Salam-e-Ishq - Part-5 books and stories free download online pdf in Marathi

सलाम-ए-इश्क़ - भाग-५

#सलाम-ए-इश्क़

भाग-५

‘आशुडे मला सोडून का आलीस?’ क्लासमध्ये आल्यावर शलाका चिडून आशुला म्हणाली...तिने उत्तर द्यायचं टाळल...... मोठ्या मोठ्या डोळ्यात फक्त पाणी दाटल होत.शलाकाने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला थोपटलं.....

‘ये वेडाबाई....काय झालं? का रडतेस?

मानेनेच ‘काही नाही’ म्हणत तिने डोळे टिपले.

‘आदित्य ने काहीतरी बकवास केली ना? खरं सांग....’

‘नाही ग शले ..मीच मूर्ख आहे ...’ तिचे डोळे पुन्हा भरून आले.

‘अरे यार निट सांग ना काय झालं ?’ काकुळतीला येऊन शलाकाने विचारलं.

‘ माझ्याकडून उगाचं काहीतरी बोललं गेलं आणि आदित्यने त्याच्या काहीतरी वेगळाच अर्थ घेतला गं.....त्याला वाटलं मी त्याच्यावर लक्ष ठेऊन असते....’

‘यार हँडसम तर आहेच तो....पण आता बोललीस तर बोललीस... लेट इट बी....तो काय रोज कॉलेजला येत नाही सो तो काही छळणार नाही तुला...सो विसर तो काय बोलला ’ - टिफिन उघडत शलाका म्हणाली.

‘शले..तुला डबा खायचं सुचतंय ?’ तिच्याकडे रागाने बघत आशु म्हणाली.
‘अरे यार आशु चिल.....काही होणार नाही तो आता सबमिशनलाच उगवेल बघ... डिटेनलिस्टवाली पोरं ही सुधारतात का कधी ?...आणि मी आहे ना तुझी बॉडीगार्ड....’ आशूच्या ब्यागेतून तिचाही डबा काढत ती म्हणाली.

आशूला जरा धीर आला..पण असं मूर्खासारख मात्र आपण बोलायला नको होत ह्याची चुटपूट तिला लागून राहिली.

**************
आदित्य कट्ट्यावर पोहचल्यावर फुल्ल कल्ला झाला....आदित्य त्यांच्या मस्तीत सामील झाला खरा पण मन कुठं थाऱ्यावर होतं ?...काहीतरी झालय आपल्याला नक्की याची सारखी जाणीव होत होती.संध्याकाळी सुजित घरी सोडायला आलेला होता.
स्वप्नशिल्पच्या अंगणातल्या झोपळ्यावर जरावेळ ते टेकले.

‘आद्या...तू त्या ‘सेप्टिपिन’ ला सॉरी म्हटला हे एक नंबर काम केलं तू........’ त्याच्या खांद्यावर एक जोरदार थाप मारत सुजित म्हणाला.

‘सेप्टिपिन?....भाई अब ये क्या...?

‘अब्बे...ज्या फुल्ल ओढणी-बिढणी खांद्यावर सेफ्टीपिन ने पॅक करतात ....माहेरची साडी टाइप रे ..समझ न यार ..समझ !...

बऱ हे सगळ गेलं उडत...सुन...माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे... फुल असाइन्मेंट,प्राक्टिकल,नोटस...सगळं टेन्शन गुल...’ डोळा मारत सुजित म्हणाला.
‘कसला प्लॅन ?’ आदिने गोंधळून विचारलं.

‘सुन भाई... तू फक्त ‘सेप्टिपिन’ला पटवायचं.....बिनधास्त फ्रेंडशिप कर...अजून जास्त जमलं तर...फुल लव-शवचा ड्रामा......मग बघं...पोरगी कशी पटापट सगळी काम करते ते...... असाइन्मेंट,प्राक्टिकल,नोटस...सगळं..भेटेल...ते पण रेडीमेड......आणि....’ त्याच बोलणं अर्धवट तोडत आदि म्हणाला –

‘साल्या खजूर ...डोक्यात डायबेटीस झालाय का?ती तशी नाहीये.... इतके फालतू राडे करायची गरज नाहीये....मला नाही जमणार ’ .

‘ओय होय..... नाही जमणार!!..........किसको बता रहा है भाई तू ..मुझे?....साल्या GF ची हाफ सेंचुरी होईल तुझी ...म्हणे जमणार नाही....विचार कर भावड्या विन-विन सिच्युएशन...’ डोळा मारत सुज्या म्हणाला.

‘ सुज्या सर्किट बिघडलं भाव आता तुझं...... निघ तू आता......किती नीच आहेस रे तू?...आदित्य चिडला होता.

