Samarpan - 17 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - १७

समर्पण-१७

साथ छुटने की उम्मीद ना थी
इसिलीये रीश्ता अधुरा रह गया।
शायद यही वो एहसास था,
जो हमारा अधुरापन पुरा कर गया।


मला असं वाटत प्रत्येक नात्याचा काही अर्थ काढलाच पाहिजे हे महत्त्वाचं नाही. काही नाती खूप निखळ असतात, तशी नाती स्वार्थासाठी बनत नाहीत, ती फक्त एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी असतात, एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असतात, त्यात आपल्याला काही मिळायला पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते कारण त्यात स्वार्थ नसतो....माझं आणि विक्रमच ही नात असच होतं, आम्हाला एकमेकांकडून काही हवं हे कधीच वाटलं नाही आम्हाला, फक्त हवी होती ती साथ...

खूप वेळ बीचवर बसुन होतो मी आणि विक्रम... एवढ्या वेळेत आम्हाला ना तहान लागली ना भूक....आम्ही जेवलो की नाही याची पण आठवण नव्हती आम्हाला. विक्रम खरच बोलायचा की आम्हाला गप्पा मारण्यासाठी कोणत्याही विषयाची गरज नाही, आम्ही कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकायचो.....आता मात्र दोघेही गप्प झालो, मनात खुप काही आहे पण शब्द सापडत नाहीत आता.....मला असं वाटतं आपण आयुष्यात कोणताही गुंता सोडवू शकतो, पण कोणात गुंतलेलं मन कसं सोडवायच...

बराच वेळ तिथे बसल्यावर विक्रम ला भूक लागली, मला बोलला,

"बर झालं ग सोनू, तुझ्याशी लग्न नाही झालं माझं.."

"का रे? असं का बोलतो?"

"मग नाही तर काय, तू गप्पा मारूनच पोट भरवलं असत माझं, खायला काही दिलंच नसतं"

"तुला इतकी आळशी वाटली का रे मी नालायका?"

"हो मग, तुझं तर मॅगी खाऊन पोट भरत, पण मला भूक लागली आहे ग, चल ना खाऊ काहीतरी"

"ठीक आहे चल, पण मला भूक नाही तूच खाशील, खरं म्हणजे ना मला आजचा वेळ खाण्यात घालवायचा नाही, फक्त तुझ्यासोबत घालवायचा आहे"

"ठीक आहे तर खाणं कॅन्सल करू आपण, तस पण उद्या मी जाणार आहे त्यामुळे दहा दिवस असं निवांत बोलणं होणार नाही तुझ्यासोबत..."

"अरे पण माझ्यासाठी तू का उपाशी राहतो, तू खा ना काहीतरी, मला नाही आवडणार तू असं माझ्यासाठी उपाशी राहिलेलं.."

"मग तुझी ईच्छा मोडणं मला आवडेल का सोनू.."

"विक्रम...नको एवढं कठीन करू माझ्यासाठी की तू नसल्यावर मला यातून निघणं अशक्य होऊन जाईल, मी नाही सावरू शकणार स्वतःला..."

"तू वेडी झालीयेस का? मी कुठे जाणार आहे आणि मी कुठेच गेलो नाहीये सोनू, तुला जेंव्हा जेंव्हा माझी गरज असेल मी असेन तिथे तुझ्याजवळ, दोस्ती की है निभानी तो पडेगी😜"

"हे सगळं बोलणं सोप्प आहे विक्रम, आता आपल्यावर जास्त जबाबदारी नाही आहे त्यामुळे तुझं माझं बोलणं इतकं शक्य होतंय पण वेळ अशीच राहील हे सांगता येत नाही आहे ना, अन त्यात पण विधिलिखित सत्य हे आहे की आपल नातं किती घट्ट असलं तरी मैत्रीचं नात आहे, आपण दोघेही कोणाशी तरी बांधल्या गेलोय, त्यामुळे आपली कितीही ईच्छा असली तरी आपल्याला एकमेकांच्या आधी आपल्या जोडीदाराला महत्त्व द्यायचं आहे....तुझं माझं कितीही प्रेम असेल एकमेकांवर तरी त्या प्रेमात वाटा पडलाय विक्रम...उद्या काही खराब वेळ आली तर तू माझ्याआधी दिशाचाच विचार करशील अन तुला करावाही लागेल आणि मलाही अभयलाच महत्त्व द्यावं लागेल तुझ्याआधी..."

