Ti ratra - 10 - last part books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 10 - उत्कर्षबिंदू - अंतिम भाग

पाच वर्षानंतर . . .
रात्रीचे बारा वाजले होते. मानसी झोपली होती, दिवसभर घर आवरून दमली होती म्हणून एका झटक्यात झोप आली होती, श्रेयस कॉम्प्युटर वर काहीतरी पाहत होता, त्यानंतर कॉम्प्युटर तसाच सोडून तो हळु हळु रूम मध्ये गेला. अंधार होता, त्याने मेणबत्ती पेटवली तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर त्याने किस केलं, ती खूप गाढ झोपेत होती. तिला त्याने स्पर्श केला ते जाणवले नाही. तिला थोड हलवून त्याने तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. तिने डोळे उघडले.
श्रेयस, “Happy Anniversary मानसी”
ती हळुवार उठून बेड वर बसली, श्रेयस च्या हातात केक होता. तिने तो केक उचलून टेबल वर ठेवला आणि दोघं हात श्रेयस च्या दिशेने करून,
ती, “Happy Anniversary”
श्रेयस तिच्या जवळ गेला, तिने त्याला जवळ करून घट्ट मिठी मारली, मिठीतच गालाचे, कपाळाचे, ओठांचे मुके घेत होती. मन भरेपर्यंत तिने त्याला सोडलं नाही. त्यानंतर ती म्हणाली
“Thank You, तू आहे म्हणून मी आहे, तू नाही तर मी काहीच नाही.”
ती खूप मोठ्याने बोलली म्हणून श्रेयस तिला बोलला, “शशश हळु परी उठेल आणि उठली तर पुन्हा झोपणार नाही.”
त्यानंतर दोघेही झोपले.
सकाळी श्रेयसच ऑफिस असल्यामुळे ती लवकरच उठली. सर्व तयारी करून तिने श्रेयस च्या वेळेवर त्याला उठवलं आणि सर्व तयारी करून तो ऑफिस ला रवाना झाला. ती बेडरूममध्ये गेली, झोपेत असलेल्या मुलीला तिने उठवले सर्व तयारी करून शाळेला पाठवले. ती एकटीच होती, बरोबर दुपारच्या वेळी दरवाजा वाजला. बाहेर एक माणूस उभा होता. तो आणि ती आधी एका ऑफिस मध्ये काम करत होते, पण त्यांचं दोघांचं प्रकरण तिच्या नवऱ्याला समजल्यावर त्याने घटस्फोट दिला होता. मानसी ने त्याला मध्ये घेतले आणि त्याने तिला जवळ घेतले आणि खूप जोरात मिठी मारली. तिच्या शरीराला नको तिथे स्पर्श करत होता, पण ती त्याला अजिबात अडवत नव्हती. ती पण त्याच्या बरोबर वाहत होती. त्या दोघांमध्ये जे नको व्हायला होत तेच झालं, ते दोघेही एकमेकांत विलीन झाले. दोघंही आता शारीरिक संबंधांनंतर दोन तास झोपून होते. अडीच ची वेळ होती. ती उठली आणि त्याला पण उठवले,
ती, “तू हो पुढे, मी तुला स्टेशन वर भेटते. आता श्रेयस माझ्या मध्ये खूप अडकला आहे. एक वर्ष झालं लग्नाला, मी नाही जास्त राहू शकत, आजचं निघुया आपण.”
तो, “चालेल, मी सहा पर्यंत भेटतो तुला. श्रेयस आणि तुझी मुलगी किती पर्यंत येतात.”
ती चिडून, “तुला माहिती आहे परी माझी मुलगी नाही, श्रेयस सात ला येतो आणि ती साडेपाच पर्यंत येते पण मी ती येण्याआधीच निघणार”
त्यानंतर तो तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर तिने सर्व कपडे भरायला सुरुवात केली. बॅग भरल्यावर ती अंघोळ करायला गेली. त्यानंतर सर्व तयारी करून ती दरवाज्यावर गेली, तेव्हा चार वाजले होते. अचानक तिला काहीतरी आठवले ती हॉल मध्ये कॉम्प्युटर ठेवलेल्या टेबल कडे गेली, त्याच्या ड्रावर मधले तिचे कागदपत्र तिने घेतले. तिच्या धक्क्याने माऊस हलला, तर मॉनिटर वर तिच्या लग्नाचे फोटो होते. ते फोटो पाहताच तिला श्रेयस ने लग्नासाठी मागणी घातली तो दिवस आठवला.
