Samntar preyshi - भाग 1 books and stories free download online pdf in Marathi

संमातर प्रियेशी - 1


अनघा व तिची मम्मी बराच वेळ रिंग रोडला उभ्या होत्या.अंधार अधिक गडद होत गेला.रात्रीचं आठ तरी वाजतं आले असतीलं. पाली चौकात वाहनं थांबण्याचं नाव घेत नव्हती.अनघानं तिच्या पप्पाचा फोन अनेकदा ट्राय केला. तो लागतचं नव्हत.येणा-या वाहनांच्या तीव्रं लाईटस्‍ डोळयावर चमकतं. वाहनात कोण बसलं आहे याचा अंदाज येत नसं. काही दिसतचं नव्हतं. मुंगीसारखी रांग नुसती वाहत होती. थांबत मात्रं एक ही नव्हतं. एखादं वाहनं आलं की

नव्हता.टॅक्श्या थांबत नव्हत्या.उगचं लिप्टं तरी कुणाला कशी मागा. अनोळखी व्यक्तीला कशी तेवढया पुरता गलका व्हायचा.काही मिनिटातच सारं कसं शांत शांत होऊन जायचं. भीती वाटणं साहजिकचं होतं. लांब एक वेडं कागदांचा जाळ करून शेकत होतं. कधी यांच्याकडं पाही. कधी नुसतचं हासं.तिथचं एक पालिकेचं डस्टबिन होत. डस्टबीन भरून कचरा ओसंडून खाली पडला होता. त्या कच-याच्या ढिगा-यात दोन- तीन कुत्रे काही तरी शोधत होती. त्यांच्यतल्या त्यांच्यतचं गुरगुरत होती.

वेडं उठून आपल्याकडं येऊ नाही असं त्या दोघीना ही वाटतं होतं. त्यामुळे भीती वाटे. एक ही रिक्षा किती वेळ झाला तरी थांबत लिप्टं मागणार? अनघाची मम्मी पण घाबरलेलीचं होती.ती अनघाला तसं दाखवत नसे.अनघा मोबाईल चिवडत होती.तिचं सारं लक्षं मोबाईल मध्येचं असे.तिच्या मम्मीचं सारं लक्षं रस्त्याकडं होतं.डोळं रस्त्यावर रोखलेली.प्रत्येक वाहनाकडे त्या बारकाईने पहात. कुणी ओळाखीचं भेटत का?बारकाईन पाहण्याचा उददेश्यचं एवढाचं होता. एवढया रात्री कोण ओळखीचं भेटणारं?तेवढयात एक मोठी गाडी आली. खर तर त्या गाडीचा वेग फार होता.गाडीचा ब्रेक दाबलं गेला.तसा कर्र…कर्रर.. आवाज आला. ब-याचं अंतरावर गाडी जाऊन उभी राहीली. पुन्हा गाडी रिव्हर्सं आली.त्या दोघी ही नुसत्या पहात राहिल्या. “अनू तू?” आतून आवाज आला. आत एक पॉश सुट घातलेला माणूस होता.असल्या महागडया गाडीतून आपल्या ओळखीचं कोण असू शकेल? दोघीनं एकमेंकीकडं पाहिलं नि काही पावलं त्या पुढं सरकल्या.

“सर,तुम्ही?” आश्चर्यानं अनघा मोहरली. काळया भोर मिश्या… गोरापान चेहरा. चॉकलेटी कलरचा थ्रीपीस घातलेला. डोक्याच्या पुढच्या भागाचे केस विरळ होऊन छान टक्क्ल पडलेलं होतं. मिश्याच्या जाडजुड कोरीव मिश्यामुळे त्याचं ओठ दिसले नाहीत पण त्याच्या ओठात हसू फुटलेलं झाकलं नाही. तो इतका सावध हासला की त्यांनी दात पण दिसू ‍ दिलं नाहीत. ते हासणं नटवं का असेना पण छान होतं. अनघाच्या मम्मी सावरल्या. पदर नीट केला. अनघा नुसतीचं सावध झाली.तिला कुठं पदर होता? ओढणी ही नव्हती. तिनं ब्ल्यू जीन्स् नि व्हाईट शॉर्टं टॉप घातलेला होता.