संतापात बॅग खांद्याला लावत सुज्या म्हणाला... ‘ अच्छा साले...अभी में नीच....तू एवी पोरी फिरव...पण आपल्या कामासाठी एक पोरगी टेम्पररी पटव म्हणतो तर....मी नीच....वाह राव ...चल भाई...बराबर है.. दोस्ती-वोस्ती अंधश्रद्धा आहे राव....’

सुजय ताडताड गेटकडे निघाला.त्याला असं चिडून जातांना बघून आदि त्याच्या मागे पळाला...त्याला बॅग धरून खेचत म्हणाला-

‘सुज्या बास का भावा...बरं..चल सॉरी बोलतो ..... फक्त नोटस,असाइन्मेंटसाठी इतका फालतू राडा नाही जमणार पण this time I will manage the submission ...’

‘इट्स ओके यार ...’ चिडून त्याने बाईकला किक मारली आणि तो जोरात निघाला.
‘शीट यार...’ पायाने गेटजवळ पडलेल्या एका खोक्याला जोरात लाथ मारून तो आत गेला.
सुजित मात्र आनंदात होता.त्याला माहित होत..आदित्य कितीही चिडला तरी त्याचं म्हणणं टाळणार नाही.
रात्रीचे ११ वाजले तरी आदिला झोप येत नव्हती....खूप अस्वस्थ,बेचैन..वाटत होत....त्याने गिटार काढली...अपोआप त्याच्याकडून धून वाजवली जात होती ---
“चुरा लिया है तुमने जो दिलको.....”

कितीतरी वेळ ती धून त्याच्या मनाचा ठाव घेत राहिली.त्याचे डोळे नकळत भरून आले...गिटार वाजवायचं थांबवून तो बेडवर पालथा पडला... पण झोप येत नव्हती.
शेवटी न राहवून तो उठला न बेसिन जवळ आला.डोळ्यावर पाण्याचे शिपके मारून त्याने आरश्यात एकवेळ पहिले... हलकेच बोटं केसांमधून फिरवत तो स्वतःशीच बोलत होता.

‘सो....मिस्टर आदित्य शिर्के....द कन्क्लूजन इज....यू आर इन लव विथ हर....पण का ?....एकाच दिवसात?...हे असं एका दिवसात प्रेम होतं? माहित नाही....पण तिच्या त्या डोळ्यात हरवायला होतं...ही अशी इतकी गोड फिलिंग अगोदर नव्हतीच कधी...हे असं हरवून जाणं..इतकं छान का असतं? ह्या बेचैनीत पण एक मजा आहे.....पण तिला काय वाटत? आज माझ्या अटेंडंसकडे तिचं लक्ष होत..का ?

‘यार...... आय एम इन लव...’घरात आहोत हे विसरून मोठ्याने ओरडून तो म्हणाला आणि धाडकन बेडवर जाऊन पडला.शेजारी पडलेल्या गिटारला प्रेमाने जवळ ओढत त्याने किस केलं....मग तो केव्हा झोपला हे त्यालाही समजलं नाही.

आदिला जेव्हा पासून ही जाणीव झाली होती की....त्याला आशु खरच आवडायला लागली आहे आणि कदाचित हेचं प्रेम आहे तेव्हापासून तिला रोज बघावस वाटू लागलं..आता तो लेक्चरसाठी जास्तच उत्सुक असायचा..सुजितच्या रूमवर न जाता सरळ लेक्चरला जायचा.
आदि रोज लेक्चर करतोय म्हणजे शेवटी तो आपला प्लान वर्कआऊट करणारच असं वाटून सुज्या खुश होता. .....इंजिनिरिंग लाईफमध्ये सबमिशन आणि असाईन्मेट म्हणजे ऑक्सिजन...आता आपल्याला कसलीच फिकीर नाही ह्या जोशात तो होता. पण हा सुजितचा एक गैरसमज नवीनच वादळ आणणार होता.

आदिला हे सगळं हवंहवंस वाटू लागलं...ते रोज लवकर येऊन तिची फक्त वाट बघणं,तिची रिक्षा निघेपर्यंत त्या रस्त्यावर त्याची स्पोर्ट रेड कलर करिझ्मा घेऊन उभं राहणं..मित्रांमध्ये असूनही तिला नजरेच्या आड होऊ न देणं...महिन्याभरात...त्याचं सगळं जीवन आशुमय झालं होतं.
आशु आज अबसेन्ट असल्याने आदित्य हिरमुसला होता.एका टेबलवर शलाका एकटीच प्रॅक्टिकल करत होती.तो हिम्मत करून स्टूल घेऊन तिच्या जवळ बसला.

‘हाय शाकाल.....’