घटस्फोट झाल्यामुळे ती आता घरीच आई बाबा कडे राहत होती. एके दिवशी श्रेयस आला आणि त्याने सरळ तिच्या बाबांकडे लग्नाची इच्छा सांगितली. तिच्या बाबांनी होकार दिला. तरीसुध्दा श्रेयस ने मानसी चा होकार असेल तर लग्न करेल अशी अट घातली. तिच्या बाबांना सांगितले की मी तिच्याबरोबर एकट्यात बोलतो. एका खोलीत जाऊन तो तिला बोलला, “मला बाहेरून माहिती पडलं की तुझं कुणाबरोबर तरी प्रकरण सुरू होत त्यानंतर तुझ्या नवऱ्याने तुला घटस्फोट दिला, मला नव्हतं माहिती की त्या रात्री तू माझ्याबरोबर राहिली म्हणून असे काही घडेल. मी तुझी माफी मागतो त्या रात्री मी जे काही केलं त्याबद्दल, आणि मी माफी तर नाही मागू शकत पण तू माझ्याबरोबर लग्न करणार ?”
तिने खूप विचार केला,
ती, “हो”
तो, “माझी एक मुलगी आहे.”
ती, “आपली”
त्यांचं दोघांचं लग्न झालं.
ती विसरून गेली होती की तिला बाहेर जायचं आहे. समोर मॉनिटर वर फोटो बघत असताना तिच्या लक्षात नाही आले की ती फोटो गुगल ड्राईव्ह वर बघत होती, हळू हळू खाली जात असताना तिला लग्नचे फोटो दिसत होते.
ती त्या फोल्डर मधून बाहेर आली. त्यानंतर बाहेर खूप सारे फोल्डर होते. ती खाली खाली जात होती. त्यामध्ये परी वाढदिवस, ऑफिस पार्टी, मानसी आश्याप्रकारचे खूप फोल्डर होते. तिने कॉलेज डेज म्हणून फोल्डर उघडले त्यात तिचे , माया, श्रेयस तिघांचे फोटो होते. त्यात सर्वात शेवटी एक फोल्डर होत “ती रात्र”. तिने ते उघडले त्यातला व्हिडिओ लावला.
डॉक्टर, “सांग तू असा कसा झाला, काय झालं होत तुझ्याबरोबर ?”
गुड्डू बोलत होता,
मी दहा वर्षाचा होतो तेव्हा सर्व जण मला गुड्डू म्हणायचे, मी खूप गोंडस होतो. तेव्हा आमच्या बाजूला एक दादा राहायचा. तो कायम समोरच्या ताई कडे बघत असायचा. काही सामान पाहिजे होत म्हणून आईने मला ताई कडे पाठवले. मी गेलो तेव्हा दरवाजा लावला होता. मी दरवाजा वाजवला पण कुणी दरवाजा उघडताच नव्हतं शेवटी दरवाजा उघडला, समोर दादा होता. मी विचारलं, “ताई कुठे आहे. ?”
तो, “नाही ती बाहेर गेली आहे”
मला काहीच समजले नाही. मी पुन्हा घरी जायला वळलो. मागून ताई चा आवाज आला, “गुड्डू”
मी मागे पाहिले तर ताई एका कोपऱ्यात पडली होती तिने काहीच घातले नव्हते. मला काहीच समजले नाही, तितक्यात दादा ने मला उचलले आणि आत घेऊन गेला मला कपाटात बंद करून टाकले. बाहेर ताई चा मोठमोठ्याने आवाज येत होता. अचानक आवाज बंद झाला. दादा ने दरवाजा उघडला ताई बेशुद्ध पडली होती. दादाने मला पकडले आणि माझे कपडे काढून टाकले आणि काय केलं मला काहीच समजत नव्हतं. मला खूप त्रास होत होता. मी सुद्धा बेशुद्ध पडलो होतो. मला जाग आली तेव्हा मी दवाखान्यात होतो. त्यानंतर मला मोठ्यांच्या बोलण्यातून समजले की ताई आणि माझं लैंगिक शोषण झाल होत. ते काय असतं ते मला समजत नव्हतं म्हणून मी ते अजुन जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्या गोष्टीच्या जास्तच आहारी गेलो. मला आता व्यसन लागलं होत, अश्लील चित्रफिती, मुलींबद्दल च आकर्षण यात पुरता गुंतलो होतो. मला आता शरीर संबंधांबद्दल अधिकच कुतूहल वाटत होत.
डॉक्टर, “त्या दिवशी रात्री काय घडल होत.”