“असं इतक्या रात्री?” तो गाडीतून न उतरताच अनघावर नजर रोखत बोलला.

“मामाच्या गावाला गेलो होतो.इथ कधीचं थांबलोय पण एक ही वाहनं थांबत नाहीये.” अनघा बोलली. तिची मम्मी तिच्याकडं पहातचं राहिली. हा माणूस आपल्या पोरीच्या एवढा कसा ओळखीचा. नावानिशी कसा काय ओळखतोय हिला. हा कोण नेमका?

“दोघींच? किती उशीर झालाय?” अनघाच्या मम्मीकंडं त्यानं नजर फिरवली.ती नजर अंगभर रेंगाळली.

“ही माझी मम्मी. उशीराचं सोडलं मामानी इथं. आम्हाला वाटलं.जाऊ आम्ही लवकरचं. वाहनचं थांबत नाहीत आज.”

“फोन नाही केला कुणाला?” त्याच्या घोगरा आवाजात ही एक गोडवा होता.तो आवाजचं कसलेला होता.

“पप्पाचा कॉन्टॅक्टचं होत नाही,ना.कध्धीचा ट्राय करतेयं मी.” हातातला मोबाईल दाखवत अनघा बोलली.

“मी सोडू? कुठं राहता तुम्ही?”

“वरद कॉलनीत.. श्रीरामनगर…” अनघानं त्यांना पत्ताच सांगून टाकला. हया माणसाला आख्खा पत्ताचं सांगून टाकण्याची काय गरज होती? श्रीराम नगर इतकं पुरेसं होतं.अनघाच्या मम्मीच्या चेह-यावर थोडा राग पांगला. राग सहसा झाकत नाही.

“तुमची काही हरकत नसेल तर मी सोडू?” अतिशय नम्रं आवाजात ते बोलले. त्या आवाजातील नम्रता नटवी होती.

“नको सर. कशाला तुम्हाला त्रास?”अनघानं लटकचं म्हटलं.नकाराला हवी तेवढी तीव्रता नव्हतीचं मुळी. असा बोथटं नकार होकारचं समजला जातो.

“त्यात काय त्रास?मी बायपासनचं कर्वे नगरमध्ये जातोय? जाता जाता तुम्हला ड्राप करतो. तिथूनच रस्ता आहे माझा.स्पेशली थोडचं यावं लागतं.”

“पण उगाच…”

“उगाचं कसं? रात्रं झालेली आहे. आता काही वाहनं लवकर मिळण्याची शक्याता ही नाही. मी इतका ही अनोखी नाही तुझ्यासाठी. असं तुम्हाला सोडून जाऊ कसा शकेल मी अश्या ठिकाणी? एवढया रात्री? का थांबू वाहनं येईपर्यंत?”

“नको नको सर.”

“काही प्रॉबलेम तर नाही ना? आपण सहज बसू शकू इतकी मोठी गाडी माझी.” तो गाडीकडं तिरपं पहात हासतं बोलला.अनघानं नुसतचं मम्मीकडं पाहीलं. तिला काहीचं कळत नव्हतं. असल्या आलिशानं गाडी मध्ये. हा अनघाला कसा काय ओळखतोय?या माणसाबाबत अनघा कधीचं कसं काही बोलली नाही. त्या सोबतं जावं की नाही? हल्ली कसल्या भंयकर घटना घडताहेत. सज्ज्नतेच्या बुरख्यातचं सैतान दडलेले असतात. हा इतका का पघळल्यासारखं करतोय? अनघा तरूण. नुसती अनघाचं नाही आपण तरी काय एवढया म्हता-या थोडयाचं झालोत. अजून चाळीसत पण नाहीत की आपण. अश्या रात्री याच्या मनात काही वाईट विचारं आले तर? इयत्ता नवीत शिकणारी पोरगी अनघा.तिचा नि याचा काय एवढा स्नेह? अनघाची मम्मी विचारत असताना अनघा तिच्याकडं पहात होती व तो माणूस दोंघीकडं ही पाहता होता. त्याचा ड्रायव्हरं तिघांकडं ही…

