Vayutsonat - 2 books and stories free download online pdf in Marathi

वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 2

वायुत्सोनात- मीशन गगनयान २
✍रवि सावरकर (नागपूर)

जवळपास दीडशे किलोमीटरचे अंतर कापून झाल्यानंतर बुष्टर रॉकेट गगनयान पासुन वेगळे झाले. रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ने आपले काम चोख बजावले होते.

"खुssर! घुप!.... "किरssर बिप ..बिप बिप!" .... अभिअंश ने माईक सुरू केला....
" हॅलो कंट्रोल रूम मी वायुत्सोनात अभिअंश बोलतोय बुष्टर रॉकेटचे शेप्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत.

"ओके!" ..".वेल डन" कंट्रोल रूम मधून श्रीरामकृष्ण उत्तरले.

गगनयान ने आता पर्यन्त फक्त अर्धच अंतर कापलं , तीनशे किलोमीटर चे अंतर अजुन बाकी होते. भारतीय स्पेस स्टेशन पृथ्वी पासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर लो अर्थ अॅरबिट मधे ताशी वेग २७६०० की.मी. च्या गतिने पृथ्वी भ्रमन करित होत. आणि गगनयान अतिशय वेगाने भारतीय स्पेस स्टेशन कडे झेपावले होते. तर अभिअंश कॉकपिट मधल्या स्क्रीनवर पृथ्वीपासून वाढत असलेल अंतर पाहत होता. जसजसे यान आकाशात झेपावत होते तसतसे स्क्रीन वरील किलोमीटरच्या आकड्यांमध्ये भर पडत होता .

"हॅलो!", " कंट्रोल रूम ,आता मेनइंधन रॉकेट च्या शेप्रषनची वेळ आलेली आहे."
"ओके!"...."अभिअंश मेन इंधन रॉकेट शेप्रेट होत आहे आता तूला सगळे कंट्रोल तुझ्या हाती घ्यावा लागेल"...... असे बोलताच रॉकेट लॉन्चिंग सिस्टम च्या ऑपरेटरने बटन दाबले व तिकडे ते रॉकेट इंजिन गगनयांनपासून विभक्त झाले.

त्याने स्पेसशटलचे क्रायोजेनीक इंजन सुरू करून सगळे कंट्रोल आपल्या हाती घेतले. त्या स्क्रीनवर अॅरबिट मध्ये फिरणारे पुष्कळसे मानवरहित उपग्रह भ्रमण करताना दिसत होते. त्यातच ते भारतीय स्पेस स्टेशन ५०० मीटर लांम्ब व ३०० मिटर रूंद अंडाक्रुती मागुन समोर निमूळते होत गेलेले ऐखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाने पण थोडसे चपटे झालेले. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन ,चायनीज व रशियन स्पेस स्टेशन पेक्षा वेगळे अति आधुनिक यानासारखे जस्ट थोड्या वेळापूर्वीच गगनयानला क्रास करून गेले त्याला पुन्हा पृथ्वीची परिक्रमा करून गगनयान पर्यंत यायला आणखी ९२ मिनिटाच्या कालावधी लागनार होता. इतक्या गतिने ते समोर जात असूनही अंतराळात संथ गतीने वाहत असल्याचा भास अभिअंशला होत होता. त्या स्पेसशटल ने एका ठराविक गतीने पृथ्वीची प्रदक्षिणा मरायला सुरुवात केली व जसं ते स्पेस स्टेशन जवळ येईल तसं त्याच्या गतीबरोबर जुळवून घ्यायचं होतं.

"हॅलो!...अभीअंश!" स्पेस स्टेशन आता जवळ येत आहे तू तुझी गती मॅच करून घे, रोबोटिक अर्म ओपन केलेले आहे.".. कंट्रोल रूम मधून एक ऑपरेटर म्हणाला.

"ओके ! आय ॲम रेडी !" अभिअंश ऊत्तरला.

आता स्पेस स्टेशन जवळ आलं होतं एक सामायिक स्पीडने तो गगनयान समांतर रेषेत स्पेस स्टेशन सोबत उडवत होता ते यान स्पेस स्टेशनच्या रोबोटिक आर्म च्या जवळ जाताच व्याक्युम द्वारे ते यान त्यां आर्मशी जोडले गेले. त्याक्षणी अभिअंशने यानाचे इंजन बंद केले.

"हॅलो ! "कंट्रोल रूम !"... रोबोटिक आर्म यानशी यशस्वी रित्या जोडण्यात आले" अभीअंश म्हणाला

"हुर्रे sss! दॅट्स गुड जॉब! संबंधित ऑपरेटर उत्साहाच्या भरात उद्गारला

आता ते यान स्पेस स्टेशनच्या प्रवेशद्वारा कडे ओढले जाऊ लागले. दोन्ही प्रवेशद्वार एकमेका समोर येताच सेंटर राईज पोझिशन चेक करून लॅचिंग करण्यात आले. व प्रवेशद्वाराच्या बोळातील संपूर्ण हवा अंतरिक्ष मध्ये सोडण्यात आली. हे सगळं रिमोट सेन्सिंग द्वारे पृथ्वी वरील ऑपरेटिंग रूम मधून होत होतं.