‘यार आदित्य ...एक दिवस तरी व्यवस्थितपणे श-ला-का म्हण रे.....’ ती चिडून म्हणाली.

‘ओके ....बाबा ...चिडते काय........मग ...आज एकटीच प्राक्ट करतेय?...भीतभीत त्याने विचारले..

‘सो स्मार्ट आदित्य....सरळ विचार ना....अश्विनी कुठेय म्हणून... आम्हाला कळत नाहीये का तुझं रोज काय चालू आहे ते...पण उगाचच कॉलेजभर चर्चा नको म्हणून गप्प बसलोय हे लक्षात ठेव ?....त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली.

‘ओके ठीकेय ना ...मग.. माहित आहे तर ..आणि तुला तर सांगूच शकतो ...हो आवडते ती मला...म्हणून आता सरळच विचारतो कुठेय आशु..?’

‘आशु......?...ओ ..हेल्लो.....अ-श्वि-नी म्हणायचं....आशु फक्त माझ्यासाठी.....’ सरांना येतांना बघून उगाचच सर्किटचं कनेक्शन करत ती म्हणाली.

सर निघून गेल्यावर आदित्य अगदी विनवणीच्या स्वरात म्हणाला-
‘यार शलाका...तू तरी समजून घे ना...मला नाही कळतये मला काय झालंय पण तिच्याशी बोलावसं वाटतं..पण ती बोलायचं टाळतेच राव ...’
‘आदित्य खरंच नको असा वागू...ती खूप इनोसंट आहे रे.....’

‘शलाका ट्रस्ट मी....आय रिअली लाईक हर...प्लिज हेल्प मी यार....आय विल डू एनिथिंग फॉर हर...तू तिची LIC बेस्टी ना...तिच्याबद्दल थोडं तरी सांग..मला थोडी तरी कळू दे ती...’
त्याच्या डोळ्यातली आर्जवे,चमक यात एक वेगळाच खरेपणा जाणवत होता..हे प्रेमाचे साइड इफेक्टस असतात बहुदा….. प्रेमात असणाऱ्याचे डोळे खोट बोलत नाही....त्याच्या वागण्याला बोलण्यातला बदलही जाणवण्यासारखा होता आणि आदित्य स्वतः कुणी ग्रीक देवता असल्यासारखा राजबिंडा होता. कुणालाही पाहताच क्षणी आवडून जाईल असाच !

..तो गालातल्या गालात हसला की समोरचा कुणीही असो दोन मिनिट ब्लाँक व्हायलाच हवा... ...... डॅशिंग,हँडसम,चार्मिंग,त्याचा जबरदस्त ड्रेसिंग सेन्स,दृष्ट लागावी असं घोटीव शरीर,व्हालीबॉल चा बेस्ट प्लेयर...फिदा करणारा बेफिकीर अटीट्युड त्यात कहर म्हणजे विस्कटलेले सिल्की केस सोबतीला त्याची क्लासी रेड स्पोर्ट कलर करिझ्मा बाईक ....तो बाईकवरून येतांना दिसला तरी कितीतरी मुली तिथंच खल्लास व्हायच्या.नियमित कॉलेज करत असल्यापासून मुली त्याच्याशी सारखं बोलायचा प्रयत्न करायच्या...त्याला आशु आवडते हे एव्हाना बऱ्याच जणांच्या लक्षातही आलं होत.

त्याच्या डोळ्यात दाटलेले केविलवाणे भाव पाहून शलाका लगेच विरघळली.
‘खूप सिंपल आहे रे ती...चाकणच्या पुढे की काय गाव आहे तिचं...कासेगाव....तिचे वडील तिथे शाळेत शिक्षक आहेत,खूप शेती आहे त्यांची.एकत्र कुटुंब आहे.ती आणि तिची बहिण इथे मामाकडे राहतात शिकायला.तिची बहिण सीमा 10TH ला आहे ह्यावर्षी. ती तर खूप हुशार आहे,डॉक्टर बनायचंय तिला..आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो...कमलनयन बजाज गार्डनच्या पुढे समता पार्क हौसिंग सोसायटीमध्ये ....आदि आशुचं AIM खूप वेगळं आहे..तिला समाजासाठी काहीतरी करायचंय ..सोशल इंजिनिरिंग वैगरे ....तिला तिच्या गावातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी करायचंय .. आमच्या सोसायटी जवळच्या फुटपाथवर बऱ्याचवेळा भटकी लोक त्यांचे तंबू टाकून राहतात.ते लोकं सिग्नलवर काहीबाही विकत असतात.ह्या म्याडम त्यांच्या मुलांना जमेल तसं शिकवायला जातात,मलाही जबरदस्ती नेते...यू नो... सारसबागेतल्या गणपतीवर तिची नितांत श्रद्धा आहे...दर चतुर्थीला आम्ही आवर्जून तिथे जातो दर्शन घ्यायला...आदित्य....यु बोथ आर कम्प्लीटली डिफरंट सोल .... तू नको तिचा विचार करू ...’
‘मी काय करू शलाका..मला तिच्याशिवाय काही सुचतच नाहीये......मी फक्त बोलायचा प्रयत्न करतो तरी ती बोलत नाही.एक महिन्यापासून तिला फक्त त्या दिवसासाठी सॉरी म्हणायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही लोकं ऐकूनच नाही घेत ….’ तो त्रासून म्हणाला.
‘ठीक आहे आदित्य मी बोलते तिच्याशी, ती गावी गेलीय...रविवारी येईल.सांगते तिला की एकदा बोल आदित्यशी. ....ओके? चल सर्किट कम्प्लीट करूया का आता ? सर येतील चेक करायला.’
‘Thanks यार शाकालाका.... .फ्रेंड्स ?’ तिच्या पुढे हात करत तो म्हणाला...तिने हॅन्डशेक करत म्हटलं... ‘ओके फ्रेंड्स...’ नाही म्हणायला मैत्रीचा एक नवा अध्याय नकळत सुरु झाला होता.