“येताय ना?” अनघाचं जरा कन्फूजनचं झालं होतं. तिनं मम्मी कडं पाहीलं.खर तर ती अजून ही शांत होती. जायचं की नाही? असं कानात ओरडून विचारावं का मम्मीला? असं अनघाला वाटलं पण तसं काही करायच्या अगोदरच मम्मीचं म्हणाली,“चल जाऊयात.” अश्यावेळी फार विचार करायला वेळ नसतो. हा गेला निघून नि वाहनंच नाही आलं तर?तो तर खरा प्रॉब्लेम होता.

दार उघडलं.दोघी त्या गाडीत बसल्या.तसा त्यांना दिलासा आला. गाडीत एसी चालू होती. गाडी त्यामुळे उबदार वाटली. त्या रिलॅक्सं झाल्या.

“असा उशीर नाही करायचा.. हे शहर इतक पण सुरक्षित नाही. हल्ली बातम्या तर किती भंयकर वाचतो व ऐकतो आपण.” उगीचं गप कसं काय बसावं महणून त्यानी बोलायला सुरवात केली.

“उशीर थोडचं कुणी ठरून करतं असतं. वह हो जाता है.” अनघा उगीच काही तरी बोलली नि दाताड काढत बसली.तिचं असं दाताड विचकन तिच्या मम्मीला अजिबात आवडलं नाही. त्यांनी अनघाकडं थोडं रागानं पाहीलं.

“मिस..पवार.. संकोचू नका.अनघा बेस्टं फ्रेंड आमची.” हे असं स्वत:लाच आज्ञार्थी का बोलत आहेत? त्यांनी अजून थोडं स्वत:ला सावरलं.साडी नीट केली. डोक्यावरल्या समोरच्या काही बटा चेह-यावर आल्या होत्या.त्या अलगद मागे सारल्या. अनघाच्या पण अश्याचं बटा पुढं येतातचेह-यावर;पण ती अश्या हातानीं नाही सरकवत मागे. असा मानेला झटका देते. त्या थोडयाश्या उंच उडतात व मागे जातात. अनघानं ही तश्याचं त्या मागे उडवल्या.

“नाही .. नाही.. मी का संकोचू?” त्या हे बोलू शकल्या पण संकोचलेला चेहरा झाकू नाही शकल्या.

“मम्मी,हे विवेक शेंदारकर सर.” अनघानं त्यांची ओळख करू दिली.

“….???” विवेक शेंदारकर नुसतं नावं झालं. कसं कळणार कोण आहेत ते. मम्मीच्या चेह-यावरील प्रश्नचिन्हं पाहून अनघाला अधिकचं बोलावं लागलं.

“तो फोटो नाही का आपल्या शोकेस मध्ये.” मम्मीच्या डोळयासमोर हात हालवत ती म्हणाली.

“आपल्या शो केसमध्ये फोटो यांचा?” चेह-यावरील प्रश्नं चिन्हं अधिक ठळक करत मम्मी बोलल्या.

“तो आमच्या शाळेच्या गॅदरींगचा….निबंध लेखनाचं फर्स्टं प्राईज यांच्याच हातानं भेटलं ना मला?” अनघानं सारचं सांगून टाकलं. इतक सांगणं गरजेचं ही होतं.

“सॉरी..हं. कुठं तरी पाहिल्या सारखं वाटलं मला पण नक्की नाही आठवलं.” त्या छान हासल्या.

“कसं शक्यं? शोकेस मध्ये काय थोडया ट्राप्या व फोटो असतील का?” शेंदारकर त्यांच्या डोळयात आपली नजर घुसवतं म्हणाले.

“शोकेस गच्चं भरलं.सारखं हिचं चालूच आसतं. ही स्पर्धा.. ती परीक्षा.”