"मी हे नाही बोलणार सोनू की तू चुकीचं बोलत आहेस पण प्रेमात वाटा पडला म्हणजे प्रेम कमी होईल असं वाटतंय का तुला? अस कधीच होत नसत...प्रेम मोजता येत नाही त्यामुळे ते वाटल्याही जात नाही...हं ही गोष्ट मान्य आहे की जबाबदाऱ्या वाढल्यावर कदाचित एवढा वेळ आपण नाही काढू शकणार एकमेकांसाठी पण त्यामुळे आपल्या भावनांवर त्याचा काही परिणाम होणार आहे का? मला एक गोष्ट माहीत आहे मी कुठेही असलों तरी मी तुला नाही विसरू शकत आणि मी दिशाचा आहे, तू अभयची आहेस हे माहिती आहे मला, पण खराब वेळेत फक्त आपला जोडीदारच असायला पाहिजे असं नाही ना, मित्र पण तर साथ देऊच शकतात....अभय इतके अधिकार नक्कीच नाहीत मला पण तुला मानसिक आधार देण्याइतपत तरी मला हक्क देशील ना..."

"काहीपण विक्रम...तुझा हक्क आहे तेवढा, बर जाऊदे खुप दिवस झाले तुझं गाणं च ऐकलं नाही रे, एखादं गाणं म्हणून दाखव ना, माहीत नाही नंतर कधी मिळेल ऐकायला"

"तू तर असं बोलत आहेस आज, जस ही शेवटची भेट आहे आपली...काय झालं आज तुला"

"माहीत नाही रे पण खूप घाबरल्यासारखं होत आहे आज, भीती वाटतं आहे, माहीत नाही का?"

"तुला ना भूक लागली आहे जाडे, अन तुला ते कळत नाही आहे, तुझे सेन्सेस बरोबर काम करत नाहीत😂😂"

"मला चिडवन बंद कर अन गाणं म्हणून दाखव ना प्लिज"

तेरे काँधे से ही लग के यारा बीती उम्र सारी
सोचो कैसी होगी किस्मत हुआ यूँ तो फिर हमारी
सारे आँसू तो हो तेरे और आँखें हो हमारी
तेरे दर्द हमें जो मिले प्यार में तेरे दर्द हमें जो मिले प्यार में
हम खुशी से यूँ भर जाएँगे
हम मर जाएँगे हो ओ..हम मर जाएँगे
मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे
हमें तेरी है कसम, हम संवर जाएँगे

विक्रमचा शब्दनशब्द माझ्या काळजाला भिडत होता, का आज अस वाटत होतं की ही वेळ संपूच नये, हा दिवस संपूच नये, का आज जीव एवढा कासावीस होत होता...मी विक्रमच्या गाण्यात एवढी हरवून गेली होती की मला काही भानच नव्हतं,

"कुठे हरवलात मॅडम? कस वाटलं गाणं माझं?"

"काही नाही...छान म्हटलं गाणं...."

"तुला माहीत आहे सोनू, मी दुसरंच गाणं म्हणणार होतो पण अचानक काय झालं काय माहीत हेच शब्द निघालेत तोंडतुन"

"जा रे फेकू नको, तू किती नौटंकी आहेस मला माहित नाही का?😝😝"

"तुला तर माझी प्रत्येक गोष्ट जोकच वाटते, जा नाही बोलणार मी तुला...😏😏"

"😝😝 कोणीतरी रागवलय....चिडल्यावर क्युट दिसतो रे,"

"😍😍खरंच... मग आता रोज रागवत जाईल मी, न तसही तू आहेस ना मनवायला..."

"नेहमीच नसणार आहे विक्रम...चल नाटकं बंद करा तुझे अन घरी सोड मला खूप उशीर झालाय"

"हो हो नेहमी असच कटव मला, एक चहा सुद्धा पाजला नाही आहेस तू मला तुझ्या हातचा.."