अभिअंश माईकवर
"मी आता स्पेस स्टेशनवर जाण्यास तयार आहे "..असे म्हणत अभीअंश ने सीट बेल्ट उघडला व हवेत तरंगत कॉकपिट च्या दरवाजा जवळ जाऊन गोल आकाराचे चक्री घुमऊन लाच ओपन करताच "खट्ट" अश्या आवाजा सरशी तो वरतुळाकार दरवाजा ऊघडता झाला समोर वर्तुळाकृती बोळ होत हवेत तरंगतच तो गगनयानं च्या एक्झिटगेट कडे जाऊ लागला हे सगळे दृश्य पृथ्वीवर कंट्रोल रूममध्ये बसुन सगळे पाहत होते.
एक्झीट गेट सुद्धा काॅकपीटच्या दरवाजा सारखेच उघडण्यात आले , समोर पुन्हां तसच बोळा होत. अभिअंश च काम झालं होतं समोर स्पेस स्टेशनचे प्रवेशद्वार होतं.

"घsssर ,झुsssईप ,खट खट खट खट".... असा आवाजा सरशी प्रवेशद्वार उघडण्यात आल. समोर तसच एक बोळ होतं तो हवेत तरंगतच त्या दुसऱ्या दाराजवळ पोहोचला तिकडे ते प्रवेश द्वार बंद झाले. आता हा गेट त्यालाच उघडायचा होता म्हणून दरवाजाच्या सेंटरला असलेले ते गोल चक्र त्याने फिरवुन लॅच हॅन्डल वरती करून दरवाजा ऊघडताच त्याचे पाय खाली त्या प्लेटफार्म वर टेकले, कारन स्पेस स्टेशन वर कुत्रीम गुरुत्वाकर्षणाची सोय करण्यात आली होती. मिशन फत्ते झाले होतं

अभिअंश चे भारतीय स्पेस स्टेशनवर पहिलं पाऊल पडताच पृथ्वीवर ऑपरेटिंग रूम मध्ये टाळ्यांच्या कडकडाट झाला. सगळे एकमेकांना शुभेच्छा देत होते. एकमेकांना आलिंगन देत होते सगळ्यांची छाती गर्वाने फुललेली होती. मिशन यशस्वी झालं होतं. इस्रोने पुन्हा एक नवीन कीर्तिमान स्थापित केल होत. आपल्या स्वदेशी बनावटीच्या स्वदेशी यानामध्ये स्वदेशी स्पेस स्टेशनवर मानवाला यशस्वीरित्या पाठवलं होतं. भारत जगातला चौथा देश व स्वनिर्मित स्पेसस्टेशन अंतरिक्ष मध्ये प्रस्थापित करणारा तिसरा देश झाला होता. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदी अश्रूमिश्रित उल्हास होता त्यातल्याच एका जणाने म्हटले.
"भारत ssss माता की " .... जय! सगळे एकदम उद्गारले

"भारत माता कि sssss जय!"

"भारत माता कि sssss जय!

तो जयघोष पृथ्वीवरील त्या ऑपरेटिंग रूम मध्ये एक सुरात दुमदुमत होता. अभिअंश च्या कानावर पडलेला तो आवाज पाच-पन्नास लोकांचा नसून एकशे तीस करोड भारत वासियांचा असल्यासारखे भासले, त्याचीही छाती आता गर्वाने फुलून गेली होती. डोळ्यातून आनंदी अश्रू वाहत होते. आतापर्यंत गुप्त असलेले हे मिशन संपूर्ण जगाला माहित होणार होते आणि त्याचे नाव इतिहासाच्या अध्यायामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार होते. अंतराळात जाण्याचे स्वप्न त्याचे आज पूर्ण झाले होते. हात जोडून गुडघे टेकून स्पेसस्टेशनच्या छताकडे पाहत त्याने ईश्वराचे मनोमन चिंतन करून धन्यवाद म्हटले व तोही त्यांच्या सोबत जयघोष करू लागला ......

"भारत माता कि जय...!"

"भारत माता कि जय ...!"

"भारत माता कि जय....!"