“अश्या प्रोग्रामचे फोटोज पण फार असतील ना?”

“एवढे पण नाहीत ते. सॉरी,माझ्या लक्षातच नाही आलं.”

“होतं कधी कधी तसं पण तुमची अनघा फार हुशार नि गुणी मुलगी.फार मोठी होईल ती.” शेंदारकरांनी विषय बदला.

“हे सारं ठीक पण अभ्यास ही करायाला हवा ना?” अनघाच्या मम्मीनं तिच्याकडं कौतुकमिश्रीत पहात म्हटलं.

“काय अनू? तू अभ्यास नाही करत?”

“काय ग मम्मी असं का बोलतेस? मी अभ्यास नाही करत खरचं?”

“अभ्यासापेक्षा असल्या स्पर्धा.. परीक्षाचं जास्त असतात तिला.”

“स्पर्धा व संघर्षं ही महत्त्वाचा असतो माणसाच्या जडण घडणीमध्ये.” शेंदारकर जरा तात्विक बोलू लागले.

“स्पर्धांचा व परिक्षांचा कंटाळा नाही हिला पण अभ्यास नाही करत फार.”

“मम्मी तुला मला डॉक्टरं करायचं. जे की मला नाही व्हायचं.” नाकावर लटकाचं राग पसरला होता.

“मग असं काय होणारेस तू?”‍ तिच्या मम्नचं तसं विचारलं.

“मुलांना त्यांच त्यांना ठरवू दयावं.काय व्हायचं नि काय नाही. नाही का हो सर?” अनघा लाडक्या स्वरात बोलली.

“खरं ना तुझं?” शेंदारकरानं लंपटासारखी उगीचं अनघाची बाजू घेतली.

“माझे नाहीत विचार हे. सर,तुम्हीचं तर सांगितलं ना तुमच्या भाषणात आम्हाला?”

“असं का? चांगल लक्षात ठेवलं.”

“मग अख्ख भाषणचं पाठं माझ्या ते.” अनघा स्तुतीनं खुलून आली.

“चक्क पाठचं.”

“पण मम्मीला सांगा ना?तिचा नुसता तगादा असातो माझ्या माग.अभ्यास कर. अभ्यास कर.” अनघाच्या स्वरात अल्लडता होती. अनघा काय बावळटं का? इतकं लाडात येऊन का बोलतेय या माणसाला. अनघाच्या मम्मीला तिचं असं वागणं खटकतचं होतं. अनघाला सांगणारं कसं? ते तिघं ही खळखळून हासले. ड्रायव्हरं मात्र शांत होता.

“मुलांच मुलांना ठरवू दयावं असं मी सांगितलं ना? मग तू काय ठरवलेस? कोण व्हायचं तुला?” शेंदारकरांनी प्रश्न विचारला.

“मला रायटर व्हायचं तुमच्या सारखं.” त्यांच्याकडं हासत पहात अनघा बोलली. असं हासली की गालावर छान कळी पडते अनघाच्या. त्या खळीकडं शेंदारकरांनी हळूच पाहिलं. त्यांच्याकडं अनघाच्या मम्मीनं नजर रोखलेलीच होती. पुन्हा नजरा नजर… शेंदारकरांचा चेहरा आकसला.

“मी फक्त रायटर नाही.”

“मग ?”

“या जिल्हयाचा उपजिल्हाधिकारी मी.नोकरी करतोय मी.लिहीणं हा छंद माझा.”

“क्काय? तुम्ही डेप्यूटी कलेक्टरं आहात?” अनघाच्या मम्मीला तो आश्चर्याचा शॉक होता. शेंदारकरांनी तो आनंद नि आश्चर्यांनं ओथबंलेला चेहरा पाहिला.

“जे भी व्हायचं ते हो पण अभ्यास तर कर. तपश्चर्या शिवाय कोणत्याचं कामाम यश नाही.” गुळगुळीत झालेला एक सुविचार त्यांनी सांगितला.

“ सर, करतेय मी अभ्यास. मम्मीचे सारखेच टोमणे सुरू असते.”