"अरे...त्यात काय एवढं, चल घरी आता चहा बनवते मी..खरंच चल"

"नको ग, मी मजाक करत होतो, अभय नाही घरी साध्या, जेंव्हा त्याची अन माझी ओळख होऊन जाईल ना तेंव्हा येईल तो असताना"

"बापरे, मला घाबरला सिंघम...घाबरू नको या एकांताचा फायदा घेऊन तुला काहीच करणार नाही मी ,🤣🤣"

"😂😂तू खरच आगाऊ झाली आहेस, तुझा काहीच भरोसा नाही आता तू काय करशील, मला लवकर पळायला पाहिजे इथून😜"

"नालायक आहेस नुसता..बर ठीक आहे निघ आता, आणि हो उद्या जातो आहेस ना, काळजी घे, कामावर लक्ष दे, आणि...."

"आणि काय?"

"आणि लवकर ये, खूप कसतरी वाटतंय रे विक्रम, जस काही हातातून निसटतय काहीतरी.."

"तू जास्त विचार करत आहेस सोनू, आणि हे छोट्या छोट्या गोष्टींवर रडणं बंद कर, मला नाही आवडत ग तू रडलेलं..नाहीतर मी जाणार नाही"

"नाही रे मी काही नाराज नाही, माझी काळजी नको करू तू, फक्त लवकर ये.."

"हो ग बाई... तू पण काळजी घे, आणि अभयकडे लक्ष दे..."

"जाऊ मग मी आता?"

"माझी हो म्हणायची वाट बघशील तर कधीच जाऊ शकणार नाहीस सोनू..."

विक्रम किती चुकीचा आहे हे पटवण्यासाठी मला खुप कारण देण्यात आली, तो मला कसा फसवतोय हे पण खूप रंगवून सांगण्यात आलं मला...पण माझ्या मनाला माहीत आहे विक्रम काय आहे, जो व्यक्ती मी घरी एकटी असताना घरात यायला टाळतो, मी त्याच्यासोबत एवढा वेळ घालवूनही मला साधा स्पर्श करायचा टाळतो, तो विक्रम फक्त आणि फक्त माझ्या मनाला स्पर्श करू शकतो...आणि ही गोष्ट आता मला कोणाला पटवून द्यायची गरज वाटत नाही कारण कोणाची मानसिकताच नाही ही निखळ मैत्री समजून घ्यायची......

विक्रम मला घरी सोडून निघून गेला पण माझं मन आज खुपच जड झालं होतं..आज मला वाटलं मी कदाचित विक्रम ला गमावलं आहे...ज्या वक्तीबद्दल आपण जास्त हळवं असतो त्याच्याबद्दल आपल्याला आधीच जाणीव व्हायला लागते काही चुकीचं घडेल याची...असच काहीस माझ्याबाबतीत घडत होतं...
----------------------------------------------------------------

मी माझ्या विचारात घरी आली आणि दरवाजा उघण्यासाठी चावी काढली तर मला जाणवलं दरवाजा उघडाच आहे, मला तर आधी खूप भीती वाटली, पण हिम्मत करून हळूच दरवाजा थोडासा लोटला तर आतमध्ये अभयला बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला, अभय दोन दिवस आधीच आला...कसकाय,

"अभय...घाबरली ना मी, आणि मी सकाळी किती फोन केले तुला माझे फोन का नाही उचलले....तू येतोयेस हे पण नाही सांगितलं मला, आणि असा अचानक येऊन घरात बसला...मला किती भीती वाटली"

मी इतकी बडबड करत होती पण अभय मात्र एक शब्द ही बोलला नाही....तो फक्त माझ्याकडे बघत होता, मी त्याला डोळ्यानेच विचारलं काय झालं तर तो उठून माझ्याकडे आला आणि मला काही कळायच्या आत त्याने मला त्याच्याजवळ खेचून घेतलं आणि
माझ्या कमरेला त्याच्या हातांचा विळखा घातला....मला आज अभयचा स्पर्श, त्याच्या डोळ्यातले भाव खूप भीतीदायक वाटले...एरवी खूप नीटनेटकेपणा जपणारा अभय, आज मात्र अश्या अवस्थेत??..विस्कटलेले केस, डोळे इतके लाल की आगच ओकत होते, पायातले शूज पण नाही काढले अजून...माझ्या एकदम जवळ येत तो मला बोलला,

"बोल न नैना...किती फोन केलेस मला...खूप मिस केलं असशील ना मला, नाही राहवत ना लांब तुला माझ्यापासून... बोल ना"

"अभय....तू ड्रिंक केलयेस?"

"हो केलंय, आता सगळ्या गोष्टी तुला विचारून करायला पाहिजे मी?"

