Padchhaya books and stories free download online pdf in Marathi

पडछाया - भाग - ४



कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिंदगी है बहेने दो
प्यासी हू मै प्यासी रहेने दो

स्टेला गुणगुणत होती .. तिचं ते आनंदाने व्यक्त होणं मानसी अनुभवत होती.. स्टेला तल्लीन होऊन गात होती .

कभीतो कुछ ऐसा हि हुआ था
निंद मे तूमने जब छुआ था
गिरते गिरते बाहो मे बची मैं
सपने पे पांव पड गया था
सपनो मे बहेने दो
प्यासी हू मै प्यासी रहेने दो

गाता गाता स्टेलाचं लक्ष, तिथे उभ्या असणाऱ्या मानसीकडे गेलं... तिने गायचं बंद केलं..
" अरे थांबलीस का? किती छान वाटतं होतं ऐकायला.. " मानसी म्हणाली.
" विहूला खूप आवडतं हे गाणं.. " स्टेला म्हणाली .
" खूप प्रेम करतात ना तुझ्यावर.. " मानसीने विचारले.
" जीवापाड.. हि इज जॉली पर्सन.. केवळ त्याच्यामुळे जिवंत आहे मी.. " स्टेला म्हणाली .
" तुमची भेट कशी झाली? " मानसीने विचारले.
" माय पा.. हि वॉज सर्व्हन्ट.. ते ड्रायव्हर होते विहानच्या बाबांकडे.. एकदा दोघे कुठेतरी जातं होते.. असिसिडेन्ट झाला.. बाबा जागीच गेले.. पा मात्र वाचला.. पण पाय गेला.. सारं दुःख विसरुन विहान आमच्या मदतीला धावला.. हॉस्पिटलचा खर्च.. माझ्या शिक्षणाचा खर्च तो करायचा.. एकदा तो आमच्या घरी आला.. येताना भिजून आला.. कपडे बदलून कॉफी दिली.. भिजल्यामुळे थंडी वाजत होती.. तापहि भरला होता.. पा ने त्याला रहायला लावलं.. पा झोपल्यावर.. सूप दयायला म्हणून गेलो.. थंडीने कापत होता.. मला काहीच सुचतं नव्हतं.. पा पेनकिलर घेऊन झोपला होता.. कुठल्याशा फिल्म मध्ये पाहिलेलं आठवलं शरीराची उब.. मी कपडे उतरवून पांघरुणात शिरलो.. त्याला उब मिळाली.. पण आमच्यात.. " स्टेला सांगत होती .
" मग प्रेम जडलंय.. कधी कळलं?... " मानसीने विचारले.
" त्यादिवशी घडून गेलेला तो प्रणय मी विसरु शकत नव्हते .. पण विहान त्याला घडलेली चूक समजत होता.. तो बरेच दिवस आमच्यघरी फिरकला देखील नाही.. पा खूप आजारी होता.. मी येशूजवळ प्रे करायचे .. त्याच्याशिवाय कोण होतं मला.. पण जे घडणं अटळ होतं ते घडलं.. पा मला एकट्याला सोडून निघून गेला... मी कोलमडून गेले .. हि बातमी कुठून विहानला समजली माहित नाही.. एक दिवस मी पा च्या आठवणीने रडत होते .. तो आला..
" मला कळवावंस नाही वाटलं.. एव्हढं परकं समजलीस? " विहान म्हणाला.
" माझ्या ध्यानात नाही आलं.. आय वॉज इन सॉरो.. प्लीज फरगिव्ह मी.. " मी म्हणाले .
" वेडी आहेस का? माफी तर मी मागायला पाहिजे.. तुझी.. तू सेवाभावाने माझ्या जवळ आलीस.. अन मी मात्र.. " विहान म्हणाला.
" आता तू वेडेपणा करतो आहेस.. तू कुठल्या भावनेने ते केलंस मला माहित नाही.. पण मी मात्र.. " मी अडखळले .
" तू मात्र.. तू मात्र? काय? " विहान म्हणाला.
" ते बोलायची हि वेळ नाही.. माझा पा.. त्याच्या जाण्याच्या दुःखात आहे मी.. फक्त स्वतःला गिल्टी नको समजूस.. लेटस फेर्गेट.. विसरुन जा सारं.. " मी म्हणाले .
त्या दिवसापासून विहान रोज माझ्याजवळ येऊ लागला.. काळजी घेऊ लागला.. आमच्यात मैत्रीच्या पुढं असं काहीतरी फुलू लागलं.. एक दिवस मी कन्फेस केलं.. त्यानेही स्विकारल आमच्यात असणारं बॉण्डिंग.. लव्ह..
आम्ही प्रेमात खूप पुढे गेलो.. इतके की मॅरेज करुन संसार करण्याची स्वप्नं पाहू लागलो.. त्याने माझ्याशी लग्न करायच वचन दिलं.. पण हे कसं शक्य होतं.. " रोमील म्हणाला.
" खरंच किती प्रेम आहे ना एकमेकांवर.. " मानसी म्हणाली.