******

रविवार संध्याकाळी समता पार्क हौसिंग सोसायटीच गार्डन नेहमी पेक्षा जास्त गजबजलेलं असायचं.अश्विनी दुपारीच परतली होती.त्यांची आवडती गोष्ट म्हणजे संध्याकाळी खाली गार्डनमधल्या गप्पा. अश्विनी गावाकडच्या गमती-जमती सांगताना चांगलीच रंगली होती.शलाका नेहमीसारखी बडबड करत नाहीये,शांतपणे ऐकत आहे..हे तिला जाणवत होतं.. तिच्याकडे आश्चर्याने बघत आशु म्हणाली- ‘शले....काय झाल?...आज अगदी शांत शांत...?
‘आशु......एक सांगू ,रागावणार तर नाही ? ...’ शलाकाने भीत भीत विचारले.

‘जाडे बोलतेस का आता ...आज चक्क परमिशन घेऊन बोलतेय...’

‘आशु......तू ....तू....तू ..’

‘ये तू तू तू तू तारा.....बोल ना...’ आशु हसता हसता म्हणाली.

‘आशु ...तू एकदा आदित्यशी बोलशील का?’ शलाका एका दमात बोलली.

अशुच्या चेहऱ्यावरच हसू मावळल..तिने अविश्वासाने शलाकाकडे बघितलं...
‘शले...तू मूर्ख आहेस का?...काय बोलते ते तरी कळतंय का तुला......’

आशुचा हात हातात घेत ती म्हणाली-
‘आशु एकदा बोल ग....त्याला फक्त सॉरी म्हणायचं....and one more thing……’
‘काय .....’ अशुच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उमटलं....

‘He really Likes you baby……’ थोडंस घाबरूनच ती म्हटली.आशूचा चेहरा अगदी कोरा झाला बोलतांना आवाज जड झाला-

‘शले...मी फक्त एक दिवस नव्हते तुझ्यासोबत ..तर तूला लगेच सॉफ्ट कॉर्नर झाला त्याच्याबद्दल..तुला माहित आहे ना ह्या गोष्टीत मला पडायचं नाहीये.!

‘अरे बेबी...असं नाहीये....तो त्या दिवशी सकाळपासूनच माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता ...तेव्हा कुठे प्रक्टिकलला मी बोलले...खूप जेन्युईन वाटला रे तो....’

‘शलू खरंच त्याचा विषय काढू नको गं.....’ तिच्याशी नजर चुकवत ती म्हणाली.

‘पण का आशु?’

‘प्रेमात पडूनही प्रेम नाकारण...प्रेम नाहीये...किंवा प्रेम करायचंच नाहीये,त्या वाटेलाच जायचं नाहीये असं मनाला क्षणोक्षणी बजावण....ह्याच्या सारखी दुसरी वेदना नाहीय ग......’
‘आशु..........तुला सुद्धा...?.....’
चल खूप वेळ झालाय....घरी जाऊया......’ तिचं बोलण मध्येच थांबवत आशु निर्विकारपणे म्हणाली.

***********

आज पहिल्या लेक्चरला बऱ्यापैकी प्रेझेंटी होती...आदित्यला उशीर झाला होता.तो धावत पळत जिना चढून रूम जवळ आला....

‘मे आय कम इन ?’ त्याने त्याच्या दमदार आवाजात विचारलं.

