Bandh hrudayache hrudayashi - 4 books and stories free download online pdf in Marathi

बंध हृदयाचे हृदयाशी!..... - भाग(4)




💞 बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(4) 💞


मोनाचे विचारचक्र सुरू असते....यातच ती जिना चढून 2ऱ्या मजल्यावर घरी कधी पोहचते,तीच तिला कळत नाही...बेल वाजवते, तिची आई दरवाजा उघडते....

" मम्मी,पटकन जेवण गरम कर, मला खूप भूक लागलीय!..."मोना म्हणते...आणि फ्रेश व्हायला जाते...

" अगं, पण आज काय काय केलंस?...आणि.ज्याचं operationतुम्ही आता केलं,तो मुलगा कसा आहे आता?...बरा आहे का?..."मम्मी विचारते...

" सगळं सांगते,पण जेवल्यावर!...पोटात कावळे ओरडत आहे,मम्मा!...पहिले जेवण,plzz!...."मोना म्हणते...

" ok,जेव,मग सांग..."

मोना पोटभर जेवते....आणि मग आईला घडलेलं सगळं सांगते....आई सगळं ऐकून नवल वाटतं, ..

"बरं झालं बाई,operation व्यवस्थित पार पडले ते!....आता देव करो आणि तो मुलगा लवकर शुद्धीत येवो,म्हणजे झालं!...आणि त्या डॉक्टर ऋषीची कमालच आहे म्हणायची!....एवढी रिस्क घेऊन पेशंटला बरं करतोय!...देव भलं करो अशा माणसाचं!..."मोनाची आई म्हणते...

" हो,बघ ना,ते डॉक्टर ऋषी खुप मेहनती आणि हुशार आहेत,अस वाटतं!...आज ज्या पद्धतीने त्यांनी तो पेशंट handle केला,that's so amazing!....एक क्षण मलाही वाटलं की आता काय होईल?... but he is so talented....त्यांनी हे सगळं व्यवस्थित manage केलं,experience खूप असावा त्यांचा!...."मोना म्हणाली..

" हो गं बाई,असंच असेल कदाचित!...चल तू पण थकली असशील ना?..,जा झोप आता,सकाळी लवकर कुठे जायचे आहे का?..."मम्मी म्हणते...

" हो,आता operation झालेल्या मुलाला एकदा बघून येईन म्हणते!..."मोना सांगते....

" हो,नक्की बघ,नाहीतर तो कसा आहे,याची तुलाही धाकधूक राहील!..."मम्मी म्हणते...

मोनाची आई झोपायला निघून गेली...मोनाही थकल्यामुळे लवकर झोपली....सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना!...म्हणून!...

----------------///-------------///----------------///----------------

दुसऱ्या दिवशी सकाळी मोना लवकर उठली....पटापट सगळं आवरून हॉस्पिटलमध्ये जायला निघाली....ती डॉक्टर ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली.....डॉक्टर आदित्य आलेले होते म्हणून ती सरळ त्यांनाच भेटायला म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेली....

डॉक्टर आदित्य मोनाला पाहून आश्चर्यकारक नजरेने म्हणाले...

" ओहह,welcome, very very good morning, आज सकाळी कसं काय इकडे येणं केलंत?...."

"डॉक्टर आदी,very good morning, तो कालचा पेशंट, काय नावं त्याचं?...विवेक.... कसा आहे तो?...शुद्धीत आला का? .." मोना विचारते...

" या बसा,नुसतं आदी म्हटलं तरी चालेल बरं, we are friends now, आणि तो ठीक आहे आता ,पूर्ण शुद्धीत नाही आला,पण थोड्याच वेळात येईल तो शुद्धीवर!... अस डॉक्टर ऋषी आताच मला सांगून फ्रेश व्हायला घरी गेले आहेत,रात्रभर इथेच होते,त्यांच्याच observation खाली होता तो!...."आदित्य मोनाला म्हणतो....

" मलाही मोना म्हणालात तरी चालेल बरं का!...माझे सगळे friends मला मोना म्हणतात...बरं झालं चला,पेशंट ठीक आहे म्हंटल्यावर जीवात जीव आला माझ्या!...पेशंट ठीक तर सगळं ठीक!..."मोना म्हणते....

" तू ही फार एकनिष्ठ दिसते कामाबद्दल!...."आदित्य म्हणतो.

" हो असायलाच हवं ना!...."मोना म्हणाली.

"चला मग friendship ची सुरुवात एक कप कॉफीने करूयात?..." आदित्य म्हणतो.

