू नको खाऊस.. आणि तुला कोणी ऑफर केली सुद्धा नाहीये भाजी..मध्ये कशाला करतोस बडबड?" नेहा ने राजस ला परत झाडले.. राजस वैतागलेल्या मूड मधेच होता.. मधेच तो चिडून आभा कडे सुद्धा पाहत होता...

"काय फालतूपणा लावलाय ग नेहा.. काय इतक कौतुक भरल्या वांग्याचं? जसं कधी पाहिलीच नाहीस ही भाजी.. तुला इतकी आवडत असेल तर पुढच्या वेळी मी शिकून तुझ्यासाठी करून आणेन.. पण अनोळखी माणसांच्या डब्यातून काही खाल्ल तर बघच..गाठ माझ्याशी असेल.."

"धमकी? आणि मला? राजस.. शट अप तू... कोणाच्या डब्यातल खायचं आणि कोणाला विचारायचं ही माझी मर्जी आहे...त्यात तू लुडबुड करू नकोस..आय नो वी आर बेस्टी पण काहीही ऐकून घेणार नाही बर का.. आता तर नाहीच..आणि आभा ला द्यायचं नसेल तर ती देणार नाही.. मला सांग, काय होतंय तुला? आणि सारख अनोळखी लोकं अनोळखी लोकं अशी का बडबड करतो आहेस?" नेहा आणि राजस मधला संवाद आभा शांतपणे ऐकत होती. पण आता ती बोलणार होती..तिला जाणवलं होत की राजस चा इगो हर्ट झाल्यामुळे तो अश्या प्रकारे रीयाक्ट झाला होता..

"बास करा तुम्ही दोघ.. तुम्ही छान मित्र आहात.. तसेच राहा प्लीज.. उगीच माझ्यामुळे तुमच्या मैत्रीत प्रॉब्लेम नको..आय अॅम सॉरी नेहा!! माझ्यामुळे उगाच तुमच्यात भांडण नको.. माझ पोट भरलंय मी जाते.. तुला भाजी ठेवते.. संपवून टाकलीस तरी चालेल.." इतक बोलून आभा उठायला लागली.. नेहा ने तिला थांबण्यासाठी बोलण चालू केल,

"नो नो आभा.. तुझ्यामुळे काहीच नाही होत ग.. आम्ही छान मित्र आहोत आणि नेहमीच राहू.. आमच्यात अशी नॉक झोक चालू असतेच!! डोंट वरी अबाउट अस.. तू डब्बा न खाता जाऊ नकोस प्लीज..." नेहा च बोलण ऐकून घेत आभा ने मानेने ओके सांगितलं आणि ती बोलायला लागली...

"पोट भरलंय नेहा म्हणून जातेय...." आभा हसून बोलली.. पण मनातून ती जरा ऑकवर्ड झाली होतीच... ऑफिस च्या पहिल्याच दिवशी असं काही होईल ह्याचा अंदाज तिला नव्हता. राजस एक टक आभा कडेच पाहत होता.. पण त्याला जाणवलं आभा सहज सहजी पाघळणार नाहीये...

"थांब ग आभा.. तू प्लीज डबा खा.. आणि मला सुद्धा हवीये भरली वांगी ची भाजी..पण तुझी नको!!" राजस खोट हसत बोलला. त्याला मोकळेपणा ने सॉरी सुद्धा म्हणता येत नव्हता, त्याचा इगो सारखा सारखा त्याची वाट अडवत होता..

"मी डबा ठेऊन जातीये इथेच.. यु बोथ कॅन शेअर इत... फक्त नंतर डबा आणून द्या मला..." इतक बोलून आभा जायला उठली. पण राजस ने तिचा हात धरला...

"आभा.. स्टॅच्यु.." स्टॅच्यु शब्द ऐकताच आभा स्तब्ध उभी राहिली.. ती एकही शब्द बोलली नाही...मग राजस तिच्याकडे पाहून हसायलाच लागला.. त्याच मनसोक्त हसून झालं आणि तो बोलायला लागला..

"ओह वॉव!! स्टॅच्यु असतांना छान दिसतेस.. एकदम शांत न न बडबड करणारी.." राजस एकटाच हसला. आता तो सिरिअस होऊन बोलायला लागला, "हो मी मान्य करतो... माझा इगो हर्ट झाला सकाळी त्याची ही रीयाक्सन होती...मला आज वर अस कोणीच वागवल नव्हत.. इग्नोर झालेलं मला सहन नाही झालं.. आणि मी विचित्र वागलो.. म्हणजे इगो हर्ट झाला की असाच वागतो विचित्र.. आय कान्ट हेल्प इट... सॉरी! तुझा आज पहिला दिवस आणि मी काय वागलोय.." राजस चा आवाज बदलला होता.. त्याच हे वागण एकदम अनपेक्षित होते आणि नेहा त्याच्याकडे पाहत चेहरा वेडा वाकडा करत होती... ती राजस ला नीट ओळखत होती आणि त्याच्या तोंडून सॉरी येणे किती अवघड आहे ह्याची जाणीव तिला होती... तिच लक्ष आता पूर्णपणे आभाकडे होतं. तिला राजस ला काय उत्तर देते ही तिला पहायचं होत.. खर तर नेहा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. खूप रेअर अशी गोष्ट आज झाली होती.. त्याच बोलून झालं आणि राजस ने स्टॅच्यु ऑफ केला... आभा रीलाक्स झाली.. पण राजस चे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर मनात काय चालूये हे कळल सुद्धा नव्हत. आभा ने थंडपणे राजस चे बोलणे ऐकून बोलायला लागली..

क्रमशः..