एका क्षणात मनाचा निग्रह तोडून आशुने नकळत दाराकडे पहिले.....डार्क मरून हुडीज,ग्रे जीन्स, ग्रे डेनिम ओपन जॅकेट ...कपाळवर पसरलेले अस्ताव्यस्त केस....तिला उगाचं धडधडायला लागलं...त्या गोड क्षणांमध्ये तिला हे ही जाणवलं नाही शलाका तिला खालून पाय मारतेय...मग एकदम भानावर येत तिने शलाकाकडे पहिले.
एक फ्लर्ट स्माईल देत शलाका तिच्या कानात म्हणली... ‘मॅडम…. बसला तो जागेवर....’

नकळत का असेना पण आपण आदित्यकडे एकटक बघत होतो आणि शलाकाने ही गोड चोरी पकडली ह्या विचाराने ती गोरीमोरी झाली.

मागचे तीन दिवस तीन वर्षासारखे गेल्यावर आशुला बघून आदित्य सुखावला. शॉर्ट ब्रेकमध्ये तो शलाकाकडे आला.
त्याला आलेलं पाहून शलाका म्हटली...
‘आशु मी दोनच मिनटात आले.’ आणि ती निघाली.

‘शलाका थांब .....’ आशुही बेंचच्या बाहेर येणार तसा आदिने तिचा हात पकडला आणि जवळ जात म्हणाला .. ‘आशु फक्त दोन मिनिट दे मला… उगाच वर्गात इशू नको....कारण मी हात तर सोडणार नाही.ती घाबरली,वर्गात तुरळक मुलं होती तरीही ‘कुणी बघायला नको म्हणून ती पुन्हा जागेवर बसली.
तो शलाकाच्या जागेवर बसला ...
‘अश्विनी मला फक्त सॉरी म्हणायचं….त्यादिवशी तुला उगाचं त्रास झाला..पण यार मला असं उगीच अव्हाइड करू नको..निदान क्लास मधल्या इतर मुलांशी बोलते तेवढ मिनिमम तर बोलूच शकतेस ना....I am not that bad boy….’

एवढा वेळ इकडे तिकडे बघत त्याच्याकडे थेट बघणं टाळत असलेल्या आशुने त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून त्याच्याकडे बघितले तर त्याचे गर्द काळे डोळे पुन्हा तिच्या डोळ्यांशी थेट भिडले...तिच्या पापण्यांची नाजूक उघडझाप त्याच्या हृदयाचे ठोके वाढवत होती.दोन क्षण शांततेत गेले ..तशी ती सावरली पुन्हा खाली बघत उगाच बॅग उघडून बुक्स काढत म्हणाली ... ‘ओके आणि मी पण सॉरी त्या दिवसासाठी......’

ब्रेक संपायला आला होता.शलाका आत आली...तिच्या जागेजवळ आल्यावर मिश्किलपणे म्हणाली-

‘उठा मिस्टर इत्यादी शिर्के...इथंच बसायचा बेत दिसतोय?

उठतांना तो हळूच शलाकाच्या कानात म्हणाला-

‘बेत तर कायमचा तिला शेजारी बसवायचा आहे...लवकरच पूर्ण होईल...’

शलाकाने एक फटका मारताच तिला हळूच डोळा मारून तो जागेवर गेला.
आज खूप दिवसांनी त्याला खूप छान वाटत होतं...काहीतरी हरवलेलं अचानक सापडलय आणि ते पुन्हा कधीच हरवायचं नाही....ह्या भावनेने त्याने हे नाजूक क्षण मनात अलगद लपवले.

*********

आदिचा कॉलेज,अभ्यास, प्रॅक्टिकल यातला इंटरेस्ट वाढला होता,सर्किट डिझाईन,प्रोग्रामिंग चांगल जमायला लागलं होत त्यामुळे स्टाफही त्याला ओळखू लागला.
शिर्के परिवार ह्या चांगल्या बदलाने हरखून गेले होते,
अभिने हा बदल कसा,का,कुणामुळे सगळं ओळखलं होतं.टवाळ मित्रांची संगत कमी होऊ लागली होती.
सुजितला अजूनही हा सगळा प्लॅनचा भाग वाटत होता.सबमिशन आणि असाईन्मेटच टेंशन नसल्याने महिनाभरात ....’लेक्चर्स-प्रॅक्टिकल सब अंधश्रद्धा है|’ म्हणत फक्त ८/९ क्लास अटेंड केले होते.