“तुम्ही असं तिच्यवर काही लादू नका. आनंद हाच जर जीवनाचा उददेश्य असेल तर अभ्यास करतानी ही आनंद वाटला पाहीजे.जीवनात दु:खच्या डोंगरात विखरूलेले आनंदाचे क्षंण वेचतं राहवं माणसांनी.तिचं तिला ठरू दया. आताचं कुठं पंख फुटलेत तिला.उडू दया तिला.” अनघाच्या मम्मी नुसतं ऐकतचं राहिल्या.किती छान बोलत होते ते. काही माणसाच्या शब्दांत नि स्वरात एक लय असते. मनाच्या पृष्ठभागावर ते शब्दसूर तरंग निर्माण करत राहतात.

“तिचं आकाश ही तिलाच निवडू दया. झेपावू दया तिला हवं तसं.पदांची नि पदव्याचे साखळदंडानं स्वत:ला जखडून टाकण्यापेक्षा उधळू दया अंतरंग फुलासारखं. बहरण्याची,मोहरण्याची आपण सक्ती नाही करू शकत कुणालाचं.”

“ आश्यासक्ती कसली? तिला वाटतं तसचं ती करतेय.माझं काय चालतं या दोंघाच्या पुढं.तिच्या पप्पांची फार लाडकी ही. एक शब्द नाही मोडवत त्यांना हिचा. घडोघडी बोटावर नाचवत असते त्यांना.”

“आणि तुम्ही?”

“क्काय?” शेदारकरांचा हा प्रश्नं एकदमच अनपेक्षीत होता त्यांना.त्या दचकल्या. हे असं का बोलताहेत? शेंदारकरांनी सावरलं स्वत:ला.

“काय ग अनू? पप्पांना नाचवते बोटावर तू?” शेंदाकरांनी पुन्हा स्वत:ला सावरून घेतलं.

“नाही हो सर? मम्मी काही पण बोलते.” ती लाजली. लडीवाणपणाला लाजण्याचा रंग आल्यामुळे ती अधिकचं लोभस वाटू लागली.

“नाव कमावेल तुमची ही लेक.लाखात ऐक ही.” शेदांरकराच्या बोलण्यातून अनघाची सुस्ती तर होती पण एक विश्वास ही होता. स्तुतीचा अति डोस ही पंचाट वाटतो. अनघाला त्यांच बोलणं आवडतचं होतं पण तिच्या मम्मीला ते हवेहवीसे वाटत होते.

आपल्या मुलीची अशी स्तुती ऐकून त्यांची छाती गर्वानं फुगून आली होती. अनघाच्या आई होत्या त्या.आईचं ह्रदय मेणाचं असतं का? त्या पार पघळू गेल्या होत्या. ते अनघा बददल बरसचं काही बोलले. अनघाच्या मम्मीला सुरवातीला अवघडून गेल्यासारखं वाटत होतं. त्या नंतर थोडया रिलॅक्स झाल्या. अनघा तर किती बोलत होती. शेंदारकरकडे अनघाची मम्मी सूक्ष्म पहात होती. अजून कुठं विश्वास होता तिला त्यांचा. पुरूषच होते ना? त्यांची नजर नेमकी कशी हे त्यांना ताडायचं होतं. पुरूषाच्या नजरेत एक लोचट आंबटपणा व वशाळता ही असते.

शेंदारकरांची व अनघाच्या मम्मीची नजरानजर झाली. अनघाच्या मम्मीनं नंतर तो नजरेचा होणारा अपघात टाळला. शेंदारकर दोघीकडं ही पहात होते. लेक आणि आई. आईची झेरॉक्स कॉपीचं होती अनघा. समोरच्या लटकलेल्या आरश्यातून त्यांनी त्या दोघीना पाहयचा प्रयत्न केला. अनघा मोठी झाली तरं अशीचं दिसेल का?मिसं पवारनी कसी जबरदस्त फिगर मेन्टसं केली. इतकं रेखीव नि आखीव शरीर कश्या काय ठेऊ शकल्या असतील त्या? बांधेसूदपणात तारूण्यं जास्तीचं खुलून येते. बांधेसूदपणा सुंदरतेपेक्षा मादकाता अधिक ठळक करतो.त्यांना विचारावं का त्यांच्या हया फिगरचं रहस्यं? ते स्क्ष्मपणे पाहत होते आरश्यात. चोरटया नजरेतले आसुसलेपण कुणी झाकू नाही शकतं.

