Thodasa is in love, there is little left…. - 10 books and stories free download online pdf in Marathi

थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी .... - 10

आदी आणि अरोही बाहेरून जाऊन घरी आले .दोघेही खुश होते .दोघांचा ही मूड चांगला होता ...पण एका व्यक्तीचा मूड मात्र अजिबात चांगला नव्हता . आदी च्या आई चा ......तिला आदी आणि अरोही च अस एकत्र बाहेर फिरायला जाणे तिला अजिबात आवडले नव्हते .ती आदी आणि अरोहीशी जरा वेगळीच वागत होती . दोघांशीही ती मोजकेच वागत होती .आदींच्या आणि अरोही च्या दोघांच्या ही ते लक्षात आले होते . पण आदी ने आईला समजावले ... मग आईचा रुसवा थोडासा कमी जाहला. पण अजून ही तिचा अरोही शी रुसवा मात्र कायम च होता ....अरोही ला हे खूप खटकले ......पुढे नेहमी असेच घडू लागले ...जेव्हा कधी अरोही आणि आदी बाहेर जात ...तेव्हा आई अरोहीवर रुसून बसत . आदी च्या आई च्या अश्या वागण्यामुळे ....अरोही ला मानसिक खूप त्रस्स होऊ लागला होता .तिने अदीशी ह्या बाबतींत बोलायचे ही ठरवले ...पण बिचारा आदी काय बोलणार. शेवटी हळू हळू त्याने अरोही ला बाहेर नेह्नेच बंद केले . आणि जेव्हा कधी बाहेर जात ते दोघे तेव्हा सोबत आई ला ही घेऊन जात . जाहले .....आता अरोही वर अनेक बंधने येऊ लागली . साडी च घाल, ड्रेस घालू नको ..... ई कडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको ,..आदींची आई आणि बहीण दोघीही तिला अनेक बंधने टाकू लागली . अरोही आता घरात च राहू लागली .दिवसभर घरातील कामे करणे .......एवढच तीच आयुष्य उरले होते .त्यामुळे तिची आता चिडचिड होऊ लागली होती . आणि त्या चिड्चिडिचा त्रस्स आदी ला होत होता . तो दिवसभर ऑफीस मधे असे ...घरी यायला खूप उशीर होई . आणि कामावरून गेल्यावर आदी खूप थक्लेला असे . ह्याचा परिणाम असा की, अरोही ला आता वाटायला लागले होते की, आदीच तिच्यावर प्रेम नाहीए... तिने जी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, ती ही नाहीतच ...... अरोही एकांतात खूप रडत असे .....आदिला आपला जोडीदार निवडून आपण चुकी तर नाही केली ना ....आणि जरी चुकी केली ....तरी आपण ती चुकी काय सुधारू शकत नाही ...जे आहे ते अस आहे .आणि ह्या पुढे काही जाहाले तरी हेच आपल्याला स्वीकारायचे आहे .
आदींच्या आई च आणि त्याच्या बहिणीचे अरोही वर एवढे प्रेशर असे की, सतत कशावरून न कशावरून बोलायचे . ह्याचा परिणाम असा की ती आता नाराज राहू लागली होती . आपल सतत काहीतरी चुकतय .अस तिला वाटत असे .... आपण, आयुष्यात काहीच करू शकत नाही . अस, तिला वाटू लागले .. ती आता शांत शांत राहू लागली . कोणाशी फारसे बोलायचे नाही .... बाहेर कुठे जायचे नाही ..... आपल्या कामाशी काम ठेवणे . तिच्या ह्या वग्न्याबब्तीत ही तिच्या नणंद आणि सासूबाई तिला नावे ठेवत ....आदींचे ही कान भरत ......पण आदी ला कोणाची बाजू घ्यावे कळतच नसे ... त्यामुळे तो शांतच बसे .कधी कधी आई ला आणि बहिणीला काही बोलता येत नाही, म्हणून .......कधी कधी तिची चुकी नसताना ही तिला बोलावे लागे . पण ....ह्या सगळ्याचा अरोही ला मात्र खूप जास्त त्रस्स होत होता . आणि तेवढाच त्रस्स आदिला ही होत होता . शेवटी प्रेम असच असत .......निरागस, गोंडस ....निःस्वार्थी.....