आदित्य,शालका,अश्विनी तिघांनीही कॉलेजच्या NSS टीमचा फॉर्म भरला होता.वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर NSS ची महाविद्यालयीन टीम काम करत होती. त्यामुळे आदित्यला आशुची सामजिक विषयांवरची पकड,जाणीव किती पक्की आहे हे दिसून आलं,जेवढी ती त्याला समजत होती,कळत होती...तो अजूनच तिच्यात गुंतत चालला होता..आणि हे प्रेमाच्या रेशमी धुक्यात हरवणे सापडण्यापेक्षाही हवेहवेसे होते...

सेमिस्टरच्या सगळ्यात अवघड अश्या नेटवर्क थेअरीची असाइन्मेट स्वतः सोडवल्यावर आदिला खूप आनंद झाला.त्या दिवशी दोघीही अब्सेंट होत्या.क्लास भरलेला असूनही एकट वाटत होत.तो सबमिट केलेली असाईन्मेट घ्यायला गेला तेव्हा मॅडम घाईत होत्या आणि त्याच गडबडीत शलाका ऐवजी ‘तुझी असाईन्मेट शितोळेकडे दिली आहे’ असं म्हणून गेल्या.दुसऱ्या दिवशी आदित्यला ताप आल्याने घरी राहावं लागलं.

दुसऱ्या दिवशी-

शलाका आणि आदि कॉलेजला नव्हते.आशु एकटीच बसली होती.तिला एकटीला पाहून लॉन्ग ब्रेक मध्ये पूजा तिच्या शेजारी येऊन बसली.पूजा सुजितचा रूमी गिरीशची सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड.
‘आशु एक विचारू?’ तिने घाबरतच विचारले.
‘बोल ना..’
‘तू वाईट वाटून घेऊ नको पण ....आदिने तुझ्याकडे असाईन्मेट,नोटस काही मागितलय का?’
‘नाही ग..का विचारतेय...?
‘आशु...बघच तू तो नक्की मागेल तुझ्याकडून ...तुला वाईट वाटेल पण .... सुजित एकदा फुल्ल प्यायलेला होता तेव्हा गिरीशला म्हणाला की तुझ्याशी फ्रेंडशिप म्हणजे आदीचा आणि त्याचा प्लॅन आहे.आरामात असाय्न्मेंट,नोटस मिळवायचा.त्यात जर तू आदीच्या प्रोपोजलला हो म्हटलीस तर...विन विन सिच्युएशन...३ वर्षासाठी ....तुला वार्निंग द्यायचं काम मी केलं..कारण गिरीश म्हणाल आशु चांगली मुलगी आहे ह्या आदित्यसारख्या बडे बाप की बिघडी औलादच्या बोलण्यात फसायला नको ....पण तू गिरीश किंवा माझ नाव सांगू नको हा प्लिज..सुजितला माहित नाहीये तो काय बोलून गेला ते’

आशुचा विश्वासच बसत नव्हता पण पूनम बोलतेय ते ही ती खोट म्हणू शकत नव्हती.तिचं डोक गरगरायला लागलं.आदित्य असं वागेल?...
तिने खरं काय आहे हे समजते तोपर्यंत शांत राहायचं ठरवलं आणि हे खरं निघालं तर?...ह्या विचारानेच ती मनातून पार तुटून गेली....

दुसर्या दिवशी अंगात कणकण असतांनाही आदि आईचं न ऐकता कॉलेजला आला होता.इकडे शलाकाने खोदुन खोदुन विचारलं तरी आशु सांगत नव्हती की सकाळ पासून का तिचे डोळे सारखे सारखे भरून येत आहे. शॉर्ट ब्रेकमध्ये मोठ्या आनंदाने आदि त्यांच्या जवळ गेला.त्याला त्याने मेहनतीने,२-३ रेफरन्स बुक्स वापरून सोडवलेल्या असाय्न्मेंटला किती मार्क्स मिळाले हे बघायची उत्सुकता होती. मॅमने सांगितले होते तुझी असाय्न्मेंट शितोळेकडे दिलीय जी अक्चुली शलाकाकडे होती.

मोठ्या आनंदाने तो म्हणाला-

‘अश्विनी नेटवर्कची असाय्न्मेंट दे ना .....’

हे ऐकताच अश्विनी दुखावली गेली.तिचा पारा चढला आणि ती ताडताड क्लासच्या बाहेर गेली.दोन मिनिट आदि,शलाका ...गारचं पडले न मग तिच्या मागे धावत गेले.ती जिन्याने धाडधाड बेसमेंट पार्किंगमध्ये गेली तिचं रडणं थांबतच नव्हतं.. आदि फक्त आपल्याला कामासाठी जवळ करत होता हा विचारच तिला सहन होत नव्हता.ती एका गाडीला टेकून रडायला लागली.
आदि आणि शलाका तिच्याजवळ पोहचल्यावर त्यांना समजेचना ती का रडतेय.शलाकाने तिला शांत केलं.
‘अशुडे काय झालं? स्टॉप क्रायिंग.....’