"आता मिशन फत्ते झालं!; याची खबर सगळ्या जगाला कळू द्या !" मिस्टर असिफ लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स बोलवा!; "आपल्या माननीय पंतप्रधानांना या जगाला काहीतरी सुचवायचे"!आहे " श्रीरामकृष्णानांनी त्यांचे सेक्रेटरी आसिफ खान यांना आदेश दिला.
त्यासरशी आसिफ खान पटापट मीडियाला फोन करून प्रेस कॉन्फरन्स करण्याची सूचना दिली.
हे माहिती मिळताच सगळ्या चॅनल्सवर एकच न्यूज झळकायला लागली.
"ब्रेकिंग न्यूज, ....ब्रेकिंग न्यूज,...ब्रेकिंग न्यूज!!!"
माननीय प्रधानमंत्री अब कुछ ही देर में देश को संबोधित करने वाले है।
हे ऐकताच संपूर्ण देशवासीयांच्या मनामध्ये धडकी भरली कारण आता काय? नोटबंदी नंतर प्रधानमंत्री एकावर एक सरप्राईज देत होते. देशातील लोक उत्साहित व चिंतेत होते .
इकडे प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली प्रधानमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन फुलांची मला टाकून मंचावर स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री आपल्या नेहमीच्याच तोऱ्यात सगळ्यांशी शेख हॅन्ड घेऊन माइक वर आले. नेहमीप्रमाणेच एक नजर तिथे बसलेल्या सगळ्या पत्रकारांवरून फिरवून माननीय प्रधानमंत्री यांनी बोलायला सुरुवात केली

"मेरे प्यारे भाईयो और बहनों मै भारत का प्रधानमंत्री एकसै तीस करोड देश वासियों को संबंधित करणा चाहता हु ।"

एवढं बोलून ते शांत झाले आणि पुन्हा त्यांची नजर त्या रूम मध्ये सगळ्यांवरून फिरू लागली . या एका मिनिटाच्या शांततेमध्ये इथे जमलेल्या पत्रकार व टीव्हीवर बघणाऱ्या नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले की आता काय बोलतील ?आता आणखी काय नवीन आणल यांनी?

त्या एक मिनिटाच्या शांततेनंतर प्रधानमंत्री पुन्हा बोलू लागले

" मेरे प्यारे भाईयो और बहनों मै आप सभी से कहना चाहता हु; की आज हमने एक बहुत बडी उपलब्धि को हासिल किया है। आज हमने एक नया ईतिहास रचा है ।" असे म्हणून मीशन गगनयान ची संपूर्ण माहिती त्या भाषणात दिली.
ही खबर संपूर्ण जगभरात पसरली टीव्ही चॅनल वाले काही अनिमेशन करून काही इस्रो कडून मिळालेल्या व्हिडीओ न्यूज चैनल वर प्रसारित करून मिशन कसे सुरू झाले व कसे यशस्वी झाले ह्याचे विवरण करीत होते. एका चॅनलवर तो अँकर ॲनिमेशन चित्र दाखवून हातात माईक घेऊन आडवेतिडवे हातवारे करून म्हणत होता, "आप देख सकते किस तरह इस्रोने ए मिशन गुप्त रखके" .....इतक म्हणताच अचानक टीव्ही बंद झाला. काय झालं कोणाला कळले नाही. बोलता-बोलता नेटवर्क कवरेज गायब झालं. युट्युब वर व्हिडिओ पाहणाऱ्यांचे व्हिडिओ बफरिंग करू लागले. मोबाईलवर बोलणार्‍यांचे संभाषण कट झाले. काय झाले कोणालाच कळत नव्हते एअरपोर्ट शि असलेले विमानाचे संपर्क तुटला. शेअर मार्केट अचानक बंद पडले. सगळीकडे हाहाकार माजला काय होतय कुणालाच काही समजत नव्हते.

"ज्झ्विsssई ...बुssम ..भडाम !"
जमीनीवरून सुटलेल्या मिसाइल ने अंतराळात फिरणाऱ्या सॅटेलाइट वर मारा करताच विस्फोटा सरशी प्रकाश ऊत्पन्न झाला व तो विझलाही.
ते सॅटेलाइट त्या मिसाइलचे तुकडे कुठे नाहिशे झाले माहीत नाही, पण सगळेच्या सगळे सेटलाईट त्या ठिकाणी अतिशय वेगाने एकवटून गायब होऊ लागले. हळूहळू आता तिथे एक काळा टिपका निर्माण झाला. त्या टिपक्या च्या सानिद्ध्यात येणारी प्रत्तेक वस्तु अजगराने ओढलेल्या भक्षासारखी ओढली जाऊ लागली. त्या हवाविरहित अंतराळात गुरूत्वाकर्शणाच एक वादळ निर्माण होऊन त्याच्या सानीद्धात आलेल्या प्रत्तेक वस्तूला गीळंक्रृत करून. त्याचा आकार वाढवतच होता ते एक कृष्णविवर होत. (ब्लॅक होल) ते कसे निर्माण झाले? काय कारण होते त्याला?
*****
अभिअंश ने स्पेसस्टेशनचे दार बंद केले तो केशरीरंगाचा स्पेस सुट उतरवून त्या दरवाजा च्या बाजुला असलेल्या काचेच्या कपाटात ठेवले. ते ऐक वतृळाकृत दालन होत, उजव्या बाजूला वैज्ञानिकांना रहण्यासाठी जवळपास विसपंचविस खोल्या हेत्या. डाव्या बाजूला असलेल्या स्टोअर रूम मध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू व जीवनाशक वस्तू होत्या, त्याच्या बाजूलाच एक वाचनालय, जिमखाना व टुलरूम होती जी विविध टुल्स व विविध मशीनी सुट्या भागांनी परीपुर्ण होती. हे सगळ तीथे लिहीलेल्या नावाच्या पाटी (नेमप्लेट) वरन कळत होत. समोरच एक कॅरीडोर होत. ते कॅरीडोर स्पेस स्टेशनच्या कॅकपीट जवळ जाउन संम्पत होतं.