गुड्डू पुढे बोलायला लागला,
श्रेयस झोपला त्यानंतर माझ्यात वेगळ्याच प्रकारची इच्छा होऊ लागली. मला समोर मानसी दिसत होती. तिच्या बरोबर मला माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. ती झोपली होती, मी तिच्या जवळ जायला लागलो. तिला जाग आली, तिने माझ्या मनातल हेरून घेतलं होत. तिला ही तेच हवं होत, लग्न झाल्यानंतर पण पती पासून दूर राहून आपल्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असल्या की काहीच सुचत नाही. मग आपण कुणाकडूनही त्या इच्छा पूर्ण करून घेतो. ती सुद्धा मला साथ देत होती. पण त्यानंतर मला अचानक गुंगी यायला लागली. माझं डोकं दुखायला लागलं आणि मी झोपलो. त्यानंतर मला काहीच आठवत नाही.
डॉक्टर, “माया बद्दल काही माहिती आहे का तुला ?”
तिला मी कॉलेज संपल्यावर एकदा भेटलो होतो. ती प्रेग्नंट होती माझ्यामुळे, त्यानंतर मी तिला कधीच भेटलो नाही.
सर्व हकीकत माहिती झाल्यावर मानसी खूप मोठ्याने रडायला लागली. तिला काहीच समजत नव्हतं आता तिने काय करायला पाहिजे. श्रेयस घरी आला बरोबर परी पण होती, anniversary असल्यामुळं तो घरी लवकर आला असावा. त्याने दरवाजा वाजवला तर तो ईशांत ने उघडला. त्याला श्रेयस ने विचारले इकडे कसा तर वहिनी ने बोलावून घेतलं, श्रेयस आत गेल्यावर तिथे त्याच्या ओळखीचे सर्व लोक होते. मानसी ने anniversary party ठेवली होती, श्रेयस बेडरूम मध्ये गेला. बाहेर परी ईशांत बरोबर खेळत होती. मानसी बेड रूम मध्ये आली, तिने श्रेयस ला टॉवेल देऊन फ्रेश व्हायला सांगितले. तो आत गेला, बाहेर आल्यावर तिने त्याला बेड वर बसवले.
मानसी, “तुझ्या कॉम्प्युटर मध्ये एक व्हिडिओ आहे. तो तू कधी पाहिला आहे का?”
श्रेयस, “कोणता ?”
मानसी ने मॉनिटर वर व्हिडिओ सुरू केला, व्हिडिओ संपल्यावर श्रेयस, “मी याची सीडी जाळून टाकली होती, तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला.”
मानसी, “गूगल ड्राईव्ह”
श्रेयस, “अच्छा, म्हणजे ते स्वप्न नव्हतं, खरंच त्या रात्री मी उठलो होतो, सीडी गुगल ड्राईव्ह वर टाकून मी झोपलो होतो.”
मानसी, “तुला आठवत नाही.”
श्रेयस, “नाही.”
मानसी, “नक्कीच गुड्डू ची करामत असणार”
श्रेयस, “मला माफ कर, मी लपवले”
परी रूम मध्ये आली. पण दोघांना बोलायचं होत म्हणून श्रेयस ने ईशांत ला बोलावून घेतलं, तो तिला बाहेर घेऊन जात होता,
ईशांत, “तुझं नाव काय?”
परी, “परी, पण शाळेतलं नाव सिया आहे.”
ईशांत,”छान, चल सिया आपण बाहेर जाऊ.”
मानसी श्रेयस च्या पाया पडून रडायला लागली, “मला माफ कर श्रेयस, मी खूप मोठी चूक केली आहे.”
