After Married life - 1 in Marathi Fiction Stories by shraddha gavankar books and stories PDF | लग्नानंतर च आयुष्य.... - 1

Featured Books
 • The Mystery of the Blue Eye's - 6

  दरवाजा एक बुजुर्ग आदमी खोलता है और अपने चौखट के सामने नौजवान...

 • पागल - भाग 40

  भाग–४० मिहिर और निशी भी जल्दी राजीव के घर पहुंच गए । सभी राज...

 • जादुई मन - 15

  जैसे जाते हुए किसी व्यक्ति की गर्दन पर नजर जमाकर भावना करना...

 • द्वारावती - 34

  34घर से जब गुल निकली तो रात्रि का अंतिम प्रहर अपने अंतकाल मे...

 • डेविल सीईओ की मोहब्बत - भाग 6

  अब आगे, आराध्या की बात सुन, जानवी के चेहरे पर एक मुस्कान आ ज...

Categories
Share

लग्नानंतर च आयुष्य.... - 1

प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा आहे.कथाच नाहीतर हे खरा प्रसंग आहे........


भाग १

मी एका सध्या कुटुंबा मध्ये राहणारी साधी मुलगी परिवार तसा मोठा अगदी गोकुळ जस आजी-आजोबा आई वडील आम्ही ४ भावंडं ३ बहिणी आणि सर्वात छोटा भाऊ माझा तसा मधला नंबर, मोठ्या ताईच्या नंतर चा, माझा स्वभाव तस सांगता येणार नाही पण मी होते खूप हट्टी एकदा बोलायला लागले की खूप बोलेल नाहीतर काहीच नाही खूप शांत अशी तस राग खूप लवकर येतो पण मनात काहीच नाही अगदी प्प्रेमळ.

आम्ही ४ भावंडं सर्वच लाडके पण मला वाटायचं मी जरा जास्तच लाडकी होते . मला एखादी गोष्ट आवडली कि मला ती पाहिजेच असं होत माझं.पण सर्व हट्ट पुरवायचे माझे वडील घरात मी एक वेळेस कोणाचं काही ऐकत नव्हते.पण वडिलांचा शब्द काहीच खाली पडू दिला नाही. त्याच मुळे मी जरा जास्त लाडाची होते.माझं सांगायचं झाल कि मी घरात कधीच जास्त लक्ष दिल नाही. माझी शाळा माझ कॉलेज आणि अभ्यास फक्त त्या मुळे घरातील काम कधी केलेच नाही स्वयंपाक तसा खूप छान बनवत होते. तस सर्व जण नाव देखील काढायचे जास्त काही नाही पण थोडं फार येत होत सर्व कधी गरजच पडली नाही जास्त काम करायची घरा मध्ये आजी आई आणि मोठी ताई करत असे सर्व म्हणून मी कधी केलं नाही. पण खरं सांगायचं झाल तर मला कंटाळा हि खूप होहोता.मला रागवत असे आई पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे त्या मुळे सर्व माझ्या मनासारखं ह्ह्यायचं.

मोठी ताई आणि मी सोबतच कॉलेज ला जायचो त्या मुळे आम्ही अगदी मैत्रिणी जश्या सर्व ऐक मेकींना सांगायचो ताईचा स्वभाव खूप छान कधीच रागवत नव्हती. मी लहान असून सुद्धा माझ ऐकून घेत कारण घरा मध्ये दादागिरी माझीच चालत असे तस ताई मध्ये आणि माझ्यात फक्त २ वर्ष्याच्या फरक त्या मुळे आम्ही छान राहायचो ताई मोठी असल्या मुळे तीच लग्न झाल पण मला काही करमत नव्हतं तशी ती तिच्या संसारा मध्ये खुश होती अगदी मजेत


आत्ता ताईच्या लग्ना नंतर घरा मध्ये मीच मोठी म्हणजे लग्न करायचा माझा नंबर तस मी अगोदरच सांगितलं होत मला नाही करायचं एवढ्या लवकर कारण मी कस राहणार तुमच्या पासून दूर मला नाही जायचं तुम्हाला सोडून असच बोलायचं मी नेहमी पण घरचे काही ऎकत नव्हते तसे वडील ऐकायचे पण आजी आणि आई नव्हत्या ऐकत त्यांनी मला खूप समजून सांगितलं पण मी काही ऐकत नव्हते तरी एक आखरी वेळेस माझे वडील मला बोलले तुला नाही करायचं ना एवढ्या लवकर नको करू पण बघायला येतात त्यांना येऊन जाऊदे मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि तयार झालेकसा वाटला हा भाग नक्की कळवा पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहे........


धन्यवाद................