त्याने आता काॅकपीट मधे प्रवेश केला त्या कॉकपिट ची रचना गगनयान सारखीच होती फक्त पॅनल वरील उपकरणात भर पडली होती. आपल्या गळ्यातली लॉकेट म्हणून लटकवलेली चावी त्याने काढली व पॅनलवर असलेल्या कीहोलमध्ये लावून फिरवताच, पॅनलवर असलेल्या प्रज्वलीत इंडीकेशन मधे भर पडली. आता त्या स्पेस-स्टेशनचे सगळे कंट्रोल त्याच्या हाती आले. स्क्रीनवर ऐका बाजुला पृथ्वीवरील त्या कॉन्फरन्स रूम मधील दृश्य दिसत होते तर एका बाजूला त्या अंतराळात फिरणारे उपग्रह दिसत होते. हे सगळ पाहत असतानाच

"ह्रुssप ह्रुsssप ह्रुssssप" ...हुटर चा आवाज त्या कॅकपीट मधे धुमला.
स्क्रीनवर मेसेज झळकलायला लागला.
"अलर्ट!"
" अलर्ट !"
सोबतच स्पेस शटल च्या मागच्या भागाच्या दृषःत कसलातरी विस्फोट होऊन तो प्रकाश अंधारात गडप होउन अंतराळात फिरणारे सॅटेलाइट त्या ठिकाणी गायब होतानी दिसले. तो सावध झाला ते स्पेस स्टेशन कंम्पवत झाले.
क्र्हु ssप!......क्र्हुsssप!!. क्र्हुssssप !.....पुन्हा हुटर चा आवाज
"अलर्ट.... वो. एच. ई. ०००१ "
"अलर्ट ... वो .व्ही .ऐ. ०००४"
"अलर्ट ... वो .व्ही. ०००९"
( वोव्हर हिट इंजन, वोव्हर व्होल्टेज, वोव्हर अॅम्पीअर )असे एका वर एक मॅसेज झडकायला लागेल काय होत आहे त्याला समजत नव्हते .
"हॅलो हॅलो कंट्रोल रूम!"
"धिस इज व्ही 1( वायुत्सोनात).... हॅलो..... हॅलो!".... तो पृथ्वीशी संम्पर्क साधन्याचा प्रयत्न करीत होता पण सगळ व्यर्थ ते स्पेस-स्टेशन त्या अनंत अंधाऱ्या वेटोळ्यात ओढले जात होते. त्याने यानाची गती वाढवीण्याचा प्रयत्न करताच. "स्झुइंsssग घुsssडुप ".....आवाजा सरशी त्याच्या डोळ्यापुढे अंधार दाटला संम्पुर्ण यान अंधारल होत.
त्या अंतराळातील एकूनऐक वस्तू सोबत आपल भारतीय स्पेस-स्टेशन सुद्धा चक्रिवादळात फिरणाऱ्या वस्तू सारखे फिरत, एक मेकावर आदळत, मुखापासुन बुडापर्यंत जाऊन नाहिशे होत होते. ते कुठे भिरकावले जाणार माहीत नाही या पृथ्वीच्या आवारात की सैरमंडलात कि या ब्र्म्हांडाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी. सुरवात झाली होती एका अनंत अंधाऱ्या यात्रेला. त्या निर्जीव धातुंच्या तुकड्यांन सोबत एक हाडामासाचा मनुष्य ही होता आणि तो होता ........"अभिअंश!!!
क्रमशः...
✍ रवि सावरकर
8121129889
www.savarkarstory.com
नमस्कार मीत्रांनो 🙏😊
कथा वाचुन झाल्यावर अभिप्राय नक्की द्या काही चुकल्यास बिनधास्त सांगा ......धन्यवाद 😊