" हो नक्की!..."मोना म्हणते....जरा विचार करून पुन्हा बोलते....

" डॉ.ऋषी नेहमी गप्प असतात का?..म्हणजे शांत स्वभाव आहे का?...त्यांच्या घरी कोण कोण असतं?...म्हणजे आई,वहिनी किंवा बहीण कोणीतरी असेल ना?..."

" हम्म,तस जास्त काही मला त्यांच्याबद्दल माहिती नाही,पण इतकं माहिती आहे की त्यांना आई नाही,मोठा भाऊ आणि वहिनी आहेत आणि ....."

" आणि काय?...लग्न....लग्न झालंय का त्यांचं?..."

" का गं ,एकदम लग्नविषयी विचारते आहेस,काय क्रश वगैरे आहे का तुझा त्यांच्यावर?....हा हा हा😂😂मी आपलं सहजच विचारलं,dont mind हम्म!...."

" नाही रे आदी,सहजच विचारलं!...."

" मला याबद्दल काही माहिती नाही, मिळाली तर तुला नक्की सांगेन हम्म!...."

दोघेही हसतात,इतक्यात डॉक्टर ऋषी तिथे येतात,म्हणतात," काय रे! आज काय चाललंय?....छान मैत्री झाली वाटतं तुमची?....आणि डॉ. मोनिका आज सकाळीच तुम्ही इकडे?...काय विशेष?...any problem?...."

" No, nothing, सहजच त्या कालच्या पेशंटला पाहायला आले होते, आदीने सांगितले की तो बरा आहे म्हणुन!..." मोना.

" बसा ना,तुम्ही सुध्दा कॉफी घ्या,फ्रेश वाटेल!..."मोना ऋषीला म्हणते.

हो म्हणत,ऋषी सुद्धा त्यांना जॉईन होतो,मग त्यांचे बोलणं चालू होते....

" हो, He is out of danger now, येईल लवकर शुद्धीवर,छोटे छोटे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्याशी निगडित, पण होतील ते ही ठीक लवकरच!..."ऋषी त्या दोघांना सांगतो...

इतक्यात सिस्टर डॉक्टर ऋषीला हाक मारते, सगळे धावतच त्या मुलाच्या रूमकडे जातात.....

त्या मुलाला शुद्ध आलेली असते त्याची आई त्याच्याजवळ बसलेली असते.... ते त्या बाईला म्हणजे त्या मुलाच्या आईला बाहेर जायला सांगतात........डॉक्टर ऋषी लगेच त्याला चेक करतात...काही सूचना सिस्टरला सांगतात,औषध कोणती द्यायची आणि कधी द्यायची, असं सगळं सांगतात,त्याला एक इंजेक्शन देतात,सलाईन change करतात...आणि बाहेर येतात...

त्या बाईला म्हणजे विवेकच्या आईला म्हणतात," हे बघा, तो आता ठीक आहे, पण त्याला पूर्ण बरा व्हायला 8,10,दिवस लागतील,अशक्तपणा खूप आलाय...त्यामुळे तुम्हाला किमान 10 दिवस इथेच थांबावे लागेल....कालपासून तुम्ही इथेच आहात, थोडा वेळ घरी जा,काही काम असेल तर करून या,तयारी करा 10 दिवस इथे राहण्याची...आणि काळजी घ्या त्याची!...तसे आम्ही आहोतच,सगळं सांगितलं आहे मी सिस्टरला,काही अडचण आली तर मला भेटा...."

विवेकची आई डॉक्टरच्या पाया पडते...म्हणते..." डाक्टर, तुमि व्हतात,म्हणून माझा पोरगा वाचला,नाहीतर तो दुसरा डाक्टर म्हणला की नाय वाचणार म्हणून!....."जोरात रडू लागते....

" आता काळजी घ्या त्याची,होईल तो बरा लवकरच!..."
डॉक्टर ऋषी म्हणतात.....

मोना,आदित्य सगळे ऋषीकडे पाहत असतात...ऋषी आदित्यला पेशंट विवेक बद्दल काही सूचना देतो आणि मग तिघे येऊन आदित्यच्या केबिनला कॉफी घेण्यासाठी जातात....

" जीवन खुप अनमोल आहे,म्हणून एक एक मिनिटं आपण दुसऱ्यांना बरं करण्यासाठी घालवला पाहिजे!..." ऋषी म्हणतो.