विहान ऑफिसला गेला की मानसी स्टेलाची काळजी घेऊ लागली.
" तूझा नवरा कुठंय? " स्टेलाने विचारले.
" तो इथे नसतो.. नोकरी निमित्ताने परदेशी गेलाय.. मी अशी अवघडलेली आहे म्हणून इकडे आलेय. " मानसी म्हणाली.
" विहू अन तूझा नवरा मित्र आहेत का? " स्टेलाने विचारले.
" नाही.. माझा नवरा आईला आईचं मानतो.. " मानसी.
" अच्छा.. म्हणजे यू आर फॅमिली.. " स्टेला म्हणाली .
" हो.. आईंना सासूचं मानते.. त्या सुद्धा मुलीसारखं प्रेम करतात. " मानसी म्हणाली.
" मलाही तूझी बहीणच समज.. " रोमील म्हणाला.
" मला जवळच असं कुणी नाही... आज बहीण मिळाली .. " मानसी म्हणाली.
" मला ना चाईल्डस फार आवडतात.. आता विहुला सांगणार आहे.. एक मुलं अडॉप्ट करायला लावणार आहे.. घरात एखादं मुलं नको.. विहान येईल इतक्यात.. मी येते . " स्टेला म्हणाली .
स्टेला गेली अन मानसी विचारात गुंगून गेली..आपलं आपल्या बाळाचं भविष्य.. ती विचार करु लागली..
इतक्यात विहान आत आला..
" अहो.. स्टेला ने पाहिलं तर?... " मानसी म्हणाली.
" यासाठीच तूला म्हणालो होतो.. तिला इथे नको आणूया..
पण तू हट्ट करुन आणायला लावलं. " विहान.
" तुमची किती फरफट झाली असती. " मानसी.
" पण हे नाटकं करायला लागतंय.. आपली बेडरुम सोडून इथे रहातेस.. बायको असूनही तिला खोटंच सांगायला लागतंय.. " विहान.
" तिला एक ना एक दिवस सत्य सांगावं लागणार आहेच की.. अन नाही सांगितलं तरी माझी काहीच हरकत नाही. " मानसी म्हणाली.
" पण आता मला तूला सोडून नाही रहावतं.. ती झोपल्यावर रात्री तुझ्याजवळ येणं.. तिच्या नकळतं तुझी काळजी घेणं.. " मानसीला मिठीत घेत विहान म्हणाला.
" पण स्टेलाला कळूनये म्हणून नाटकं करतो आहोत.. पण ती तुमचं पाहिलं प्रेम आहे विसरु नका. " मानसी म्हणाली.
रोमील येण्याची चाहूल लागली म्हणून दोघे बाजूला झाले.
" डार्लिंग.. तू इथे आहेस हो.. मी तूला घरभर शोधत होतो.. " स्टेला म्हणाली .
" मानसीला काय हवं नको ते विचारत होतो. " विहान.
" सो स्विट.. " स्टेला कॉफीचा मग समोर करत म्हणाली .
" स्टेला .. तू कशाला केलीस? मी केली असती.. तूला पण आराम करायला हवा. " मानसी.
" माझ्यापेक्षा तुझी काळजी घेणं महत्वाचं आहे.. हो ना डार्लिंग.. " स्टेला विहानकडे पहात म्हणाली .
विहान आपली चोरी पकडल्या गेल्या सारखा खजील झाला...

रात्री दरवाजा बंद करुन विहान बेडवर आला.. मानसी गाढ झोपेत होती.. विहान तिच्या बाजूला झोपला.. तिच्या चेहेऱ्यावर असणारे निरागस भाव पाहून त्याला गलबलून आलं..
" हिचा दोष नसताना.. हे सर्व फेस करावं लागतंय हिला.. स्टेला .. ती सुद्धा विश्वासाने माझ्या कुशीत विसवते .. दोघांना फसवतोय.. परमेश्वरा मला क्षमा कर.. " विहान विचारा होता.
" कसला विचार करताय.. झोप नाही येतं? " मानसी.
" तुम्हां दोघांना फसवतोय.. माझं मन मला खातंय.. " विहान म्हणाला.
" तुम्हाला तर सांगितलं त्यादिवशी.. माझं प्रेम.. माझा हिस्सा मला मिळतोय.. मी परिपूर्ण झाले.. आता तुम्ही ततिच्या सोबत वेळ घालवा.. तो लवकरच ठिक होईल.. " मानसी म्हणाली.
" तू खूप महान आहेस मनू.. तुझ्या लायकीचा मी नाही.. " विहान म्हणालास.
" आणि मी ज्याला आपलं सर्वस्व दिलंय.. तो किती महान असेल हयाचा विचार करा.. " मानसी.
विहानने मानसीला मिठीत घेतले...

|| क्रमशः ||