एक दिवशी अरोही चे बाबा तिला भेटायला आले .त्यांना अरोही त खूप बदल दिसले . तिची तब्येत उतरली होती . चेहरा ही खूप उतरल्या सारखा वाटू लागला होता . चेहऱ्यावरच हसूच गायब जाहले होते . अरोही च्या बाबानी तिला अस कधीच पहिले नव्हते . त्याच्या मनात अनेक विचार यायला लागले . आपण ....अरोही च लग्न अदीशी करून काही चुकी तर नाही ना ...केली .ह्या बाबतींत अरोही शी बोलावेच लागेल . पण, एथे कसे बोलायचे ? घरातले काय म्हणतील? आणि कदचित अरोही ही एथे मोकळेपणाने बोलू शकत नाही ......मग, अरोही च्या बाबानी एक मार्ग काढला .त्यानी आदींची आणि आदींच्या आईची परवानगी काढली ..आणि तिला चार दिवस माहेराला घेऊन गेले .
अरोहीला माहेरी आलेले पाहून तिच्या आई ला फार आनंद जाहला . पण ....तिला ही अरोही मधे थोडा बदल जाणवला . पण ...तिने अरोही ला काही विचरले नाही .संध्याकाळी अरोही च्या आई ने सगळा स्वयंपाक तिच्या आवडीचा बनवला . पण ...तिथे ही अरोही काही नीटशी जेवली नाही ....आणि जेवण करून झल्यावर गप्पा मारण्यासाठी न थांबता सरळ बेडरूम मधे झौपय्ल निघून गेली . रात्री किचन आवरून झल्यावर आई आणि बाबा बोलत असताना दोघांच्या ही लक्षात आले .की .....अरोही च्या वागण्यात बदल जाणवतोय ....तिच्या मनात काहीतरी आहे ...आणि, ते ती कोणालाच सांगू शकत नाही . पण अरोही च्या आई ला प्रश्न पडला की, अस, तिच्या मनात काय आहे? की, ती आपल्याला सूध्हा सांगू शकत नाही . अरोही च्या बाबानी अरोही च्या आई ला ....काहीतरी निमित्त काढून अरोही शी बोलायला संगितले . पण ....आई च्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालु होते .
अरोही महेराला येऊन दोन ते तीन दिवस जाहले होते . आता ती थोडी रेलय्क्स जाहली असेल ...म्हणून ......आई ने तिच्याशी बोलायचे ठरवले ...आज दुपारी घरात कोणी नव्हते ....अरोही च्या आई ला चांगली संधी मिळाली होती .तिने कपाट आवारायच्या निमित्त ने अरोही ला बोलवले .आई च्या बोलण्यावर अरोही तिथे आली . कपाटा तील जुन्या वस्तू पाहून तिला खूप आनंद जाहला. तिच्या चेहऱ्यावर तो दिसू लागला ...तिने कपाटातून जीन्स काढली . ती तिची अव्ड्तिचि जीन्स होती .तिने ती जीन्स घातली .तर, तिला ती जीन्स आहे त्या पेक्षा सैल होऊ लागली . ती आई ला म्हणली ....तब्येत कमी जाहली ना मझी ....आई ने ही फार काही न बोलता होकारार्थी मान हलल्व्ली. तिने कपाटातून अनेक वस्तू काढल्या ...तिची अभ्यासाची पुस्तके ...रात्ररात्र जागून काढलेल्या नोट्स ....तिचा आवडीचा बाहुला ....तिचा लेपटॉप ..... नोत्प्यड, तिच्या कॉलेज मधे जिंकलेल्या ट्रॉफी..... बरच काहीही ....एकेकाळी हे सगळ तीच आयुष्य होत .त्यात ती रमय्ची...नवनवीन स्वप्ने बघायची ....बिनधास्त जगायची ...आवडेल ते करायची . पण ....आता .....आता काय करते ? काहीच नाही..... त्या कप्टाट्ल्या जुन्या वस्तुत तिला तिचा शोध लागला ....तिला काय हवं होत? तिची स्वप्न काय होती? पण ....घरचे ....तिचा लगेच चेहरा पडला .तिच्या आई ने तिचा पडलेला चेहरा बघितला ...आणि तिच्या मनात चलेली घालमेल ओळखली .....तिने तिच्या समजावण्याचा सूर धरून ...ती अरोही ला म्हणली ....अरोही ........ नवीन आयुष्य स्वीकारावे ग..... पण, जुने सोडून नाही ग ......स्वतहाच ....अस काहीतरी नेहमी स्वता जवळ ठेवावे ... जे आपल्याला आपली, आपल्या अस्तित्वाची, आपल्या स्वभीमानची नव्याने ओळख करून देईल . अरोही ला समजले ...की आई ला तिला काय सांगायचे ते .....आणि ह्या पुढे तिला काय करायचे ते ... तिच्या मनाने पक्का निर्णय घेतला ...ती आई ला काही बोलली नाही ...पण, तिच्या कडे बघून आई ला समजले .....की, तिला जे सांगायचे होते ...ते अरोही ला नीट समजले ...आणि आता तिला तिचे ध्येय समजले आहे .