आदि पूर्ण ब्लाँक झाला होता.

‘शलाका ह्याला इथून प्लिज जायला सांग ....’ ती डोळे पुसत म्हणाली.

‘अरे पण काय झालंय आणि मी काय केलय?....’तो खूप गोंधळला होता.

‘शलाका He used us……आपल्याशी फ्रेंडशिप वैगरे फक्त नाटक होतं..खरी गोष्ट तर ही आहे की ..सुजितला आणि ह्याला सबमिशन सोप्प व्हावं,नोटस मिळाव्या म्हणून हे सारं चाललं होत...बोल ना आदित्य हा विषय झाला नव्हता तुमच्यामध्ये?’

आदित्य पुरता गार पडला होता....ही गोष्ट आशुपर्यंत कशी पोहचली याचं त्याला नवल वाटलं. आणि विषय तर झाला होता पण त्याने तो विषय तिथेच थांबवला होता...

‘आशु लिसन....सुज्या म्हटला होता पण..........’

त्याच बोलणं अर्धवट तोडत संतापाने आशु म्हणाली -‘बघ शलाका....तुला ह्याच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता ना...नाऊ सी.... ही अशी मुलं कधीच सुधारत नाहीत....’

‘आशु लिसन......हे असं काहीच झालं नाहीये....तुझा गैरसमज आहे....I really like ……तो वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात संतापात थरथरत आशुने याच्या गालावर एक जोरदार थापड मारली.......

डोळ्यातून वाहणारी आसवं पुसत म्हणाली..... ‘ Don’t you dare to say that to me Mr. Aadity Shirke…..’

आशुच्या ह्या वागण्याने मात्र आदित्य संतापला....शेजारच्या बाईकला संतापात लाथ मारून तो ताडताड क्लासमध्ये गेला बॅग उचलली आणि तो खाली पार्किंगला आला.
अजूनही त्या दोघी तिथच होत्या.शलाका तिची समजूत घालत होती.त्याने संतापात त्याची बाईक काढली.शलाका घाईने त्याच्या जवळ गेली....समजावणीच्या सुरात म्हणाली-

‘आदित्य प्लिज....तू शांत हो....आता बाईक चालवू नको...आणि प्लिज त्या सुजितला काही बोलायला,विचारायला जाऊ नको...खूप इशू होतील ती अजून डिस्टर्ब होईल......’

‘शलाका....ती डिस्टर्ब होईल,तिला वाईट वाटेल.....माझं काय....एक चान्स तर द्यावा बाजू मांडायला...........समोरच्याचं थोड तरी ऐकाव ना..यार...’...त्याच्याही डोळ्यात पाणी दाटलं होत.

शलाकाने त्याच्या बाईकची चावी काढून घेतली...दोघांनाही समजावतांना शलाकाची दमछाक झाली.

दिवसभर कुणीही कुणाशी बोललं नाही...आदित्यला सुजितला जाब विचारावा वाटत होता पण...उगाच पुन्हा भांडण भरकटायला नको म्हणून तो गप्प बसला.कॉलेज संपल्यावरही आदिने बोलायचा प्रयत्न केला पण अश्विनी काहीही ऐकायला तयार नव्हती...दुसरा दिवस उजाडे पर्यंत ....तिघांचीही तगमग होत राहिली.दुसर्या दिवशी पुन्हा आदिने बोलायचा प्रयत्न केला पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती.तो समोर आला तरी तिच्या डोळ्यात टचकन पाणी येत होत.....दोन दिवस प्रयत्न करूनही ती ऐकत नाही म्हटल्यावर आदित्यचीही सहनशक्ती संपली ... साडेबाराचा लॉन्ग ब्रेक सुरु होता ,तो पुन्हा बोलायला आल्यावर आशु वैतागली–

‘शले...मी घरी जातेय....तू येतेय का?’त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती रागात म्हणाली आणि बॅग घेऊन निघाली सुद्धा.शलाकाही तिच्यासोबत निघाली.त्या स्टॉपवर थांबल्या.आदित्यच्या संतापाचाही कडेलोट झाला.त्याने बाईक काढली आणि तो स्टॉपवर त्यांच्या समोर जाऊन थांबला.

बाईक जस्ट थांबवून तो चिडून शलाकाला म्हणाला-

‘शलाका..हिला आत्ता माझ्या सोबत यायला सांग.....नाहीतर आता इथच बोलायला सांग किंवा मी हिच्या घरी येतो ..पण मला आज बोलायचंच आहे...१ तासात तिला पुन्हा सोडतो ट्रस्ट मी.....’ तो इतका चिडल्यावर आता ऐकणार नाही आणि इथे प्रदर्शन नको म्हणून तिने आशूला म्हटलं... ‘आशु प्लीज जा ना यार ऐकून तर घे........आणि आदि तू प्लीजजज गाडी हळू चालव...’