जो माणूस डायरेक्ट बाईकडं पाहू शकत नाही तो? काय आपली जीभ उचलू शकतो. ते बोलू नाही शकले. पहातच राहीले. अनघाच्या मम्मी बाहेर पहात होत्या. त्यांच लक्ष नव्हतं शेदारकरकडे पण अनघाचं होत ना?अनघा आपल्याला पहाते आहे हे त्यांच्या लक्षात आले तसं ते वरमून गेले. वरमाच्या उमटलेल्या रेषा चेह-यावर थोडयाचं झाकता येतात? बराच वेळ नुसती शांता होती.

वीस मिनिटात ते त्यांच्या स्टॉपला आले. गाडी थांबवली.

“घरी सोडू? “

“नको नको.आम्ही जातो इथून. पाच मिनिटांचा रस्ता फक्त.”

“हे घे.. पुढच्या महीन्यात प्रकाशीत होतं माझं पुसतकं..” एक रंगीत कोर पुस्तकं अनघाच्या हातावर ठेवत ते बोलले. अनघानं ते पुस्तक हातात घेतले. तिची ते लगेच चाळण्याची तयारी.

“अग,थँक्स तर म्हण त्यांना.”

“थॅक्यू सर.” अनघा गोड हासली. त्यांच्या हातात हात दयायाला पण विसरली नाही. अनघाच्या मम्मीनं ते पाहीलं. आता आपल्याला वाटतं तितकी पोरगी लहान राहीलेली नाही. असं इतकं मोकळं नको वागयाला हिने. परक्या पुरुषा बरोबर तर नकोच नको.दोघी छान हासल्या.

“प्रोग्रामला या. ही आमची छोटीशी वाचक खास आंमत्रित आहे. निमंत्रणाचा कॉल करेल मी.मम्मी पप्पाना आणायचं हं तुला बेटा. सौ.पवार येण् कंम्पलसारी हं.”

“आता तुमच्या या छोटयाश्या वाचकांनी ठरवल्यावर तर यावाच लागेल.”

“मम्मी,मी कधीचेच ठरवलं.थँक्सं सर?” अनघा बराच वेळ नुसती पहात राहिली होती. गाडी निघून गेली. दोघी चालू लागल्या. अनघाच्या मम्मीच्य मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते. त्यांनी अनघाला एक एक प्रश्न विचारारयाला सुरूवात केली.

“तुझी कशी ओळाख त्यांची?”

“प्रसिध्द लेखक आहेत ते.आमच्या शाळेच्या गॅदरींगला हे पाहूणे होते या वर्षी.”

“गॅदरींगच्या पाहूण्याशी एवढी ओळख..?”

“त्या मॉलमध्ये हेच होते ना? सईला नि मला मदत केलेले.”

“ते होते हे? मगाच गाडीत असतानी का नाही सांगितलस हे?”

“माझ्या लक्षातच नाही आलं.”

“काय वेडी पोरगीस ग तू? नुसतं फोन वरच आभार मानलेत मी त्यांचे.आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता.” मम्मीचा चेहरा उदास झाला.

“आभार तर मानलेत ना तू? फोन वर काय नि प्रत्यक्ष काय? मला तो प्रसंग आठवाला तरी कसं तरीचं होतं.” अनघाच्या अंगावर शहारे उमटले कारण्‍ अनघाला तो मॉल मधला प्रसंग पुन्हा जसा तसा आठवू लागला. आठवणीच्य भोव-यात सापडली होती. भोव-यातून आपण किती ही ठरवलं तरी बाहेर नाही निघू शकतं.

(पुढील भाग लवकरचं )