मोना म्हणते...." म्हणजे स्वतः नाही जगायचं?...स्वतः साठी कधीतरी जगावं माणसानं!....म्हणजे सेवा करणं सोडायचं नाही पण.....

🌹" कुछ पल खुद के लिए जिया करो,
मौत खडी हैं इंतजार में तेरे,
हसीं से उसे रुसवा किया करो!..." 🌹

" अरे वाह!...तुलाही जमत की काव्य!...भारीच आहे!...तुझं आणि ऋषी सरांचं भारी जमेल मग!..."आदित्य म्हणतो....

" नाही रे,काहीतरीच तुझं!...ते आपलं सहजच!..."मोनाला बोलायला काही सुचत नाही कारण आज पहिल्यांदा तिच्या तोंडून काव्य निघाल्यामुळे तिला स्वतः आश्चर्य वाटते..

" खरंच, खूप छान!...लिहता का तुम्ही?..."ऋषी म्हणतो...

" तुम्ही मला मोनाच म्हणा,तसही सगळे मला मोना म्हणतात...आणि आता मी इथे अधूनमधून येणारच आहे त्यामुळे मी आता इथलीच आहे...मग फ्रेंड्स मध्ये अरे कारेच बरं वाटतं.... दुसरी गोष्ट मी काही लिहत नाही,तुम्ही छान लिहता....एखादं छान काव्य म्हणा ना,पण आता प्रेम या विषयावर हवं...."मोना...

" अरे, आता कुठे ?..आता नको आणि हा काय विषय?...नको!..." ऋषी म्हणतो....

" ok, तुम्ही आम्हाला frds थोडे मानता, तुम्ही का म्हणाल?...तुम्ही तर फार मोठे कवी!.... फक्त काव्यसमेंलनात काव्य म्हणता ना!. " मोना म्हणते...

" हो सर,एकदम बरोबर आहे मोनाच!..., असच आहे" आदित्य म्हणतो...

"अरे,असं काहीच नाही,तुम्ही दोघ माझे आता चांगले मित्र आहात...." थोडं विचार करून ऋषी पुन्हा बोलतो....", अ....प्रेम म्हणजे.....हम्मम....फार पूर्वी केली होती ही कविता!....जुनी आहे पण म्हणतो.....कविता नवी की जुनी यापेक्षा त्यातले भाव महत्त्वाचे!....नाही का?..."

" हम्मम,ते काय म्हणतात ना!...अ... इर्शाद, इर्षाद!...."
मोना म्हणते,आदित्य तिच्याकडे पाहून हसतो.... ऋषी म्हणतो....

------–-----///--------------////--------------///------------------

💓 प्रेम 💓

प्रेम दोघांनी करायचं असतं,
प्रेम दोघांनी निभवायचं असतं,
एकमेकांना विसरता येतं नसेल
तर आठवायचं असतं (१)

एकमेकांत पटत नसेल,
तर जमून घ्यायचं असतं,
हे तडजोडीचं नातं असतं,
आपल्याना आपणच सांभाळायचं असतं(२)

सारं काही डोळ्यातून समजायचं असतं,
ओठ न उघडता खूप काही बोलायचं असतं,
असं असूनही गप्प बसायच असतं,
कळुनही न कळल्यासारखं वागायचं असतं(३)

.येथे भांडूनही गोड बोलायचं असतं,
गोड बोलतानाही भांडायचं असतं,
भांडणं विसरून बोलायचं असतं,
मर्यादा सांभाळून वागायचं असतं(४)

भेटता येत नाही म्हणून तडपायचं असतं,
भेटल्यावर पुन्हा दूर जायचं असतं,
अस सगळेकही,
मिलनापर्यंत करायचं असतं(५)

---------------///-------------////---------------///-----------------

ऋषी कविता म्हटल्यावर एकदम कुठल्यातरी विचारात हरवतो.....आदित्य आणि मोना टाळ्या वाजवतात...

मोना म्हणते...." बघ आदी,याला म्हणतात काव्य!.....मी तर असच काहीतरी म्हणाले मगाशी!.....काव्य तर याला म्हणतात...हो ना,ऋषी सर!...."

पण ऋषी सर तर कुठे हरवले असतात कुणास ठाऊक?...
आदित्य आणि मोना दोघेही त्यांच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहतात....

" कौनसी उलझन से वो घिरा हैं,
चांद से मुखडे पर सन्नाटा खडा हैं!...."
( क्रमशः )

💞 प्रिया..💞

(आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे,त्यामुळे कथा पुढे जाण्यास मदत होते....)