आदित्य चिडल्यावर कुणाचंच ऐकत नाही आणि कुणालाही घाबरत नाही हे एव्हाना दोघींना माहित झाल असल्याने आशु नाईलाजाने त्याच्या मागे बसली....त्याने गाडी टर्न केली....तो सारसबागेकडे निघाला.गाडी पार्क करून ते बागेत पोहचले तेव्हा गर्दी बरीच कमी होती...बागेच्या उजव्या बाजूला जिथे जस्त लोकं नव्हते तिथल्या बेंचवर बसेपर्यंत त्याने तिच मनगट घट्ट पकडलं होत.ती मागुन चालत होती.तिला जरा खेचून त्याने समोरच्या बेंचवर बसवलं आणि तो संतापात म्हणाला-

‘ ..बोल आता....काय प्रोब्लेम आहे ग तुझा...काय इतकी बालिश वागते..थोड्या थोड्या गोष्टींवर राग धरतेस........कुणीतरी सांगितलं आणि तू ऐकल....स्वतःच डोक काय फक्त परीक्षेला युज करायला राखीव ठेवते का?....नेहमी सगळ्या गोष्टीत तुझीच मनमानी...दुसऱ्याच्या इमोशन्स म्हणजे कचरा ...ग्रो अप आशु ....’

‘काय बोलू सांग ना...तुमचं बोलण झालं हे तू मान्य केलास ना...स्वतः अभ्यास करायला नको...मजा करायला पहिजे आणि मग असं पोरींना हाताशी धरून...सबमिशन कम्प्लीट करायचं मैत्री मग प्रेम मग सगळंच.विन विन सिच्युएशन नाही का?....तुझ्यासारख्या वाया गेलेल्या,एटीकेटी पास,स्मोकर पोराकडून काय अपेक्षा करणार तुझ्यासाठी हा ३ वर्षाचा खेळ असेल पण ह्याने कुणाचं आयुष्य खराब होऊ शकतं ह्याचा विचार कोण करणार?’

तिच्या ह्या अपमानास्पद बोलण्याने आदि दुखावला गेला.

‘काय वाया गेलेला आहे मी.....मी त्या दिवशीच स्मोक करणं सोडून दिल जेव्हा तू म्हटलीस मला त्रास होतो.जे मला ३ वर्षात जमलं नव्हत ते मी एका दिवसात जमवल..सहजच....कारण...कारण..आवडतेस तू मला...आणि खूप जास्त आवडते..रोज कालपेक्षा आज जास्त आवडतेस.....खूप बदल केले मी स्वतःमध्ये तुझ्यासाठी......मला माहित नाही... तुझ्या डोळ्यात पाहिलं की मला काय होत,पण मी स्वतःला विसरून जातो आणि मग तुझ्याशिवाय मला काहीच सुचत नाही.....आणि तुला भेटलो त्या पहिल्या दिवसापासून हे मी फील करतोय..ते तुझ्या डोळ्यात हरवलेले दोन क्षण खूप महागात पडले मला..रात्री झोप येत नाही..आणि दिवसा तू समोर असलीस की काही सुचत नाही ...हा तीन वर्षाचा खेळ नाहीये माझ्यासाठी आता आयुष्यभराचा आहे....सुज्याचा नीचपणा तर त्यानंतरची गोष्ट....
ज्या असाय्न्मेंटची विषयी मी विचारात होतो ना .... ती मी माझीच असाय्न्मेंट मागत होतो, नेटवर्कची.. जी मी स्वतः सोल्व केली होती.तुझ्याही अगोदर...म्याडम म्हटल्या तुझी असाय्न्मेंट चेक करून शितोळेकडे दिलीय.... तू पुढे काही ऐकूनच घेतलं नाही..कुठली असाय्न्मेंट काय....
आता राहिली गोष्ट एटीकेटी पासची....तर मिस शितोळे.....तुला इथे च्यालेंज देतो.....हे बॅकलॉगचे तर सब्जेक्ट काढेलच पण तुझ्यापेक्षा १% जास्त मिळवेल ह्या सेमला .....आणि आजच्या दिवसानंतर माझा तुला काहीही त्रास होणार नाही...पुन्हा कधीच आणि कसलंच एक्सप्लनेशन देणार नाही....हे शेवटचं.... तू साधा मैत्रीमध्ये विश्वास ठेवत नाही तू काय कुणावर प्रेम करणार.....

क्रमशः

©हर्षदा