"न..नाही, तस नाही पण तू आधी केलं नाहीस ना म्हणून...सोड मला...तू फ्रेश हो, मी काहीतरी बनवते खायला"

"नको, माझी काही खायची इच्छा नाही, आणि तू तर खाऊनच आली असशील ना बाहेरून? बाय द वे, कुठे गेली होतीस फिरायला, मी नसलो की मज्जा करतेस हां खूप..."

"हो...मी ते बाहेर...म्हणजे तुला फोन केला होता ना त्यासाठी..."

"बर जाऊदे, कुठे गेली होतीस यावर चर्चा नंतर करू आपण, कोणासोबत गेली होती ते सांग..."

"अं..अभय मी ना ते..."

"बर जाऊदे ते पण नंतर बोलू आपण, पूर्ण रात्र आहे ना आपल्याकडे बोलायला, तू थकली असशील नाही? फ्रेश हो नंतर बोलू आपण..."

अभयचे हावभाव आज मला बरोबर वाटत नव्हते, त्याच बोलणं टोचत होत मला, आणि ती चिठ्ठी... अरे हो.. नक्कीच अभय ने ते वाचलं असावं, मला खूप भीती वाटत होती, अभय ज्याप्रकारे बोलत होता, मी भीतभीतच त्याला विचारलं...
"अभय, तू ते चिठ्ठी वाचलीस?"

"कोणती चिठ्ठी? अरे हां... तुझं लव्ह लेटर..नाही वेळ मिळाला वाचायला...खरं म्हणजे ना नैना, ते लेटर वाचायच्या आधीच, मला तुझ्याकडून अस सरप्राईज मिळालं ना की ते वाचायची ईच्छा च झाली नाही.."

"सरप्राईज?? कसलं सरप्राईज?"

"तुला बोललो ना, पूर्ण रात्र आहे बोलायला त्यामुळे थोडंस फ्रेश हो तू, आणि लागलं तर काही खाऊनही घे, मग बोलू आरामात.."

मी गुपचूप त्याच बोलणं मान्य करत माझं आवरून घेतलं पण माझ्या मनातली धडधड काही कमी होत नव्हती, अभयने चिठ्ठी वाचली नाही, आणि काय सरप्राईज बोलत असेल तो....मी विचार केला खूप झालं नैना, आताच जा अन सांग अभयला की विक्रमसोबत बाहेर गेली होती ते...

मी अभयजवळ गेली त्याला सगळं सांगायला तर त्याने मला बेड वर ढकललं, आणि तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला, मला खूप राग आला त्याचा, मी त्याला रागाने बाजूला केलं,

"पागल झालयेस का अभय, ही काय पध्दत आहे..."

"अरे ...काय झालं? नवरा आहे मी तुझा, हक्क आहे माझा...अन तू बोललीस ना मला खूप फोन करत होतीस, म्हणजे नक्कीच मला मिस करत होतीस तू, आठवडा भर सोबत नव्हतो आपण, आता दाखव ना मला, तूला किती आठवण आली माझी ..?"

"अभय...हे बघ अभय, सोड मला प्लिज...आपण शांततेत बोलू उद्या, तू ना सध्या शुध्दीवर नाहीयेस.."
अस बोलून मी त्याला बाजूला करून जायला निघाली तर त्याने माझ्या मनगटाला एवढ्या जोरात पकडुन पिळा दिला कीं मला वेदना व्हायला लागल्या,

"अभय, काय करतो आहेस?? दुखतंय मला प्लिज सोड.."

"चूप नैना, एकदम चूप...एक शब्दही तोंडातून काढायचा नाही, नाहींतर मी विसरून जाईल तू माझी बायको आहेस...आणि काय म्हणाली तू, मी शुध्दीवर नाही...शुद्धीवर तर आज आलोय मी"

अभय इतक्या जोरात ओरडला माझ्यावर की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, त्याचा अवतार पाहून भीतीने माझं अंग थरथरायला लागलं....अभयचे आजचे रंग खूपच भियीदायक होते माझ्यासाठी, नेहमीच शांत डोक्याने विचार करणारा, कोणतीही कृती करताना दहा वेळा विचार करणारा, स्त्रियांचा एवढा आदर करणारा अभय आज माझ्यासोबत असा वागत आहे हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होत...कदाचित माझ्या आयुष्यतल्या वादळाची सुरुवात झाली होती....
------–--------------------------------------------------------

क्रमशः