श्रेयस तिला उभ करून,”शांत हो, रडू नको, काय झालं नीट सांग”
मानसी हुंदके देत बोलायला लागली,
मी जॉब करत असताना मला एक मुलगा खूप आवडतं होता, मी आणि त्याने लग्न करायचं ठरवल होत. पण माझ्या घरच्याचा विरोध होता, त्यांनी माझं लग्न लावून दिलं हे तुला माहिती आहे. पण त्यानंतर पण आम्ही दोघं सोबत असायचो. मला त्या लग्नातून सुटका हवी होती. तेव्हाच मला तू फेसबुक ला दिसला. माझा तुझ्यावर खूप राग होता, तो राग काढायचा होता म्हणून तुला बदनाम करायचा आणि लग्न मोडायचा सोबत प्लॅन तयार केला. त्या रात्री मी आणि सृष्टी आलो होतो, तेव्हा कुणी भाऊ नव्हता माझ्याबरोबरच माझा प्रियकर होता. आधीच्या दिवशी तू कुठे राहतो, कसा आहेस. बदलला आहेस का , तुझ्या बरोबर कोण राहत. तेच बघण्यासाठी सृष्टी आणि मी आलो होतो. सर्व व्यवस्थित वाटले म्हणून दुसऱ्या दिवशी मी एकटीच आले. मी तुला माझ्या जाळ्यात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला पण तू अडकला नाहीस. मला तुझी खुप दया आली होती, काहीपण झालं तरी कॉलेज च माझं पहिलं प्रेम आहे. तुला बदनाम नाही करायचं , फक्त माझं लग्न मोडायच हाच माझा प्लान होता. म्हणून तू बाहेर गेल्यावर मी तुझ्या पाण्याच्या बाटलीत झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. तुझ्याबरोबर नको त्या अवस्थेत फोटो काढले आणि ते घेऊन सकाळीच मी निघून गेले. पण मला नव्हतं माहिती तुझ्याबरोबर असं काही सुरू असेल. त्या फोटो मुले माझं लग्न मोडल, पण नेमके तू माझ्या घरी लग्न करायला आला. त्या आधी माझा प्रियकर लग्नासाठी आला होता पण बाबा त्याला नाही म्हणाले, आम्ही मार्ग काढणार होतो. पण बाबांना तुझ्यामुळे लग्न तुटलं हे माहिती होत म्हणून त्यांनी आपल्या लग्नाला होकार दिला. लग्नानंतर सुध्दा मी त्याला भेटायची. आज सुध्दा दुपारी आम्ही बरोबर होतो, तू आमच्या दोघांमध्ये आला म्हणून तुला त्रास द्यायचा म्हणून आज मी पळून जाणार होते पण तुझं सर्व खर माहिती पडल्यावर इच्छा नाही झाली तुला सोडून जाण्याची. तू त्या दिवसानंतर माया ला कधी भेटला होता का ?
श्रेयस शांततेत बोलला, “परी तिचीच मुलगी आहे, तिच्या डिलिव्हरी च्या वेळी माया गेली. परी ला सांभाळणार कुणी नव्हतं, कुणी तिला कबुल करत नव्हतं म्हणून मी तिला घेऊन आलो. तुझ्या नावाचा शेवट आणि माया च्या नावाचा शेवट म्हणून मी तीच नाव सिया ठेवलं होत. तू जा नको राहू इथे तुला जिकडे जायचं तिकडे जा. मी माफ केलं तुला, चूक माझी होती असं मला वाटायचं पण माझ्या डोक्यावरचं ओझ आता हलकं झाल आहे.”
मानसी, “सॉरी श्रेयस, परी ला माझी गरज आहे, राहू दे मला सोबत तिच्या.”
तो रागात उठून बाहेर गेला, मानसी तिथेच रडत होती. त्याच्या ऑफिस मधून लोक आले होते, तो त्यांच्या बरोबर बोलत होता. अचानक मानसी ला श्रेयस चा आवाज ऐकू आला, “मानसी”
ती डोळे पुसून बाहेर आली. त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
श्रेयस परी कडे हात करून, “ती माझी मुलगी सिया”
मानसी च्या खांद्यावर हात ठेऊन, “माझी लाईफ माझी वाइफ मानसी”
मानसी कडे पाहून श्रेयस हसला आणि तिच्या गालावर हाथ फिरवून, “जा केक घेऊन ये केक कापू”
श्रेयस ने तिला माफ केलं होत, कारण चूक तिची पण नव्हती त्याची पण नव्हती. तरी सुद्धा चूक दोघांची होती. श्रेयस च लग्न झाल्यानंतर गुड्डू चा त्रास कमी झाला होता. मानसी आणि श्रेयस आता बरोबर राहत होते. मानसी ने त्या माणसाबरोबर चे सर्व नाते मोडून टाकले होते. मानसी आता फक्त श्रेयस ची होती. माया ची मुलगी माहिती पडल्यावर मानसी च सिया बद्दल च प्रेम अजूनच वाढलं होत.
सर्व चांगलं सुरू होत पण आता एकच वाईट गोष्ट बाकी होती. गुड्डू ला बाहेर कसं काढायचं. गुड्डू कुणी माणूस नाही ये ती मानसिकता आहे. ती बदलली पाहिजे. जे मनात येत ते आपण रोखू शकत नाही पण ते सत्यात साकारण्याच आपण थांबाऊ शकतो .
एका महान मानसरोगतज्ञाने म्हटलेच आहे,
सज्जन कोण तर ,
दुर्जनांनी प्रत्यक्षात केलेल्या कृतीचा जो मनात विचार करतो तो सज्जन.

THE END …. – दुर्गेश यशवंत बोरसे